माझ्या वडिलांनी गणाला आणिलं अनवाणी | VIKAS LAMBORE GAN 2024 | विकास लांबोरे गण 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024

КОМЕНТАРІ • 121

  • @satishnevarekar2329
    @satishnevarekar2329 Місяць тому +34

    ह्याला बोलतात वैचारिक बुध्दी,ह्याला बोलतात एमपीएससी च शिक्षण,की जुन्या गोष्टी अभ्यासत्मक विचार करून त्या वेळी पैसा नव्हता एवढा पण त्या गणपती सणाला नैसर्गिक रीत्या परी परिन असलेलं योगदान त्यातूनही सण आनंदात साजरा होत होता........बुवा खूप छान 👍

  • @Vaibhavsrv91
    @Vaibhavsrv91 Місяць тому +22

    शाहीर विकास लांबोरे ....खरतर मुंबई पुण्यातून कोकणात जायला ८-१० तास लागतात पण हा अवलिया आपल्या ५ मिनिटांच्या गाण्यात आपल्याला कोकणात घेऊन जातो....लांजा तालुक्यातील विवली हे त्यांचे गाव... दुर्गम भागात राहून गावच्या मातीशी नाळ असलेला हा कलाकार....प्राथमिक शिक्षण गावात आणि ११-१२ सालपे गावात नातेवाइनकाकडे राहून शिपोशी गावात शिक्षण घेतले....नुकताच त्यांनी MPSC परीक्षेतून सरकारी नोकरी मध्ये प्रवेश केला आहे....असं असल तरी वेळात वेळ काढून हा माणूस आपली कला जपत आहे दिवसेंदिवस त्यात सुधारणा करत शक्ती तुर्याला एका नव्या उंचीवर नेऊन लोकसहभाग वाढवायचं काम करत आहे...सध्याच्या अश्लीलतेच्या शक्ती तुर्याच्या जमान्यात विकास बुवा म्हणजे देवाने शक्ती तुरा सावरायला पाठविलेले देवदूत असल्या सारखे काम करत आहेत ...गेल्या वर्षी गणेश उत्सवाच्या काळात आलेलं आईसाठी लिहिले त्याच गाणं "सांग चाल आई काय काय आणू गणपतीला" हे प्रत्येक गावाबाहेर राहणाऱ्या आणि आई वडील गावी असणाऱ्या माझ्या सारख्या कोकणी माणसाला डोळ्यात अश्रू उभे करायला लावणार गाणं लोकांना खूपच आवडलं... या वर्षी नुकतच त्यांनी सादर केलेलं गाणं वडिलांसाठी आहे..१५-२० वर्षांपूर्वीचा काळ आपण आठवला तर गावात जायला रस्ते नव्हते शेताच्या बांधावरून नदी नाले पार करून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आण्यासाठी वडिलांचा जो उत्साह असायचं त्याच वर्णन करणार गाणं ...जगाचा बाप असणारा बाप्पाला पोटाच्या पोराप्रमाणे सांभाळून आणतोय आपला बाप ...मखरात बसवतो आणि सांगतो आता तू मला सांभाळ ...माझ्या परिवाराला सांभाळ...आता या सगळ्या सुख सुविधा आल्या...घरासमोर गाडी लागते आणि आपण बाप्पाला घेऊन येतो,,,तिथून अंगणात येई पर्यंत फक्त एखादा खडा आपल्या पायाला लागला तर लागला...आपल्याला सवय नाही खडयनची ...पण तुमचा आमचा बाप २०-२५ वर्ष पूर्वी जेव्हा तुम्ही लहान होतात त्यावेळी ३-४ किलोमीटर एवढं अंतर अनवाणी पायानी तो बाप्पाला कसा आणत असेल ...सवेंदनशील मनाचे विकास बुवा आणि त्यांचे आई वडील याना साष्टांग नमस्कार ...🙏🏻
    🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
    गणा माझ्या बालपणी, होत्या वाटा आडवळणी
    कोसो मैल दूर चालुनी, दगड धोंडे कट्ट्यातूनी
    त्या वाटेने माझ्या वडिलांनी, आणील तुला अनवानी
    गणा माझ्या बालपणी, होत्या वाटा आडवळणी
    बांधील मखर काम्बीत चिव्यानं,दार वर्षाची चादर बांधिली नव्यानं
    काकडी चिबूड ठेवून तुझ्यापुढं, रान फुलांची भेट दिली भादव्यानं
    भात हरकाचा ठेविला निवेद, हात तुला जोडुनी
    गणा माझ्या बालपणी, होत्या वाटा आडवळणी
    जुन्या मेंढीचं केंबल्याच घर, एका आढ्याखाली गुरु ढोर पोर
    कुंबायचं बंध दावणीला ढोर, अवजार ऐवज सार दाराम्होर
    वसा हा अखंड कधी पडला ना खंड, बाप असा खानदानी
    🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

    • @VikasLambore
      @VikasLambore  Місяць тому +1

      Thank you so much 😊

    • @pareshpujari9210
      @pareshpujari9210 Місяць тому +1

      Kup chan

    • @user-jy5gh6xb1t
      @user-jy5gh6xb1t Місяць тому +1

      ❤❤🙏🙏 खूप छान

    • @rupeshkhale9166
      @rupeshkhale9166 25 днів тому

      ही गाथा वाचल्यावर प्रत्येकाला आपले बालपण नक्कीच आठवत जाईल ...
      अशी ही लेखणी सुंदर अप्रतिम ❤

  • @harishelake1418
    @harishelake1418 Місяць тому +16

    लवकरच ह्याच रेकॉर्डिंग पण येवुदे ..ह्या वर्षी हाच गण गाजणार गणपतीत

  • @pradipmodakepandurang1225
    @pradipmodakepandurang1225 Місяць тому +7

    माऊली अंगावर काटा आला सत्य परिस्थिती मांडली अत्यंत सुंदर काव्य

  • @sakshibaikar4366
    @sakshibaikar4366 Місяць тому +5

    ❤❤❤❤❤❤
    दादा कधीपासून तुमच्या गाण्याची वाट पाहत होते.
    तुमचे शब्द तो काळ जगवतात मला.
    पाहिले गणपतीचे दिवस आठवले.
    मागच्या वर्षीच माझ्या बाप्पासाठी हे तुमचं गाण मी आमच्या गावी मुलांच्या नाचात बोलले दादा.
    सर्वांना खूप खूप आवडलं.
    तुम्हाला खूप खूप धन्यवाद दादा.
    तुमच्यामुळे अशी परिस्थितीसी वास्तव वादी गाणी ऐकायला मिळतात.

  • @KokaniSwargकोकणीस्वर्ग

    विकास दादा खरंच आज सर्वांना दाखवून दिलात तुम्हाला शब्दांचा जादुगार का म्हणतात ते सुंदर गण झाला आहे जे आपण जुणे दिवस जगलोय ते हुबेहूब तुमच्या शब्दात उतरतं ❤❤❤❤❤❤

  • @shamshitap
    @shamshitap Місяць тому +5

    विकास दादा जबरदस्त गण अंगावर काटा आला नक्कीच गाजणार ...🫶👌👌🔥🔥

  • @adishriproduction
    @adishriproduction Місяць тому +9

    जगलो ते दिवस
    राहिल्या त्या आठवणी,
    शेवटी बाप तो बाप,
    लेकरासाठी चाले अनवाणी..!
    शब्दांचा जादूगार
    गातो मुखी गाणी,
    नक्कीच गाजणार ही वाणी...!!

  • @akshaybhovad5568
    @akshaybhovad5568 Місяць тому +8

    प्रत्येक गीतातुन नविन काहीतरी देता माऊली❤ ❤❤❤

  • @pradipmodakepandurang1225
    @pradipmodakepandurang1225 Місяць тому +6

    हे गाणी शूट झालं पाहिजे ❤❤

  • @yogesh_lambore
    @yogesh_lambore Місяць тому +7

    कोकणी शब्दांचा मालक....
    शाहीर...Class हो तुम..!!❤

  • @user-en2fh5ni7w
    @user-en2fh5ni7w Місяць тому +6

    तुम्हाला कोणत्या शध्दात वर्णन करू कळत नाहि शाहीर तुम्ही हिरा आहात आज आजी आजोबांच्या काळाची खायला अन्नाची वणवण आज जिवंत करून दिली सलाम तुम्हाला आई नवलाईची कृपा तुमच्यावर अशीच राहो

  • @user-uh5gk9wu6s
    @user-uh5gk9wu6s Місяць тому +4

    विकास सर यांना एक विनंती अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक गीत... सादर करावे.. 🙏 कोंकणी कलेचा चाहता म्हणून एक मागणी आहे.

  • @mahendradhanvade5933
    @mahendradhanvade5933 Місяць тому +5

    माऊली खूप छान गण आहे. पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या . आम्ही सुद्धा अनुभवलय् हे दिवस .तुमच्या लेखणीला सलाम❤❤..
    **प्रत्येक गाण्याला साजेल अशी चाल निवडता तुम्ही ,ही तुमची खाशियत आहे...

  • @AjayGurav272
    @AjayGurav272 Місяць тому +5

    आयुष्याचा जिवंत देखावा म तो पुर्वीचा असो वा सध्याचा तो आपल्या लेखणीतून व सुदंर आवाजातुन रसिकांच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा करणारा अवलिया म्हणजे शाहिर विकास लांबोरे .. गुरुमाऊली सलाम तुमच्या विचार सरणीला व लेखणीला..❤️🥰

  • @user-di1rd5sq9y
    @user-di1rd5sq9y Місяць тому +3

    लेखणीच्या बादशाह....
    शाहीर हे सुर नव्हे
    अंतर्मनातील आवाज आहे हा 🥹🙂❤😊

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 Місяць тому +2

    बुवा तुमच्या विचारणी सरणीला आणि शब्दरचनेला सलाम ....गण एकताना अंगावर शहारे आले ...जबरस्त बुवा 🙏🙏🙏

  • @dineshkumbhar9344
    @dineshkumbhar9344 Місяць тому +3

    कसं विसरु मी तुला कान्हा रे या गवळणीची चाल आहे पण अप्रतिम गण झालाय यावर्षी सुद्धा गेल्या वर्षी सारखाच सारका गाजणार 🙏🙏

  • @vishwajittambitkar2004
    @vishwajittambitkar2004 Місяць тому +4

    खुप छान शाहिर विकास लांबोरे दादा❤😍 आपल्या मातीतले बोल तुम्ही जपत आहात खरच खूप छान लेखनी 👌 तुमची गाणी, काव्य रचना लेखनी , आवाज खुप गोड सुंदर आहे, ❤ नवीन काही ऐकायला मिळते ते तुमच्या काव्य लेखनीतुन आणि ते खुप आवडते , मनोरंजनाचा बादशाह, शब्दाचा जादुगार, समाज प्रबोधन गीतकार असा एक लोकप्रिय शाहिर
    शाहिर विकास लांबोरे दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा💐💐💐👍👍😍

  • @sandeshnarkar3295
    @sandeshnarkar3295 22 дні тому +1

    खूप सुंदर लेखणी आणि आवाज

  • @sunilkondaskar414
    @sunilkondaskar414 Місяць тому +2

    काही तरी नवीन नेहमीच देता तुम्ही शब्द नाही आमच्या कडे काय बोलावं, शब्द वरची कमांड तर अप्रतिम ❤❤

  • @ratneshbait4395
    @ratneshbait4395 Місяць тому +1

    अगदीच हुबेहूब पूर्वीचा गणपती सण डोळ्यासमोर आणला अप्रतिम शाहीर विकास दादा लांबोरे..गुरु शिष्याची उपमा तंतोतंत लागू पडते...गणा माझ्या बालपणी होत्या वाटा आडवळणी..कविमानातलं सुंदर शब्दांकन....गीताला साजेसं संगीत व नाच..आपणाकडून या कोकणातील कलेची परांपरा निरंतर चालू राहो हिच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏💓🌷

  • @Kokani_pintya
    @Kokani_pintya Місяць тому +2

    तुमच्या प्रत्येक गाण्यामध्ये जिवंतपणा असतो, वास्तविकता असते आणि हेच काळजाला भिडते .❤💯🙏 अप्रतिम

  • @sachinname936
    @sachinname936 Місяць тому +2

    खूप सुंदर गाणं आहे माऊली ❤❤

  • @santoshmasane7408
    @santoshmasane7408 Місяць тому +2

    खूप छान शब्द रचना माऊली. खरंच अंगावर शहारे आले गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. ऐकमेव शाहीर आहात तुम्ही ❤ जे जुन्या आठवणी आणि रूढी परंपरा जाग्या करून समाज प्रबोधन करता. आणि आता लोक गाडीतून घेऊन येतात. खूप अभिमान आहे तुमचा असेच आपल आणि आपल्या बाबुरंगले घरायचे नाव मोठ करत रहा. ❤

  • @ravindrapalsamkar5044
    @ravindrapalsamkar5044 Місяць тому +1

    खुपच अप्रतिम विषयावर काव्य लेखन बुवा संपूर्ण बालपण आठवलं ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sureshmirgal4364
    @sureshmirgal4364 Місяць тому +1

    विकास शाहीर तुमची विचार सरणी एवढी विचारक आहे की मागची परसथिती ऐवढी अभ्यास पूर्ण मांडली आहे माझ्याकडे शब्द नाहीत धन्यवाद ❤

  • @akshaychavan9825
    @akshaychavan9825 Місяць тому +1

    अप्रतिम लेखणी बुवा आणि आवाज पण खूप गोड आहे बुवा या गाण्याचा रेकॉर्डिंग लवकरच येऊदे खूप सुंदर जुन्या आठवणी मांडल्या आहात खरोखरच शब्दांचे जादूगार आहात तुम्ही सलाम तुमच्या लेखणीला❤😍

  • @MARUTI455
    @MARUTI455 Місяць тому +2

    काय आवाज आहे खूपच सुंदर गायक विकास जी lambore आपल्याला मानाचा जय मल्हार

  • @santoshzore5153
    @santoshzore5153 Місяць тому +1

    माऊली सर्व class आहे, काय बोलावे वैचारिक कवित्वाला,शब्द अपूरे.. खरच अतिसुंदर, जुने ते जपले पाहिजे अन आपण त्याचे प्रेरणास्त्रोत..!!

  • @user-ov4rs7tk4r
    @user-ov4rs7tk4r Місяць тому +2

    शाहीर आपली काव्य रचना अप्रतिम असते ... नक्कीच कोकणच्या बोलिभाषेतील शब्द कान मंत्रमुग्ध करून जातात ❤❤

  • @swagatmusic6393
    @swagatmusic6393 Місяць тому +2

    अप्रतीम गण विकास माऊली 👌🙏

  • @kamleshk.t60
    @kamleshk.t60 Місяць тому +2

    खूपच सुंदर काव्यरचना शाहीर...❤ अप्रतिम गायन❤❤

  • @ganeshgurav7180
    @ganeshgurav7180 Місяць тому +2

    Kay bolu salam❤❤❤

  • @swapnilbamne6738
    @swapnilbamne6738 Місяць тому +1

    Lambore buva mi tumhacha fan aahe ghatiwale gavatun kharach changal geet aahe angavar kata yenara satya parshtiti

  • @GaneshGurav-ru4ee
    @GaneshGurav-ru4ee Місяць тому +1

    तुमच्या लेखणीला सलाम बुवा.खूप जबरदस्त गण गायलात.❤❤🎉🎉

  • @SashikantPathere
    @SashikantPathere Місяць тому +1

    खरंच खूप छान काव्य रचाना आहे बुवा

  • @pravinsawant3017
    @pravinsawant3017 Місяць тому +2

    गण ऐकायचा तर तुमचा सलाम तुमच्या लेखणीला

  • @user-jv4bn7ke1s
    @user-jv4bn7ke1s Місяць тому +1

    खुप सुंदर गीत ❤❤

  • @swapnilbhalekar9599
    @swapnilbhalekar9599 Місяць тому +1

    सुंदर काव्यरचना आवाजाला तोड नाही खरंच अंगावर काटा आला 👌👌😘

  • @vinayakgawade5992
    @vinayakgawade5992 Місяць тому +1

    लवकर रेकॉर्डिंग ऐकायला मिळावी शाहीर...आपणास विनंती...

  • @prashantbane3151
    @prashantbane3151 Місяць тому +1

    ❤ माऊली सलाम तुमच्या लेखणीला ❤❤❤

  • @balkrishnaghawali7572
    @balkrishnaghawali7572 Місяць тому +1

    खूप सुंदर रचना आणि गायन ❤❤

  • @KokanCreationTeam
    @KokanCreationTeam Місяць тому +1

    Khup chan mast jhalay ❤

  • @shantaramkolapate7826
    @shantaramkolapate7826 Місяць тому +1

    अप्रतिम गण भाऊजी.......❤️🙏

  • @ajinkyalakhan9386
    @ajinkyalakhan9386 Місяць тому +1

    बुवा कोणत्या शध्दात वर्णन करु .शाहीर खुप छान गायन केला आहे.

  • @Kokani_pintya
    @Kokani_pintya Місяць тому +1

    अंतःकरणाला भिडणारा गण आहे माउली ❤

  • @ShubhamGurav-px2xk
    @ShubhamGurav-px2xk Місяць тому +1

    दादा तुझ्या प्रत्येक गाण्यातून खूप काही शिकायला मिळतं आहे....लेखणीचा बादशाह आहेस तू....शाहिरी मुजरा दादा तुला....हे गान रेकॉर्ड झालं पाहिजे....

  • @yogeshkatkar6550
    @yogeshkatkar6550 Місяць тому +2

    ज्यांनी परिस्थिती पाहीलेली अनुभवलेली असेल तो या गणाचा मतितार्थ समजेल
    भात हरकाचा खाऊन भुक भागवणारा बाप सणासुदीला तोच नैवेद्य दाखवून गणपती बाप्पा ला पुजलेला भक्त आणि परमेश्वराच्या अतुलनीय भक्ती भावाचा गण..
    माऊली डोळे पाणावले.. शब्दांकन आणि सारं बापच...🙏💐💞👌

    • @VikasLambore
      @VikasLambore  Місяць тому +1

      तुमची कमेंट येणं हे माझं भाग्य! खूप मनापासून आहे हे...

    • @milindpangale2579
      @milindpangale2579 Місяць тому

    • @yogeshkatkar6550
      @yogeshkatkar6550 Місяць тому

      @@VikasLambore 🙏💞

  • @RajendraBhatade-wq7kw
    @RajendraBhatade-wq7kw Місяць тому +1

    आता पर्यंत एवढी गाणी ऐकली पण अस गाणं ऐकल्यावर पहिले दिवस आठवले

  • @kunalkatkar4227
    @kunalkatkar4227 Місяць тому +1

    बुवांची विचार क्षमता कमालीची आहे

  • @pramodgurav8969
    @pramodgurav8969 Місяць тому +1

    शाहीर मानाचा मुजरा ❤❤❤❤जबरदस्त गण

  • @user-tz4wb2nt8t
    @user-tz4wb2nt8t Місяць тому +1

    खुप सुंदर काव्य रचना आणि जुनी आठवण🎉🎉🎉

  • @kokani_chhand
    @kokani_chhand Місяць тому +1

    खूपच सुंदर गणाची मांडणी जबरदस्त 💐❤️

  • @pramodsangale5718
    @pramodsangale5718 Місяць тому +1

    अप्रतिम लेखणी.. ❤

  • @SanjayGorivale-py3lz
    @SanjayGorivale-py3lz Місяць тому +1

    अप्रतिम गीत सादर केलात बुवा 👌👌👍👍🙏

  • @kunalgitaye5606
    @kunalgitaye5606 Місяць тому +3

    हा गण रेकॉर्डिंग झाला पाहिजे 😍

  • @dhananjayagre2407
    @dhananjayagre2407 Місяць тому +1

    दादा या गाण्याचे रेकॉर्डिंग येऊदे. खूप सुंदर शब्द रचना 🙏

  • @अक्षयपवार-न7भ
    @अक्षयपवार-न7भ Місяць тому +1

    खूप सुदर अप्रतिम गीत लांबोरे बुवा 🎉❤

  • @shaileshbendre182
    @shaileshbendre182 Місяць тому +1

    खूप मस्त...❤

  • @sachinkokirkar7926
    @sachinkokirkar7926 Місяць тому +1

    खुप सुंदर पूर्ण चित्र उभा केलात भुवा

  • @dayanandfhatkre9265
    @dayanandfhatkre9265 Місяць тому +1

    अप्रतिम विकासजी लाबोरे

  • @RBSH_AVIRAJ20
    @RBSH_AVIRAJ20 Місяць тому +2

    व्वा क्या बात है
    निसता धुडगूस शाहीर

  • @AkshayChogale-sn2xs
    @AkshayChogale-sn2xs Місяць тому +1

    बुवा आवाज आणि रचना खरं खूप छान आहे पोर फक्त छोटी नाचवा ❤❤❤

  • @udaybhojane7705
    @udaybhojane7705 Місяць тому +1

    खूप छान

  • @Ganesh_12346
    @Ganesh_12346 Місяць тому +1

    Lambore buaa turyachi shan 👌👌👌👌👌❤❤❤❤❤ surekh gan ❤❤

  • @swapnilkarvanje2666
    @swapnilkarvanje2666 Місяць тому +1

    विकास माऊली नादखुळा

  • @sachinkale195
    @sachinkale195 Місяць тому +1

    छान 👌

  • @nikhilbhere1082
    @nikhilbhere1082 Місяць тому +1

    Masat buwa ❤🎉

  • @amarharchilkar4288
    @amarharchilkar4288 Місяць тому +1

    Khup sundar🙏🙏geet guruji

  • @prasadtambat3547
    @prasadtambat3547 Місяць тому +1

    सर ह्याच रेकॉर्डिंग करा 🙏खूप समाधान वाटतो. ऐखल्यावर

  • @prashantbhatade1339
    @prashantbhatade1339 Місяць тому +1

    अति सुंदर बुवा ❤

  • @sarthakgamer2481
    @sarthakgamer2481 Місяць тому +1

    ❤ खूपच छान
    नेहमप्रमाणेच

  • @user-jo2lo6bl9y
    @user-jo2lo6bl9y Місяць тому +1

    अप्रतिम
    सुंदर शब्द रचना

  • @ranjitkumar5776
    @ranjitkumar5776 Місяць тому +1

    खूप छान. ... लेखणी खूपच छान असते ....

  • @rajendrathik7755
    @rajendrathik7755 Місяць тому +1

    झक्क्कास ..... १नंबर .... शाहीर ....❤👏👏👏👌

  • @sandeepmahadye7623
    @sandeepmahadye7623 Місяць тому +1

    खूपच छान!❤

  • @prakashpichurle9153
    @prakashpichurle9153 Місяць тому +1

    खुप छान लांबोरे बुवा

  • @avinashbate3131
    @avinashbate3131 Місяць тому +1

    Khup mast shahir

  • @RajeshChalke-m2j
    @RajeshChalke-m2j Місяць тому +1

    Nice बुवा 🙏

  • @prasadkhambe6989
    @prasadkhambe6989 Місяць тому +1

    शब्दांचा जादूगार 🌿❤️🤝

  • @maheshkhedekarmah6652
    @maheshkhedekarmah6652 Місяць тому +1

    👌👌👌👌👌👌

  • @harisable9781
    @harisable9781 Місяць тому +1

    अप्रतिम❤

  • @vikramjadhav1204
    @vikramjadhav1204 Місяць тому +1

    1 नंबर

  • @sagarkhapare5311
    @sagarkhapare5311 Місяць тому +1

    खुप छान दादा❤

  • @ganeshgurav7180
    @ganeshgurav7180 Місяць тому +1

    😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤

  • @shaileshbaikar973
    @shaileshbaikar973 Місяць тому +1

    सूंदर गण ❤❤

  • @satyajeetsurve4632
    @satyajeetsurve4632 Місяць тому +1

    La javab ❤bua

  • @ashokbole1859
    @ashokbole1859 Місяць тому +1

    छान, आपली गीतं कौटुंबिक, सामाजिक जाणीव जागी करतात.
    हे गाणं रेकॉर्ड करा शब्द कळतील
    धन्यवाद..

  • @rakeshsukamrk
    @rakeshsukamrk Місяць тому +1

    ❤❤❤❤❤

  • @samikshasalunkhe4441
    @samikshasalunkhe4441 Місяць тому +1

    Khup sunder

  • @maheshsatope5248
    @maheshsatope5248 Місяць тому +1

    शब्दाचा किमयागार✍️

  • @Sharyat_ek_parmpara18
    @Sharyat_ek_parmpara18 Місяць тому +1

    Classsssss🤟🏻♥️

  • @maheshsatope5248
    @maheshsatope5248 Місяць тому +1

    शाहीर शब्द कमी तुमच कौतुक करायला❤आतुरता आगमनाची गणरायाच्या

  • @bhaskaragre1400
    @bhaskaragre1400 Місяць тому +1

    बाप आठवला गुरुजी 😢🙏

  • @sanjaychogale327
    @sanjaychogale327 Місяць тому +1

    Atyant hushar shahir..........

  • @roidasnalavade7550
    @roidasnalavade7550 Місяць тому +1

    रेकॉर्डिंग करा गान दादा 🙏

  • @jayeshpataye5881
    @jayeshpataye5881 Місяць тому +1

    माऊली लवकरच गाणं रेकॉडिंग पण येऊदे.

  • @umeshpadilkar2297
    @umeshpadilkar2297 Місяць тому +1

    शाहीर 🫡❤

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 Місяць тому +1

    रेकॉर्डिंग करा शाहिर