पारंपरिक उकडीचे मोदक | Ukadiche Modak | Ganpati Special

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • पारंपरिक उकडीचे मोदक:
    मोदक म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा. बाहेरून मऊ लुसलुशीत आणि आत मधाळ गोडवा.
    एकविस मोदकांचे परफेक्ट प्रमाण..नक्की करून पहा..
    साहित्य:
    उकड साठी :
    2 कप तांदळाचे पीठ(तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली चांगले सुखवून पीठ बनवलं आहे)
    2 कप पाणी
    2 टीस्पून तूप
    1/2 टेबलस्पून मीठ
    सारणासाठी :
    2 टीस्पून तूप
    2 कप किसलेले खोबरे
    1.5 कप किसलेला गूळ
    1 टीस्पून जायफळ आणि इलायची पूड
    4 टेबलस्पून बारीक चिरलेले काजु-बदाम
    कृती :
    1.सुरुवातीला आपण उकड काढून घेऊ. त्यासाठी पातेले किंवा कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मीठ आणि तूप घालून उकळी काढून घेणे.
    2.पाण्याला उकळी आली की ह्यामध्ये तांदळाचे पीठ घालुन पटपट मिक्स करून घ्यावे आणि गॅस बंद करून भांड्यावर घट्ट झाकण ठेवावे. कमीत कमी पाच मिनिट तरी पीठ झाकून ठेवावे. उकड पराती मध्ये काढून घेवून स्मॅशर ने गुठळ्या मोडून घ्याव्यात आणि पाणी आणि तुपाचा हात लावून उकड चांगली मऊसर मळून घ्यावी. मळून घेतलेली उकड सुती कापड टाकून झाकून ठेवावी.
    3.आता सारण करण्यासाठी एक कढई गॅसवर गरम करून त्यामध्ये तूप घालून घ्यावे. तूप गरम झाले की, त्यात खोवलेले ओले खोबरे व चिरलेला गूळ घालावा. वेलची आणि इलायची पावडर तसेच बारीक चिरलेले काजू आणि बदाम घालुन घ्यावे. गूळ पुर्णपणे विरघळल्या नंतर दोन मिनिट अजून परतून घेवून लगेच गॅस बंद करुन घ्यावा .जास्त वेळ सारण परतू नये त्यामुळे सारण घट्ट होते आणि मोदक भरताना फाटण्याची शक्यता असते.
    4.आता पुन्हा एकदा झाकून ठेवलेली उकड तेल पाण्याचा हात लावून मळून घ्या. जेवढा जास्त वेळ उकड मळून घ्याल तेवढं पीठ छान तयार होईल. छोट्या लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा घेवून पारी बनवून घ्यावी. पारी बनवताना मधून जाडसर आणि बाजूने बारीक करून घ्यावी.बनवलेल्या पारीला पाकळ्या करुन घ्या आणि ऐक चमचा सारण भरून मोदकाच्या शेंड्याला पाकळ्या थोड्या दाबून घेत मोदकाला गोलाकार आकार देत जा.आता मोदक हळूहळू बंद करून घ्या. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या.
    5.मोदक पात्रात पाणी गरम करायला ठेवून
    ज्या चाळणी मध्ये मोदक उकडणार आहात त्याला तेल किंवा तूप लावून घ्या आणि एकेक करून मोदक ठेवून द्या. मोदक पंधरा मिनिटे वाफवून घ्या. थोडे थंड झाले की सर्व मोदक एका प्लेट मध्ये काढून घ्या.
    6.मस्त लुसलुशीत मोदक तुपाबरोबर सर्व्ह करावे.

КОМЕНТАРІ • 11

  • @RajaramPatil-nb1uw
    @RajaramPatil-nb1uw 5 місяців тому +1

    उकडीचे मोदक फारच छान

  • @mahiagro3324
    @mahiagro3324 5 місяців тому +1

    Khup chan

  • @9kartik95
    @9kartik95 5 місяців тому +1

    👌 thanks for the recipe.😋😋

  • @meenakashikhamkar9204
    @meenakashikhamkar9204 5 місяців тому +2

    खूप सुंदर मोदक बनवले आहेत तुम्ही..मी तर एक दोनदा बघणार आहे... व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि सबस्क्राईब सुद्धा केलं 🎁✅ प्लिज तुम्ही सुद्धा या🙏

    • @kokaneehooman
      @kokaneehooman  5 місяців тому +1

      धन्यवाद

    • @meenakashikhamkar9204
      @meenakashikhamkar9204 5 місяців тому

      Dhanyawad friend 🙏

    • @RajaramPatil-nb1uw
      @RajaramPatil-nb1uw 5 місяців тому

      @@meenakashikhamkar9204 गणेश भक्तांना खुप खुप शुभेच्छा

    • @RajaramPatil-nb1uw
      @RajaramPatil-nb1uw 5 місяців тому

      @@meenakashikhamkar9204 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ताई साहेब तुम्हाला