रंगपंढरी Face-to-Face: Alok Rajwade - Part 1
Вставка
- Опубліковано 24 січ 2021
- "नाटकातले कलाकार, नेपथ्यातली प्रत्येक वस्तू, प्रकाश, संगीत... हे सर्व प्रेक्षकांचं देणं लागतात. नुसतं आलं आणि गेलं असं काहीच नसावं. प्रत्येक गोष्टीने स्वतःचं असं काही म्हणणं घेऊन यावं, ते मांडावं आणि मगंच जावं."
- आलोक राजवाडे
'रंगपंढरी' चा नवा सीझन विचार आणि प्रक्रियेत विलक्षण नवेपणा असलेल्या आलोक सारख्या तरुण, प्रतिभावान दिग्दर्शकाने करावा हे आम्हाला समर्पक वाटलं.
'दोन शूर', 'गेली एकवीस वर्षं', 'शिवचरित्र आणि एक', 'बिनकामाचे संवाद', 'सिंधू, सुधाकर, रम आणि इतर', 'A Doubtful Gaze at Uber in the Midnight', 'नाटक नको', 'मी गालिब', 'तिची सतरा प्रकरणे' अशी अनेकविध विचारांची आणि धाटणीची नाटकं बसवणारा मराठी रंगभूमीवरचा तरुण, गुणी आणि प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून आलोक ओळखला जातो.
संहितेपासून प्रयोगापर्यंत नाटक उभं करण्याचे सर्व पारंपरिक ठोकताळे मोडीत काढत एखाद्या मनस्वी आणि उत्स्फूर्त चित्रकारासारखा आलोक नाटकाला सामोरा जातो. त्याच्या दिग्दर्शन प्रक्रियेत जेवढी अनिश्चितता आहे तेवढीच काव्यात्मकता आणि दृश्यात्मकता सुद्धा आहे.
सर्व टीमला बरोबर घेऊन शक्याशक्यतेचे सर्व कंगोरे अथकपणे धुंडाळावे, आणि मग ह्यातून साकार झालेला एक रसरशीत, नवेपणा असलेला प्रयोग प्रेक्षकांना अनुभवायला द्यावा ह्यासाठी आलोक सर्व पणाला लावतो.
आजच्या भागात ऐकूया ह्या नव्या दमाच्या आणि असामान्य दृष्टीच्या दिग्दर्शकाच्या प्रक्रियेविषयी. - Розваги
"अलोक राजवाडे " अतिशय हुशार,हरहुन्नरी , talented कलाकार ... मुलाखत खूप छान झाली! 👌👌👌👌
Ekdam unique
Alok Rajwade is one of the most promising star of Marathi Theater. His thinking and execution of it on visual medium is just mind blowing. Hope he keeps writing and producing more and more. Thank you for the interview
i guess im asking randomly but does anybody know of a method to get back into an Instagram account?
I was dumb forgot the password. I would love any assistance you can give me.
@Julio Jesse instablaster =)
What a brilliant person! Have been seeing n loving his character in Bhadipa, but have fallen all the more in love with his directorial process. He is indeed taking the theatre at a different level.
अलोक फार आवडता आहेच . ही मुलाखत खूप आवडली. कमेंट मध्ये अनेकांचा आक्षेप आहे की यातले बरेच लोक किंवा संस्था माहीत नाहीत किंवा कळाल्या नाहीत.
मला जेंव्हा ही माणसं आणि संस्था कळाल्या नाहीत तेंव्हा मी त्याचा शोध घेतला आणि त्यांचं काम जास्त कळालं. मला ही प्रोसेस फार आवडली. ज्याचं नाटकावर, साहित्यावर वगैरे प्रेम आहे त्या प्रत्येकाला ही प्रोसेस आवडेलच.
थँक्स रंगपंढरी !
Very proud of you,Alok. Being a Akshar Nandan parent,I can visualise your thoughts.
Khoop chhaan mulakhat... Was great to listen to a new age director-actor like Alok. Liked the easy, colloquial, chatty style... Madhurani's growth as an interviewer is palpable. Would love it if you invited Vijayabai Mehta on the show.
खूप दिवसांनी नवीन मुलाखत बघायला मजा आली.नवीन पिढी कशी घडते आहे बघणे हे बघायला मजा आली.खूप सुंदर मुलाखत.
खूप दिवसांनी रंगपंढरी पाहीले .....छान वाटले 👍👍👏
खुप सुंदर.. आलोक विचारांमध्ये अतिशय क्लियर आहे.
रंगपंढरी सुरु झाली .फारच आनंद झाला.
हुशार पुणेकर. Hope he fulfils his potential. Keeps his heads on his shoulder.
Welcome back after a gap! तुम्ही गप्पा मारल्या सारखे इंटरव्यु करता वगैरे हे छान आहे, भन्नाट आयडिया आहे ही, म्हणजे अगदी नाविन्यपूर्ण, क्रांतिकारक आहे, ई. ई.
पण एक विनंती आहे.. या गप्पा एवढ्या ही खाजगी करु नका की ऐकणार्यांना उपरं, लेफ्ट आऊट वाटेल. पहिल्या पाचच मिनिटांत तुम्ही एकेरी नावं घेऊन इतक्या पुणेरी किंवा मुंबईरी (?) लोकांबद्दल/संस्थांबद्दल बोललात की मला वाटायला लागलं आपण कुठेतरी अशा घरात आलोय जिथे आपण नकोसे पाहुणे आहोत. यांचं काय चाललंय ते चालू दे. आपण बाहेर फिरुन येऊ तोवर.
असं होऊ नये. एकेरी नावं घेऊन त्या त्या लोकांशी जवळीक असल्याचं तुम्ही दाखवता किंवा जवळीक निर्माण करता हे खरं.
पण अमेरिकेत किंवा लंडनमध्ये बसून, किंवा अगदी रत्नांग्रि-गुहाग्रात बसून जे लोक हा तुमचा शो बघतात, किंवा जे रोजच्या संध्याकाळी कुठल्यातरी नाटकवाल्याच्या घरी पडीक "बसत" नाहीत त्यांचाही विचार करा.. आणि त्या लोकांची निदान एका वाक्यात, पूर्ण नावासकट ओळख करुन द्या.
तुमच्या "डॉक्युमेंटेशन"चा हा ही भाग महत्त्वाचा आहे हे विसरु नका. नंतर काही वर्षांनी हे उल्लेख झालेले कोण लोक हे शोधणं सोपं करा...
Thanks for the feedback. It's very valid.
असे व्यक्तींचे किंवा संस्थांचे उल्लेख येतील तेव्हा चालू मुलाखतीत लगेच संदर्भ देण्याचा प्रयत्न करू किंवा video च्या खाली comment मध्ये थोडक्यात ह्या व्यक्तींची/संस्थांची ओळख करून देऊ. 🙏
@@RangPandhari That will be so great! But also perhaps suggest your guests not to speak using only first names. The minimum they could/should use is the person's full name. So at least people could look them up if interested.
मस्त आहे
वाट पहात होतो दुसरे सत्र सुरू होण्याची. धन्यवाद आणि शुभेच्छा!!
Was eager to know abt Aloks journey . He is so brilliant and capable of taking the whole process of play all together at diff level. God bless him n Parn 💖
खूप छान मुलाखत वाटली रंगपंढरीचे आभार
खुप छान मुलाखत!! धन्यवाद!!खुप खोल विचारी व्यक्तिमत्त्व आहे!!!
I thought Alok Rajwade is related to Satish Rajwade 😂
I know him only from Bhadipa 😇
Nice to hear this interesting theatre journey 👍
I have seen him only in bhadipa and his work is so natural and fabulous many best wishes for his future
Most awaited series...
Much awaited
उत्कृष्ट मुलाखत.... कमालीचा talented माणूस आहे
Khoop sundar
All the very best to Alok Rajwade
Nice eager to watch next part.
Always enlightening to hear Aalok
Tarun mulanche vichar aikun chan vatal, khup bgarbharun bolala Alok👍👍
Tyanchi hi natak kuthe pahara yetil ,Karan hi prayogik natak aahet.
मनःपूर्वक ध्न्यवाद....
Ultimate comic timing and expression Alok Rajwade......
अतिशय उत्तम मुलाखत
Much awaited for his interview
Detailed Interview 👍👍👍👍
Alok has such clarity in his thoughts.. so articulated 👌🏻👌🏻 aalok ❤️
26 January cha gift.. Thank you Rang Pandhari team
खूप शुद्ध मराठी आहे अलोक ची ❤
Brilliant interview
Khup chan
thanks rang pandhari
This guy is brilliant!
Atishay sundar prashna kadhlet. Pratyek interview madhe. Character cha abhyas, story cha abhyas... Especially, Mukta Barve yancha interview .... Sundar.
तेजश्री जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
योगेश तडवळकर,
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
सई परांजपे यांची मुलाखत लेखिका, दिग्दर्शक म्हणुन जरुर प्रस्तुत करावी.
It was a fun interview. Also waiting for Lalit Prabhakar to watch next 🙏😁
Same
Majha favourite Alok rajwade .he is fabulous ❤️
🥰😇🙂 Khup anand zal director cha १bhag bahun kup bhari ahel . writer cha pan interview ghetla var maja yeil.......
Intelligent chap!
My favourite actor
My most favourite actor
Very very fine actor
Natural acting
किती वेगळा विचार
I am so so so happy 😃 see you all team back with all goods things....ashi hi me vedi ahai tumchya serial chi ani ata hai mhanje me ajun ajun tumala baghnar
Thanks! 😊❤️
👌♥️
👍👍
किती सुंदर शाळां होती तूझी.
Jhakas Yogesh !!😊👏
Thanks चारुदत्त!
Thank you😊
During interview do not forget it's for the public as well. In this interview there's casual reference to some people on first name basis. How does the audience know who is Shashank?? Also please include people who have some body of work behind them like Ashok Saraf, Nirmiti Sawant etc. I didn't even know who Alok Rajwade is?? Of course now I know thanks to this episode. But I don't think the selection of interviewees is very balanced till this point. Anyways all the best for all future endeavours.
Acceptance of new things is necessary to feed your brain ....believe on words and ideas rather than just names
Good to watch this. Please include Ashok Saraf, Nana Patekar, Sonali Kulkarni senior,
Also please add Atul Kulkarni
❤️
🙌💚👍
Khup kamal vyakti 😊
Khup bhari👍👍
रंगपंढरी
तुम्ही जयंत सावरकर यांची मुलाखत अजूनही का घेतली नाही????कृपया घ्या कलाकार दिग्दर्शक आणि संपूर्ण कारकीर्द अशी मिळून चार भागात घ्यावी...💐💐
Thanks for the suggestion.
Rajwade And Sons. (Movie)madhil Aalok chi bhumika khup aavdli.
I have been eagerly waiting for 2nd episode. Was Happy to See Adwait Dadarkar there.
I have to suggest a few really talented Directors from rest of the maharashtra to your team. Where Can I contact for the same ?
Please email us at projectrangpandhari (at) gmail [dot] com
Lagech pahila .......vaat ch pahat hote kadhi yeto navin apisode... 2 vela Tari pahin aani mg savistar comment karen
This interview is more complex than Tenet.. 😄
-:) Thanks for watching.
गेली एकवीस वर्षे,याच script वाचण्यासाठी,की किंवा नाटक पाहण्यासाठी मिळेल का
You ask same question in same order to all. Why? Interview can be more interactive. Specially with such talented people
Hi स्नेहा जी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
Actually free and easy प्रश्न न विचारता प्रश्नावली मुद्दामहूनच नाटकाच्या पूर्ण life cycle वर आधारित ठेवली आहे. संहिता निवड ते प्रयोग. नाटकाची ही संपूर्ण प्रक्रिया आणि प्रत्येकाची त्याला approach करायची निरनिराळी पद्धत डॉक्युमेंट करणं हा रंगपंढरीचा मूळ उद्देश आहे.
Having said that, yes, the same question can always be repharsed as you suggest.
Please keep sharing your views frankly like this. We really appreciate it.
- योगेश तडवळकर.
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
@@RangPandhari many times they give answer in earlier segment still you ask next qu which will have same answer. That can be avoided. Bcoz many times they keep on repeating that answer. "Tech mhantlo mi adhi" / "adhi sangitl tasa" etc.
Alasacha bhag ahe. Tumhi alashi ahat manje aas manayach ahe ka?
ऐकायला छान वाटतंय . पण ती ट्रॅडिशनल पद्धतीने प्रश्न विचारायला जातेय . कि तुला डिरेक्टर म्हणून कुठलं स्क्रिप्ट अट्रॅकट करत तर तो खूप एकातून एकातून भरकटल्यासारखा बोलतोय .
तिला कदाचित आठवत नसेल आपण काय प्रश्न विचारला होता आणि आपण काय ऐकलं 😇
Thanks for your frank feedback.
यालाच गप्पा मारणं म्हणतात ना ? तो या सगळ्या प्रकाराशी इतका एकरूप झालाय एकंदर की त्याला भरभरून बोलावंसं वाटतंय हेच कार्येक्रमाचं यश आहे
@@Pri_p884 कार्यक्रमाचं यश तर आहेच.ते नाकारत च नाही. स्पेसिफिकली या मुलाखती बाबत बोलतेय. यांना गप्पा असं जरी म्हटल असेल तरी ही मुलाखत आहे. मुलाखतीत स्पेसिफिक प्रश्नांची टू द पॉईंट उत्तर अपेक्षित असतात तशी त्याची नाहीयेत. उत्तर ऐकताना तिने काय प्रश्न विचारला होता तेच कदाचित तिला विसरायला होत असेल जस माझ्यासारख्या प्रेक्षकांना होत आहे इतकंच सांगणं. बाकी आतापर्यंत मी ऐकलेल्या मुलाखतीच्या बाबतींत अस झाल नाहीये फक्त याच्याच बाबतीत झालाय म्हणून अशी कॉमेंट केलेय 😉
Who's Atul Sir? Who's More Sir?? There are a few references to them in this interview.
Atul sir mhange Atul Pethe je uttam photographer aahet v actress parn petethe vadil.
More sir jyancha sant sahitya v itihasacha khup abhyas aahe. Anek marathi news paper madhe tyanche lekh prasidhha zale aahet.
@@shilpakulkarni3186 Thank you
अभिजीत जी, सॉरी हे संदर्भ स्पष्ट झाले नाहीत मुलाखतीत. ह्यापुढे असे संदर्भ आल्यास video च्या खाली आम्ही नोंद करू. 🙏
Thanks for all likes and responses. Appreciate it. This show has really been a very enjoyable and satisfying experience to watch. Wishing it even more success in the future!!
6वाटी जोंधळा 3854दिवस 5
Where Can we See his Movie AUMM?
Not sure.
किती अवघड बोलतो हा 😄😄
Thanks for your feedback!
नेहेमी फुटतच का, कधी कधी नव उभं रहात की
फार डोक्यावरून गेले.😁
😜😜☑️😃😃
Thanks for watching and your honest feedback!
इतके हातवारे का करावे लागतात बोलताना ??? आत्मविश्वासाची कमतरता इतक्या वर्षे नंतरही जाणवतेय बोलताना . आरामात बोला की राव . बाकी हुशार तर तुम्ही आहातच .
Thanks for your feedback.
"मला असं वाटतं की "..….. किती वेळा? 😜😂😂😂
ही कुठली नाटकं कधी आली कुठून आली कुठे गेली 😃🙄
प्रायोगिक नाटकांचं marketing कमी पडतं ह्या अर्थाच्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
@@RangPandhari अगदी बरोबर, त्या मुळे हे सगळे चांगले कलाकार, त्यांचं चांगलं काम आम्हाला पहायला मिळत नाही. आणि नको ते कार्यक्रम सिरीयल नाटक सिनेमा लोकं डोक्यावर घेतात पाहावे लागतात
@@manny99901 खरंतर ते एक वेगळंच जग आहे, आणि मी त्यात नाही याचं दुःख वाटतं.