Це відео не доступне.
Перепрошуємо.

जगातील सर्वात मोठं अभंगाच मंदिर पाहून थक्क व्हाल | गाथा मंदिर देहू । Gatha Mandir Dehu । देहू दर्शन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 сер 2024
  • आता पर्यंत तुम्ही अनेक मंदिरे पहिली असतील पण कधी अभंगाचा मंदिर पाहिलंय का ?
    कित्तेक कोटी खर्च करून गाथा मंदिर बांधले आहे. गाथा मंदिराला तेहतीस कळस , समोर विशाल हत्ती शिल्पे, कारंजे, गाभाऱ्यात संत तुकाराम महाराज यांची भव्य मूर्ती, अवतार शिल्पे, विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि गाथे मधील सुमारे ४१४५ अभंग संगमरवरात कोरलेले आहेत.
    गाथा मंदिराचं स्थापत्य हे पौराणिक स्वरूपात आहे. गाथा मंदिराला तेहतीस कळस आहेत ते तेहतीस कोटी देवांचे प्रतिक आहेत. सभामंडपाला अठरा खांब आहेत ते अठरा पुरणाला समर्पित आहेत. गाथा मंदिरात चार अष्टकोन चार वेदासाठी आहेत. तर पाचव्या अष्ट्कोनात जगतगुरु संत तुकाराम महाराज हे भव्य शिल्प स्वरूपात आहेत.
    गाथा मंदीर स्थान
    गाथा मंदिर हे देहू मध्ये इंद्रायणी नदी काठी असून गाथा मंदिराच्या मागच्या बाजूस इंद्रायणी डोह किव्हा आनंद डोह आहे.
    गाथा मंदिराला जायचे कसे ?
    देहू मधील संत तुकाराम जन्मस्थान आणि देऊळवाडा म्हणजे मुख्य मंदिर या मधील दर्शन झाल्या नंतर चौदा टाळकरी प्रवेशद्वाराच्या समोर वैकुंठ गमन स्थान आहे. या वैकुंठ गमन स्थानाच्या कमानी पासून सरळ पुढे एक रस्ता जातो या रस्त्याने पुढे साधारण एक किलोमीटर गेलं कि गाथा मंदिर आहे.
    गाथा मंदिर पाहायचं कसं ?
    गाथा मंदिर हे फक्त एक मंदिर नसून तो एक अभंगाचा वैचारिक ठेवा आहे. आणि हा अभंगाचा ठेवा समजून घ्यायचा असेल तर आपल्याकडे पुरेसा वेळ हवा. पहिल्यांदा गाभाऱ्यातील संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घ्यायचे. त्या नंतर तळमजल्यावरील " सुंदरते ध्यान उभे विटेवर " या गाथेमधील पहिल्या अभंगा पासून सुरुवात करायची. तळमजल्यावरील चार अष्टकोनातील अभंग पाहत पुढे जायचं. तळमजल्या मधील अभंग पाहून झाले कि पहिल्या मजल्यावर जायचे. पहिल्या मजल्यावर सुद्धा खूप अभंग आहेत. जमेल तेवढे अभंग वाचत पुढे जायचे. मग विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायचं. विठ्ठल रखुमाईच्या डाव्या बाजूला या अभंग मालिकेचा शेवट होतो. त्या नंतर या मंदिराच्या नभोमंडपातील अवतार शिल्प पाहायची. आणि त्या नंतर मंदिरातून बाहेर यायचे. सभामंडपात काही वेळ चिंतनात घालवायचा. आणि गाथा मंदिराचा निरोप घायचा.
    देहू दर्शन मध्ये कोणती ठिकाण आहेत ?
    गाथा मंदिरा बरोबरच देहू दर्शना मध्ये खुप ठिकाण आहेत जी आपण पाहायला हवीत.
    देहू मधील महाद्वारातून पुढं आलं कि चौदा टाळकरी प्रवेश द्वारातून थेट संत तुकाराम जन्मस्थान आणि राहत घर या ठिकाण जायचं. या जन्मस्थानाच्या बाजूलाच संत तुकाराम महाराज यांची पत्नी जिजाबाई मंदिर आहे. जन्मस्थान मंदिराच्या समोर मूळपुरुष संत विश्वम्भर बाबा मंदिर आहे. जवळच संत तुकाराम महाराज पालखी पहिला मुक्काम ज्या ठिकाणी असतो तो इनामदार वाडा आहे. यानंतर देहू मधील मुख्य मंदिरात जायचं. या मंदिरात विठ्ठल रखुमाई मंदिर , राम मंदिर , हरिहरेश्वर मंदिर , संत बहिणाबाई मंदिर , शिळा मंदिर येथील दर्शन घ्यायचं. या नंतर जायचं देहू मधील वैकुंठ गमन स्थान मंदिर पाहायला. वैकुंठ गमन स्थान मंदिर येथे संत तुकाराम महाराज मंदिर , विठ्ठल रखुमाई मंदिर , नांदुरकी वृक्ष , संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरचे शिल्प , श्री कृष्ण मंदिर आहे. मग गाथा मंदिर पाहायला जायचे. गाथा मंदिर पाहून झालं कि गाथा मंदिराच्या मागच्या बाजूला संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवली आणि गाथा तरून आली तो इंद्रायणी डोह आहे. हा आनंद डोह पाहून झाला कि भंडारा डोंगर पाहायला जायचं. चौदा टाळकरी प्रवेशद्वारा पासून साधारण सहा किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र भंडारा डोंगर आहे. भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज मंदिर आहे. तर बाजूलाच जिजाबाईच्या पायातून काटा काढला हा प्रसंग दाखवणारे विठ्ठल आणि जिजाबाई यांचे मंदिर आहे. भंडारा डोंगर नवीन मंदिर या मंदिराचे बांधकाम सुरु आहे. भंडारा डोंगरावर नंदुरकीचा वृक्ष आहे.
    हि सर्व ठिकाणे देहू दर्शन मालिका मध्ये पाहता येतात.
    Gatha Mandir Time Stamp
    00:00 - गाथा मंदिर व्हिडिओ | Gatha Mandir Video
    00:38 - गाथा मंदिर व्हिडिओ मध्ये काय पाहणार आहोत
    00:56 - संत तुकाराम महाराज जन्मस्थान कडे प्रस्थान
    01:39 - संत तुकाराम महाराज जन्मस्थान आणि राहते घर
    03:02 - संत तुकाराम महाराज मंदिर देहू
    03:52 - वैकुंठ गमन स्थानाकडे प्रस्थान
    04:14 - वैकुंठ गमन स्थान देहू
    06:16 - गाथा मंदिराकडे प्रस्थान
    07:52 - गाथा मंदिर देहू
    12:03 - आनंदडोह कडे प्रस्थान
    12:16 - आनंदडोह देहू । इंद्रायणी डोह देहू
    13:55 - शेवट
    देहू दर्शन
    देहू दर्शन २०२४ । संत तुकाराम महाराज मंदिर देहू । संत तुकाराम महाराज घर । संत तुकाराम महाराज जामनस्थान । तुकाराम बीज २०२४ । तुकाराम बीज । वैकुंठ गमन स्थान । भंडारा डोंगर । संपूर्ण देहू दर्शन । गाता मंदिर । गाथा मंदीर । गाता मंदीर । पाऊलवाटा
    Dehu Darshan
    Sant Tukarm Maharaj Temple | Gatha Temple Dehu | Gata Temple Dehu | Dehu Dehu | Bhandara Dongar | Vaikunth Gaman Sthan | Tukaram Bij 2024 | Tukaram Beej 2024 | Tukaram Beej | Anand Doh Dehu | Indrayani doh Dehu | Tukaram Maharaj Home | Paulvata
    #gathamandir #dehu #santtukarammaharaj #dehudarshan #gathatemple #gata #abhang #पाऊलवाटा #paulvata #Indrayani #santtukaram #tukarammaharaj #tukaram

КОМЕНТАРІ • 66

  • @OmkarSutar-rb6bb
    @OmkarSutar-rb6bb 6 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली
    तुमचे मनापासून धन्यवाद
    तुमच्या मुळे आज मला पूर्ण गाथा मंदिर पाहायला मिळालं.
    मी पूर्ण गाथामंदिर फिरून आल्या सारखं वाटल.
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 17 днів тому +1

    संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️

  • @umapatil4756
    @umapatil4756 19 днів тому

    Thank you so much Mauli.Dhanya kelet tumhi amhala.Sant Tukaram Maharajanche Darshan ghadavil❤❤❤❤

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 17 днів тому +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️

  • @taktak_marathi
    @taktak_marathi 4 місяці тому +2

    जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे मूळ गावं देहू आणि त्यांचे संपूर्ण जीवनकार्य मधाळ आणि रसाळ शब्दांत विवेचन केले आहे.खूप सुंदर निरूपण माऊली.?🙏🙏
    ।। जय जिजाऊ ।। जय शिवराय।।

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому

      खूप खूप आभारी आहे माऊली 🙏🚩🙏

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 4 місяці тому +1

    खूपच अभ्यासपूर्ण आणि महितपूर्ण वीडियो बनवला तुमचे व्हिडीओज त्यामुळे लाखोंमध्ये लोक पाहतात अप्रतिम

  • @sidworldofficial
    @sidworldofficial 4 місяці тому +2

    रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग... किती सुंदर व खोली असलेला अभंग.
    त्यावेळीची परिस्थिती, अनुष्ठान, विरक्त वृत्ती, धर्मांध घटक व बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना चितपट करणारे तुकोबा... खरंच का "तुका आकाशाएवढा" हे आता कळते.
    ज्यांच्या संतसानिध्याने युगप्रवर्तक छत्रपती शिवराय 🚩 सुद्धा प्रभावित होतात व त्यांना आपले आध्यात्मिक गुरू मानतात. किती थोर, युगाच्या पुढील काळाचा वेध घेणारे विचार होते तुकोबारायांचे...🙏🚩राम कृष्ण हरि 🚩

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +1

      तुकोबारायांचे अभंग म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे.
      खूप खूप आभारी आहे सर..
      तुमच्या सुंदर कमेंट मुळे पाठबळ मिळते 🙏🚩🙏

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 4 місяці тому +3

    देहू दर्शन , आळंदी दर्शन , पंढरपूर दर्शन , भीमाशंकर दर्शन , भगवान गड दर्शन हे व्हिडीओ खूप सुंदर आहे...
    जय हरी माऊली 🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому

      धन्यवाद माऊली 🚩🙏🚩

  • @sidworldofficial
    @sidworldofficial 4 місяці тому +3

    "तुकोबा समर्थ ज्यांनी केला हा पुरुषार्थ.. दगडासहीत वह्या ... तारियेल्या जैशा लाह्या..." जनसागरातुन ही गाथा तरून वर आली.
    वाह सर किती छान बोलतात. २४ कॅरेट पेक्षा अस्सल सोनेरी शब्दमोती वापरलेत.❤😊

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому

      खूप खूप आभारी आहे माऊली..
      आपले मार्गदर्शन आहेच की 😊

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar4437 2 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤

  • @Varkari208
    @Varkari208 4 місяці тому +2

    आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
    शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ||
    🚩 राम कृष्ण हरी माऊली 🚩

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🚩🙏

  • @rohitkhengare397
    @rohitkhengare397 Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली
    श्री संत तुकाराम महाराज म्हणतात
    " आम्हां घरी धन , शब्दांचीच रत्ने |
    शब्दांचीच शास्त्रे , यत्न करू ||
    शब्दची आमुच्या जीवीचे जीवन |
    शब्दे वाटू धन , जनलोक ||🚩🚩🚩🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙇🙇🙇😃😃😃😃👍👍👍👌👌👌

  • @sunitapandit4973
    @sunitapandit4973 5 днів тому

    राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा माधवा गोविंदा सर्वेश्र्वरा

  • @sidworldofficial
    @sidworldofficial 4 місяці тому +1

    लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.. ..
    कोटी कोटी प्रणाम अभंगरचयिता, संतकवी, भागवत धर्माचे कळस. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज...यांना.👍😊

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏

  • @bhashanrang
    @bhashanrang 3 місяці тому

    अद्भुत, अद्वितीय, जगतगुरू संत तुकाराम महाराज जन्मस्थान माहिती...
    जय हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @rohinimistry4707
    @rohinimistry4707 17 днів тому

    खूप छान माहिती,. तुकोबा महाराजांची गाथा उभी केली❤

  • @pradiptole
    @pradiptole Місяць тому

    जय हरी 🙏🏻🙏🏻👍🏻🌹

  • @swapnilpoteofficial
    @swapnilpoteofficial 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली..❤️🚩

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🚩🙏

  • @rekhatai6773
    @rekhatai6773 Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @Ashwed0323
    @Ashwed0323 25 днів тому

    Ram Krishna hari

  • @dnyandevkashid
    @dnyandevkashid 2 місяці тому

    Very nice

  • @user-us3fz1st4d
    @user-us3fz1st4d 4 місяці тому +1

    भारीच

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +1

      धन्यवाद माऊली 🙏🚩🙏

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 12 днів тому

    राम कृष्ण हरी 🚩विठ्ठल 🙏🏻जय जगतगुरु संत तुकाराम महाराज 🙏🏻आम्ही जातो आमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा 🙏🚩

  • @sanjaysurwase7672
    @sanjaysurwase7672 4 місяці тому +1

    🚩अतिशय प्रभावी , अभ्यासपूर्ण माहिती दिलीत . खूप खूप अभिनंदन , आभार .
    शेवटी एक - आनंद डोह बोलला असता तर सर्व सत्य वदत शेवटी त्याने जगतगुरु तुकोबांचे मारेकरी ओरडून जगास संगीतले असते…….
    🌺🙏🌺 माय बाप तुकया 🌺🙏🌺

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +1

      हो हे खरं आहे.

  • @vijay_edtix
    @vijay_edtix 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली🚩🙏🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому

      राम कृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @umakantkharbikar5780
    @umakantkharbikar5780 3 місяці тому

    Khup chhan darshan dilet mast je kadhi mahit navhate

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 4 місяці тому

    Chhan video

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 Місяць тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल माझा लेकुर वाळा संगें गोपाला मेळा

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz 4 місяці тому +2

    काय सांगू आता संतांचे उपकार।
    मज निरंतर जागविती॥

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🚩🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Місяць тому

    देहू दर्शन आळंदी दर्शन पंढरपूर दर्शन भगवानगड दर्शन तुळजापूर दर्शन भिमाशंकर दर्शन या सर्व मंदिरांचे आपल्या पाऊलवाटा चॅनलच्या माध्यमातून सर्व व्हिडिओ अप्रतिम केले आहे माऊली

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 Місяць тому

    रुक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुसवरी आळवी ती राम कृष्ण हरी

  • @AshokBalwadkar-mj2le
    @AshokBalwadkar-mj2le 29 днів тому

    सर्व ठीक आहे पण आत्ता जे घर दाखवल आहे ते महाराजांनी राहीलेल नाही ३५० वर्षे होऊन गेली असतील,संत तुकाराम महाराज की जय

  • @atuljadhav1673
    @atuljadhav1673 4 місяці тому +1

    Ŕam krushna hari

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому

      राम कृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @nirubaichaudhari2328
    @nirubaichaudhari2328 4 місяці тому +1

    आनंदाचे डोही आनंद तरंग

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🚩🙏

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 4 місяці тому +7

    ज्या संत तुकाराम महाराजांनी आजीवन, अंधश्रद्धा निर्मूलन केले, त्यांचेच सहदेह वैकुंठ गमन झाले ही सर्वात मोठी अंधश्रद्धा का ?

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +5

      काही प्रचलित गोष्टींच्या विरुद्ध जाता येत नाही. परंतु तुकोबारायांचे अभंग दिशादर्शक आहेत. मला वाटतं तुकोबारायांच्या तत्वज्ञानावर लक्ष केंद्रित करावं.

    • @sidworldofficial
      @sidworldofficial 4 місяці тому +1

      ​@@Paulvataअगदी बरोबर बोललात सर..😊

    • @sidworldofficial
      @sidworldofficial 4 місяці тому +1

      माऊली, खरे आहे आपले.. परंतु, आम्ही जातो आमुच्या गावा.. तसेच आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी.. वाडवेळ झाला उभा. .ही सर्व तुकोबांचीच रचना आहे ना?
      समकालीन आणि भक्कम इतिहास शिवाय कोणतेही विधान करणं म्हणजे. अशक्यप्राय.. जगद्गुरु तुकाराम महाराज यांना कोटी प्रणाम..🙏

    • @MeenakshiLagad
      @MeenakshiLagad Місяць тому

      ​@@Paulvataमी देव वडे मी

  • @user-vu1lc2mr6k
    @user-vu1lc2mr6k 4 місяці тому +1

    Pandurang hari Vasudev Hari ramkarusan hari

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +1

      राम कृष्ण हरी 🙏🚩🙏

  • @RB_OFFICIAL.0
    @RB_OFFICIAL.0 4 місяці тому +1

    🙏राम कृष्ण हरी 🙏

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +2

      राम कृष्ण हरी 🙏

    • @shailajamore7840
      @shailajamore7840 4 місяці тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 👌👌🙏🙏👍👍

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar4437 2 місяці тому +2

    त्र्यंबकेश्वर चा पण एक video Kara

    • @Paulvata
      @Paulvata  2 місяці тому +1

      काही महिन्यात त्र्यंबकेश्वर चा व्हिडिओ पण येईल. आता संपूर्ण वारी दर्शन चे व्हिडिओ येतील 😊🙏

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b 3 місяці тому

    कधी मांढरगड निवासीनी महातंत्रशक्ति काळुबाई आईसाहेबांच्या सिद्ध क्षेत्राला भेट द्यावी...

  • @user-us3fz1st4d
    @user-us3fz1st4d 4 місяці тому

    दाजी फोन लागत नाही

  • @umakantkharbikar5780
    @umakantkharbikar5780 3 місяці тому

    Vitthalanchi thoravi agadh ahe

  • @sadanand3502
    @sadanand3502 Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @The_Warrior-11
    @The_Warrior-11 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  4 місяці тому +1

      राम कृष्ण हरी 🙏