|| बलिदान दौड || छत्रपती शंभू राजेंना समर्पित | १८०० किलोमीटर ची बुलेट यात्रा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лют 2024
  • सेवेचे ठाई तत्पर
    II आयोजित II
    🚩बलिदान दौड 🚩
    जय शिवराय मित्रांनो,
    अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी.
    त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा.
    ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले त्या त्या निवडक काही महत्वाच्या जागी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्यांचे चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने ही ८ दिवस ८ प्रेरणास्थाने अशी बुलेट दौड आयोजित केलेली आहे.
    🚩दौडीचा मार्ग-
    जन्मस्थान पुरंदर
    पालीचा किल्ला सुधागड
    पद्मदुर्ग
    रत्नागिरी
    जुवेचा किल्ला गोवा ( सेंट इस्टेवान )
    किल्ले पन्हाळा
    शृंगारपूर
    संगमेश्वर
    धर्मवीर गड ( बहादूर गड )
    क्षेत्र तुळापूर संगम
    या प्रत्येक जागा शंभू राजेंच्या स्वभावाचे , गुण वैशिष्ट्यांचे , कला गुणांचे वेगवेगळे दर्शन घडवून देतात. तेच वेचण्यासाठी, त्या जागांवर जाऊन त्या ठिकाणचे विशेष असे शंभू चरित्र वाचन करून कायमचे त्यांना आपल्या मनात ठासून भरण्यासाठी ही बलिदान दौड आयोजित केलेली आहे.
    १७ फेब्रुवारी पासून सुरु होणारी ही दौड सलग ८ दिवस दौडून २४ फेब्रुवारी रोजी तुळापूर येथे पूर्ण होईल
    🚩सहभागी सदस्य राईडर 🚩
    सत्यजीत भोसले
    किरण शेळके
    प्रशांत काळाने
    सुयोग शिंदे
    🚩सहाय्य्क व्यवस्थापक🚩
    पार्थ चव्हाण
    साई दळवी
    🙏🏼या यात्रेस आपले सर्वांचे आशीर्वाद असावेत🙏🏼
    🚩जय शिवराय🚩

КОМЕНТАРІ • 2

  • @surajdhage1008
    @surajdhage1008 4 місяці тому

    धर्मवीरगडला कधी येणार आहेत

  • @curiousviewer9
    @curiousviewer9 4 місяці тому

    Contribute naki karo