Це відео не доступне.
Перепрошуємо.

लॉकडाऊनमध्ये रोजगार गेला, तबलावादकानं केली ‘विदर्भ अमृततुल्य’ चहाच्या ब्रँड निर्मिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2020
  • तबलावादक शुभम देवाळकर (Shubham Devalkar) हा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर या छोट्या गावातील आहे. चंद्रपुरातच त्याने संगीत- वादनाचे प्राथमिक धडे गिरवत रोजगाराच्या शोधार्थ मुंबई गाठली. गेले अनेक वर्ष तो पुण्या-मुंबईत सेलिब्रिटी कलाकारांच्या मैफिलीत विविध वाद्यांची संगत करत आहे. तबला- ढोलकी नाल यावर त्याची विशेष हुकमत आहे. मुंबई-पुण्यात आणि बॉलीवूडमध्ये वादनाच्या अनेक संधी येत गेल्या आणि सोबतच उत्तम मिळकतही होत गेली. मात्र, फेब्रुवारी मार्च महिना उजाडताच जगासह संगीत मैफलीच्या कार्यक्रमांना कोरोनाचा फटका बसला. पुण्यात राहून शुभमने 2 महिने हे संकट टळण्याची प्रतीक्षा केली. या काळात कुठलेही कार्यक्रम नसताना आर्थिक आघाडीवर तो ढासळत गेला. (Shubham Devalkar starts Vidarbha Amruttulya tea shop in Chandrapur)
    विदर्भ अमृततुल्य चहाची निर्मिती
    जगण्याची चिंता सतावू लागल्यावर शुभमने गावी विसापूर येथे परतण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे असलेली रक्कम आणि मनात घोळत असलेला नवीन उद्योगाचा विचार याचा मेळ घालत त्याने जिद्दीने लगतच्या बल्लारपूर औद्योगिक शहरात चहा विक्रीचे दुकान थाटण्याचे ठरविले. बँकांकडून कर्ज घेत जागेची जुळवाजुळव आणि साहित्य उभारून शुभमने ‘विदर्भ अमृततुल्य चहा’ नावाचा ब्रँड विकसित केला.
    बल्लारपूर शहरातल्या पंचतारांकित बस स्थानकाच्या बाजूला एका व्यापार संकुलात गेले काही महिने शुभम देवाळकर आपल्या परिवारासह हा चहाचा ब्रँड शौकिनांना सर्व्ह करतो आहे. पुणे- मुंबईत असलेली रोजगाराची संधी हरवल्यानंतर निराश न होता शुभमने जिद्दीने उचललेले हे पाऊल कोरोनाने अर्थात संकटाने त्याला दिलेला धडाच ठरला आहे.
    पुणे मुंबईत असतानाच तिथल्या चहाच्या उत्तम ब्रँडचा अभ्यास करून त्याने त्यातले प्राथमिक कौशल्य मिळवले होते. एकीकडे उत्तम कलागुण असताना सुटलेला रोजगार तर दुसरीकडे नव्या उद्योगाच्या माध्यमातून नव्या ग्राहकांपुढे आपले उत्पादन घेऊन जाण्याची संधी त्याने नेमकी हेरली. सध्या बल्लारपूरात त्याच्या या ‘विदर्भ अमृततुल्य चहा’ ला मोठा प्रतिसाद लाभतो आहे. (Shubham Devalkar starts Vidarbha Amruttulya tea shop in Chandrapur)
    कोरोना काळात कार्यक्रम बंद झाल्यामुळं गेल्या कार्यक्रम बंद झाले आणि बऱ्याच दिवसांपासून मनात असलेला विचार प्रत्यक्षात उतरवला. लोकांना सेवा देताना चहाला विदर्भ अमृततुल्य नाव देण्याचे पक्के केले, असं शुभम देवाळकर (Shubham Devalkar) यानं सांगितले.
    कोरोना अवतरला. दहशत पसरली. रोजगार गेला. गावी परतण्याची वेळ आली. मात्र त्यातूनही नव्याने फिनिक्स प्रमाणे उभारी घेत शुभम देवाळकर पुन्हा एकदा आयुष्याला सामोरा जाण्यास सज्ज झाला आहे.
    FaceBook
    Twitter
    UA-cam
    Instagram

КОМЕНТАРІ •