आस्तिक-नास्तिक म्हणजे काय? | Dr.Rajendra Kher। Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 345

  • @amuktamuk
    @amuktamuk  6 місяців тому +21

    डॉ. राजेंद्र खेर यांचं पुस्तक घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा!
    Awakening Your Bliss मराठी amzn.in/d/dG6v5wd
    Awakening Your Bliss English amzn.in/d/cmo8ABo

    • @vikramsinhchavan447
      @vikramsinhchavan447 5 місяців тому

      35:21

    • @Vidnnyan.Ki.Duniya
      @Vidnnyan.Ki.Duniya 2 місяці тому

      Kahsvar aahe he pusatak

    • @Vidnnyan.Ki.Duniya
      @Vidnnyan.Ki.Duniya 2 місяці тому

      नमस्ते, तुमची चर्चा अर्धी ऐकली उरलेली पण एकेनच खात्रीने पण काही प्रश्न पडले आहेत अशा आहे की आपण व मान्यवर वक्ते याच निरसन करतील. त्यांनी अनेक बाबी सायन्स बे सिद्ध केल्या असे विधान केले. पण कोणत्या गोष्टी, कोणते प्रयोग केले गेले, कितीवेळा केले गेले. प्रसिद्ध कुठे झालेत त्याचे डिटेल्स मिळाले तर बर होईल. अनेक बाबी उदारणार्थ मूर्तिपूजा कोणा भक्ताला आर्थिक मदत पुरवण्यासाठी निर्माण झाली हे संशोधन कोणी केलय नेमकं त्याला आधार संदर्भ काय ते सांगावं. मंदिराचं काम जर सुज्ञ मानव बनवण्यासाठी असेल . तर आज कोण काय खातो यावरून लिंचिंग करणारे कोणते धार्मिक आहे. त्यांना एकही योगी, साधू ,साध्वी वा संत हे सांगताना दिसत नाही . उलट दुसऱ्या धर्मच्या लोकांना ऐकट पकडून. जोर जबरदस्ती ने भीती घालून मारहाण करून जय श्रीराम म्हणायला लावणं यात कोणता धर्म आहे. व माणुसकी नेमका कोणता धर्म शिकवतो. योगी नाव लावणारे सत्ता उपभोगत आहेत. व अनेक साधू संन्याशी उपभोगबघेऊन बलात्काराच्या गुन्ह्यात आत आहेत. तर साधू कोण ? Dopamine , oxytosin शरीरात वाढलं की आनंद मिळायला लागतो प्रेमभावना जागृत होते. मेंदूचे अनेक कप्पे विजेचा वापर करून कार्यरत केले तर अनभूती यायला लागतात. व तेच भाग विद्युत न वापरता अनेक औषधी पदार्थ वापरून , hipnotise करून वा सेल्फ hipnotisam चा वापर करून देखील करता येतात. याचा अनुभव सामूहिक आरतीत अनेक लोक देहभान विसरून जातात तेव्हाही येतो. तर यासाठी अस्तिकतेची गरज काय. आपण एखादा नास्तिक वक्ता देखील बोलवायला हवा.

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 6 місяців тому +22

    संत गाडगेबाबा यांचे विचार याविषयी मला योग्य वाटतात.

  • @shahajimali8547
    @shahajimali8547 6 місяців тому +20

    शार्दुल आणि ओमकार धन्यवाद हा विषय घेतल्याबद्दल खरंच आम्ही कधी आई वडिलांना प्रश्न विचारले नाहीत पण श्रध्देने देवाकडे प्रार्थना करत आलो. परंतु आजच्या पिढीला प्रश्न आहेत आणि ते विचारतात त्यांना उत्तर देण्यासाठी किंवा सामंजस्य साधण्यासाठी आजचा विषय खूपच महत्वाचा आहे. खेर सरांचे देखील खूप खूप धन्यवाद🙏🏻

  • @jayashreepuranik7734
    @jayashreepuranik7734 6 місяців тому +7

    खूप सुंदर मुलाखत! राजेंद्र जी,तुमचे देह झाला चंदना चा ही दादाजिंचा जीवनावर असलेली कादंबरी अप्रतिम आहे. कादंबरी लिहिल्याबद्दल खूप धन्यवाद .

  • @pranalipalsamkar5198
    @pranalipalsamkar5198 6 місяців тому +7

    खुप सुंदर अप्रतिम पद्धतीने सरांनी समजवले पांडुरंग शास्त्री आठवले दादा यानच्या विचाराचा तत्वाचा अविष्कार होत होता व्हिडिओ पाहताना खुप आभार🙏💫🌟🌼😊

  • @AbhijeetParshe
    @AbhijeetParshe 2 місяці тому +1

    अत्यंत जटील परंतु मानवी जीवनाला व्यापून टाकलेल्या महत्त्वपूर्ण विषयावर राजेंद्र खेर यांनी मांडणी केल्याबद्दल आणि हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अमुक तमुक चे हार्दिक आणि मनःपूर्वक आभार.खूप गहन आणि मोठा विषय एका तासात मांडणं हे शिवधनुष्य राजेंद्र खेर यांनी लीलया पेलल आहे.❤❤❤

  • @sunitadeshpande2195
    @sunitadeshpande2195 6 місяців тому +5

    अतिशय संवेदनशील विषयावर अत्यंत संयमीतपणे चर्चा झाली. धन्यवाद अमुक तमुक टीम 😊

  • @RashmiKeer-x3e
    @RashmiKeer-x3e 3 місяці тому +1

    अमुक तमुक तुमचे आभार तुम्ही जे विषय
    निवडतात त्यावर येणार भाष्य करणारे विचारवंत आजवर आल्याचे v तुमच्या टीम चे मनःपूर्वक धन्यवाद. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे काम म्हणजे समाजात चांगल्या गोष्टी प्रेरित करणे. ही खरी देवपूजा आम्ही तुम्हाला त्याबद्दल bless व मान्यवरांना नमस्कार ही आभार मानने हे मानवतावादी असणे आहे. आजच्या सराच्या विचारांनी समजले पण लगेच ही मुलाखत लिहावेसे वाटले . तुमचे आभार प्रत्येक वेळी करतो.मनात्तल्या मनात .

  • @ashwinisurvase2506
    @ashwinisurvase2506 3 дні тому

    परमपूज्य प्रेमानंद महाराज यांच्या रोजच्या सत्संगामध्ये हेच प्रश्न आणि त्याचे उत्तरही खूप छान प्रकारे मिळतात. खरंच या युगातील ते खूप मोठे संत आहेत🙏🙏🙏

  • @dr.ashokbangal9992
    @dr.ashokbangal9992 5 місяців тому +1

    धन्यवाद डॉ. खेर सर, आपण मोठा विषय, मालिका स्वरूपात होणार, अल्प वेळात सांगितला. खुप छान.
    PhD करण्यासाठी केवढे परिश्रम घ्यावे लागतात आणि त्या परमात्मा तत्व चे दर्शन पहिलीच्या वर्गात ही प्रवेश न घेता घेवू इच्छिता, हे उदाहरण छान दिलेत.
    ईश्वर म्हणजे स्वतः ईश्वर होवून जाणे. देव पहावयास गेलो देव होऊन ठेलो.. हे तुकाराम महाराज, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या संतानी जाणले, गौतम बुद्धांनी प्रचंड साधना केली, श्री रामकृष्ण,स्वामी विेकानंदांनी रांत्र दिवस अथक साधना, त्या परमेश्वरासाठी, अंतिम सत्या साठी केली. ते परम तत्त्व जाणणे हे शक्य आहे, परंतु साधने शिवाय शक्य नाही.
    छान बोललात, आपले सकाळ मधील लेख सुंदर असत.
    पुनश्च धन्यवाद

  • @sameersane6890
    @sameersane6890 6 місяців тому +27

    अत्यंत लबाड भूमिका मांडली आहे.
    धूर्तपणे आणि कावेबाज पणाने आस्तिक, धार्मिक भूमिकेचे समर्थन करुन स्युडो सायन्सची मांडणी केली आहे.

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 6 місяців тому +4

      @@sameersane6890 हे बऱ्याच लोकांना बोचेल, पण अगदी थोडक्यात बरोबर बोललात!

    • @HeavyHarsh
      @HeavyHarsh 3 місяці тому +2

      I completely agree! This is not what atheism is about. It involves a complete rejection of the existence of any god and the cultures and religions based on this idea. This individual is definitely misleading people.

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 6 місяців тому +6

    अतिशय सुंदर .आणी सखोल ज्ञान सांगितलं आहे सरांनी .पुन्हा एकावीशी वाटते .🙏

  • @anujashitut7410
    @anujashitut7410 5 місяців тому +3

    फारच सुंदर चर्चा ऐकून काही प्रश्नांची उत्तरे मिळाली धन्यवाद 🙏

  • @bylagu
    @bylagu 6 місяців тому +3

    नमस्कार. खरं तर हा विषय फार मोठा आणि गहन आहे, त्यामुळे एक तासात सर्व काही सांगणं कोणालाही जरा कठीच असतं. पण तरीही श्री राजेन्द्र खेर यांनी बऱ्याच गोष्टी या चर्चेत समाविष्ट केल्या. त्यामुळे तुम्हा तिघांनाही
    धन्यवाद आभार कृतज्ञता

  • @vrushalikadam945
    @vrushalikadam945 6 місяців тому +2

    प्रथम अभिनंदन तुम्हा ऊभयतांचं.
    हा ही विषय महत्वाचा होता माझ्यासाठी. आस्तिक आणि नास्तिक या शब्दांच्या मर्यादा समजत नव्हत्या . देवाशी कनेक्ट होणं म्हणजे काय ?मी जे कनेक्ट कर ते हे तेच आहे.
    Thank you both of you.

  • @sayusaw
    @sayusaw 28 днів тому

    अगदी माझ्याही ह्याच शंका होत्या, सुंदर एपिसोड ❤

  • @kavyasachinvedak5broll288
    @kavyasachinvedak5broll288 6 місяців тому +1

    ज्याच्या मनात दुसऱ्या बद्दल, समाजा बद्दल, देवा बद्दल, निसर्गा बद्दल आस्था आहे तो आस्तिक हे माझ मत आहे
    Podcast छान झाला ❤

  • @anukatyare
    @anukatyare 6 місяців тому +5

    ❤ फार सुंदर चर्चा! धन्यवाद खेरजी आणि टीम अमुक तमुक!

  • @alkagadge4156
    @alkagadge4156 6 місяців тому +2

    खूप छान विषय हाताळला त्याबद्दल अभिनंदन.💐 राजेंद्र सर खु अभ्यासपूर्ण बोलले धर्म, आस्तिक, नास्तिक या संकल्पना स्पष्ट झाल्या दिवशी connect होण्यासाठी कोण कोणत्या पायऱ्या क्रमाने चढाव्यात ते समजले
    आणि खरच ध्यानधारणा ,नामस्मरण केल्या मुळे शारीरिक आजार कमी होतात व मानसिक शांतता मिळते हे मी अनुभवते आहे
    खर म्हणजे हा विषय समजायला तसा कठीणच आहे खुपसे प्रश्न मनात आहेत
    आणखी काही एपिसोड व्हायला हवेत
    प्रारब्ध किंवा संतांचे चमत्कार व त्यावरील शास्त्रीय विवेचन इत्यादी.
    धन्यवाद.💐💐💐

  • @sejalmasurkar3024
    @sejalmasurkar3024 6 місяців тому +4

    खूप छान ! डॉ राजेंद्र खेर यांना ह्या भागात बोलावल्या बद्दल तुमचे दोघांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @aahanadambalkar2889
    @aahanadambalkar2889 6 місяців тому +2

    A phenomenal episode and very nice explanation from Dr. Kher sir. 🙏🙏🙏

  • @rutujahardas5454
    @rutujahardas5454 6 місяців тому +3

    फार छान प्रश्न विचारली तुम्ही दोघांनी , representation of this gen is perfect. You both are very inspirational !!

  • @supriyapaul3244
    @supriyapaul3244 6 місяців тому +3

    Thank you Shardul and Omkar, for asking the questions all of us thinking

  • @kirankamble3982
    @kirankamble3982 6 місяців тому +3

    Such a deep thought and loved the way Omkar had brave questions for the guest.
    Honest suggestion is to bring different guest with the same topic . We really seek for deep discussion.

  • @gaurim8802
    @gaurim8802 6 місяців тому +2

    खुप छान बोलले sir..खुप छान चिंतन आणि मननही झाले .. धन्यवाद 🙏

  • @madhavitarle-auti8449
    @madhavitarle-auti8449 6 місяців тому +12

    'God must be crazy part 1 &2' हा चित्रपट पाहिला आहे. सरांनी उदाहरण दिल्याप्रमाणे हा चित्रपट नक्की खूप शिकवतो, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करणाऱ्या नी खूप काही शिकण्यासारखं आहे. लहानपणी स्वाध्यायला जाताना जे शिकवलं जात होते ते आज नीट समजले असे वाटते आहे. तरीहीअजूनही खूप अज्ञान आहे माझे. जय योगेश्वर.
    हा भाग देखील छान झाला. धन्यवाद.

  • @ketanjoshi1780
    @ketanjoshi1780 15 днів тому

    khup chan.. bhakti hi apli aatli sakti banu shakte ase vatle, ani apan aplya padhitine changlya acharnatun bhakti karu shakto he samjle.. thanks a lot Amuk Tamuk.

  • @vidulakarlekar443
    @vidulakarlekar443 6 місяців тому +1

    58:10 सगळ्या चे सार एक वाक्यात... खूप छान 🙏🙏🙏

  • @dhanashreechavan8453
    @dhanashreechavan8453 6 місяців тому +7

    खेर सरांचे सकाळ मध्ये लेख येत होते तेव्हा पासून मी त्यांच्या लेखणांची मी fan झाली आहे. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाल्या बद्दल अमुक तमुक ल धन्यवाद .,🙏🙏

  • @sushamaamladi3518
    @sushamaamladi3518 6 місяців тому +3

    खूपखूप सुरेख. आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर तुम्हीं सादर केले. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडत गेली. तुम्हां दोघांनाही मनापासून धन्यवाद.

  • @milindtambe6531
    @milindtambe6531 6 місяців тому +3

    ऐकून खूप छान वाटलं.
    याच्यापुढे बरेच काही आहे.

  • @sangeetasali952
    @sangeetasali952 6 місяців тому +5

    खुप छान.आजच्या तरूण पिठीला पडणाऱ्या प्रश्नांना सविस्तर संवाद झाले.धन्यवाद आपणा दोघांचे.🙏

    • @kprabhakar1000
      @kprabhakar1000 6 місяців тому

      सेंट निकोलस ला सांगा विपश्याना कर

  • @ankush_kunde
    @ankush_kunde 6 місяців тому +2

    खुप छान मुलाखत होती, मनाला पडलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली... धन्यवाद! ♥️😊🙏

  • @engineering-music
    @engineering-music 6 місяців тому +2

    Khupach vichitra explanation ahe. Ya sarvya manacha samjuti ahe jya society ne specifically aadhicha lokanni banvun thevyla ahet ani aplyala follow karayla lavtat ahe.

  • @mohinideshmukh6491
    @mohinideshmukh6491 6 місяців тому +1

    अमुक तमुकचे अभिनंदन 🎉
    सरांनी छान शब्दात विवेचन केलं आहे.
    धर्म हा विवेकपूर्ण जगण्याचे एक साधन आहे. देव हा त्याचाच एक भाग आहे. देव ही आपल्याला पाठींबा देणारी एक प्रणाली आहे.तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा नको हे तुमच्या वर आहे.खूप छान विषय❤❤❤❤❤

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 6 місяців тому +4

    धन्यवाद ! चांगला विषय घेतलात. खरं तर अजून एक भाग यावर घ्यावा.याविषयी मनात खूप गोंधळ आहेत.विचार पक्के व्हायला मदत होईल.

  • @shwetajatar506
    @shwetajatar506 6 місяців тому +5

    i think you should have another guest for this topic. very interesting topic. love to hear more.

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 6 місяців тому +2

    खूपच छान एपिसोड धन्यवाद

  • @rekhataibhuyar3748
    @rekhataibhuyar3748 6 місяців тому +1

    आज तिघेही खूप छान बोलत आहात . अतिशय सुंदर मुलाखत.👌💐💐💐

  • @sauram4266
    @sauram4266 6 місяців тому +2

    Superb podcast guys, enlightened!

  • @kalpanarasal2715
    @kalpanarasal2715 6 місяців тому +1

    खूप छान विषय, छान समजावून सांगितले, अजून काही प्रश्न विचारले तर ऐकायला आवडेल.

  • @saurabhkulkarni205
    @saurabhkulkarni205 6 місяців тому +1

    खुप सुंदर आणि खुप सोप्या साध्या शब्दात विचार मांडले आहेत 🙏🏻🙏🏻

  • @hepurohit
    @hepurohit 6 місяців тому +8

    आजचा विषय फार चांगला होता त्यामुळे खूप उत्सुकतेने पाहायला बसलो परंतु आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. सर्व चर्चा खूप एकांगी आणि वरवर वाटली. आम्ही विचारांशी connect होऊ शकलो नाही.

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 3 місяці тому +1

    खूप छान podcast 😊❤

  • @chinmayborate6888
    @chinmayborate6888 5 місяців тому +2

    amuk tamuk is very nice information jodi no one

  • @Ramesh.7GP
    @Ramesh.7GP 6 місяців тому +10

    सगळंच भरकटलय. याच प्रश्नांची योग्य उत्तरे मुलमूले सरांकडून छान मिळतील.

  • @rumaisanaikawadi4063
    @rumaisanaikawadi4063 6 місяців тому +1

    Very nice discussion .. God is with you all time . GOD SEE YOUR HEART, INTENTIONS & ACT ..HE DOESNT SEE WHAT YOU OFFER HIM...TRUELY YOUR DEEDS..

  • @sunildude
    @sunildude 6 місяців тому +2

    खरोखर अशी चर्चा वारंवार तुम्ही खरोखर चांगले काम करत आहात

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 6 місяців тому +6

    खूपच छान विषय घेतलाय..धन्यवाद..

  • @supriyajadhav-chavan5771
    @supriyajadhav-chavan5771 6 місяців тому

    Khup chhan vishay.
    Tumache poscast khup sunder asatat mala far awadatat

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal2844 6 місяців тому +13

    जीवन फार सोप आहे मानसानच त्याला गुंतागुतीच करून ठेवल आहे. आनंदाने जगा आणि जगू द्या

    • @vilalpatil1518
      @vilalpatil1518 4 місяці тому +1

      खरे आहे फक्त माणूसकी पाहिजे

    • @subhashprachand106
      @subhashprachand106 3 місяці тому

      @@rameshwarjawanjal2844 khup sunder vichar

    • @subhashprachand106
      @subhashprachand106 3 місяці тому

      Khupach Sundar vichar

  • @sonalikorde5277
    @sonalikorde5277 6 місяців тому +3

    खूप छान विषय आहे 💐

  • @manishkokil7210
    @manishkokil7210 6 місяців тому +1

    Khupach aprtim Podcast.. Ha vishay kharach khup awghd aahe.. Why God has created all this .. We never know. Just to love Him with process is the key.. Thanks Amuk Tamuk

  • @truptimardolkar4433
    @truptimardolkar4433 6 місяців тому +2

    U become humble by doing bhakti , u get self realisation, strength to stand stong in difficult situation, sugesst to have one more discussion,
    I llke your choice of subjects

  • @manjushayetalkar8167
    @manjushayetalkar8167 6 місяців тому

    Khup sundar podcasts. Sarwa dharmcha vichar karun sir bolale konalahi na dukhwata....ankhin hyawar khup yekawasa watatay.khup sakhol ahe he dyan ani ha prawas Bhagawanta jawal pohochnyacha ,ekruo honyacha, jari te aplya aat ahet.vritti la changala walan lawayachay while living this mayawi life , responsible life.Finally we all will reach There by His grace.This Path is not easy.hard work determination, control over mind must. Fakta Geeta wachun hi pohchu shakat nahi... cleansing process madhun jawach lagel...Kalata pan walat nahi ashi stithi ahe aaj.. We live so superficial in this world...thanks for reminding easy way to remember Him again by Trikal Sandhya.... Thanks a lot sir and A and T team

  • @pradeepshete6640
    @pradeepshete6640 6 місяців тому +4

    एक आठवड्यापूर्वी आपल्या चॅनल बद्दल समजलं. सुंदर विषय व माहितीपूर्ण चर्चा असते.
    तेव्हापासून मी रोज एक vdo (walking करताना) ऐकतो किंवा टीव्ही वर पाहतो. (मी टीव्ही सीरियल पहात नाही)

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 4 місяці тому

    Very nice. ईश्वराला कनेक्ट फक्त निरंकारी मिशन करते. प्रतीमे कडून प्रत्यक्ष ईश्वराला दाखविला जातो शास्त्र संमत आहे

  • @smitak7202
    @smitak7202 6 місяців тому +11

    विषय योग्य आहे पण खरंच विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर सोडून सगळं आहे.

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 6 місяців тому +1

      😂 Can't agree more 💯

  • @ashwini1005
    @ashwini1005 6 місяців тому +12

    अमुक तमुकने खूपच मोठ्या आणि वादाचा मुद्दा ठरणाऱ्या विषयाला हात घातला आहे. मुळात धर्म ही संकल्पना फक्त माणसाला लागते. Other living beings on the planet do not need this.

  • @sandip1225
    @sandip1225 5 місяців тому +1

    खूप सुंदर मुलाखत. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @lalitmali6427
    @lalitmali6427 6 місяців тому +3

    एकदा ऐकून समाधान होत नाही, पुन्हा ऐकणार. कारण रूढी परंपरांचा खूप पगडा आहे. खूप छानच

  • @RahulPatil-tr8ds
    @RahulPatil-tr8ds 5 місяців тому +3

    अगर दुनिया बनी हे तो दुनिया बनाने वाला भी हे,, देव हा फक एकच आहे, तो विष्णू भगवान!

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 6 місяців тому +2

    खूपच छान देवा 🙏🙏🌹🌹

  • @nilimarekalwar7227
    @nilimarekalwar7227 6 місяців тому +6

    अतिशय सुरेख
    देव धर्म संकल्पनेचा खरा अर्थ समजला

  • @piyushdevanand
    @piyushdevanand 6 місяців тому +1

    Thanks a lot for this topic, considering myself I'm confused about myself being theist/atheist and I find myself somewhere at a good stand point because at this stage I'm very curious about scientific explanation about universe and philosophical explanations.

  • @priyankasawant7943
    @priyankasawant7943 6 місяців тому +18

    मुळात नास्तिक वर चर्चा करायची तर नास्तिक ला का नाही बोलावले? आस्तिक ला कसं माहीत असणार की नास्तिक काय विचार करतोय?
    पहिल्यांदा तुम्हा लोकांचा चुकलंय हे मान्य करा.
    मी नियमित ऐकते पाहते तुमचा पोडकास्ट,पण पहिल्यांदा हे चुकीचं आहे हे सांगायला हरकत नाही

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 6 місяців тому +4

      विवेकवादी, नास्तिक विचारांचा अभ्यास नसताना जबरदस्तीने ओढून ताणून अध्यात्मिक कक्षेत आणण्याचा तोकडा प्रयत्न म्हणावा लागेल.

    • @malikasikilkar3049
      @malikasikilkar3049 5 місяців тому +3

      पूर्ण सहमत.कन्फ्यूज करणं चालू आहे.चार्वाक भेट करा त्यांना

    • @amrutajog5203
      @amrutajog5203 4 місяці тому +2

      Ek aastik ek nastik ase bolvayala have hote

    • @priyason.p5212
      @priyason.p5212 3 місяці тому

      Buddha che vichar sanga tyana

    • @dr.pushpakmali5261
      @dr.pushpakmali5261 3 місяці тому

      एकदम योग्य बोलले आहे तुम्ही बाईसाहेब.
      ही एका तर्फे पांडुरंग यांची प्रसिद्धी होती.

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 6 місяців тому +1

    खुप छान व सोप्या भाषेत सांगीतले सर.

  • @DevyaniJoshi-dj1
    @DevyaniJoshi-dj1 6 місяців тому +1

    अप्रतीम....

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 6 місяців тому +2

    समजायला जरा अवघड विषय पण thanks अमुक तमुक आणी dr खेर तुमचे पण.

  • @anujabal4797
    @anujabal4797 6 місяців тому +1

    सुंदर मुलाखत धन्यवाद

  • @vivekkeskar8383
    @vivekkeskar8383 6 місяців тому +1

    अतिशय साधक बाधक चर्चा झाली... आणि राजेंद्रजीनी अतिशय मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले...खूप खूप धन्यवाद राजेंद्रजी तसेच आयोजन करणाऱ्यांचेही मनापासून आभार.
    मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की योग्य वयात योग्य संस्कार झाले तर त्याचा राम ही होवू शकतो आणि वाईट संस्कार झाले तर रावण ही होवू शकतो... दुसरे म्हणजे माणूस समाजाभिमूख प्राणी आहे... सामाजिक स्वास्थ्य हे सात्विक संवेदनशील आणि सहकार्य करणाऱ्या समुहातूननच टिकून राहू शकते...फक्त या दोन्हीही दृष्टीने जरी विचार केला तरी देव आणि धर्माचे महत्व लक्षात येईल. त्या मुळेच मी देव.. धर्म मानत नाही म्हणणाऱ्या लोकांना समजावून सांगण्यासाठी काही परखड तर्क मांडत आहे.बघा पटतंय का?
    1) या पृथ्वीवर जीव सृष्टी निर्माण होवून कमीत कमी एक लाख वर्ष लोटली आणि तथाकथित पाश्चात्यांच्या आधुनिक विज्ञानाला अजून 500 वर्ष ही झाली नाहीत.
    2) विज्ञान जे नवीन शोध लावते ते नवनिर्मिती करीत नाही..जे आहे त्याचे बुद्धीच्या मर्यादेपर्यंत तार्किक दृष्ट्या विश्लेषण करते आणि हे विश्लेषण नेहमीच काही गृहितकावर आधारित असते. 3) न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लागण्यापूर्वी फळ झाडावरून खालीच पडत होती...वर नाही...आणि हाच गुरुत्वाकर्षणाचा नियम इतर पंचमहाभूताना लागु होत नाही..जसे की अग्नी वरच्या तर पाणी उताराच्या दिशेने वाटचाल करते 4) विज्ञान एक एक शोध लावताना आपल्याच आधीच्या गृहितकांना मोडीत काढून पूर्ण पणे नवीन निष्कर्ष काढते.हेच विज्ञान मानत होते की पृथ्वी सपाट आहे...आणि सूर्य पृथ्वी भोवती फिरत आहे ( 11 व्या शतकात आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या दैवी प्रतिभेने विश्वाच्या निर्मिती पासून सर्व रहस्यांचा स्पष्ट उलगडा केला आहे.) अर्थात त्या करता पूर्वग्रहदूषित बुद्धी बाजूला ठेवून पूर्ण डोळस श्रद्धेने ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे. 4) धर्माला नाकारणारे स्वतः ला श्री संत ज्ञानेश्वर महाराज अथवा आद्य शंकराचार्य पेक्षा स्वतःला बुद्धिमान समजतात हे त्यांचे दुर्देव. 5)आधुनिक विज्ञान आपले कोणतेही सिद्धांत हे गणिताच्या परिभाषेत मोठ्या तार्किकदृष्ट्या सिद्ध करते ..परंतु हे गणित मांडताना सुरवातीलाच काही गोष्टींचा 'क्ष' म्हणून गृहित धरून मग पुढील गणित सोडवत...म्हणजेच ह्या मानलेल्या 'क्ष' वर श्रद्धा ठेवूनच पुढचा सिद्धांत सिद्ध करते...नाही का? 6) या जगात ईश्वर नसेल तर संपूर्ण विश्वात असलेल्या एका संपूर्ण सूत्र बद्धतेचे कारण काय? 7) या महाकाय ब्रम्हांडा मध्ये माणूस हा अवघे शंभर वर्षे आयुष्य लाभलेला एक छोटा जीव आहे आणि मानवाचे शरीर कितीही क्षमतावान असले तरी त्याला स्वतःच्या मर्यादा आहेत...मिळालेल्या इंद्रियांच्या मर्यादेपर्यंतच त्याची स्वतःची आकलन क्षमता आहे...त्या मुळे त्याच्या बुद्धीच्या कक्षेबाहेर कित्येक गोष्टी आहेत ज्या फक्त तर्क आणि बुद्धीच्या जोरावर समजून घेता येणार नाही आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. उदाहरणार्थ...कुत्रं अथवा मांजरांची माणसापेक्षा घ्राणेंद्रिय तीव्र असतात आणि भूकंप अथवा इतरही घटना त्यांना मनुष्याच्या आधी समजतात हे तथाकथित आधुनिक विज्ञानानेच सिद्ध केले आहे. 8) माणसाला जर लाकडी खुर्ची अथवा मातीचे भांडे तयार करायचे असेल तर एक कौशल्य पूर्ण व्यक्ती लागते..तर अवघे विश्वाचे रहाटगाडगे आपोआप चालते असे म्हणणे हास्यास्पद नाही का ? 9) आता धर्म म्हणजे काय याचा थोडा विचार करू...समाज व्यवस्था संतुलित स्वास्थ्य पूर्ण व सुरळीत पणे चालण्यासाठी वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जे आदर्श जीवन आचारसंहिता आहे ती धर्म आहे...योग्य धर्माच्या आधारावर संपूर्ण समाज व्यवस्था आणि निसर्ग यांच्या स्नेहपूर्ण ऋणानुबंध तयार होऊन वसुधैव कुटुंबकम हा विश्वात्मक भाव सर्व मानवी समाज मनात निर्माण करणारा सनातन धर्म चुकीचा कसा काय असू शकतो?? धर्माचे आकलन अथवा अनुसरण गैरसमजातून अथवा हेतुपुरस्सर चुकीचे केले जावू शकते आणि तिथे काळानुरूप सुधारणा धर्माला सुद्धा अपेक्षित आहेच...पण कधी पेशन्ट आजारी आहे म्हणुन वैद्य त्याला मारण्याचा प्रयत्न काय विचार सुद्धा करत नाही मग हे धर्म द्वेष करणारे धर्मालाच खोट कसे काय ठरवू शकतात??? अर्थात सुदैवाने आपण सर्वच सश्रद्ध आणि विवेक शील आहोत...पण या लेखाचा गोषवारा केवळ आंधळा धर्म द्वेष आहे आणि आपल्या समाजात आधुनिकतेच्या नावाखाली धर्म न मानण्याची एक फॅशन आली आहे..म्हणुन हे विचारमंथन. विवेक

  • @shwetachaudhari1894
    @shwetachaudhari1894 6 місяців тому +6

    First of all, thank you for this podcast!
    मला पण सर video मध्ये म्हटले तसं आस्तिक आणि नास्तिक ह्या दोन संज्ञांची गरज च वाटत नाही. देवाचं अस्तित्व मानणे किंवा न मानणे ह्याच्याशी मला काहीही हरकत नाही. पण कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाची मात्र मला चीड येते. देव असला नसला तरी ही त्याला खुश करण्यासाठी आपण रोज साचेबद्धपणे काहीतरी विधी करणे मला पटत नाही. कर्मकांड जिथे येतात तिथे श्रद्धेची अंधश्रद्धा होते असं मला वाटतं. सरांच्या म्हणण्याप्रमाणे भगवद्गीता किंवा अजून असे काही प्राचीन साहित्य हे जर philosophical आहे तर मग rituals चा संबंध कुठे येतो?
    मला अजून एक प्रश्न आहे. की सर म्हणाले की सनातन संस्कृती ने दिलेली principles आज scientifically prove होत आहेत. ह्याची काही उदाहरणे कोणी देऊ शकेल का? I'm genuinely curious.

    • @vibs99
      @vibs99 6 місяців тому

      कर्मकांड आपण देवासाठी करत नाही. आपल्यासाठी करतो. गंध फुलांच्या वासाने आपलं मूलाधार चक्र vibrate होतं. संस्कृत श्लोक create positive vibes. नैवद्य ही आपणच खातो. हळद, कुंकू, चंदन, फुलं काही असेल ते सगळं colourful असतं. ते बघून आपल्याला बरं वाटतं ..
      १४० कोटी लोक असून आपल्याला वेळेला काय उपयोग? हल्ली कोणाला मनातलं सांगायचं तरी तो exploit करणार नाही ना ही भीती.. लोक एकटे पडतात. Depression मधे जातात. Psychiatrist कडे जायची वेळ येते. देवाशी एकदा association व्हायला लागलं तर हा एकटेपणा कमी होतो. नुसतं समोर बसून ध्यान करणं किती जणांना जमतं? एक एक विधी करतो तसं आपल्याला ही "कंटाळा" येत नाही. .तितकं तुम्ही त्याच्या संगतीत राहता.. जसं आपण आपल्या घरच्यांच्या साठी करतो, तसं देवासाठी.. ते ही आपल्या बरं वाटावं म्हणून.. देव दिलं म्हणून खुश होत नाही की नाही दिलं म्हणून रागावत नाही. हळू हळू he becomes part of our system.. problem आला तर एकटं असहाय वाटत नाही..

    • @pratibhanimbkar163
      @pratibhanimbkar163 6 місяців тому

      मकरंद बुवा सुमंत हे तुम्हाला उत्तरे देऊ शकतात त्यांना बोलवा

    • @s.p.9735
      @s.p.9735 6 місяців тому +1

      वेदांत निसर्गपूजेला महत्व दिले आहे . यज्ञारंभी निसर्ग देवतांचे आवाहन केले जाते .

    • @jitendranakve8072
      @jitendranakve8072 5 місяців тому

      तुम्ही आधी सनातन संस्कृतीचा अभ्यास करा मग बोला.... भगवंत आहे आणि राहतील यासाठी देऊळबंद सिनेमा बघा....

    • @shwetachaudhari1894
      @shwetachaudhari1894 5 місяців тому

      @@jitendranakve8072 तुमच्या reply साठी धन्यवाद. पण माझ्या comment मध्ये मी देवाचं अस्तित्व नाकारलं आहे असं मला वाटत नाही. आणि सनातन संस्कृती चा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय आणि कसा ते सांगितलं तर मला खूप मदत होईल!

  • @drrahulpatil7415
    @drrahulpatil7415 6 місяців тому +7

    देव सर्वात मोठा भ्रम

  • @smitaphadnis9821
    @smitaphadnis9821 6 місяців тому +3

    चांगले विचार ऐकायला मिळाले

  • @bylagu
    @bylagu 6 місяців тому +1

    आत्ता श्री. खेर यांनी जो उदबत्तीच्या सुवासाचा उल्लेख केला त्याबद्दल माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की (कदाचित ते चुकीचंही असू शकेल) सर्वसाधारणपणे ज्या लोकांना उदबत्तीचा सुवास आवडत नाही त्यांचा देवाधर्मावर, देवपूजा करण्यावर किंवा धार्मिकतेवर जास्त विश्वास नसतो किंवा त्यांना अशा धार्मिक किंवा कर्मकांडांवर विश्वास वा श्रद्धाभावाचा अभाव असतो.

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 6 місяців тому

      @@bylagu कदाचित कशाला, नक्कीच चुकीचे आणि हास्यास्पद निरीक्षण आहे 🤣
      सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून घरातल्या धर्म परंपरेनुसार कर्मकांडाचे बाळकडु घेऊन मोठा होतो. नास्तिक बनण्याची प्रक्रिया जगाची थोडी समज आल्यावर, प्रश्न विचारण्याच्या वृत्ती मुळे, Critical thinking मुळे चालू होते. आणि नंतर धार्मिक रूढी परंपरांना झुगारून प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाटचाल करण्याचा निश्चय केल्यावर ती व्यक्ती नास्तिक बनते. माणूस एका वैचारिक प्रवासानंतर नास्तिक बनतो, उदबत्ती आवडत नाही म्हणून नाही 🤣🤣🤣

  • @1989nkhl
    @1989nkhl 6 місяців тому +5

    सर जे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते कळण्यासाठी त्यांनीच सांगितल्या प्रमाणे दुसरे मत समजून घेण्याची जाणीव निर्माण व्हायला हवी. इथे ती जाणीव नसलेले पण एक विशिष्ट विचारसरणी स्वीकारलेले लोक प्रचंड अहंकारामुळे सरांवर टीका करत आहेत. मी स्वानुभवातून एवढेच सांगू शकतो की ती जाणीव ज्याचात निर्माण झाली त्याला आयुष्यात असंख्य फायदे होतात आणि ते फायदे व्यावहारिक स्तरावर नसून एका उच्च अध्यात्मिक स्तरावर होतात. आयुष्य बदलून जातं. अंधश्रध्दा वाला त्याला hallucination म्हणत असतील कदाचित पण मग तुकोबा ज्ञानोबा, रामदास, गोंदवलेकर, गुलाबराव, जनाबाई, कबीर, विवेकानंद आणि असे असंख्य महात्मे यांना वेड लागलेलं असं म्हणावं लागेल.

    • @sushamamaeel6228
      @sushamamaeel6228 6 місяців тому +3

      वाह...!! काय भारी उत्तर दिलंत...
      काय आहे ना, यांना अनुभव घ्यायचा नसतो आणि नावं मात्र ठेवायची असतात.. विज्ञान मानता ना... विज्ञानामध्ये एक्सपेरिमेन्टच केला जातो आणि मग निष्कर्षाकडे जातो. ही प्रोसेस आहे.. ती प्रोसेस मान्य करता मग इतर का नाही...? यांना देव दुसऱ्याने दाखवावा लागतो. भूक लागली की तुम्हीच जेवता ना की दुसरा कोणी जेवला की तुमचे पोट भरते? नाही ना..? मग देव दाखवा ही दुसऱ्याकडून का अपेक्षा.. अनुभवप्रती ठरवावे.
      सभाषणामध्ये जसे सांगितले आहे तसे आपण सर्वांनी देव या शब्दाची संकल्पना खुप आकुंचित केली आहे.. त्यातलं तत्व जाणत नाही आणि ते तत्व फक्त अन फक्त जाणिवेने कळते... स्वतःला आस्तिक म्हणणारा तरी कुठे ते तत्व जाणून आहेत. खूप कमी सत्पुरुष आहेत ज्यांनी हे तत्व जाणले आहे. त्यांनी जाणले तर आपणही जाणू शकतो, पण त्यासाठी खुप तयारी लागते, धैर्य, दृढता लागते..

    • @subhashprachand106
      @subhashprachand106 3 місяці тому

      मलाही हाच विचार येतो.प्रखर वास्तव सांगितलं.विश्वास ठेवावाच लागेल प्रत्यक्ष विभूती झालेल्या असल्यामुळे

  • @jayashrisonawane1351
    @jayashrisonawane1351 6 місяців тому

    मस्त 🙏🙏

  • @gurukrupa.4795
    @gurukrupa.4795 6 місяців тому

    Dev ha anubhuticha vishay ahe !khup sundar tarunanche prashahi ani uttarehi!!!

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 5 місяців тому +3

    *dont get into astik-nastik debate..just chant हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे God Bless All*

  • @s.p.9735
    @s.p.9735 6 місяців тому +2

    नास्तीक फक्त प्रश्न विचारण्यात अव्वल आहेत .
    स्वतः खाओ , पिओ , मौज करो असे वागतील पण आस्तीकांनी ( धार्मीकांनी ) रचनात्मक कार्य करावे अशी अपेक्षा ठेवतील .
    नास्तीकांचा दया , प्रेम , करुणा , माणुसकी , परोपकार या मानवी गुणांशी काहीही सबंध नाही .
    नास्तीकांचे विज्ञान दोनच जाती मानते - नर व मादी इतर नात्यांना त्यात स्थान नाही .
    वेद सांगतांत मनुर्भव: ( मनुष्य बना ) नास्तीक सांगतात बंडखोर बना .
    नास्तीक स्त्री पुरुष , जनता - शासन , मालक - मजुर , असे भांडण लावतात तर आस्तीक कर्तव्य शिकतात व शिकवतात .
    नास्तीकांचे दवाखाने , अन्न , वस्त्र दान , ज्ञानदान असे उपक्रम राबविलेले कधीही नाही आढळत .
    नास्तीकांना कर्तव्याशिवाय हक्क महत्वाचे वाटतात .

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o 4 місяці тому

    तुम्ही हा विषय निवडलात तुमचे आभर आमच्या मनातले प्रश्न विचारलेत आणि खेर सरांनी शास्त्राला धरून उत्तरे दिली म्हणून सरांना ढण्यवडमझे सदगुरू तीर्थरूप नाना स्वारी आणि आप्पासाहेब धर्माधिकारी दासबोध निरूपण श्रवणाच्या बैठकीतून योग्य अयोग्य यामधील फरक समजाऊन सांगतात आज समर्थांच्या बैठकीत केलेल्या श्रवणामुळे उद्ध्वस्त झालेले अनेक संसार परत आपल्या मार्गाला लागले आहेत समर्थ सांगतात ऐकले ते ऐकावे पुन्हा पुन्हा ऐकावे या नाव श्रवण महादेवाच्या पिंडीवर जशी थंड पाण्याची धार धरावी लागते तसेच आहे श्रवणाचे यासाठी मनुष्याच्या कानावर श्रवणाची धार सतत पडत असेल तर माणसाचा दानव न होता देव होतो त्याच्यातील आत्म तत्व जागृत होते त्यासाठी कोणत्याही कर्म कांडाची गरज नसते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे

  • @pratibhameshram4462
    @pratibhameshram4462 6 місяців тому

    खूप छान...

  • @anilmahadik7041
    @anilmahadik7041 22 дні тому

    Good. Information

  • @shishirjoshi5582
    @shishirjoshi5582 6 місяців тому +2

    Thanks! Tufan aahe

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 5 місяців тому

    🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉

  • @Shree20a
    @Shree20a 3 місяці тому

    Kadak good topic 🙏🙏

  • @justplay09
    @justplay09 2 місяці тому

    Thanks

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 6 місяців тому +1

    Nice video Sir.

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 19 днів тому +1

    🙏भगत सिंग यांच्यावर एक व्हिडिओ बनवा. त्यांचे WHY I AM ATHIEST? वाचा आणि त्यांची उत्तरे द्या...
    मी आस्तिक आहे पण एक खरा नास्तिक आणि खरा आत्मज्ञानी खऱ्या अर्थाने मानवतेच्या दृष्टीने परिपूर्ण असतो.म्हणूनच त्यांच्या सत्य बोलण्याने त्यांच्या हत्या झाल्या आहेत हेच खरं आहे..
    🙏तीर्था धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी...

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 6 місяців тому

    सुंदर

  • @mayurshukla6372
    @mayurshukla6372 6 місяців тому

    Khup chan ❤

  • @prasadpappu23
    @prasadpappu23 6 місяців тому +72

    एखादे प्रवचन असल्यासारखे अत्यंत मोघम व भरकटलेली उत्तरे दिली आहेत. देव (किंवा गूढ शक्तिशाली निर्माता) आहेच हे गृहीत धरून नास्तिक बाजू कशी मांडता येईल? पाहुण्यांचा या बाबतीत personal bias आड येतोय असं वाटलं. विवेकवादी, नास्तिक विचारांचा अभ्यास नसताना जबरदस्तीने ओढून ताणून अध्यात्मिक कक्षेत आणण्याचा हा तोकडा प्रयत्न म्हणावा लागेल.
    या विषयावर विवेकवादी, नास्तिक विचारांची बाजू नेमक्या शब्दात, समजावून सांगू शकतील असे डॉ. शंतनु अभ्यंकर यांना बोलवा ही विनंती 🙏

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 6 місяців тому

      shantanuabhyankar.blogspot.com/2023/12/blog-post.html?m=1

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 6 місяців тому

      डॉ. अभ्यंकर यांच्या ब्लॉग मधला या विषयावरचा लेख.
      डॉ. अभ्यंकर हे नावाजलेले लेखक व व्यवसायाने प्रसिद्ध डॉक्टर आहेत. तसेच यांनी रिचर्ड डॉकिनस् यांच्या "मॅजिक ऑफ रिॲलिटी" या जगप्रसिद्ध पुस्तकाचा भावानुवाद केला आहे.

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 6 місяців тому +9

      Also, I would suggest reading "The god delusion" by Richard Dawkins.

    • @ganeshgaikwad340
      @ganeshgaikwad340 6 місяців тому +13

      सांगलीच्या जगदीश काबरे यांना बोलवा. म्हणजे दुसरी बाजूही समजून घेता येईल.

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 6 місяців тому +1

      shantanuabhyankar.blogspot.com/2023/12/blog-post.html?m=1
      डॉ. अभ्यंकर यांचा या विषयावरील लेख!

  • @adnyat
    @adnyat 6 місяців тому +1

    उथळ चर्चा होती. धर्म या विषयावर चर्चा करायची असेल तर वेद, शास्त्र, पुराणे यात पारंगत असलेल्यांना बोलवावे. धर्मगुरू शंकराचार्य यांच्याशी चर्चा करावी.
    हा पॉडकास्ट म्हणजे रस्त्यावरच्या गॅरेजमध्ये बसून रॉकेट तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न वाटला.

  • @gaus0903
    @gaus0903 6 місяців тому

    Superb topic. Interesting discussions. Request you to add captions in English, because pure marathi words & phrases were literally going bouncer. Would love to understand it completely in a better way .

  • @suryakantshejul1074
    @suryakantshejul1074 3 місяці тому

    काही जाणिवा ह्या हजारो वर्षांपासून कानावर मनावर आदळत आलेल्या आहेत... ज्या कि ख-या असतीलच असं नाही.. अशाप्रकारच्या जाणिवांचा विवेकपुर्ण उहापोह व्हायला पाहिजे.. 🙏🙏

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 6 місяців тому

    Sir. Khup chhan aani satya tech sanitle aapan madirat jaun hat jodayche aani baher aale ki tech hat dusrya var uchalle jatat.. dhanvad sir....

  • @Pk_Secular2024
    @Pk_Secular2024 6 місяців тому +3

    छान मुद्दे मांडले ह्या सरांनी. काही गोष्टी पटल्या. काही vague वाटल्या.
    One request- या same topic वर एखाद्या नास्तिक/ विवेक वादी व्यक्तीला बोलावा please.

    • @prasadpappu23
      @prasadpappu23 6 місяців тому +2

      Yes. The discussion felt biased.

    • @amarishbhilare6304
      @amarishbhilare6304 6 місяців тому

      absolutely right..... Raju Parulekar yaannaa bolavaa mhanje sagale subject mast detailed samajaavatil

    • @kedarkshirsagar4869
      @kedarkshirsagar4869 5 місяців тому

      @@Pk_Secular2024 अगदी बरोबर

  • @Ninad_464
    @Ninad_464 6 місяців тому

    You are holding 269K subsceibers' responsibility guys,
    Choose if you wanna mislead them or help them see the right path.
    The guest has shown one side of Aastik-Nastik, but there are other aspects such as Dakshinachar, Vaamachar. People call themselves Nastik to sound so called progressive but its NOT like that.
    May God Bless you and show the path not to mislead people❤😊

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 6 місяців тому +5

    एवढे गोलमाल चर्वितचर्वण करण्याची काही गरज नाही
    धर्म म्हणजे धारण करणे
    धैर्य, दया, क्षमा, शांती, तप ( कुटुंब, देशासाठी कष्ट सहन करने), शौच ( स्वच्छता, वाईट गुण त्यागने ) अस्तेय ( चोरी न करने) , अपरिग्रह ( अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणे) संतोष आणि अहिंसा या दहा गुणांचे पालन करने म्हणजे धर्म, हा जगात एकमेव धर्म आहे तो म्हणजे सनातन या व्याख्येत कालारूप असो की स्थल रुप असो किंचीत हि बदल होत नाही
    या सनातन मधे दोन भाग आहेत
    1 आस्तिक मत ( वेद, आत्मा ईश्वर मानणारे)
    2 नास्तिक मत ( वेद आत्मा ईश्वर न मानणारे)
    या दोहोंनाही मुलभुत धर्म ( दशोगुणी) पालन करने आवश्यक आहे तरच ते खरे आस्तिक, नास्तिक होतील
    आपल्या सनातन परंपरे मधे एकुण नऊ दर्शन ( तत्वज्ञान ) आहेत
    त्यात सहा आस्तिक आणि तीन नास्तिक दर्शने आहेत
    या वरूनच आपले आस्तिक नास्तिक वर्तन ठरवावे, हे नऊही दर्शन अनमोल आहेत
    विदेशी मत, धर्म, मत, दर्शन यावर या वर स्वदेशी अर्थात सनातन धर्मास जोखु नये
    विदेशी कथीत धर्म, दर्शने हे मानवता विरोधी आहेत

  • @JyotiShendage-g7b
    @JyotiShendage-g7b 6 місяців тому

    खूपच 👌👍