माता पालक क्रिडा स्पर्धा
Вставка
- Опубліковано 25 гру 2024
- 🏅🏆🏅 माता पालक क्रिडा स्पर्धा- माता व विद्यार्थी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.. 🏅🏆🏅
क्रिडा सप्ताह निमित्त माता पालक संघ अंतर्गत माता व विद्यार्थी यांची भव्य क्रिडा स्पर्धा
आज श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालयात दुपार सत्रात माता पालकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद दायमा सर ,उपमुख्याध्यापिका दिपाली चोरट मॅडम,जेष्ठ शिक्षिका संगिता मोराणकर मॅडम,माता पालक संघाच्या अध्यक्ष सौ.कविता देशमुख,सहसचिव सौ.साधना पाटील, पालक सदस्य सौ. दिपाली वानखेडे तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.सरस्वती पूजनानंतर क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली .क्रीडा स्पर्धा मनोरा तयार करणे, फुगे फुगवणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .सर्व विद्यार्थी व माता पालकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.सर्व माता पालकांनी आपल्या पाल्यांसोबत खेळण्याचा आनंद घेतला .विजय झालेल्या माता पालक व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले महिला पालकांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले . सूत्रसंचालन श्री.स्वप्निल भालेराव सर यांनी केले .प्रिती देशमुख ,राजश्री सुर्यवंशी मॅडम,नेरकर सर,भैरवी भामरे मॅडम व भाग्यश्री बोरसे मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले . श्री.भुषण गढरी सर व रावते सर यांनी निरीक्षकाचे काम पार पाडले .क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.