एक होती हरित वसई। vasai virar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • एकेकाळची वसई आमची
    जिला म्हणायचे आम्ही हरित वसई
    पण धावू लागला विकास
    पण धावू लागला विकास
    अन.... विकासाच्या नावाखाली आपलीच माणसे विकली गेली
    आणि तिथेच झाला विकासाचा विनाश
    हिरवळ कमी तर इमारती जास्त
    पावसाळ्यात वसई विरार लागली बुडू
    सोशल मीडियावर माहिती लागली फिरू
    मांडीभर पाण्यात जेव्हा चालावे लागे
    तेव्हा म्हणावे का आम्ही असा हा विकास म्हणून...
    रेल्वे धक्क्याचा तो जीवघेणा प्रवास
    आणि मुंबईची नोकरी...
    ऑफिसला म्हणतात कसे.. तुम्ही विरार वरून कसे रोज येणार .. पावसाळ्यात किती सुट्ट्या घेणार ..
    प्रश्नांची उत्तरे देता देता कंटाळून गेली युवा पिढी
    अन मग निवडला परदेशात जाण्याचा मार्ग
    आता म्हणू का आम्ही असा हा आमचा विकास म्हणून...
    हवा आहे विकास आता तरी आम्हाला ,
    पावसाळ्यात बुडणारी वसई विरार नको कोणाला
    नको आम्हाला डांबर पाण्यात विरघळणारे
    हवे आहेत रस्ते पक्क्या डांबरांचे मजबूत असणारे
    कमी करा वर्चस्व परप्रांतीयांचे
    कारण अजूनही राहत आहेत स्थानिक येथे हक्काचे
    सुरुवात करूया, अन एकजूट होऊया
    समृद्धीचे मार्ग शोधुया
    प्रगती आपली साधुया
    Voice: Melcina Tuscano Pereira
    Writer: Melcina Tuscano Pereira
    Video Editing: Melcina Tuscano Pereira

КОМЕНТАРІ • 1