रोटरी क्लबऑफ कोल्हापूर सनराईज व परम पूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2023
  • रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्या सहयोगाने सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे मॅमोग्राफी आणि न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम लोकार्पण सोहळा व कोल्हापुरात प्रथमच भटक्या कुत्र्यांच्यासाठी ‘सिद्धगिरी शुनक सेवा धाम’चे उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वा प्रवचन हॉल, सिद्धगिरी महासंस्थान कार्यालय, कणेरी मठ, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.
    सिद्धगिरीच्या लोकोपयोगी प्रकल्पात नेहमी रोटरी कल्बचे सहकार्य राहील : विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे
    महाराष्ट्रातील पहिल्या कुत्र्यांच्या शाळेचे उद्घाटन व सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मॅमोग्राफी आणि न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम लोकार्पण सोहळा संपन्न
    कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘सिद्धगिरी मठावर पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवण्यात येतात,रोटरी क्लब-सनराईज यात योगदान देण्यासाठी सदैव आघाडीवर असेल.’ असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज, चंद्रकांत राठोड व सिद्धगिरी मठ यांच्या संयुक्त विद्यमानाने सिद्धगिरी मठ, कणेरी येथे राज्यातील पहिल्या भटक्या कृत्रांच्यासाठी ‘सिद्धगिरी शुनक सेवा धाम’चे व सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मॅमोग्राफी आणि न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले.
    कणेरी मठ येथे शवन(श्वान) प्रकल्प उभारणी व सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये न्यूरो मॉनिटरिंग मशीन व मॅमोग्राफी युनिट आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केला गेला आहे या सर्व उपक्रमांचा उदघाटन कार्यक्रम आज कणेरी मठ येते सपन्न झाला .
    श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ
    कणेरी, कोल्हापूर,
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 8

  • @devendradhavare2460
    @devendradhavare2460 Рік тому +2

    कृपा माझ्या गुरुमाऊलींची

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 Рік тому

    सद्गुरू तुम्ही छान विश्लेषण केले आहे
    जय सदगुरू स्वामी महाराज

  • @kajalpatil2895
    @kajalpatil2895 Рік тому

    🙏🏻💐शुभ सकाळ

  • @deepikakatkar511
    @deepikakatkar511 Рік тому

    🙏🌹🌸🙏

  • @sanjaydalvi7607
    @sanjaydalvi7607 Рік тому

    🙏🙏मस्त🌹🌹

  • @neetashinde538
    @neetashinde538 Рік тому

    नमस्कार स्वामिंजी

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 Рік тому +1

    कृपा सद्गुरूरायांची!

  • @rmadasvarpe5264
    @rmadasvarpe5264 Рік тому

    Krupa Shrimauli chi