Kambareshwar Mandir Bhor | भोरचे कांबरेश्वर मंदिर | श्री कांबरेश्वर मंदिर |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • ‪@jdpaneltravel2022‬
    #temple #kambareshwarmandir #kambareVillage #ancienttemples #ancienthistory #ancient #DamWaterLevel #damwater #bhor #pune #jdpaneltravel #BhatgharDam #maharashtra
    ___________________________________________________________________________________________________
    श्री कांबरेश्वर मंदिर उर्फ कर्महरेश्वर
    (कांबरे बुद्रुक, ता. भोर)
    भोर पासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर कांबरे गावातील धरणाच्या पात्रात कांबरेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर 10 महिने पाण्याखाली असते. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे हे मंदिर नुकतेच पाण्याबाहेर आले आहे. वेळवंडी नदीमधील हे प्राचीन असे पांडवकालीन शिवमंदिर आहे. या मंदिराचे मूळ नाव कर्महरेश्वर आहे. परंतु हे मंदिर कांबरे गावाच्या हद्दीत असल्यामुळे " कांबरेश्वर मंदिर " या नावाने ओळखले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते पांडवकालीन असून पांडवांनी बांधलेले आहे, अशी श्रद्धा आहे. मे व जून असे दोन महिनेच हे मंदिर पाण्याबाहेर असते. दरवर्षी पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याबरोबर वाहत आलेल्या गाळामुळे मंदिर जमिनीत गाडले जात आहे. मात्र मंदिराचा पाया आणि त्यावरील बांधकाम अजूनही भक्कम आहे. धरणातील पाण्याच्या लाटांमुळे थोडीफार मोडतोड झाली आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग असून पार्वतीमातेची मूर्ती व नंदी आहे. पूर्वी मंदिरात जाताना पायऱ्या चढून वर जावे लागत होते. मात्र दरवर्षी येणाऱ्या गाळामुळे मंदिराच्या पायऱ्या गाडल्या गेल्या आहेत. मंदिरासमोर नंदी असलेला चौथरा आहे. मंदिराच्या कळसाचे व वरील बाजूचे बांधकाम चुनखडक, वाळू आणि भाजलेल्या विटांत आहे. तर मंदिराच्या भिंतीचे बांधकाम दगडात केलेले आहे. मात्र हे दगड साधेसुधे नसून 20 मजुरांनादेखील एकत्र उचलता येणार नाहीत इतके मोठे आहेत. पांडवांनी त्या काळात कुशल कलाकृतीचा वापर करून आयताकृती दगड एकावर एक बसवून मंदिराची रचना केली आहे. अशा या पांडवकालीन शिवमंदिराला आपण आवश्य भेट द्यावी.
    जाण्यासाठीचा मार्ग :
    पुणे - चेलाडी नसरापुर आंबवणे - करंजावणे - मंत्रा रिसॉर्ट रोड मार्गे - कांबरे बु (इतरही दोन मार्ग आहेत. परंतु पर्यटकांनी आपल्या माहिती नुसार त्या मार्गांनी जावे. त्यातला पहिला मार्ग म्हणजे पुणे खेड-शिवापुर - कुसगाव (कुसगाव खिंड रोड) मार्गे आणि दूसरा मार्ग पुणे - कापूरव्होळ - माळवाडी - भाटघर धरण मार्गे) -
    भेट देण्याची योग्य वेळ : मे व जून
    ___________________________________________________________________________________________________
    kamreshwar temple
    bhatgahr dam
    ___________________________________________________________________________________________________

КОМЕНТАРІ • 26

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas Рік тому +1

    अप्रतिम चित्रफीत
    👌🙏👌🙏👌🙏👌

  • @vainateyasahasrabudhe8498
    @vainateyasahasrabudhe8498 Рік тому +1

    Very nice

  • @prachishinde8675
    @prachishinde8675 Рік тому +1

    अद्भुत आणि अविस्मणीय ठिकाण आहे.

  • @yogeshwarisalunke9286
    @yogeshwarisalunke9286 Рік тому +1

    Mast जय भोलेनाथ 🙏

  • @vikrantuchade2028
    @vikrantuchade2028 Рік тому +1

    Khup sundar mahiti dili anai vdieography pn khup mast aahe.

  • @dhananjaysalunke3672
    @dhananjaysalunke3672 Рік тому +1

    खुप सुंदर ठिकाणं

  • @namratashirsath7950
    @namratashirsath7950 Рік тому +1

    Superb drone shot! Your hard work and efforts are really admirable!👍

  • @PriyadarshaniJadhav-bb3zi
    @PriyadarshaniJadhav-bb3zi Рік тому +1

    खुपच छान! ऐकले होते पण कधी जाऊन बघायला मिळेल हे वाटले नव्हते... पण ती इच्छा आज पुर्ण झाली .

  • @AnitaSharma-bi2bh
    @AnitaSharma-bi2bh Рік тому +1

    itehasik theva ha goverment ne jatan kela pahije. khup mast video dada.

  • @dipikakulkarni9288
    @dipikakulkarni9288 Рік тому +1

    khup mast mahiti aani drone shoot pn khup mast. ase kititari temple asatil je aaplyala mahit pn nasatil.

  • @yuvrajsalunke2077
    @yuvrajsalunke2077 Рік тому +1

    खूपच छान video vary nice

  • @MeghaSuryavanshi-o9h
    @MeghaSuryavanshi-o9h Рік тому +1

    sundar explanation. tumhi kharach changal kaam karat aahat dada. karan mahit naslelya goshti sodhun tyanchi mahiti den.... sudnar video dada.

  • @revatisurushe2348
    @revatisurushe2348 Рік тому +1

    त्याच्याच अलिकडे शिरवळला या आता नदीच पाणी खाली सोडलय त्यामुळे नदी पात्रात तुम्हाला भरपुर मंदिर दिसतील.

    • @jdpaneltravel2022
      @jdpaneltravel2022  Рік тому

      नक्कीच... धन्यवाद. नवीन माहिती दिल्या बद्दल.