ह.भ.प.श्री.आसाराम महाराज बढे_आग्रा रोड,कल्याणMAH00914

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • अखंड हरिनाम सप्ताह, व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आग्रा रोड , कल्याण येथे रविवार दिनांक १० सप्टेबर २०१७ रोजी ह भ प श्री आसाराम महाराज बढे (श्री क्षेत्र आळंदी ) यांचे यथासांग कीर्तन पार पडले. निरुपणासाठी घेतलेला अभंग हा श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा गोड अभंग आहे.
    देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुक्ति ।
    तया इच्छा गति । हें चि सुख आगळें ॥1॥
    या या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी ।
    रिद्धीसिद्धी द्वारीं । कर जोडूनि तिष्ठती ॥2॥
    नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नाश ।
    अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥3॥
    तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघशामा ।
    तुका म्हणे आम्हां । जन्म गोड यासाठी ॥4॥
    हे देवा, मी तुला विनवणी करतो, मला मुक्ती, मोक्ष नको, तुझ्या भक्तिरसाचे सुख आम्हाला आगळा वेगळा आनन्द देत असतं, त्यातच आम्ही सुखी आहोत. या विष्णुदासांच्या घरी, वैष्णवांच्या घरी भक्ती, प्रेम, आनन्द, सुख अनुभवता येतं, तेथे रिद्धी- सिद्धी म्हणजे समृद्धी, सामर्थ्याच्या देवता दोन्ही कर जोडून उभ्या असतात. आम्हाला तुझ्या वैकुंठाचा वास, वस्ती नको, कारण वैकुंठात आल्यानन्तर आम्ही तुझ्या भक्तीसुखाला दुरावले जाऊ, मुकावे लागेल. त्यापेक्षा तुझ्या नामसाधनेत, कीर्तनात रंगून जाणं आम्हाला आवडेल. तुकोबा म्हणतात, हे पंढरीनाथा तुझ्या नामाचा महिमा तुला समजणार नाही, तो महिमा आम्ही भक्तच जाणून आहोत, त्यामुळे आमचा जन्म गोड झाला आहे.
    ह भ प श्री आसाराम महाराज बढे यांनी अनेक उदाहरणे देऊन अभंगाचा अर्थ लोकांना सोप्या शब्दात मांडून, विष्णू , गुरु ते वैष्णव या महत्वाच्या विषयी भाविकांना व्यतित केल्या. महाराज तुमच्या या अश्या अप्रतिम कीर्तन श्रवणाचा लाभ झाल्याबद्दल तुमचे शतशः ऋणी आहोत.
    ।। राम कृष्ण हरी ।।

КОМЕНТАРІ •