Kavitecha Gana Hotana | Ep 6 | Sajan Daari Ubha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 роки тому

    ड्रा. सलील कुलकर्णी, हे माझ्या प्रिय गायक, संगीतकारां पैकी एक, आणि अतिशय प्रतिभासंपन्न, संवेदनशील व्यक्तिमत्व.
    कवितेचं गाणं होताना, ही मालिका मला मनापासून भावली. ड्रा. सलील कुलकर्णी यांची दर्जेदार, आल्हाददायक, आणि आनंददायक संकल्पना.
    आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमीसाठी ही सुवर्ण पर्वणीचं ठरली आहे.
    आज कविवर्य सुरेश भट यांच्या 'सजन दारी उभा' ह्या कवितेचं गाणं होताना ऐकणं म्हणजे अध्यात्मिक आनंद देणारा अनुभव होता.
    ड्रा. सलील कुलकर्णी हे काव्याचे विवरण ऐवढे खोलात जाऊन करतात कि ऐकत राहवंसं वाटते.
    कवितेचं गाणं होताना, ही अविस्मरणीय अशीच स्वर्गीय अनुभूती होता आहे.🙏🙏🙏

  • @AartiPimpalkar
    @AartiPimpalkar Рік тому

    वाह वाह दादा अप्रतिमच!! 👌👌 किती सुंदर, सविस्तर कविता समजावून सांगितली आहे! अतीशय सुंदर काव्य, उत्तम संगित आणि आर्याच्या सूमधुर आवाजातील हे गीत! कविता शृंगार रस प्रधान तर आहेच पण ती आध्यात्मिक, भक्तिरस पूर्ण शृंगार कसा असावा याचं सुंदर वर्णन व विवेचन तुम्ही खूप सुंदर रित्या सांगितल आहे! खूप धन्यवाद 🙏 आणि म्हणुनच तुम्ही एक उत्तम कविमनाचे दिग्गज संगीतकार, आणि कायमचं रसिक जनांच्या मनामनात रुजलेले आहात! कायमचं राहणार 😊🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 ओळखलत ना मला स्वाती पिंपळकर ( नाशिक)🙏

  • @sudhirsunthankar5918
    @sudhirsunthankar5918 2 роки тому

    Aprateem...khoop sundar nirupan ani atishya goud aawaz tuza...Salil...dhanya ahes...🙏🙏🙏

  • @sachinvaikar6056
    @sachinvaikar6056 7 років тому +3

    wow हे गाणं जेव्हा पण मी ऐकतो तेव्हा अंगावर शहारा येतो
    काय अप्रतिम चाल आणी शब्द रचना आहे
    पहाटेच्या रम्य वेळी एकांती हे गाणं ऐकल तर एक वेगळीच अनुभूति होईल
    सलील सर असे गाणे आणखी करा म्हणजे आपल्या मराठी संगीताला चांगले दिवस येतील.
    हल्ली जे गाणे येताय ते अगदी वाहीयात वाटतात मला.

  • @shreeraj9211
    @shreeraj9211 5 років тому +3

    इतक्या दिवस फक्त गाणं ऐकत होतो
    कोणी लिहिलं गायलं काहीच माहित नव्हते.
    शब्दशः अर्थ कळत होता.
    ०पण या कवितेच्या भावनांची विस्तृतता आपल्या शब्दांतून ऐकल्यावर ........ नि:शब्द झालो.🙏🙏🙏🙏🙏
    आर्या जी आपण खरंच सुंदर गायले.👌

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant 3 роки тому

    सलील तुमचे कविता सांगणे ही आप्रितीम अनुभव असतो. सुरेश भट यांची कविता मी पूर्वी वाचली होती पण आज निराळी वाटली खूप धन्यवाद

  • @yashashrivitekari5558
    @yashashrivitekari5558 5 років тому +4

    आज पहिल्यांदा च हा episode बघितला अगदी भारावून गेले आहे......
    ...सलिल दादा खूप मस्त......
    .....इतक्या वेगवेगळ्या प्रकारे कविता समजावून सांगितल्या बद्दल खुप आभार.....

  • @poemsfoodtravelling1037
    @poemsfoodtravelling1037 5 років тому +4

    सुंदर
    मी स्वतःही कविता करते .....मराठी ब्लॉगही लिहिते... तशी मी लहानच आहे ...वीस वर्षांची.... पण मुळात कवितेचा प्रांत असल्याने हा एपिसोड पाहून खूप छान वाटलं संगीत देतानाही शब्दफेकीचा किंवा त्यातल्या लयीचा किती बारकाईने विचार करावा लागतो आणि थोड्याशा फरकानेही अर्थामध्ये किती फरक पडू शकतो हे जाणवलं

  • @rahulvardekar
    @rahulvardekar 7 років тому +11

    सजण दारी उभा, काय आता करू ?
    घर कधी आवरू ? मज कधी सावरू ?
    मी न केली सखे, अजुन वेणीफणी,
    मी न पुरते मला निरखिले दर्पणी
    अन्‌ सडाही न मी टाकिला अंगणी;
    राहिले नाहणे ! कुठुन काजळ भरू ?
    मी न दुबळी कुडी अजुन शृंगारिली
    मी न सगळीच ही आसवे माळिली,
    प्राणपूजा न मी अजुनही बांधिली;
    काय दारातुनी परत मागे फिरू ?
    बघ पुन्हा वाजली थाप दारावरी :
    हीच मी ऐकिली जन्मजन्मांतरी;
    तीच मी राधिका ! तोच हा श्रीहरी !
    हृदय माझे कसे मीच हृदयी धरू ?
    गीत - सुरेश भट
    संगीत - यशवंत देव
    स्वर - शोभा जोशी
    गीत प्रकार - भावगीत

  • @TumchiKavita
    @TumchiKavita 7 років тому +9

    'दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
    थबकले न पाय तरी ह्रदय मात्र थांबले
    वेशीपाशी उदास, हाक तुझी भेटली
    अन् माझी पायपीट डोळ्यांतून सांडली'
    Love you dear भट साहेब🙏

  • @pratibhavishwasrao8986
    @pratibhavishwasrao8986 6 років тому +2

    निःशब्द! अप्रतिम! या पुढे काही न लिहिलेलं बरं! खूप थिटंही वाटतंय आणि त्याचवेळी भरून ऊतू गेल्यासारखंही..........

  • @ArniPara
    @ArniPara 7 років тому +7

    Addicted to these words and the tune! हसरे असलो तर शृंगार वाटतो आणि जरा जरी हळवे झालो तर मधुरा भक्ती! ''नको करू सखी असा'' आणि ''पावलात वाट माहेराची'' चा see-saw आहे सगळा... Beautiful episode. Thank you :)

  • @rutasadhu956
    @rutasadhu956 8 місяців тому

    फार छान कविता समजावून सांगितली..

  • @sujanshirodkar1578
    @sujanshirodkar1578 2 роки тому

    खुपच भावले जेंव्हा देवाशी जोडणी झाली

  • @deekshatendulkar2683
    @deekshatendulkar2683 4 роки тому +2

    सहज अर्थवाही सुलभ भाषा आणि आपल्पाा कंठातील स्वर यांचा सुरेख संगम असेच कवितेचे गाणे होताना ऐकताना वाटते.

  • @charushreevaze7515
    @charushreevaze7515 3 роки тому

    आज कितीतरी दिवसांनी पुन्हा हे ऐकलं.. अप्रतिमच.. कमाल..❤

  • @saee_datar
    @saee_datar 2 роки тому

    वाह वाह किती सुंदर कविता आहे आणि किती सुंदर संगीत अणि vocal सुद्धा झालं आहे, पण सलील sir ही कविता इतक्या सुंदर पद्धतीने समजून घेतात आणि समजावतात सुद्धा, अणि शब्दा शब्दा प्रमाणे संगीतात किती अर्थपूर्णता आली आहे 😍😍❤👏🏻👏🏻🙏🏻

  • @madhuraganoo2584
    @madhuraganoo2584 7 років тому +3

    ही विरपत्नी पण असू शकेल,की जी सीमेवरून येणाऱ्या आपल्या पतीची पंचप्राण डोळ्यात आणून वाट पाहत आहे,तुम्ही म्हणता तसे आपल्या मूड प्रमाणे लोलक ही दरवेळी वेगळा निर्देश करतो,अप्रतिम एपिसोड🙏

  • @deekshatendulkar2683
    @deekshatendulkar2683 4 роки тому +1

    कवितेचा अर्थ उलगडून अशा प्रकारे विद्यार्थ्याना शिकताना किती आनंद वाटत असेल ! धन्यवाद सर .

  • @shilpachandak9931
    @shilpachandak9931 2 роки тому

    Khup sundar

  • @vishwasgurav9190
    @vishwasgurav9190 Рік тому

    अप्रतिम

  • @siddheshmodak9773
    @siddheshmodak9773 7 років тому +4

    awesome kavitech gan hotana 😘
    pan purn gan hi aikayla milhal pahije shevti

  • @yaaminiM0801
    @yaaminiM0801 6 років тому +1

    Sundar 👌 nishabda karun geli hi kavita.. antarmukh .. Hats off to Great Suresh Bhat👍 and salil sir

  • @priyankasalekar1156
    @priyankasalekar1156 5 місяців тому

    Sundar❤

  • @smrutigupte8565
    @smrutigupte8565 2 роки тому

    Salil tumhi kharach khoop Chan paddhatine Kavita samajavata

  • @dranjalikalbhor5942
    @dranjalikalbhor5942 4 роки тому

    अतिशय सुंदर निरुपण.

  • @YetheKavitaLihunMiltil
    @YetheKavitaLihunMiltil 4 роки тому

    काय तरीच अफाट आहे हे.. मी कुठेच नाही एक कवी किंवा संगीतकार म्हणून..
    खूप शिकीन मी तुमच्याकडून
    ❤️ Love From #YKLMPoetry

  • @shwetadeshpande5958
    @shwetadeshpande5958 7 років тому

    अप्रतिम !! शब्द ,चाल आणि विवेचन ......!!

  • @skam1968
    @skam1968 2 роки тому

    Apratim

  • @ashishtendulkar9817
    @ashishtendulkar9817 7 років тому +10

    Bhat saheb may be referring to 'Death' as a sajan and even when the death is around, many people are unable to shed their 'shadripus'. Your comments please.

  • @pravinmaske3207
    @pravinmaske3207 5 років тому

    अप्रतिम सुंदर 👌👌👌👌

  • @praffulkhadse2044
    @praffulkhadse2044 5 років тому

    Khup chhan...

  • @jitendrakulkarni5999
    @jitendrakulkarni5999 3 роки тому

    वा

  • @adwaitumbarkar4307
    @adwaitumbarkar4307 6 років тому

    'shringar ko rehene do' seems like sequal of this poem😊 @Saleel Kulkarni

  • @WellingMD
    @WellingMD 7 років тому +2

    Wonderful , keep the episodes coming.

  • @rajeshlabhsetwar1911
    @rajeshlabhsetwar1911 4 роки тому +1

    बहुत बढिया.
    काय सांगता sir.
    मन अस तल्लीन होऊन जात की.
    बस.
    चालूच rahav तुमचं बोलणं, गाणं.
    आपण ऐकताच राहावं.

  • @ameya9372
    @ameya9372 Рік тому

    ❤❤❤❤

  • @kalyanismusings3260
    @kalyanismusings3260 6 років тому

    simply amazing journey ....thank you so much Saleel dada

  • @adityasalunkhe3392
    @adityasalunkhe3392 7 років тому +2

    Salil sir ya episode madhil tumcha confidence ha best hota ani tyamule ekandarit atm. var tyacha parinam houn atishay sundar asa ha episode tayar zala.... Tr me hech mhanin ki ha confidence nxt episodes la pn disu dya... maf kara lahan tondi motha ghas PN je janawal te vyakt Kel.... tumhi agadi nadichya pravahasarakhe vahilat ya episode madhe... Thank u...

  • @Kaustubh_Dixit
    @Kaustubh_Dixit 7 років тому +1

    Sundar !!! Khoop sundar !!!

  • @anuradhakale1965
    @anuradhakale1965 7 років тому

    Excellent voice, explaination & singing Dr.

  • @yogidude1
    @yogidude1 3 роки тому

    भट साहेब🙏

  • @amitv08
    @amitv08 7 років тому +3

    aaj purna gaana nahi (eksandh) aikayla milal. Please desil ka?

  • @sandipsonawane2294
    @sandipsonawane2294 5 років тому

    छान 👌👌👌❤️✌️

  • @truptipalkar-surankar7597
    @truptipalkar-surankar7597 5 років тому

    🙏🙏🙏 beautiful explanation Sir

  • @prajaktashenai
    @prajaktashenai 6 років тому

    Speechless !! 🙏

  • @charushreevaze7515
    @charushreevaze7515 7 років тому

    Great👌👌👍👍👍

  • @savitamohite8917
    @savitamohite8917 4 роки тому

    Fabulous,केवळ अप्रतीम, ऐकून फक्त अनुभव घ्यावा. त्यापेक्षा जास्त बोलल्यास परिणाम निघून जाईल ही भीति. व्वा thank you for all the episodes.

  • @manjushaumre1623
    @manjushaumre1623 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @SparkandStories
    @SparkandStories 7 років тому

    Superb Salil Sir!!!

  • @raginijoshi2080
    @raginijoshi2080 5 років тому

    अप्रतीम

  • @dhawalpatki
    @dhawalpatki 7 років тому

    Aprateem..!!!

  • @shripaddeshpande3609
    @shripaddeshpande3609 4 роки тому

    सलील.. तू म्हणालास की मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो ही कविता स्वरबद्ध केली होतीस... ती ऐकायला मिळेल का...

  • @rohanTam
    @rohanTam 7 років тому +1

    khoop chhan!

  • @shilpashirwadkar3362
    @shilpashirwadkar3362 5 років тому

    💕💕💕💕💕💖💖

  • @niranjanmdeo
    @niranjanmdeo Рік тому

    खूप छान!!
    असेच रोज न्हाउनी लपेट ऊन कोवळे... हि संपूर्ण कविता आहे का कोणाकडे?

    • @priyankasalekar1156
      @priyankasalekar1156 5 місяців тому

      मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
      तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !
      अशीच रोज नाहुनी
      लपेट उन्ह कोवळे,
      असेच चिंब केस तू
      उन्हात सोड मोकळे;
      तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो !
      अशीच रोज अंगणी
      लवून वेच तू फुले,
      असेच सांग लाजुनी
      कळ्यांस गूज आपुले;
      तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो !
      अजून तू अजाण ह्या
      कुंवार कर्दळीपरी,
      गडे विचार जाणत्या
      जुईस एकदा तरी;
      'दुरून कोण हा तुझा मकरंद रोज चाखतो...?'
      तसा न राहिला अता
      उदास एकटेपणा,
      तुझीच रूपपल्लवी
      जिथे तिथे करी खुणा;
      पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !

  • @atuljaware1387
    @atuljaware1387 7 років тому +1

    सर ,
    आम्हा तरुणांना पुन्हा कविता आणि गझल यांची पुन्हा ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद !
    सायन रुग्णालयात या कधी शूट साठी !

  • @mostsatisfying544
    @mostsatisfying544 3 роки тому

    Which raag???

  • @nehamalkhare9213
    @nehamalkhare9213 6 років тому

    Gulzar hyancha...tagoranchya kavitevar adhaarit " singaar ko rehne do" hya kavitechya khoop javal jaata...

  • @SaleelKulkarniofficial
    @SaleelKulkarniofficial  7 років тому +1

    @ Ashish. certainly ..that can be one of the interpretation

    • @leenahiwarkhedkar2276
      @leenahiwarkhedkar2276 5 років тому

      व्हाट्स अँप no मिळेल का। मला एक कविता पाठवायची आहे। तुम्ही त्याला चाल लावावी असा वाटतं।

    • @leenahiwarkhedkar2276
      @leenahiwarkhedkar2276 5 років тому

      व्हाट्स अँप no मिळेल का। मला एक कविता पाठवायची आहे। तुम्ही चाल लावावी असा वाटतं। माझा no 7758899529

    • @leenahiwarkhedkar2276
      @leenahiwarkhedkar2276 5 років тому

      अप्रतिम !ऐकत राहावंसं वाटतं

  • @Kaustubh_Dixit
    @Kaustubh_Dixit 7 років тому +2

    Waiting for 'Matt kar moh tu' :)

  • @shwetadeshpande5958
    @shwetadeshpande5958 7 років тому +1

    आर्या अंबेकर च्या आवाजात कुठे ऐकायला मिळेल ?

  • @tusharmugade6746
    @tusharmugade6746 7 років тому

    sir nalesh patil yanchya kavitevr episod bnva plz...

  • @amitv08
    @amitv08 7 років тому +4

    asa amhalahi aikayla milo janma janmantari. Suresh bhatanch likhan tar apratim ni tu jya tarhene te ulgadun dakhavlas dhanya zalo.

  • @vikrantd
    @vikrantd 7 років тому +1

    Sampuch naye asa watat hota...

  • @pralhadkayande109
    @pralhadkayande109 7 років тому

    अप्रतिम