रानभाजी - चाई || चाईची भाजी ||आणि गावच्या पठारावरची सफर || Vlog No.7 ||गावाकडच्या_गमती_जमती ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • जुन महिना म्हटला की रानभाज्या खुप, प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या प्रचलीत असतात. अशीच चाई ही आमच्या परिसरात असलेली प्रसिद्ध भाजी.
    शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येताात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून खाल्या जातात.
    वनस्पती आदिवासींनी व शेतकऱ्यांनी शोधून काढल्या आणि अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही.
    त्यातलीच एक रानभाजी म्हणजेच चाईची भाजी.
    या भाजीला प्रत्येक भागात वेगवेगळी नावे असू शकतात शेंडवेलाची, तेलपट, किंवा असे अनेक नावे असतात.
    खरतर या वेलीची नाव शेंडवेल नाहीये. याला म्हणतात चाई चा वेल. पण पुण्याच्या पश्चिम भागात सर्रास शेंडवेल हेच नाव प्रचलित आहे. या वेलीच्या प्रत्येक घटकाची रुचकर भाजी बनवली जाते. लुसलुशीत कोवळे शेंडे की जे पावसाळ्याच्या सुरवातीस येतात. याची भाजी खूपच छान होते. मी स्वतः ही भाजी खाली आहे.
    भारतीय आदिवासी १५३०पेक्षा अधिक वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात. यात १४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४७ फळभाज्या, ११८ बियाण्यांच्या व सुकामेव्यांच्या प्रजाती आहेत. यातल्या काही हिरव्या भाज्या, फुलभाज्या व कंद आम्ही या पठाराची सफर या vlog मध्ये दाखवल्या आहे ...तर नक्कीच व्हिडिओ शेवट पर्यंत बघा ...!
    आणि आमच्या या गावाकडच्या गमती जमती या चॅनेल Like आणि subscribe करायला विसरु नका.
    THANK YOU.....😊

КОМЕНТАРІ •