वाह! माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल! | Update- Mazi Ladki Bahin Yojana changed

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • वाह! माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठे फेरबदल! | Big update : Mukhytamantri Mazi Ladki Bahin Yojana terms changed
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नियमांमध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी मोठे फेरबदल केलेले आहेत आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी ही माहिती दिली माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मराठी भाषेत देण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने खालील बदल झालेले आहेत.
    1) 15 जुलै ही DeadLine अंतिम तारीख काढून टाकली.
    2) वयाची मर्यादा 21 ते 60 ऐवजी आता 21 ते 65 करण्यात आलेली आहे.
    3) शेतजमिनीची अट काढून टाकण्यात आलेली आहे. आधी 5 एकर पर्यन्तची अट होती.
    Chief Minister Mr. Eknath Shinde has made major changes in the rules of the scheme Mukyamantri Mazi ladki bahin yojna. Mukhyamantri Shri Eknath Shinde today in the rainy session of the Legislative Assembly he gave this information about the changes that have been made in the rules of the scheme. Mainly the following changes have been made in this scheme.
    1) July 15 DeadLine deadline removed.
    2) Age limit has been changed to 21 to 65 instead of 21 to 60.
    3) Condition of agricultural land has been removed. Earlier there was a condition of up to 5 acres.
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 माझी लाडकी बहीण योजना माझी बहीण लाडकी mukhymantri Majhi ladaki bahan Yojana 2024 Majhi ladaki bahin Yojana Majhi bahin ladki
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक शेवटची तारीख बदलली
    Mukhymantri Majhi ladaki bahan Yojana last date changed

КОМЕНТАРІ • 562

  • @singergopalpatil7290
    @singergopalpatil7290 23 дні тому +79

    फक्त रेशन कार्ड आधार कार्ड आणि बँक पासबुक मागायला पाहिजे होते तर चांगलं झालं असतं कारण बहुतेक गरीब महिलांचे जन्मदाखले सापडत नाहीत त्यामुळे त्यांचे डोमिसाईल निघत नाही आणि ते योजनेपासून वंचित राहतील

    • @patilvikas755
      @patilvikas755 23 дні тому +6

      जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्या च जन्म दाखले आहेत, गरीब त्याछे कागदपत्र वेळेत पूर्ण होणार नाहीत तर ते ह्या योजने पासून वंचित राहतील.

    • @muzammilhusain6729
      @muzammilhusain6729 23 дні тому +1

      Domicile banana padega ya nahin

    • @muzammilhusain6729
      @muzammilhusain6729 23 дні тому

      Domicile banana padega ya nahin

    • @minakshideshmukh4799
      @minakshideshmukh4799 23 дні тому +2

      Khar aahe he tumhala kharach hi yojna rabvaychi asen tr uplabdh documents ch magave.... Jenekarun hya yojnecha labh baryapaiki hoin.....

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 23 дні тому

      खोटारडी योजना

  • @sharadakachare2438
    @sharadakachare2438 23 дні тому +95

    गरीब बहिणींसाठी तुम्ही भाऊ म्हणून उभे राहिलात म्हणून धन्यवाद

  • @HemlataNimbalkar-t8j
    @HemlataNimbalkar-t8j 22 дні тому +8

    सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे

  • @sangitatalekar284
    @sangitatalekar284 23 дні тому +17

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही ही योजना हाती घेतली आणि सर्व महिलांना खुप खुप आनंद झाला मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सर्व महिला तर्फे खूप खूप धन्यवाद🎉👍👌🙏🙏🙏🙏🙏

  • @madhukarthakare8666
    @madhukarthakare8666 23 дні тому +66

    पैसाचा योग्य वापर पुरूषांना नको पैसे दारू पितात योग्य निर्णय तुमच्या कायद्याला सलाम

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 23 дні тому +1

      मुख्यमंत्री शिंदे साहेब धन्यवाद, तुम्ही येणारे मुख्यमंत्री असणार

  • @MahendraSuryavanshi-i6s
    @MahendraSuryavanshi-i6s 23 дні тому +54

    मुलीचे शिक्षण फ्री आहे मग कॉलेज मधे अडीमिषण चे पैसे कसे घेतात. ???

  • @suvarnasuryavanshi4736
    @suvarnasuryavanshi4736 23 дні тому +4

    एकनाथ शिदे दादा खूपखूप आभार धनवाद गरीब बहीणी साठी योजना आणलया बदल❤❤

  • @hanumangowari5559
    @hanumangowari5559 23 дні тому +20

    जन्माचा दाखला नसेल तर वयाचा दाखला मान्य करावा ही एक विनंती

  • @user-e242vidya
    @user-e242vidya 23 дні тому +3

    साहेब खूप चांगल तुम्ही केलं.आज खर्या अर्थाने तुम्हाला बहीनींचा आशिर्वाद लागला अख्ख्या महाराष्ट्रातल्या बहिणींचा आशीर्वाद लागला महाराष्ट्रातल्या सगळ्या बंधू-भगिनी खुश झाल्या या मोठ्या भावा वरती❤❤❤❤

  • @NitaVilkar-sk8kq
    @NitaVilkar-sk8kq 23 дні тому +6

    दादासाहेब खुप छान निर्णय घेतला आहे विधवा बहीणीला भावाकडू हात भार

  • @shwetaborawake8442
    @shwetaborawake8442 23 дні тому +57

    ज्या महिलांना मुलेबाळे नाहीत त्यांचे नवरे भरपुर.पगारदार असून त्यांना ना नवरा नीट सांभाळतो ना माहेरचे सांभाळतात अशा महिलांना आधार दया शिंदे साहेब ऐवढी या बहिणीची मागणी मान्य व्हावी

    • @mirakamble3866
      @mirakamble3866 22 дні тому

      हो बरोबर आहे माझ पण तेच मत आहे सरकारी नोकरी असणारे सगळेच नवरे आपल्या बायकोला नीट सांभाळत असतील असे नाही सरकारी अधिकारी असणारे सगळे दारू वरती पैसे घालवतात घरच्या बायकोला मुलांना नीट सांभाळत नाहीत त्या बायकांना पण हि योजना लागू करा कारण त्या बायका पण सन्मानाने राहतील आणि सरकारी नोकरी म्हणजे काही पगार पण जास्त नाही अडीच लाखापेक्षा कमीच आहे मग त्यांना का हा लाभ मिळू नये त्यांना पण मिळायला पाहिजे

    • @ShrirangNiware
      @ShrirangNiware 22 дні тому +2

      L❤l

    • @mirakamble3866
      @mirakamble3866 22 дні тому

      माझा सोबत कोण कोण सहमत आहे त्यांनी कॉमेंट मध्ये त्यांची मते मांडा आपली मते मांडायला शिका

    • @SohamRaut-gi4rl
      @SohamRaut-gi4rl 22 дні тому

      ​@@ShrirangNiwareकायद्यात बदल केल्याबद्दल

    • @truptijadhav9302
      @truptijadhav9302 22 дні тому +1

      Tai tu kharch bolli 💯💯

  • @mahammadshaikh8808
    @mahammadshaikh8808 23 дні тому +4

    ज्या लोकांचा उदरनिर्वाह कर्ज काढून घेतलेल्या चार चाकी वर आहे त्यांचं काय

  • @vijaymengane1490
    @vijaymengane1490 23 дні тому +10

    काही लोकांकडे मालवाहतूक फोर व्हीलर आहे त्याच्यावरच त्यांचा प्रपंच चालतो सध्याच्या परिस्थितीत त्यांना गाडीचे हप्ते भरणे मुश्किल झाले आहे अशा कुटुंबात बाबत विचार करावा

    • @user-dy4xh3hi6t
      @user-dy4xh3hi6t 23 дні тому

      He khar ahe

    • @BhaktipawarPawar
      @BhaktipawarPawar 23 дні тому

      Ho na maza pan bacha problem ahe taxi ahe mala pan yacha लाभ घेता येणार नाही

  • @kishormore3023
    @kishormore3023 23 дні тому +8

    तीन लाख उत्पन्न ठेवायला पाहिजे होते साहेब हि एक अट वाढलीतर खूप खूप आभार

  • @AT-aabha
    @AT-aabha 23 дні тому +3

    इतिहासात पाहिले मुख्यमंत्री असणार की ज्यांनी आपल्या बहिणींचा विचार केला आहे.धन्यवाद दादासाहेब🙏

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l 23 дні тому +3

    धन्यवाद सर माझ्या भावाला देव सुखी ठेवो हीच प्रार्थना

  • @user-zs4gx6uo1p
    @user-zs4gx6uo1p 23 дні тому +9

    ही योजना जेष्ठ नागरिकांसाठी सुरू करायला पाहिजे होती
    . त्यांना खरी गरज होती.

  • @simrangoves263
    @simrangoves263 23 дні тому +1

    साहेब आपल्या या कार्याला सलाम

  • @janabalandagewad8277
    @janabalandagewad8277 23 дні тому +7

    शिंदे साहेब भाऊ बहिणीला कमी पडनार नाही धन्यवाद भाऊ 🎉🎉🎉🎉🎉

  • @axy143
    @axy143 23 дні тому +3

    साहेब चार चाकी ची अट काढून टाका

  • @BaliramYadav-sn3df
    @BaliramYadav-sn3df 23 дні тому +9

    मुलींना शिक्षण मोफत केले आहे, अभिनंदन साहेब. मुलांना शिकवायला बर्याच पालकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे शिकलेल्या मुलांची संख्या घटेल. मग ह्या शिकलेल्या मुलींना नवरे तुम्ही आयात करणार आहेत का.

  • @abhimanyukshirsagar3544
    @abhimanyukshirsagar3544 23 дні тому +7

    साहेब सर्व आटी रद्द करा सरसगट द्या सर्व महिला तुमच्या बहीणी च आहे

  • @anandjadhav5690
    @anandjadhav5690 23 дні тому +7

    आणी मग ६५ च्या वरच्या ज्या महीला आहेत ज्यांना एकाही योजनेचा लाभ मिळत नाही ज्यांचे ऊत्पन्न ही कमी आहे त्या कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतात?

  • @pradipdaulatdar4584
    @pradipdaulatdar4584 23 дні тому +7

    सेतू केंद्रावर फॉर्म ऑनलाईन करण्यासाठी 200 ते 300 रुपये रहिवासी आणि उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू केंद्र वाले साहेब लक्ष ठेवा

  • @user-ov2sk9fb7b
    @user-ov2sk9fb7b 23 дні тому +3

    गाडी वाली नि काय केले व्यवसाय करायला गाडी घेतली आहे

  • @somnathgaikwad3636
    @somnathgaikwad3636 23 дні тому +40

    खूप छान केलात शिंदे साहेब

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 23 дні тому

      खूप छान निर्णय घेतला महिलांसाठी मुख्यमंत्री दादा

  • @axy143
    @axy143 23 дні тому +3

    काही लोक जुनी चार चाकी प्रवासी वाहतूक करणेसाठी किवा टेम्पो चालक हमाल भाजी कांदे बटाटे फिरुन विकनेसाठी घेतात त्यांच्यासाठी चार चाकी ची अट शिथिल करा

  • @prakashgaikwad1871
    @prakashgaikwad1871 23 дні тому +7

    बाकी काहीही असो पण बाळासाहेबांना जे अपेक्षित होतं ते काम तुंम्ही करताय साहेब साहेबांच्या विचारांचे खरे वारसदार असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला

  • @kantajagtap3664
    @kantajagtap3664 23 дні тому +16

    खरी गरज तर साठ वयासाठीपुढे असायला हवी

  • @user-pt6ny3vn4d
    @user-pt6ny3vn4d 23 дні тому +3

    शिंदे साहेब तुम्ही खूप खूप छान निर्णय घेतला आहे पण ज्यांना जमीन नाही सरकारी नोकरी नाही त्यांनी पोट भरण्यासाठी गाडी घेतली लोन काढून हप्ते भरतात अशा जनतेचा विचार करावा.. चार चाकी गाडी अट काढून टाकावी ही विनंती आहे...🙏

  • @ShubhangiSonavane-q7n
    @ShubhangiSonavane-q7n 23 дні тому +3

    माझे सर्व कागद पात्र आहे पण रेशन कार्डे वर नाव नाही तो नियम नका लावू भरपूर अशा महिला आहे त्याचे रेशनकार्ड वर नाव नाही मग त्यांनी काय करावे दादा😢

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 23 дні тому

    अतिशय छान निर्णय आहे मनःपुर्वक धन्यवाद ❤🙏

  • @NamdevDubukwad
    @NamdevDubukwad 23 дні тому +2

    धन्यवाद् सर

  • @SleepyMountainRailway-ti2ty
    @SleepyMountainRailway-ti2ty 23 дні тому +15

    खेडोपाडी ही योजना आली पाहिजे म्हणजे झाले

  • @alkapatil6695
    @alkapatil6695 23 дні тому

    आभारी आहोत साहेब

  • @Aditi-xm5um
    @Aditi-xm5um 22 дні тому

    ❤Thanks khup Chan mahiti dilit tyabaddal tumche hi khup khup abhar🎉🎉

  • @RahulDeverale
    @RahulDeverale 23 дні тому +4

    शिंदे साहेब जसं तुम्ही आता सांगितलं की आमच्या बहिणीकडून कोणी पैसे घेतले तर आम्ही त्यांना सस्पेंड कर तसं तुम्ही मुलींच्या शिक्षणाबाबत ही करू कारण की कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना सर लोक पूर्ण फीस घेता त्यांच्यावरही काही कारवाई करा

  • @sunitakamble3227
    @sunitakamble3227 23 дні тому

    मनापासून आभार धन्यवाद

  • @chandraksntrandive9471
    @chandraksntrandive9471 23 дні тому +45

    धन्यवाद शिंदे साहेब आणखी एक काम करा मराठा आरक्षण चा प्रश्न सोडवा आणि आरक्षण द्यावे

    • @minakshideshmukh4799
      @minakshideshmukh4799 23 дні тому +2

      Right

    • @vishnupatil2779
      @vishnupatil2779 23 дні тому +2

      खरंय.. आयुष्यभरासाठी मुख्यमंत्री रहाण्याची सुवर्णसंधी आहे

    • @harshadaparab1568
      @harshadaparab1568 23 дні тому +3

      हो , मराठा आरक्षण करा

    • @sagarudage3959
      @sagarudage3959 23 дні тому

      मला खात्री आहे शिंदे साहेब तितक्या जोमाने हे पण देखील काम करून दाखवतील

    • @yogeshzate-mf8hq
      @yogeshzate-mf8hq 23 дні тому

      संजय गांधी निराधार 6000 रुपये एकनाथ शिंदे साहेब यांनी करा अपंगांना नोकरी जॉब मिळाला पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांना नमूद करतो की❤ खरच कठीण बाबी अपंगाचा विचार कोणी करत नाही का करत ते जर सरकारचे लेकरू असतं तर मग काय

  • @ReshmaDeshmukh-v7u
    @ReshmaDeshmukh-v7u 23 дні тому +2

    डॉक्युमेंट्स मध्ये रेशन कार्ड नसलं तर चालतं का सर

  • @anitisuryawanshi8284
    @anitisuryawanshi8284 22 дні тому

    खूप छान धन्यवाद❤

  • @user-oi9hx1qi1r
    @user-oi9hx1qi1r 23 дні тому

    धन्यवाद.मुखेमत्री.सहेब

  • @shitalmaheshasarkarasarkar
    @shitalmaheshasarkarasarkar 22 дні тому

    Khup khup dhanyawad mukhyamantri Sir tumche khup khup aabhar

  • @VinayakDeshmukh-tg9qi
    @VinayakDeshmukh-tg9qi 23 дні тому +17

    मुलींसाठी शिक्षण फ्री आहे तर मुलांसाठी का नाही

    • @JilaniShaikh-rf2hl
      @JilaniShaikh-rf2hl 22 дні тому

      मुलगा शिकला तर कार्यकर्ते कसे बनतील😂😂

  • @sanjaypendharkar8164
    @sanjaypendharkar8164 23 дні тому

    Khup chaan Saheb

  • @dattaharde5785
    @dattaharde5785 22 дні тому

    धन्यवाद भाऊ

  • @sampatraomendhe1109
    @sampatraomendhe1109 23 дні тому +2

    चार चाकी जुनी गाडी ३०/४०हजार ते पाच लाख रुपये पर्यंत येथे तर मोटार सायकल व स्कुटी११५०००/-रुपये ते१००००००/-रुपये पर्यंत आहे तरी चार चाकी गाडीची अट काढून टाकावी

  • @santoshlande434
    @santoshlande434 22 дні тому +1

    एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,आपण खूप छान पद्धतीने आपल्या अनुभवानुसार महिलांना आधार देण्याचं काम करत आहात ते काम खूपच अविश्वसनीय आहे, अप्रतिम सर्वांना आवडेल अशी योजना आपण राबवत आहात, आपले मनापासून आभार,पुढिल वाटचालीसाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, 🙏👍🚩🚩🚩👏

  • @sangitathube5057
    @sangitathube5057 23 дні тому +9

    अंगणवाडी सेविकांना किती मानधन मिळते त्यांना का वगळले

    • @JaysreeShelke
      @JaysreeShelke 23 дні тому

      अंगणवाडी सेविका प्रत्येक योजनाआली की वेळेवर काम करते मग ती नाही का लाडकी बहिण तिला का दुर केले लाड क्या भावाने🎉🎉

  • @sheetalaradhye6148
    @sheetalaradhye6148 22 дні тому

    Thank you very much saheb

  • @vikastawade3502
    @vikastawade3502 23 дні тому +12

    शिंदे साहेब योजना तर खूप चांगली आहे परंतु सर्व महिलांचे जन्म दाखला असेल किंवा सापडत नसतील तर या योजनेपासून बहुतेक महिला वंचित राहतील त्यामुळे जन्मदाखला ऐवजी आधार कार्ड किंवा बँक पासबुक राशन कार्ड इतर काही ऑप्शन उपलब्ध करून द्यायला पाहिजे

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 23 дні тому +2

      अहो विकास पाटील १० वर्ष हे आता पर्यंत सगळ्याच गोष्टी आधार कार्डवर करत आलेले आहे आणि आताच काय झाले आहे.. त्याच्यावर वय आहे नागरिकत्व आहे रहीवासी गाव आहे मग अजुन काय पाहिजे सरकारला हे फक्त विधानसभे पुरते पहीलाच हाप्ता थोडेफार ठिकाणी देणार आणि निवडणूका झाल्यावर बंद ही फक्त नौटंकी चालू आहे

  • @vishnuchaudhari405
    @vishnuchaudhari405 23 дні тому +10

    फक्तं डोमासिल एवजी दुसरा पर्याय पाहिजे.

  • @vaishalibachhav7625
    @vaishalibachhav7625 23 дні тому +3

    रेशन‌ कार्ड मध्ये नाव नसेल तर चालेल का

  • @sudhakargaikwad947
    @sudhakargaikwad947 22 дні тому

    धन्यवाद

  • @vaishalijoshi9976
    @vaishalijoshi9976 22 дні тому +1

    खूप उत्तम योजना आहे त्यामुळे महिला सुरक्षित झाली आहे वृद्ध महिलांचाही विचार करा ज्यांना कोणी विचारत नाही त्यांचा

  • @shailejsalunkhe3269
    @shailejsalunkhe3269 22 дні тому

    Khup chan saheb

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 23 дні тому +3

    लोकांना काम द्या फुकट खायची सवय न लावता कष्टाने खायची सवय लावा.
    मते‌मिळवण्यासाठी ही योजना पण याचा परिणाम योग्य ना ही.
    शिक्षणासाठी योग्य आहे

  • @user-cg1oy7hx2e
    @user-cg1oy7hx2e 23 дні тому +6

    २००० करा दाजी पण खुश होतील

  • @surendrazade827
    @surendrazade827 23 дні тому

    Thank you sir

  • @sheetalaradhye6148
    @sheetalaradhye6148 22 дні тому

    Amha sarv mahilantarphe bhau rayanche abhinandan ani khoop khoop shubhechhya

  • @user-eb5hp4mq2s
    @user-eb5hp4mq2s 21 день тому

    महत्वपूर्ण योजना चालू केल्याबद्दल धन्यवाद शिंदे साहेब

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 23 дні тому +14

    काही दिवसांनी देश आणि राज्य कर्ज बाजरी करणार

    • @machhindrabachhav2106
      @machhindrabachhav2106 23 дні тому +2

      अशामुळे लोकांची कष्ट करण्याची तयारी राहणार नाही

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 23 дні тому

      तुलाच लय काळजी दिसतेय

    • @priyankanagvrkar1331
      @priyankanagvrkar1331 23 дні тому

      Jesta nagrikansathipan hi yojana kadha

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 23 дні тому +2

    very good congestion

  • @OmkarPadalkar
    @OmkarPadalkar 23 дні тому +2

    योजने बद्दल धन्यवाद सर माझी रिक्वेस्ट आहे, डोमेसाइल सर्टिफिकेट साठीची जन्म दाखल्याची अट काढून 10 वी सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड चालेल असे काहीतरी करा प्लीज सर

  • @user-po3dl6zd8j
    @user-po3dl6zd8j 23 дні тому

    Sir maze aai vadil nahit ni document pn nahit mi ks apply kru sir pls kahi sanga pls sir

  • @SantoshShinde-in8zg
    @SantoshShinde-in8zg 23 дні тому +1

    मुख्य मंत्री साहेब योजना चांगली आहे पण काही मुलं देखील अशी आहेत की ती शिक्षनामध्ये टॉप लेव्हलला आहेत पण परिस्थिती मुळे त्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही म्हणून त्यांच्या साठी सुद्धा कोणता तरी निर्णय घेणे गरजेचे आहे तरी आपण याचा विचार करावा

  • @pallavideshmukh2877
    @pallavideshmukh2877 20 днів тому

    सर्व महिला खूप खुश आहेत सर्व महिलांकडून तुमचे खूप खूप आभार

  • @user-be7yr7lg4g
    @user-be7yr7lg4g 22 дні тому

    Khupch chan Kam kele aahe dadani

  • @PanchalSwati-ou5fh
    @PanchalSwati-ou5fh 23 дні тому

    Sir sakat kra n jyana pgar kmi aahe aani 10 .12 vrsh fukat kelyachya naitar pgar suru hoto tyanh kay

  • @deepakkhairnar5196
    @deepakkhairnar5196 22 дні тому

    शिंदे साहेबांनी पहिल्यांदा सगळ्या समाजाची मने जिंकली, खूप खूप धन्यवाद काका तुम्हाला

  • @cutenessqueenbela273
    @cutenessqueenbela273 22 дні тому

    Plz sanga na married aahe pn sarv documents papa chya navani ahe chln ka ?

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 23 дні тому +2

    ज्या महिलांचे ब्यांक अकाउंट आहे त्यांच्या अकाउंट मध्ये विना अट पैसे बहिणींच्या खात्यात भरावेत तरच ही योजना यशस्वी होईल. अन्यथा बोलाचाच भात बोलाची कढी...

  • @surekhathombare7221
    @surekhathombare7221 23 дні тому +6

    ज्यांच्या कडे अडीच हजाराची पेन्शन येते त्यांना❤❤

  • @rambhosale3531
    @rambhosale3531 22 дні тому +2

    कृपया माझी कोण दखल घेणार आणि कशी घेणार याकडे महाराष्ट्र राज्य सरकारने लक्ष वेधून घेतले पाहिजे
    ही विनंती आहे
    मला आता जास्त हालचाल करता येतं नाही
    हेच माझे सरकारला
    निवेदन देण्यात आले आहे

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 23 дні тому +2

    आयत खाण्याची सवय लावणेचे काम चालु आहे.कालांतराने मोलमजुरी करणे,शेतीसाठी काम करणेस,इ.साठी कुणीही मिळणार नाही.वोट बॅंक तयार करणे चुकीचे आहे.

  • @BharatlalKohale-uw9rj
    @BharatlalKohale-uw9rj 22 дні тому

    फिर छान नियम धन्यवाद जी

  • @user-gw4ub4hd7s
    @user-gw4ub4hd7s 22 дні тому

    Thank you. C m sahek.

  • @sharad7131
    @sharad7131 23 дні тому +2

    Sinde saheb congratulations

  • @vidyadamle2227
    @vidyadamle2227 23 дні тому +1

    आम्ही ही आपले धन्यवाद

  • @nareshnavnage5051
    @nareshnavnage5051 20 днів тому

    ठवल्या बायांना मरेपर्यंत पैसे दिले तर फारच छान आम्ही आपले आभारी राहीन. भूमीहीन असल्यामूळे आमचा उदरनिर्वाह,मूलिंचशिक्षण बरोबर होत नाही कृपया मार्गदर्शन करा हिच विनंती सर धन्यवाद शिंदे सर.लक्ष द्या

  • @RiyaJadhav-di8wx
    @RiyaJadhav-di8wx 23 дні тому

    Kup chan sir

  • @shrikantghuge221
    @shrikantghuge221 23 дні тому

    खूप छान निर्णय घेतला

  • @rajendraramteke854
    @rajendraramteke854 23 дні тому

    Hi yojna suru keli tumche kup dhan yawad

  • @nitinshahane8562
    @nitinshahane8562 23 дні тому +3

    खुप छान आहे माहिती
    पन आधार कार्ड किंवा ओळख पत्र
    एवढीच कागदपत्रे ठेवा
    कारण मतदानाचा हक्क सर्वच लेडीज ला आहे 65 वर्षांनंतर लेडीज मतदान करतेत ना

  • @meenakshijadhav6275
    @meenakshijadhav6275 23 дні тому +1

    Mazya kade birth certificat ani living pan nahi ashe ter mi yogya tharel kai

  • @satyawansurve8194
    @satyawansurve8194 23 дні тому +1

    धन्यवाद मा.शिंदे साहेब,त्याच प्रमाणे ग्रामिण भागातील घरतुलांचा प्रश्न लौकरच मार्गी लावा,नमस्कार साहेब.

  • @sureshjadhav5214
    @sureshjadhav5214 23 дні тому +1

    साहेब डोमासाईलची आडकाठी तेवढी काढून टाका कारण नावावरूनच समजते की यांचं महाराष्ट्रातल वास्तव्य तेवढं करा

  • @AnilShende-cs9wt
    @AnilShende-cs9wt 23 дні тому

    Jal Macha dakhla nhi ahe mazya kde living ahe mazya kde domicile kadala jalmacha dakhla pahijen mnte sir me Kay kru sir sanga kahi tri

  • @VandanaVaidya-yv1mo
    @VandanaVaidya-yv1mo 23 дні тому

    Asha work er aslyas from. bharta yeil ka

  • @abasochandane3894
    @abasochandane3894 23 дні тому +9

    आधार कार्ड राशनकार्ड रहिवाशी दाखला उत्पन्न दाखला बॅक पासबुक फोटो मतदान कार्ड एवढच सक्तीच करा भरपूर महिलांचे जन्म व शाळेचे दाखिले नाहीत त्या माता भगिनी या पासून वंचित राहतील त्यांना कस देता येईल ते बघा सर्व बहिणीच्या शुभेच्छा तुम्हाला मिळतील याचा विचार व्हावा

    • @user-ts4ur4ds2y
      @user-ts4ur4ds2y 23 дні тому +1

      शिंदे साहेब आभारी आहे असा मुख्यमंत्री आजपर्यंत झालेला नाही तुम्हाला दिर्घायुष्य लाभो 🙏🙏

  • @rajendrajagtap9823
    @rajendrajagtap9823 23 дні тому +2

    खूपच छान माहिती आहे आनंद देणारी

  • @rosyjohndavid972
    @rosyjohndavid972 23 дні тому

    Thank you sir yours faithfully are mother sixth five years old❤🎉🎉

  • @user-tf1jo9ru9c
    @user-tf1jo9ru9c 22 дні тому

    Thanks

  • @user-nk2oz9ky4p
    @user-nk2oz9ky4p 23 дні тому +4

    कोणाला देतात अंगणवाडी सेविका ना काही च नाही का एवढे काय पाप केले अंगणवाडी सेविका नी तुम्हाला माहिती नाही महाराष्ट्रातील च बहीण आहेत शिंदे साहेब खुप कमि पगारा काम करतो दादा आम्ही पण मतदार आहेत मुंबई ला येऊन पाय धरायचे काम आहेर आम्हाला नाही का लाडकि बहीण नाही तर सावत्र बहीण समजून मदत करा हात जोडते एक अंगणवाडी बहीण

    • @arunapadvi8099
      @arunapadvi8099 23 дні тому

      अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई सुद्धा काही निराधार, परित्यक्ता, विधवा आणि घटस्फोटीत महिला आहेत त्यांचा का विचार केला नाही तुम्ही

  • @kulbhushannadgouda4928
    @kulbhushannadgouda4928 23 дні тому

    मुख्यमंत्री साहेब धन्यवाद

  • @supurmodelgamer2898
    @supurmodelgamer2898 23 дні тому +1

    भाऊ म्हनुन मदत करायची आहे तर अडी कशासाठी आधारकार्ड बैंक पासबुक मतदान कार्ड सरपंच रहीवासी दाखला याचावर मदद कर

  • @MarotiLole-jr9xe
    @MarotiLole-jr9xe 22 дні тому

    Very nice decision sahab

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 23 дні тому +1

    महाराष्ट्रातील सर्वच महिलांना लाडकी बहीण योजनेत सहभागी करा . कारण आपले हक्काचे मतदार हे मध्यम वर्गीय भगिनी आहेत . मला सर्वांन बद्दल बोलायचे नाही . पण जे आपल्या विरोधात मतदान करतात तेच या योजनेत पुढे येऊन लाभ घेणार आहेत . ते आपल्याला जमा झालेल्या कागद पत्रा वरूनच समजेल . जय महाराष्ट्र

  • @shivsanap1851
    @shivsanap1851 23 дні тому +3

    या योजनेमुळे सर्व लोक आळशी होतील कामे करणार नाही

  • @sujitwasankar4759
    @sujitwasankar4759 22 дні тому +2

    आम्ही अशा महिला ज्यांच रेशन कार्ड मध्ये नाव nhi tyani kay karav plese sanga