तळोदा तालुक्यात आजी व नातूला लक्ष करणाऱ्या तीन नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्यात तळोदा वनविभागाला यश

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024
  • नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात आजी व नातूवर जीवघेणा हल्ला करुन त्यांना लक्ष करणार्या, एक दोन नव्हे तर तीन नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्यात तळोदा वनविभागाला यश आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या बिबट्यांनी तळोदा तालुक्यातील काजीपुर व चिनोद शिवारात चांगलाच धुमाकुळ घातला होता, पंधरा दिवसात तब्बल तीन जणांचा बळी गेल्यानंतर वनविभागाने याच ठिकाण पिंजेर लावले होते, बुधवारी सकाळी एक आणि गुरुवारी सकाळी दोन नर मादी बिबट्यांना या भागातून वनविभागाने जेरबंद केले आहे, दोनच दिवसात तीन बिबट्या जेरबंद झाल्याने, या भागात नेमके किती बिबट आहेत? याबाबत आता प्रश्न निर्माण झाला आहे, दरम्यान पकडेले बिबटे तीनही एकाच कुटुंबातील असून त्यांच्या वैद्यकीय तपासणी नंतर, त्यांना धुळे येथील वनविभागाच्या कार्यालयात हलवण्याचा हालचाली देखील सुरु करण्यात आल्याचे समजत आहे, मंगळवारी काजीपुर शिवारात बिबट्याच्या हल्यात आजी आणि तिला शोधण्यास गेलेल्या सात वर्षीय नातवावर हल्ला करुन बिबट्याने लक्ष केले होते.

КОМЕНТАРІ •