|| सज्जनगड || Sajjangad Fort || Shree Samarth Ramdas Samadhi || Mumbai to Satara ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • श्रीरामदासस्वामी संस्थानला हिंदवी स्वराज्यापासूनच राजसत्तेकडून व समाजाकडून सतत पाठिंबा मिळत राहिला आहे. श्रीसमर्थ रामदासस्वामी चाफळहून इ. स. १६७६ मध्ये सज्जनगडावर वास्तव्यास आले. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणजेच सज्जनगडावरील मठ होय. आज ही वास्तू समर्थांचा मठ म्हणून ओळखली जाते. या मठात समर्थांचे वास्तव्य सुमारे ६ वर्ष झाले आहे. राज्याभिषेकानंतर शिवछत्रपतीं समर्थांसमवेत येथे सुमारे दीड महिना राहिलेले आहेत. संभाजी महाराज देखील या मठात सुमारे दोन महिने राहिलेले आहेत. त्यामुळे हा मठ म्हणजे सज्जनगडावरील अत्यंत पवित्र वास्तू होय.
    श्रीसमर्थांनी तंजावरच्या (तामिळनाडू) कारागिराकडून करून घेतलेल्या पंचधातूंच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या मूर्ती या मठातील शेजघरात ठेवल्या होत्या. अखेरचे पाच दिवस अन्नत्याग करून श्रीसमर्थांनी याच मूर्तींचे समोर माघ वदय ९ शके १६०३ (दि. २२ जानेवारी १६८२) रोजी देह ठेवला. मठाचे उत्तरेस एक खळगा होता. तेथे श्रीसमर्थांच्या देहावर शास्त्रोचित अंतिम संस्कार करण्यात आले. हे संस्कार श्रीसमर्थांचे शिष्य उद्धवस्वामी यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी श्रीसमर्थशिष्य कल्याणस्वामी गडावर नव्हते. परंतु शिष्या चिमणाबाई उर्फ आक्काबाई त्यावेळी गडावर होत्या. ज्या जागी अंतिम संस्कार करण्यात आले त्याजागी श्रीसमर्थ समाधी प्रगट झाली व त्याचेवर मंदिर उभारून मंदिरात वरील पंचधातूंच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.
    गडावरील महत्वाचे ठिकाण
    १.छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार
    २.श्री समर्थ रामदास महाद्वार
    ३. घोडाळे तलाव
    ४.पेठेतील मारुती मंदिर
    ५.श्रीधर कुटी
    ६.श्री समर्थ रामदास समाधी मठ
    ७.अशोक वन
    ८.धाब्याचा मारुती मंदिर
    ९.शेजघर
    १०.महाप्रसाद गृह
    #indiatourism
    #maharashtratourism
    #travel
    #vlog
    #minivlog
    #sajjangad
    #sajjangarhfort
    #satara

КОМЕНТАРІ • 3