Це відео не доступне.
Перепрошуємо.

प्रॉपर्टी विकताय | आलेल्या पैशांची गुंतवणूक करणार की टँक्स भरणार | Property buy & sell

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2021
  • #capital_gains_tax #short_term_capital_gain #long_term_capital_gain
    Capital Gains Tax on Property - Section 54 | कॅपिटल गेन्स टॅक्स संधर्भात संपूर्ण माहिती 📝
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    रेसिडेन्सियल प्रॉपर्टी सेक्शन ५४ कॅपिटल गेन टॅक्समध्ये २ प्रकार पडतात
    १) शॉर्ट टर्मकॅपिटल गेन टॅक्स
    २) लॉन्ग टर्मकॅपिटल गेन टॅक्स
    १) शॉर्ट टर्मकॅपिटल गेन टॅक्स - एखादी प्रॉपर्टी तुम्ही विकतघेतल्यापासून २४ महिन्यांच्या आतमध्ये विकत असाल तर या केस मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीच्या झालेल्या व्यवहारामध्येजो प्रॉफिट असतो. त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. हा टॅक्स तुमचाआयटी रिटर्न म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न चा जो स्लॅब असेल त्यापरमाने टॅक्स भरावालागतो, बऱ्याच जणांचा स्लॅब २०% चा असतो किंवाकाहींचा ३०% चा असतो. जसा असेल त्याप्रमाणे आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सभरावा लागतो. यावर टॅक्समध्ये कोणतंही exemption किंवा indexation benefit मिळत नाही. हा टॅक्स कंपलसरी भरावा लागतो.
    २) लॉन्ग टर्मकॅपिटल गेन टॅक्स - एखादी प्रॉपर्टीतुम्ही विकत घेतल्यापासून २४ महिन्यांच्या नंतर विकली तर या केस केस मध्येतुम्हाला प्रॉपर्टीच्या झालेल्या व्यवहारामध्ये झालेला जो प्रॉफिट असतो. त्यावरलॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. पूर्वी हि मुदत ३ वर्षांपर्यंतची होती आता ती कमी करून २वर्ष करण्यात आली आहे.हा टॅक्स फ्लॅट २०% असतो. यामध्ये तुम्हाला exemption सुद्धा मिळते. Property indexation calculation करून तुम्हाला महागाई किती वाढली आहे त्या प्रमाणात टॅक्स वाचवता येतो. लॉन्ग टर्म कॅपिटलगेन टॅक्स वाचवायचा असेल तर आपल्याला हा टॅक्स 3 प्रकारे वाचवता येतो.
    १) तुमचीप्रॉपर्टी विकल्यापासून २ वर्षांच्या आतमध्ये नवीन residential property vikat ghevu shakta नाहीतर एखादा प्लॉट घेऊन त्यावर 3 वर्षांच्या आत घर बांधायला हे पैसे वापरूशकता. असं केल्याने आपल्याला लॉन्ग टर्म कॅपिटलगेन टॅक्स मधून रिलीफ मिळतो. पण या पैशानी विकतघेतलेली नवीन परोपरी तुम्हाला पुढील ३ वर्ष विकत येत नाही. कारण तुम्हाला हि प्रॉपर्टी घेण्यासाठी टॅक्स मध्येरिलीफ मिळालेला असतो. तसेच या पैशांमधून जास्तीत जास्त २ प्रॉपर्टी विकत घेऊ शकता
    २) तुम्ही जर १वर्षांपूर्वी एखादी प्रॉपर्टी विकत घेतली असेल व तिचे लोन चालू असेल तर हे आलेलेपैसे लोण ला भरू शकता. अशा केस मध्ये सुद्धा तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही
    ३) गोवरमेन्टबॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करू शकता. (यामध्ये ५ वर्षांचे लॉकइन पिरेड असून ५%व्याजाचा दर असतो. कॅपिटल गेन अकाऊंट व गव्हर्मेंट बॉण्ड्स या दोन्ही ऑप्शन्स संपूर्ण माहिती
    कॅपिटल गेन अकाऊंट -कॅपिटल गेन अकाऊंटकेव्हा ओपन करावे - जर तुम्ही ज्याफायनान्सियल इयर मध्ये प्रॉपर्टी विकली ते फायनान्सियल इयर संपायच्या आतमध्ये दुसरी प्रॉपर्टी नाही विकत घेता आली तर तुम्हाला ३१ जुलै च्या आतमध्ये अकाऊंटओपन करून पैसे जमा होणं गरजेचं असतं.जेव्हा तुम्हीदुसरी प्रॉपर्टी विकत घेता तेव्हा तुम्हाला समोरच्या पार्टीला या अकाऊंट मधूनपेमेंट करता येते.जर २ वर्षांच्याआतमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी नाही विकत घेता आली तर कॅपिटल गेन अमाऊंट withdraw करण्यासाठी तुम्हाला पहिला टॅक्स भरावालागतो महागच हि अमाऊंट अकाऊंट मधून काढता येते.
    गव्हर्मेंटबॉण्ड्स - २ प्रकारचे बॉण्ड्स असतात
    १) NHAI - National Highways Authority ofIndia
    २) REC - rural electrification corporation
    यातून मिळणाराव्याजाचा दर हा ५ to ६ % इतका असतो.
    इन्व्हेस्टमेंटचीमुदत - तुम्ही प्रॉपर्टी विकल्यापासून ६ महिन्याच्या आतमध्ये या बॉण्ड्स मध्येगुंतवणूक होणं गरजेचं आहे.
    लॉकइन पिरेड - ५वर्षांचा असतो ५ वर्षांनी हे पैसे पूर्णपणे टॅक्स फ्री होतात. याचं येणारे व्याजहे टॅक्सेबल असून ते दर वर्षी तुम्ही घेऊ शकता.
    Follow me on :
    Instagram : / umeshmahadik7
    Facebook : / umeshmahadik57
    Email ID : umeshmahadik14@gmail.com
    Amazon shopping Link - amzn.to/358EqBX
    #Tax #income_tax #property_deals #Capital_Gains_Accounts_Scheme #income_tax_section_54 #property_indexation_calculation #property_indexation #tax_exemption #sell_income_property #residential_property #tax_consultant #CA
    If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE & COMMENT.
    For Business Inquiries & Sponsorship
    Email Id : umeshmahadik14@gmail.com

КОМЕНТАРІ • 29

  • @user-mk9po1zm2d
    @user-mk9po1zm2d 18 днів тому

    स्वतःवर invest करा. Health आणि skills वर जास्तीचे पैसे असतील तर Gold आणि उद्योगधंद्यासाठी लागणारे assets

  • @rajendragaikar4782
    @rajendragaikar4782 Рік тому +1

    सरळ सोप्या शब्दात माहीती दिलीत आभारी

  • @rajeshyawalkar3382
    @rajeshyawalkar3382 Місяць тому

    खूपच उत्तम माहिती दिली धन्यवाद

  • @rameshpathak858
    @rameshpathak858 4 місяці тому +2

    Very nice mahiti dili

  • @Ishaan-ix4wh
    @Ishaan-ix4wh 25 днів тому

    5 varsh गुंतवणूक 6% नी करण्यापेक्षा तीच प्रॉपर्टी तशीच ठेवली तर पैसे दुप्पट होऊ शकतात

  • @deepak-korgaonkar2535
    @deepak-korgaonkar2535 Місяць тому

    खूप छान माहिती

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Місяць тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @starjotishandgems3551
    @starjotishandgems3551 29 днів тому

    ❤ sir 1991 सांली घर purchase केलं होत Rs 67,500 ला आणि आता विकल जून 2024 लां Rs 135,0000 ला तर incom tax किती pay करावा लागेल?

  • @OptimisticArcticFox-uu6iw
    @OptimisticArcticFox-uu6iw Місяць тому

    खुप छान माहीती

  • @dpawar3047
    @dpawar3047 Рік тому

    खुप छान माहिती दिली 🙏🌹

  • @balasahebghule7212
    @balasahebghule7212 5 місяців тому

    छान मा हीती दिली

  • @surabhimangaonkar9097
    @surabhimangaonkar9097 Рік тому

    खूपच छान.सगळी माहिती मिळाली. सरकारी बाॅंडची मुदत संपल्यावर आपण त्याचरकमेची fd करु शकतो का

  • @mahendradhumal7316
    @mahendradhumal7316 Місяць тому

    Mi फ्लॅट sale केला ३/७/२३ la capital gain save karnesathi भरायला लागू नये mahnun २/७/२५ पर्यंत मि दुसरी property विकत घेऊ shakto ना ka आता ३१/०७/२४ che aat ch ghetali पाहिजे

  • @arunkulkarni9973
    @arunkulkarni9973 Рік тому

    खुप छान माहिती.

  • @kundarairana3123
    @kundarairana3123 4 місяці тому

    Govt. Bond's kuthe miltil. National ised Banks madhe.

  • @devidasmadkevlogs3687
    @devidasmadkevlogs3687 3 роки тому +1

    #complete

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 2 роки тому +1

    धन्यवाद

  • @anantraut5301
    @anantraut5301 4 місяці тому

    छान माहिती

  • @vijaypatil8548
    @vijaypatil8548 2 роки тому

    खूप खूप आभारी आहे

  • @suchetajoshi7649
    @suchetajoshi7649 6 місяців тому

    विकल्यापासून किती दिवसाच्या आता कॅपिटल गेन टॅक्स साठी invest करावे लागतात

  • @user-uf6gf2nd1u
    @user-uf6gf2nd1u Місяць тому

  • @ShubhamPatil-hh2bg
    @ShubhamPatil-hh2bg Рік тому

    वडिलोपार्जित प्रॉपर्टी आपल्या नावावर झाल्यावर विकल्यास टॅक्स कसा असतो?

  • @kirantakalkar9116
    @kirantakalkar9116 2 роки тому

    Thanks

  • @maheshwaikar2157
    @maheshwaikar2157 Рік тому

    दोघांनी मिळून एक फ्लॅट घेऊ शकतो का

  • @user-fn7sm2kx8e
    @user-fn7sm2kx8e 3 роки тому +1

    1st viewer.....

  • @user-tn9jv3dg5o
    @user-tn9jv3dg5o Місяць тому

    खूपच उत्तम माहिती दिलीआहे धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 місяців тому

    धन्यवाद