चमचमीत पाठडाळिच पिठलं आता पाठडाळ म्हणजे नेमक काय जाणून घेऊयात l Patdalicha Pithla Lost Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 чер 2024
  • चमचमीत पाठडाळिच पिठलं आता पाठडाळ म्हणजे नेमक काय जाणून घेऊयात l Patdalicha Pithla Lost Recipe #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes
    #patdalichapithla #pithla
    Details of Mauli Lakdighana Oil
    🌟We Manufacture WOOD PRESSED/COLD-PRESSED OIL🌟
    🙋Order Now 📲 +91 73786 00709
    🌐bizicard.in/maulilakdighana
    www.maulilakdighana.com
    Instagram: @maulilakdighana
    #maulilakdighanatel
    #maulilakdighana
    Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
    Follow us on all other platforms
    Facebook - Masteer Recipes profile.php?...
    Instagram- Masteerrecipes2022 masteerreci...
    Masteer Recipes hindi channel UA-cam-
    / @masteerrecipeshindi
    Masteer Recipes marathi UA-cam channel -
    / @masteerrecipes
    Follow our Personal handles here -
    (Chef Vishnu Manohar)
    Facebook- Vishnu Manohar fanclub vishnu.manoh...
    Instagram- chef_vishnumanohar chef_vishnu...
    (Chef Prajakta Pai shahapurkar)
    Facebook- ChefPrajakta Pai Shahapurkar
    prajakta.sha...
    Instagram- prajakta_pai_shahapurkar
    prajakta_pa...
    चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style
    • चिकन दम बिर्याणी | Hom...
    परफेक्ट मेदू वडा | रेस्टॉरन्ट स्टाइल मेदूवडा बनवा घरी | Crispy Medu Vada | Medu Vada Recipe
    • परफेक्ट मेदू वडा | रेस...
    अस्सल पाव भाजी मुंबईची /How to make Pav Bhaji/Easy spicy Pav Bhaji Recipe/ Indian Street Food
    • अस्सल पाव भाजी मुंबईची...
    पनीर बनवा घरच्या घरी | Homemade Paneer | How To Make Paneer At Home | Panner
    • पनीर बनवा घरच्या घरी |...
    महाराष्ट्रीयन मसाले भात | लग्नातला मसाले भात | Maharashtrian Masale bhat | Masala Bhat/Biryani Rice
    • महाराष्ट्रीयन मसाले भा...
    1100 किलो साबुदाणा खिचड़ी तुम्ही पहिलीए ! INDIA'S BIGGEST Khichadi making with 250 /300 kg Ghee
    • 1100 किलो साबुदाणा खिच...
    • 1100 किलो साबुदाणा खिच...
    खमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani | Diwali Special Recipe | Chakli bhajani
    • Video
    इडली | Idli Recipe | How to Make Soft and Spongy Idli | Homemade Idli Batter
    • इडली | Idli Recipe | H...
    साउथ स्पेशल सांबार - How To Make Vegetable Sambar | South Indian Curry | Sambhar | Idli wada Sambhar
    • साउथ स्पेशल सांबार - H...
    स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
    • स्वयंपाकासाठी कोणती भा...
    तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
    • कल्हई म्हणजे काय? पितळ...
    रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
    • रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
    सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
    • सोप्पी कुकर मधली चिकन ...
    झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
    • झणझणीत गावरान रस्सा| म...
    हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
    • हि एक ट्रिक वापरून फक्...
    भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
    • भरपेट नाश्ता चमचमीत ना...
    लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
    • लाल भोपळ्याची रस्सा भा...
    Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
    • Resturant सारखं चिली च...
    वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
    • वाटणाची गरज नाही , कोण...
    पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
    • पारंपरिक पद्धतीने कैरी...
    महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
    • खमंग मेतकूट | How to m...
    फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
    • फक्त रव्यापासून बनवा म...
    बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
    • बिना चिज बिना यीस्ट - ...
    घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
    • घरच्या घरी रेस्टोरंटसा...
    झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
    • झटपट बनवा चटपटीत कच्चा...
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 293

  • @abigailmoses0910
    @abigailmoses0910 24 дні тому +17

    पाठ डाळीचे पिठले खूपच छान आहे, नक्की करून बघणार.
    “कनवली” हा पदार्थ भारतात ले बेने इस्राएल यहुदी बनवतात. रवा आणि खोबऱ्या पासून बनवला जातो. हा खूप जुना गोड़ पदार्थ आहे.
    Thanks from Israel.

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  24 дні тому +1

      Thank you so much

    • @chandrkantsir2562
      @chandrkantsir2562 24 дні тому +1

      Pesaralu ha padarth khup Juan ahe. Hiravya mugachya salisakat ha padarth banavatat

    • @satishrdatar6337
      @satishrdatar6337 4 дні тому

      शेगावच्या श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथात कानवले असा उल्लेख आहे....!!🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @savitamarathe64
    @savitamarathe64 15 днів тому +9

    विष्णूजी नमस्कार.तुम्ही जसे वेगवेगळे विक्रम रेसिपी या क्षेत्रात करत आहात तसे उपक्रम ही करत आहात.हे कोडं म्हणजे खाद्यसंस्कृतीमधील देवाणघेवाणच आहे.आपण केलेल्या आवाहनानुसार मी पुढीलप्रमाणे पदार्थ आणि घटकपदार्थाची नावे पाठवत आहे.१)लेकूरवाळी भाजी --भोगीला करतात ती भाजी(२)वडीरसपाट --पाटवडयांचा रस्सा (३)पेंदोडया --भुसवडया(४)भगरी--वरीईची उपवासाची खिचडी (५) गोळ्याची आमटी--डुबुकवडे(६) रव्याचे बुंदले--गोड आणि तिखट पदार्थात टाकलेले रव्याचे छोटे गोळे (७) साबुदाण्याची उसळ--साबुदाण्याची खिचडी (८)भाताची खिचडी किंवा खिचडीचा भात--डाळतांदूळाची खिचडी (९)चांदूला--तळहाताएवढी भाकरी (१०) खानदेशी फुनके--मुटके(११)शाकभाजी--वांगीबटाटेहरभरा भाजी (१२) फेण्या --पापडया. घटक पदार्थ पुढीलप्रमाणे (१)आ-हाची डाळ--तूरीची डाळ.अरहरडाळ या हिंदी शब्दाचा हा अपभ्रंश असावा.विदर्भात आणि खानदेशात हिंदी भाषेचा प्रभाव आहे.(२)लाखोळीची डाळ--लाखाची डाळ(३)कुळीथ--हुलगे(४)गरा--रवा(५)बादलफूल --कर्णफूल(६)हळीव--अळीव(७)गिलके --घोसाळे. धन्यवाद.या कोडयामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व खवैयांना माझ्या शुभेच्छा.या उपक्रमाला आपण प्रतिसाद देऊन आनंद घेऊ या.

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 24 дні тому +25

    आमच्या कडे याला कळण्याचं पिठल म्हणतात आमची आई जात्यावर तुरी, मूंग, उडीद, चने यांची घरी दाल बनवायचे त्याचे जे सालासकट पिठ राहायचे त्याला कळणा म्हणतात ,खूप छान

  • @ShitalMore-kv4ox
    @ShitalMore-kv4ox 11 днів тому +7

    अजून येक पदार्थ कळण्याची भाकरी आणि ठेचा हा पदार्थ पण आमच्या खानदेशात केला जातो उडीत आणि ज्वारी एकत्र दळून त्याची मीठ टाकून भाकरी बनवता आणि गरम गरम भाकरी चा वरचा भाग काढून त्यावर तेल पसरून परत तो पापुद्रा त्यावर ठेवायचा आणि ठेसा सोबत खायचं खूप छान पदार्थ आहे हा

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 24 дні тому +15

    छान हरबर्याचे पाठडाळीचे पिठले बनवले तसेच हरबर्याची भाजी वाळवून तिचेपण घुटे छान होते जूनी लोकभाजी वाळवून त्यात शिजवतांना आंबटबोरे किंवा चिंच घालून पिठ ललावून पातळ भाजी करायचे तसेच कुळदाचेपण भाजून ते जात्यावर भरडून त्याची साल काढून डाळ करतात आणी त्याचे पण पिठले बनवतात खारट्या बनवतात.धन्यवाद दादा नविन रेसीपी दाखवली🙏🙏

  • @pratibhapaulkar7357
    @pratibhapaulkar7357 24 дні тому +12

    शेतकरी जेव्हा जात्यावर चने mug turi bhardat asat त्याचे जे पीठ पडायचे सलमिष्रीत त्याला kalana. कळणा म्हणायचे.त्याचे पिठले पण पौष्टिक आणि उत्तम

  • @manishabhavsar4417
    @manishabhavsar4417 24 дні тому +11

    कळण्याची भाकरी यात ज्वारी,उडीद आणि मिठ घालून मिक्स करून दळून आणावे, त्यची भाकरी किव्हा पुरी वांग्याच्या भरीत बरोबर खूप छान लागते,❤

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 8 днів тому +1

    कळणा म्हणजे पूर्वी माझी आजी खानदेशात उडीद, हरभरा, तूर यांच्या जात्यावर भरडून डाळी करायची. त्यातून खाली राहिलेली डाळींची सालं ,फोलपटं, डाळींचे भरड, यापासून कळणा बनवायचा.तो ज्वारी बरोबर दळून त्याची भाकरी केली जायची.ती कळण्याची भाकरी.या कळण्याचे पापडही फार सुंदर लागायचे. विष्णूजी, तुमच्या पारंपारिक पदार्थांमुळे वारंवार आजीची, आत्याची आठवण येते.तुमचे मनापासून आभार 🙏

  • @vaishaligaikwad2498
    @vaishaligaikwad2498 24 дні тому +8

    विदर्भात याच प्रकारच्या तुरीचा डाळीचा कळणा करतात .त्यामधे कैरी किवा आमचूर पावडर घालतात .तिखट थोडे जास्त घालावे.

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 16 днів тому +2

    खूप वेगळा आणि खमंग पदार्थ दाखवलाय . नक्की करून पाहणार .
    धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @swatidongare8345
    @swatidongare8345 24 дні тому +3

    खुपच छान रेसिपी... भरपूर फायबर युक्त.....😊....
    आमच्या कडे जात्यावर भरडुन केलेल्या डाळींचा काळणा असायचा ,त्याचे उकडलेले शेंगोळे बनवायचे खुप छान असायचे पौष्टिक आणि फायबर युक्त.....😊❤

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7ok 24 дні тому +3

    मला वेगवेगळ्या प्रकारचे पिठले बनवायला खूप आवडते आज एकदम वेगळा प्रकार दाखवला नक्कीच आवडेल बनवून बघायला धन्यवाद

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 2 дні тому

    मस्तच जुन्या आठवणींना उजाळा दिला धन्यवाद ❤ जुन्या रेसिपीज पारंपरिक आहे अशाच काही रेसिपीज परत एकदा दाखवा प्लीज

  • @prathmeshbidgar1394
    @prathmeshbidgar1394 24 дні тому +2

    सर्व पदार्थ खुप छान असतात मी सगळया रेसिपी करून पाहिलात खुप छान जमलाय तुमचे खुप आभार धन्यवाद रोज रेसिपी बघते आशच रेसिपी दाखवत जा आम्हीं शिकत जाऊ आणि सगळण्याना खाऊ घालू खुप खुप धन्यवाद आणि साबर रेसिपी खूपच छान होती

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 24 дні тому +2

    खूपच मस्त वेगळा मेनू वाटून डाळ चे माहित होते हे करुन पाहणार मस्त धन्यवाद

  • @suhasinideo7041
    @suhasinideo7041 24 дні тому +1

    व्वा खमंग पदार्थ. नक्कीच करून बघेन 👌👌

  • @nilimabalapure9390
    @nilimabalapure9390 24 дні тому +5

    मस्त,झकास प्रथमच नाव ऐकले पिठल्याचे

  • @kalpanakadapa4947
    @kalpanakadapa4947 24 дні тому +4

    Mazya sasubai " masti kadbu " karayachya. Tyat khadi sakhar chana dal khobaryache chote tukade, gul, manuke ghalun he puran karun te kanaketa bharun karave. Mhanje he kadbu khanaryala mast susti yete. Manun hyache nava masti kadbu ase ahe.

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 24 дні тому +1

    खूपच मस्त आणि अगदी वेगळा प्रकार.

  • @lalitadasgupta6499
    @lalitadasgupta6499 24 дні тому

    छान आहे हे पिठलं . माझी आजी चून म्हणायची. पिठलं माझा आवडता पदार्थ आहे व हे वेरिएशन मी नक्कीच करणार.

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 24 дні тому +1

    Khoop chhan navin recepie, nutritious healthy for diabetic patients, tasty, yummy 😋

  • @umeshkhalikar6611
    @umeshkhalikar6611 24 дні тому

    छान. आपण सुचवल्याप्रमाणे , सातारा परिसरातील एक अगदी वेगळी व interesting शेंगदाण्याचा म्हाद्या ही रेसिपी आहे.

  • @nayanamulherkar4846
    @nayanamulherkar4846 24 дні тому +3

    आमच्याकडे "निनाव" नावाचा पदार्थ, श्रावणानंतर केला जातो.
    अतिशय चविष्ठ, सुरमट व खमंग !

  • @renunishane5220
    @renunishane5220 24 дні тому +2

    “पनगुजिया” आमच्याकडे बनवतात ,गरमा गरम खूपच चविष्ट व हेल्दी

  • @surekhajoshi6188
    @surekhajoshi6188 24 дні тому +10

    विष्णूजी पिठल्याची रेसिपी वेगळी आणि छान आहे.
    दूधमोगरा- तांदळाचा रवा, दूध आणि साखर घालून 8 तास भिजवून ताटलीला तूप लावून त्यात ढोकळ्यासारखं उकडून घ्यायचं आणि तुपाबरोबर खायचं. दूध नारळाचे असेल तर छान चव लागते.

    • @a.oza66
      @a.oza66 24 дні тому

      वाह..!! क्या बात है... 👍

    • @suchitraandhorikar2189
      @suchitraandhorikar2189 24 дні тому

      एकदा रेसीपी दाखवा ताई

    • @shwetadandawate2224
      @shwetadandawate2224 19 днів тому

      वाह एकदम मस्त 👍

  • @omkardangare3249
    @omkardangare3249 15 днів тому +1

    ज्वारी चा ठोंबरा सुद्धा छान बनतो

  • @tanujatege
    @tanujatege 24 дні тому +1

    खूप छान रेसिपी

  • @kavitajain4942
    @kavitajain4942 24 дні тому +3

    वरणाची भाकरी ...माझी आजी करायची ही पण खुप छान आणि खमंग लागते

  • @nitinbansode7114
    @nitinbansode7114 24 дні тому +1

    पारंपारिक पदार्थ खूप छान 👌

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce 2 дні тому

    खूप वर्षां पूर्वी आपली मुलाखत एका पुस्तकात वाचली होती तेव्हा आपण बोलले होता की मी ज्या हॉटेल मध्ये शेफ होतो ते काम सोडण्या च्या शेवटच्या क्षणा पर्यंत मी इमानदारीने काम करीत होतो कारण की ती माझी नैतिक जबाबदारी आहे ❤ तेव्हा पासून आज पर्यंत मी आपला आदर करतो
    ❤हे विचार फक्त एक इमानदार माणूसच करू शकतो ❤ जय श्री राम

  • @madhukende4729
    @madhukende4729 24 дні тому +4

    कुलिथाचे (हुलग्या चे,)पिठले आपण करतो त्याच प्रकारे कुळथाचे माडगे पण बनते ते गोड असते.पाणी उकळत ठेवायचे त्यात गूळ,थोडी सुंठ घालायची पाणी उकळले की त्याला कुळ थाचे पीठ लावायचे जेवढे आपल्याला पातळ हवे त्याप्रमाणे.सर्दी साठी हे खूप छान असते

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 15 днів тому +1

    Khoop chhan padarth

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 15 днів тому

    Tumhi great aahat.aajparyant lokana kiti shikavlet tumhi

  • @chhayadoiphode2778
    @chhayadoiphode2778 5 днів тому

    खूप छान मास्टर , नक्की करुन बघणार पिठले , बघून खायची इच्छा झाली

  • @shitalmahagaonkar5312
    @shitalmahagaonkar5312 24 дні тому

    Khupch chan diste aahe...mi nakki banvnar .....❤

  • @sharavastisable6022
    @sharavastisable6022 24 дні тому +1

    एकचं नंबर

  • @jayadeshpande6944
    @jayadeshpande6944 24 дні тому

    Afalatun.recipe..sunder..chamchamit...testy..

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 24 дні тому +1

    छान आहे रेसिपी मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 23 дні тому +1

    खूप छान आहे🎉🎉

  • @swaroophazare7931
    @swaroophazare7931 20 днів тому

    Khupach chaan recipe aahe aani patkan honari aahe
    Ahach prakare vegalya Dali waprun aapan madag banavu shakato .

  • @madhavimalgaonkar7563
    @madhavimalgaonkar7563 17 днів тому

    Very nice n healthy recipe. I Will surely try.Mouth watering.

  • @Manju........444
    @Manju........444 18 днів тому

    खूप छान नवीन प्रकार चे पिठले
    Thnq sir माझी आजी छिल्का मूग खिचडी, करडई चा खिचडा (खीर चा प्रकार), नुक्ती चा लाडू(बुंदी लाडू) बनवत असे
    आई चा हात चे आमरस धिरडे

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 24 дні тому

    Good evening sir. Khupch chhan navinch recepi. Up la rojch lokana sattu powder kartat.tyachi athvan zali

  • @lalitashinde6469
    @lalitashinde6469 24 дні тому

    खूप छान

  • @anjalikulkarni7522
    @anjalikulkarni7522 24 дні тому +4

    शिळ्या पोळीचा कुस्करा याला माणिकपैंजण हे नाव आहे

  • @bharatichaudhari
    @bharatichaudhari 23 дні тому

    Ha padrth maharastara, zarkhand, chattisgad walyach traditional food ahe, te tr ajun udid, tudal mix karun banwatat, nice kanerach pithal mhatal tari chalel, nice recipe

  • @falgunimore1232
    @falgunimore1232 24 дні тому

    Khar ahe , very tasty

  • @supriyabhurke6946
    @supriyabhurke6946 День тому

    Khup khup chan pithale

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 24 дні тому +1

    मोतीचुर लाडू आणि कधी वड्या करायची आई अतिशय सुंदर लागायच्या.

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 24 дні тому

    खूप छान 👌

  • @seematirkey7501
    @seematirkey7501 24 дні тому +1

    ❤ m speechless

  • @rutujasalokhe4092
    @rutujasalokhe4092 16 днів тому

    All old thoughts n things v hv to implement it
    I agree with ur statement.God bless u

  • @sarojzanjal1720
    @sarojzanjal1720 24 дні тому

    नक्की करून बघेन.खूप छान सांगितले.

  • @smitakatdare5145
    @smitakatdare5145 24 дні тому +4

    पाठडाळीची उडीद डाळ याच घुट अप्रतिम लागत

  • @momskitchen-nilimadeshpand4550
    @momskitchen-nilimadeshpand4550 24 дні тому +2

    गाडगीळ हा एक गुळाचा पदार्थ आहे माझ्या मुलाला खूप आवडते

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 24 дні тому

    Very nice recipe chef mai hh ap ki video dekhti hu

  • @alkadhumal7822
    @alkadhumal7822 24 дні тому +1

    पीठाल मस्त ❤

  • @purushottammoghe8931
    @purushottammoghe8931 9 днів тому

    Little khup chan😊

  • @mahadevkatkar526
    @mahadevkatkar526 23 дні тому

    Khup sundar disat ahe mi karun bagate Namaste Sir

  • @AnjaliNaik-kt8gg
    @AnjaliNaik-kt8gg 15 днів тому

    रविवारी शाळेला सुट्टी सकाळचा नाष्टा जोंधळ्याच्या पिठाची उकड ( मस्त अंबट तिखट किंचित गोडसर)

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 23 дні тому

    Wa sir khupch Chan 👌👌👌👍🙏

  • @chayanagpure3905
    @chayanagpure3905 24 дні тому

    V nice

  • @gamermukund1821
    @gamermukund1821 24 дні тому +2

    खूप छान जुन्या आठवणी ताज्या झाल्या🎉

  • @rupajoshi3746
    @rupajoshi3746 24 дні тому

    Wah 👌 recipe chef 😊

  • @neetasurve6990
    @neetasurve6990 15 днів тому

    मस्तच 😋😋👌

  • @VijayaPatekar-jy3xb
    @VijayaPatekar-jy3xb 24 дні тому +1

    Vishnuji nmskar mazing Aaji krt are as pithal.aani asch kulith, hire mug hyanche pn bhajun boarding pithale bnwta yete.mugache tr lhanpasun vrudhanpryant sgle Khan shaktat.agdi aajari kiva bantin sudha.

  • @shubhangikotwal3917
    @shubhangikotwal3917 24 дні тому

    Tumchya recipies baghayla khup Chan vatatat.
    Kadhi gole ha padarth kadachit mahit asel . Patal takasarkhi kadhi karun ti uklat thevaychi ani tyat bhijleli chana dal tyat mirchi lasun aal ani halad mith takun tyache gole karun kadhit sodayche ani te shijle ki var yetat . Gole phodun tyavar kadhi ghevun tel , mohri jiryachi fodni takun khalle tar chavisht lagtat.

  • @sahanaa9324
    @sahanaa9324 24 дні тому

    Old is Gold.
    Pls share indo Chinese recipes. Fusion recipes are always welcome.

  • @sharavastisable6022
    @sharavastisable6022 24 дні тому

    छान पिठलं

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 20 днів тому

    खूप खूप छान मस्त रेसिपी 👌👌👍👍

  • @swatilele8727
    @swatilele8727 24 дні тому +2

    खूपच छान रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद विष्णुजी!

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 5 днів тому

    Tasty pithle

  • @waredevelopers5021
    @waredevelopers5021 24 дні тому +2

    आमच्या कडे चण्याच्या पिठा पासून गुळवणी हा पर्दाथ बनवतात.

  • @madhukende4729
    @madhukende4729 24 дні тому +2

    कुलथाच्या पिठाचे पिठले आपण करतो,तर त्याच पिठाचे माडगे करतात ते गोड असते पाणी उकळत ठेवायचे उकळले की त्यात गूळ,सुंठ घालायचे मग त्याला पिथल्यासारखे पीठ लावायचे जेवढे पातळ हवे तवढे.हे सर्दीला खूप चांगले.

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 22 дні тому

    सर आखे उडीद भाजून त्याचे पीठ करून त्या पीठात मिर्ची पावडर हळद हिंग मिठ कोंथिबीर सफेद तीळ घालून पीठ मळून त्याच्या शेंगोळ्याही आमची आजी करायची उकडून त्याच्या चकत्या करून कांदयाच्या फोडणीत टाकून वरून तीखट मीठ टाकून परतून चांगली वाफ आणायची खाण्यास देतेवेळी कोथिंबीर ओले खोबरे लिंबू द्याची फार सुंदर शेंगोळ्या लागायच्या👏 धन्यवाद

  • @pradnyayadav7461
    @pradnyayadav7461 24 дні тому +2

    सांडगेच्या पिठाचे मुटके बनवतात ते खुप छान लागत

  • @meenawankhade4181
    @meenawankhade4181 24 дні тому

    He as telat n ghalta phodni karun pani ghalaych panyala ukali aalyavar tyat he pith takaych aani shiju dyaych chhan lagte

  • @pushkarabhyankar4078
    @pushkarabhyankar4078 7 днів тому +1

    दक्षिण महाराष्ट्रातील बारामती सातारा कराड या भागातली झणझणीत भाकरी बरोबर खाण्याकरता चटण्या साद्या आणि म्हाद्या

  • @swarupakulkarniofficial
    @swarupakulkarniofficial 24 дні тому

    उंबर भाजी

  • @laxmankulkarni6984
    @laxmankulkarni6984 24 дні тому +1

    पाठल्याला काही भागात चटपट नाना म्हणतात. ऐक जुना पदार्थ पानागे नावाचा एक छान पदार्थ होता कुठल्यातरी पानावर ते बनवायचे छान लागायचा.

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 24 дні тому

    Nice

  • @meenakshinaik8654
    @meenakshinaik8654 19 днів тому

    Chaan dakhavli paramparik recipe

  • @momskitchen-nilimadeshpand4550
    @momskitchen-nilimadeshpand4550 24 дні тому +3

    खूप मस्त , माझी आई कैरी चे डू बुक (dubuk) करते आई चे आई ची रेसिपी आहे कैरी ची कोय घेतात त्याला खूप छान लागते आणि चिंच चा बोटुक मामा करतात आम्ही लहानपणी खूप खायचो चोखून आई कुटून करायची

    • @a.oza66
      @a.oza66 24 дні тому

      Please share recipe... 🙏

  • @anaghadatar7979
    @anaghadatar7979 24 дні тому +1

    नमस्ते विष्णुजी माझी आई वाटल्या डाळीचे लाडू करते खुप छान लागतात.

  • @bharatikoni77
    @bharatikoni77 20 днів тому

    I am from Karnataka and my mother use to make green moong pitla wadi.

  • @priyankathawale5593
    @priyankathawale5593 24 дні тому

    Kanki pithachi bhakar jyamafhe kanik 1/4 jwariche pith 3/4 ase mix karun bhakar bnwatat aplya nagpur chya jawalachya khedyapadyat Mazi aai Ani atya bnawte thechya kinwa tikhat mithabarobr mast lagte

  • @madhuramahajan2049
    @madhuramahajan2049 22 дні тому

    Mast recepy sir, Ganj khup chan ahe available ahe ka tumzya kade....

  • @user-im1sl2bm6k
    @user-im1sl2bm6k 24 дні тому +1

    Gawasani che wade :-
    Wade ( stuffing ) :-
    Chana Dal ,
    Hiravi Mirachi,
    Aal, Lasun pakalya, Mith, Jire, Hing, Halad,
    Lal Tikhat.
    Kothambir.
    Dal 4 tas bhijawun thewayachi.
    Garmarit watayachi.
    Sarv sahitya watun mix karach. Bajula thewayach.
    Kothambir warun takayachi.
    Gawasan ( cover) :-
    Gavhach Pith,
    Thods Tikhat, Mith, Halad, Pani.
    Pith wastragal barik chalayach.
    Bhijawun thewayach.
    Seel nako & ghatt nako as. 1/2 tas.
    Tel tapawaych
    Kapad ola karun thewayacha.
    Pani katoryat ghyayche.
    Kanik gola gheun
    tyat dalich saran bharaych.
    Gola seel karun kapadawar pani laun thapayacha.
    Madhe gol karaycha.
    Wadya sarakha.
    Talun Pudina Chatani,
    Chinch che Chatani
    Barobar khaa.

  • @mrunalinigore7227
    @mrunalinigore7227 23 дні тому

    Mazi aaji kele( piklele) mule Ani Lal bhopala , naral dudh ghalun sambar karat ase. This is rare .

  • @Rohinikankate
    @Rohinikankate 24 дні тому +2

    आमच्याकडे आमची आजी कुलिथाचे शिंगोळे भाजी बनवायची चव लक्षात आहे पण पाककृती लक्षात नाही हुलगा पाहिलं की
    शिंगोळी आणि त्याची चव जिभेवर रेंगाळते ❤❤

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 18 днів тому

      सोप्पी आहे... शेगोळे रेसिपी मिळेल you tube var.. मला वाटतं मधुराज रेसिपी वर आहे...माझी आई करायची शेंगोळे पावसाळ्यात,आणि माडगे करायची....

  • @latasalunkhe9213
    @latasalunkhe9213 21 день тому

    आमच्या कडे याला चनादाळ चे कोंबडे पिठलं म्हणतात खान्देश ता 😊

  • @vidyaskitchen201
    @vidyaskitchen201 24 дні тому +2

    माझ्या लहानपणी आई शेपूची भाजीचे फळ खूप सुंदर बनवायची माझे वय आज७० आहे तो खमंगपणा अजुन जिभेवर आहे

  • @bhagyashrikadam4282
    @bhagyashrikadam4282 24 дні тому

    आमच्या कडे राजमाला अडीच मासा असे म्हणतात किंवा वाघा घेवडा पण म्हणतात आणि काळा घेवडा याला फौजदारी शिपाई म्हणतात बाकी रेसिपी उत्तम

  • @sangeetashengule8716
    @sangeetashengule8716 24 дні тому

    शेंगुळे वडी हा मिक्स पिठाचा पदार्थ पारंपरिक आहे

  • @AnjaliNaik-kt8gg
    @AnjaliNaik-kt8gg 15 днів тому

    रविवारी सकाळी नाष्टा जोंधळ्याच्या पिठाची उकड.

  • @shobharamgude2304
    @shobharamgude2304 24 дні тому

    लय भारी! वा! काय खमंग पिठलं...
    घाटावर असंच उडदlचं करतात. त्याला " घुटं " म्हणतात. त्याचीही detail recipe द्या please.
    Thanking in anticipation. 👌❤️

  • @aparnadhote3756
    @aparnadhote3756 24 дні тому

    धन्यवाद sir. खुप छान आणि यूनिक recipe दाखवली तुम्ही. मी regular viwer आहे. तुमच्या रेसिपी सोप्या आणि खुप छान असतात.पहिल्यांदाच comment करत आहे.
    माझी आजी "नी "ची भाजी करायची. अतिशय चवदार असायची ती भाजी आठवल तरी तोंडाला पाणी सुटते.😊

  • @MsHimani123
    @MsHimani123 3 дні тому

    वड्याचा पानी , हे ऊड़द दाळीचे पदार्थ आहे, भंडारा भागत खुप प्रसिद्ध आहे

  • @seemapatil1788
    @seemapatil1788 19 днів тому

    डाळीचे कचके। उडीदाची काली डाळ अर्धी जास्त शि ज ऊन निथळून त्यावर तिळाची चटणी तेल टाकून छान लागते

  • @anitakambale3887
    @anitakambale3887 19 днів тому

    आम्ही लहानपणी भरपूर खाल्ले आहे.