मराठी + गुजराती व्होटर काबीज करायचा मोदी राज पॅटर्न | Narendra Modi | Raj Thackeray | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • मराठी + गुजराती व्होटर काबीज करायचा मोदी राज पॅटर्न | Narendra Modi | Raj Thackeray | Vishaych Bhari
    मंडळी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मुंबईतील राजकारणाचा राज्य आणि देशावर प्रभाव पडत असल्याने तसेच येथील अर्थकारणाशी बरेच हितसंबंध जोडले गेलेले असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी नेहमीप्रमाणे यावेळीही मुंबईतील निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय. मागच्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपा आणि शिवसेना यांच्या महायुतीने सहा पैकी सहा जागा जिंकत दणदणीत यश मिळवलं होतं. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची तुटलेली युती आणि नंतर शिवसेनेत पडलेली फूट यामुळे मुंबईतील बरीच समिकरणं बदललेली आहेत. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये मुंबईकर कुणाला साथ देणार याबाबत बरीच उत्सुकता आहे. मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी जुळलेली समिकरणं आणि प्रचाराचा एकंदरीत रागरंग पाहता यावेळी मुंबईत भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यातच मुख्य लढत होताना दिसत आहे. सध्या भाजपाचं नेतृत्व मोदी आणि अमित शाहांकडे असल्याने तसेच मागच्या काही वर्षांत महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेले काही उद्योगधंदे आणि मुंबईत वाढलेली गुजराती समाजाची अरेरावी यावरून लोकसभेच्या निवडणुकीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग देण्यात ठाकरे गट आणि महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे भाजपा आणि महायुतीची मुंबईमध्ये यावेळी कसोटी लागणार असं चिन्ह दिसत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला राज ठाकरे यांनी जाहीर केलेला बिनशर्त पाठिंबा, तसेच शुक्रवारी शिवतीर्थावर राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची झालेली सभा या भाजपा आणि महायुतीसाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये मागच्या काही काळात उत्तर भारतीय, गुजराती आणि काही मराठी मतदार अशी मोट बांधत भाजपानं आपलं स्थान बळकट केलं आहे. आता राज ठाकरे हे सोबत आल्याने मराठी विरुद्ध गुजराती असं चित्र उभं करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ठाकरे गटाला शह देणं भाजपा आणि महायुतीला शक्य होणार आहे. तसेच मोदी आणि राज ठाकरे यांच्या प्रभावामुळे मराठी आणि गुजराती मतांचं एकीकरण होऊन कुठल्या मतदारसंघांमधील समिकरणं बदलू शकतात, याचा घेतलेला हा आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #pmmodi
    #pmnarendramodi
    #pmnarendramodispeech
    #rajthackeray
    #rajthackeraylatestspeech
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 23

  • @AUDK9
    @AUDK9 14 днів тому +3

    व्हिडिओच्या व्ह्यूज वरून कळतंय की 14 तास झाले व्हिडिओ टाकून आणि व्ह्यूज फक्त 947 आलेत याच्या वरूनच कळत आहे की यांची लोकप्रियता किती आहे

  • @-xv8rq
    @-xv8rq 14 днів тому +8

    राज साहेब कोकलून दामले तरीही ते थांबले नाही त्यांनी थेट मोदींना व्यासपीठावरून 5 शार्थी घातल्या माय मराठी साठी हे खरे मराठीचे वाली❤

  • @sanketkolte5543
    @sanketkolte5543 15 днів тому +7

    राज ठाकरे साहेब ❤️

  • @VishaalRaje
    @VishaalRaje 13 днів тому

    राजू पेंटर ने इज्जत घालवली महाराष्ट्राची....

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 14 днів тому +2

    मोदी राज ❤

  • @ARP1820
    @ARP1820 15 днів тому +4

    Only Uddhav Thackeray saheb 🙌🏻🙌🏻🙌🏻💯💯💯💯

  • @vedantdagadkhair6693
    @vedantdagadkhair6693 15 днів тому +6

    fakt mashal 🔥🔥

    • @-xv8rq
      @-xv8rq 14 днів тому

      उद्धव पंज्या वाले 😂😂😂😂😂

  • @Avinash12334
    @Avinash12334 15 днів тому +5

    मशाल❤❤❤

  • @shivabodke8509
    @shivabodke8509 15 днів тому +6

    Only मशाल

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 14 днів тому

      अरे भुंडाळया कधी त्या उध्दव ठाकरे च पण भाषण एकात जा इथे काय कमेंट करतो आ इ स क्रीम निशाणी 😂

  • @shahupatil6085
    @shahupatil6085 15 днів тому +4

    काही फरक पडत नाही,मुंबई मध्ये फक्त मशाल

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 15 днів тому

      😂😂😂

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 15 днів тому

      Bhava Mumbai madhe bjp chi hava aahe ekda jaun bg

    • @-xv8rq
      @-xv8rq 14 днів тому

      तुमच्यात सारखे सहानुभूती वाले आहेत 😂😂😂😂😂 तेवढेच

    • @umeshbane7976
      @umeshbane7976 14 днів тому

      अरे राजा मशाल नाही तो आईसक्रीमचा कोण आहे 😂

  • @pppatil3626
    @pppatil3626 14 днів тому

    राज ठाकरे यांचा महाराष्ट्र च्या 0 इफेक्ट आहे 😂😂😂😂

  • @LalitSharma-ul8gf
    @LalitSharma-ul8gf 14 днів тому

    marathi,muslim,aani south indian la mat india la janar aahe

  • @RAVIRAJ-hh8sb
    @RAVIRAJ-hh8sb 14 днів тому

    😂😂तुमचा बिनडोक उद्ध्वस्त ठाकरे काहीही झालं तरी येत नसतो.

  • @gpatilmh5533
    @gpatilmh5533 15 днів тому +1

    Marathi Janta ya gujratyana bali padnar nahi ya veli