Gandhi's Last Month - गांधीजी का आखरी महीना - Prof. Apoorvanand Jha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024
  • An important talk by Dr. Apoorvanand Jha - explaining the relevance of Gandhi's strong anti-majoritarian stand in his final days - made all the more important in the background of the Dadri massacre.
    देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळात झालेल्या फाळणीमुळे ज्या भागात दंगली आणि नरसंहार होत होते, त्या भागात जाऊन तेथील दंगली आणि नरसंहार थांबविण्याचा प्रयत्न महात्मा गांधी करीत होते. स्वातंत्र्यांच्या आनंदोत्सवात सहभागी होण्यापेक्षा जातीयवादी-धर्मांध शक्तींना समाजात फूट पाडण्यापासून रोखणे हे त्यांना प्राथमिक कर्तव्य वाटत होते. सर्वधर्मीयांना देशात राहण्याचा आणि आपले उपासना स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे, असे त्यांचे ठाम मत होते. उत्तर प्रदेशात नुकत्याच घडलेल्या दादरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींचे हे विचार आपल्या सर्वांसाठी मोलाचा संदेश आहे, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि विख्यात लेखक अपूर्वानंद झा यांनी केले.
    गांधी जयंतीनिमित्त सत्यशोधक सांस्कृतिक मंचाच्या वतीने गांधीजींचा शेवटचा महिना या विषयावर एस. एम. जोशी सोशलिस्ट फौंडेशनच्या सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य होते. यावेळी लाल निशाण पक्ष (लेनिनवादी)च्या कार्यकर्त्या कॉ. मुक्ता मनोहर, लोकायतचे नीरज जैन आणि सोशलिस्ट पार्टी (इंडिया) च्या महामंत्री अलका जोशी उपस्थित होत्या. जोरदार पाऊस असतानाही शहरातील अनेक पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी या व्याख्यानाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

КОМЕНТАРІ •