Shivneri Fort Junnar | शिवनेरी किल्ला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #ShivneriFort #ShivneriFortJunnar #ShivneriKilla
    Shivneri Fort Junnar | शिवनेरी किल्ला
    मित्रांनो आज भेट देत आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याला. आज हा किल्ला पाहणार आहोत सोबतच या किल्ल्याची माहिती देखील घेणार आहोत.
    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला अजूनही तेवढाच भक्कम आहे. १६ फेब्रुवारी १९३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला.
    १६२९ मध्ये आई जिजाऊ गरोदर असताना शहाजी राजेंनी जिजाऊ ना शिवनेरी किल्ल्यावर आणले, याच किल्ल्यावर आणण्याचे कारण म्हणजे किल्ल्याची चहूबाजूंनी असलेली भक्कम तटबंदी. आई जिजाऊ च्या संरक्षणासाठी शाहजीराजे भोसलेंना हा किल्ला सुरक्षित वाटलं. आज पण हा किल्ला सुस्तीतीत आहे, हे किल्ला पाहिल्यावर लक्ष्यात येते. किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे. याच शिवाई देवीला आई जिजाऊंनी नवस केला कि, जर मला मुलगा झाला तर त्याचे नाव तुझ्या नावाप्रमाणे ठेवील आणि त्या नवसाला शिवाई देवी पावलीहि. इ.स. १९ फेब्रुवारी १६३० रोजी आई जिजाऊंना पुत्र प्राप्ती झाली, आणि नवसाप्रमाणे आई जिजाऊंनी पुत्राचे नाव शिवाजी असे ठेवले.
    जुन्नर बस स्टॅन्ड जवळील रस्ता आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. जुन्नर गाव ते किल्ला असे ४-५ किमी अंतर आहे. जुन्नर गावातून त्या ठिकाणी जाण्यासाठी ऑटो वगैरे ची मदत घेऊ शकता.
    किल्ल्यावर असलेले भक्कम दरवाजे आजही किल्ल्याच्या सुरक्षेतेची साक्ष देतात. काही दरवाजे खराब होत आहेत पण त्यांच्या दुरुस्तीची कामेही तेवढीच बारकाईने होत आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा लागतो त्यामुळे चढण्यासाठी जास्त त्रास होत नाही. किल्ला चढत असताना सात दरवाजे लागतात. थोडे वर चढून गेल्यानंतर रिकाम्या जागेत बागेचे स्वरूप देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी बसल्यावर सावलीसोबत वाऱ्याचा हि तेवढाच आनंद मिळतो. किल्ल्यावर असलेली साफ-सफाई किल्ल्याच्या सौन्दर्यतेमध्ये भर घालते. जात असताना आई शिवाई देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या आतील गाभारा लाकडापासून बनवलेला आहे आणि त्या लाकडांमध्ये कोरीव काम केलेले दिसून येते. पुढे गेल्यावर तोच रस्ता आपल्याला शिवजन्मभूमीकडे घेऊन जातो. शिवजन्मभूमी कडे जात असताना आपल्याला गंगा जमूना या पाण्याच्या टाक्या लागतात त्या पाहण्यासारख्या आहेत. एवढ्या उंचावर असूनही त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या स्वच्छ पाण्याने पूर्ण भरलेल्या दिसतात. शिवजन्मभूमी पासून पुढे जात असतांना बदामी टाके लागते, या टाक्याचा आकार बदामाचा असल्यामुळे याला बदामी टाके नाव देण्यात आलेले आहे. पुढे कडेलोट पॉईंट, वर किल्ल्याचा शेवट होतो.
    वर किल्ल्यावर जाताना मधे-मधे पिण्याच्या पाण्याची सोया केलेली आहे. किल्ल्यावर जेवणाची कोणत्याही प्रकारची सोय नाही, पण तुम्हाला लिंबू सरबत, कोकम सरबत अश्या प्रकारची छोटी मोठी दुकाने लागतात. साधारण किल्ला पाहायला १ तास लागतो.
    मग कधी भेट देताय शिवनेरी किल्ल्याला?
    तुम्हाला जर या ठिकाणाला भेट देण्याची इच्छा असेल तर, तुमच्या सोयीसाठी मी मॅप ची लिंक खाली देत आहे तिची मदत घ्या.
    ----------------------------------
    GEAR I USE TO MAKE MY VIDEOS
    Canon DSLR with Lens EF-S 18-55mm - amzn.to/3oPJndD
    Memory Card For DSLR - amzn.to/3ahro7k
    Action Camera - amzn.to/2YrRL7Q
    Redmi Note 10 - amzn.to/2WUV0UZ
    Gimbal For Mobile - amzn.to/2WVEcgD
    2nd Action Camera - amzn.to/3F70iNV
    GoPro Action Camera Battery & Charger - amzn.to/3p0eWB3
    Action Camera Accessories - amzn.to/3mukZva
    Monopod For DSLR and Action Camera - amzn.to/3oKQ7cE
    Tripod Mount Adapter - amzn.to/3sfD58D
    Tripod Mount Adapter 2 - amzn.to/3F95wJe
    boAt Rockerz 255 Pro+ 40 Hours Battery - amzn.to/2Yufsgl
    Noise Fir Color - amzn.to/3Ar9Lwe
    तुम्हाला जर अश्याच नवीन ठिकाणांची माहिती घ्यायाची असेल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही मला आपल्या इंस्ट्राग्राम ( Travelij_ ) किंवा फेसबुक ( Travel IJ ) च्या पेज वर मॅसेज करू शकता मी नक्कीच माहिती देऊ शकेल.
    -------------How to Reach-------------
    goo.gl/maps/Jq...
    From Pune - 95 km
    From Mumbai - 155 km
    ---------------------------------------------------
    Subscribe to Travel IJ : bit.ly/2NT4qK2
    Like us on Facebook: / travelij
    Follow us on Instagram: / travelij_
    Hit LIKE and SUBSCRIBE !
    Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!

КОМЕНТАРІ • 187