Shar ala to dhawuni | शर आला तो धावुनी | Rasika Joshi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 519

  • @satyabhushangosavi7261
    @satyabhushangosavi7261 2 роки тому +20

    गायनातील ठहराव मनाला खूपच भावला..!! कविता तर अप्रतिम आहेच..परंतु आपल्या गायनाने फारच सुश्राव्य झाली... खूप वेळा ऐकलीय...स्तुती साठी शब्द अपुरे आहेत...!!!

  • @veenapande9392
    @veenapande9392 Рік тому +12

    आजच्या पिढीला हि गाणी ऐकवायला हवीत,,, प्रत्येक वेळी ऐकताना जीव कासावीस होतो... रसिका तू खूप गोड गातेस ग,, ❤

  • @vipskul5618
    @vipskul5618 2 роки тому +34

    अजूनही ही कविता ऐकल्यावर डोळ्यातून पाणी येते आईचा आठवणीने 😭

    • @vandanadamle3379
      @vandanadamle3379 Рік тому +1

      मला शाळेची आठवण झाली तेव्हा ही कविता पाठ केली होती अजूनही ती पुर्णपणे पाठ आहे कविता म्हणताना अजून डोळ्यात पाणी येते

    • @cshekharkambli7960
      @cshekharkambli7960 Рік тому

      Aa❤ at aaaaaaa

    • @cshekharkambli7960
      @cshekharkambli7960 Рік тому

      Sa

    • @abhijitjoshi
      @abhijitjoshi 18 днів тому

      😂

  • @vijayabhyankar2597
    @vijayabhyankar2597 2 місяці тому +1

    रसिका तूझ खास अभिनंदन .अतिशय भावपूर्ण सादरीकरण.

  • @sadanandsalvi619
    @sadanandsalvi619 20 днів тому

    ही कविता मी 4मध्ये शिकलो आज मी 70+आहे. ताई तुम्ही मला खरच ही कविता म्हणून माझे मन भरून आले. धन्यवाद ताई. 👌👌🙏🙏

  • @vijaykeer2950
    @vijaykeer2950 Рік тому +2

    सुंदर गायन. कवि ग ह पाटिल, ज्यांनी देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश लिहिली

  • @kiransamant
    @kiransamant 3 роки тому +13

    फार सुंदर...!
    ग. ह. पाटलांचे हे शब्द नेहमीच काळजाला हात घालतात. डोळ्यात पाणी जमा होतं. चालही तितकीच अस्वस्थता आणणारी. थेट आत जाणारी. शब्दांचा अर्थ अगदी काहीही न सांडता जश्याचा तसा पोहोचवणारी..
    तुमच्या आवाजात ऐकतानाही तोच अनुभव आला. प्रसंग समोर उभा राहीला. धन्यवाद.

    • @anilnerpagar5869
      @anilnerpagar5869 2 роки тому

      हदयाला पाझर फोडणारी कविता

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 Місяць тому

    लहानपणी ची कविता ऐकून खूप खूप समाधान झाले . लहानपणी तर डोळ्यांना टप् टप् पाणी येत असे. छान ताई. आपण उत्कृष्ट म्हटले आहे ताई. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई.

  • @yashwantjoshi8609
    @yashwantjoshi8609 Рік тому

    मंत्रमुग्ध

  • @संघटित
    @संघटित 2 роки тому +50

    या कविता परत अभ्यासात यायला हव्यात,तरच पुढारलेल्या या तरूणाईला माता पिता, समाज रुढ यांची जाणिव राहील

  • @madhurideo747
    @madhurideo747 10 місяців тому +1

    इतक्या सुंदर कविता आता ऐकायलाच मिळत नाही.ही कविता तर अप्रतिम आहे.कविता ऐकताना अश्रू अनावर होतात.

  • @gayatrikarkhanis190
    @gayatrikarkhanis190 13 днів тому

    लहान पणीची कविता. खूप आवडत असे मला. ही कविता ऐकवल्या बद्दल धन्यवाद. रसिका खूप सुंदर म्हणतेस. चेहऱ्यावर तुझ्या त्या त्या गाण्याचे भाव स्पष्ट असतात. आणि आत्ता तू रडतेस जी काय असे जाणवते. खूप खूप छान रसिका

  • @sudhaukidve5481
    @sudhaukidve5481 3 роки тому +7

    खुप छान कविता आमच्या लहानपणीची ऐकुन खुप छान वाटले मी आत्ता 67वर्षाची आहे मन भरून आले

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 3 роки тому +2

    ही गोष्ट च नाही तर ही कविता आम्हाला मराठी पुस्तकात अभ्यासाला होती.त्यामुळे मन बालपणात गेले..खूप छान .मी तुझी गाणी ऐकते.

  • @prakashjoshi3295
    @prakashjoshi3295 3 роки тому +2

    मला ही कविता ऐकून खूप खूप छान वाटले आणि जुन्या लहानपणाच्यया स्मृती जाग्या झाल्या, सध्या माझे वय ७२ वर्षे आहे.धन्यवाद व आपणास शुभेच्छा.

  • @nilimaurhekar5497
    @nilimaurhekar5497 Рік тому +1

    खुप बढिया आहे ही कवी ता, कलियुगी असा पुत्र मिळणे म्हणजे आपले अहोभाग्य आहे ❤❤

  • @karunavishe7091
    @karunavishe7091 3 роки тому +9

    अप्रतिम!
    माझ्या वडिलांना ही कविता होती... त्यांची आवडती कविता... त्यांना जाऊन आता एक वर्ष होईल.... खूप तीव्रतेने आठवण येते त्यांची... ह्या कवितेमुळे खूप गहिवरून आले... हृदय स्पर्शी...

  • @dldeshpande2019
    @dldeshpande2019 3 роки тому +12

    रसिका खूप छान गायलीस माझी आई लहानपणी हे गाणे म्हणायची आज तु त्या दिवसांची आठवण करुन दिली

    • @sujatawaghodkar5507
      @sujatawaghodkar5507 2 роки тому

      माझ्या काकू मला आईकावयाच्या .. खूप छान वाटलं आईकुन

    • @madhavishukla9335
      @madhavishukla9335 Рік тому

      अतिशय सुंदर गायली आहेस रसिका😢

  • @sandhyakulkarni5759
    @sandhyakulkarni5759 2 місяці тому

    कविता ह्रदयस्पर्शी आहे आणि गायली सुद्धा अप्रतिम.

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 3 роки тому +9

    कित्ती गोड.
    शब्द नाहीत बोलायला.
    थेट हृदयाला भिडणारे स्वर.... 🙏

    • @neetiramteke5812
      @neetiramteke5812 Рік тому

      माझी आई ही कविता माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलांना पाळण्यात झोपवताना गायची. आईची आठवण झाली.

  • @nivruttibangal3102
    @nivruttibangal3102 5 місяців тому

    हि कविता या कलियुगात शाळेतील शिक्षकांनी लहान मुलाना मनावर चांगले संस्कार पडावेत म्हणून शिकविली गेली पाहिजेत अतिशय उत्तम शब्द रचना

  • @prakashdhawale8314
    @prakashdhawale8314 Рік тому

    अगदी सत्य मन भरून आले आहे. अश्या कवितांची पुन्हा अभ्यास क्रमात गरज आहे. समाज हितासाठी.

  • @swatikulkarni3511
    @swatikulkarni3511 Рік тому +1

    Very sensitive

  • @maheshojale
    @maheshojale 3 роки тому +29

    भावपूर्ण गायन! डोळ्यासमोर अगदी हुबेहूब प्रसंग उभा रहातो.. गीतकार, संगीतकार आणि गायक - सगळेच तोडीस तोड! एक श्रेष्ठोत्तम कलाकृती! 🙏🏻

    • @mahananddamale5645
      @mahananddamale5645 2 роки тому +1

      भावपुर्ण गायन केले कि अगदी सहज हुबेहुब प्रसंग उ भा रहाते ताई

  • @popatpalve7584
    @popatpalve7584 Рік тому +1

    Even I cross 70 Yrs, I still remember this heart touching poem .when I was studying in std ivth this poem taught by our Guruji in a very sad and silent mood.Thanks Rasika for uploading this poem. Moreover, you have sung sweetly. Such types of poem should be included in school syllabus for moral thoughts

  • @s.d.mansute9030
    @s.d.mansute9030 2 роки тому +1

    किती गोड आवाज आहे किती छान चाल लावली आहे अगदी आगळेवेगळे अप्रतिम सुंदर, धन्य तो आवाज धन्य ती चाल धन्य तो भावपूर्ण गीत शतशः नमन या गीताला या आवाजाला आणि त्या वृध्दपणी मीच एक आधार वाहवा काय सुंदर लय काढली भावपूर्ण बोलिला 👌🙏

  • @vedadeshmankar9381
    @vedadeshmankar9381 3 роки тому +3

    अंगावर काटे आणि डोळ्यांमध्ये पाणी आले...अप्रतिम👌👌👌

  • @komaljadhav1125
    @komaljadhav1125 18 днів тому

    माझ्या आजोबांनी ऐकवली कविता❤आज ते माझ्या सोबत नाहीत.पण आज ही कविता ऐकून मन भरून आलं ❤😢 थँक्यू ताई

  • @amitajadhav7155
    @amitajadhav7155 Рік тому

    माझ्या आईची आवडती कविता होती ही। ती नेहमी गुणगुणायची।सुंदर कविता आणि आवाज ही छान।

  • @sunilsonwalkar6787
    @sunilsonwalkar6787 Рік тому

    खरच नवीन पिढीला या पवित्र प्रेम व नातं यांची कल्पना येईल

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Рік тому

    अशा कविता पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात याव्यात ,त्यामुळे अलीकडच्या पिढीला माता - पिता यांचे ममत्व आणि वात्सल्य प्रेम याची जाणीव जागृती होईल

  • @girijasudame1595
    @girijasudame1595 3 роки тому +4

    अप्रतिम!!! रसिका खूपच छान, डोळ्यातुन पाणी आले, हृदयस्पर्शी शब्द व आपले गायन।।।

  • @DrDnyaneshwarDhangar
    @DrDnyaneshwarDhangar 3 місяці тому

    माझ्या बालपणी मी श्रावण बाळ ची भूमिका करायचो आणि ह्याच सुरात, लयात गायन करायचो
    मी ज्या पद्धतीने गायन करायचो तीच पद्धत आज 35 वर्षानंतर ऐकून प्रसन्न झालो 😊

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 3 роки тому +1

    अतिशय सुरेख गायलीस रशिका अंगावर काटा आला ही कविता आम्ही पाठ केली होती अभ्यासाला होती आम्हाला

  • @shailasubbaraman9830
    @shailasubbaraman9830 Рік тому

    हृदयस्पर्शी कविता व गायन. बालपणीच्या अभ्यासातील डोळ्यात पाणी आणणारे काव्य. ऐकून फार छान वाटले, हृदय भरून आले.

  • @Chandrakant-g7e
    @Chandrakant-g7e 11 місяців тому

    अप्रतिम, अगदी लहान पणी आमचे काका ही कविता बोलायचे,आज त्यांची ह्या कवितेमुळे आठवण झाली.
    तुमच्या गायकीला मनापासून वंदन.

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 роки тому +2

    मन हेलावून टाकणारी शब्द रचना!! शाळेतील दिवस आठवले. डोळे पाणावले वर्गातील शांतता आठवली. फारच छान शालेय जीवनात नेले म्हणुन. धन्यवाद.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 7 місяців тому +2

    खूप छान कविता, माझेही वय 67 वर्षे आहे. अजूनही एकांतात असताना ही कविता मी ऐकतो आणि मनसोक्त रडतो. कुठे गेले ते बालपण असा प्रश्न पडतो.

  • @kisanaher6357
    @kisanaher6357 Рік тому

    अप्रतिम गीत . खरंच म्हणतात ना जुनं ते सोनं.अगदी १०० टक्के खरं.

  • @manojmanerikar
    @manojmanerikar 3 роки тому +3

    खूपच छान. आपली गाण्यांची निवड अफलातून असते🙏🙏🙏

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 Рік тому

    ऐकुन फारच छान वाटले, लहानपणी ची आठवण झाली

  • @sunitalasurkar243
    @sunitalasurkar243 Рік тому

    खुप सुंदर आवाज! लहानपणी ऐकलेल्या श्रावणबाळाच्या गाण्याने आज ही मन गहिवरते.

  • @ratanbondre5722
    @ratanbondre5722 2 роки тому

    खूपच सुन्दर . मला सुध्दा ही कविता इयत्ता चौथीत होती. सहजच तोंडात बसली होती. आता वयाच्या सत्तराव्या वर्षी सुध्दा ती तेवढीच भावते. एवढेच नाही तर डोळे वाहतात.

  • @swatichati7754
    @swatichati7754 3 роки тому +7

    खुप छान गायली रसिका, अगदी बालपणात नेऊन सोडल तु ,आमच्या लहानपणी आमची आजी ही गोष्ट खुप रंगवून सांगायची तेव्हा डोळे भरुन यायचे ,आज तु खुप गोड गायलीस आता देखील डोळे भरून आले🙏 अशीच गात रहा

    • @BhujangraoDhorkule-vr5ig
      @BhujangraoDhorkule-vr5ig Рік тому

      ही कविता होती आम्हाला शाळेत
      खरच आज शाळेतुन आल्या सारखं वाटलं
      खरंच आहे शपथेवर सांगतो
      जय हिंद

    • @balubabar8398
      @balubabar8398 Рік тому

      माझी आवडती कविता आहे . जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @pradippathak2492
    @pradippathak2492 3 роки тому +1

    Atyant Bhavpurna Gayan ani cheharyavari Bhav.. apratim.

  • @rashmikulkarni4050
    @rashmikulkarni4050 Рік тому

    खूपच सुंदर कविता व तितकेच सुंदर व भावपूर्ण गायन. पुन्हा एकदा शाळेत जाऊन आल्यासारखे वाटले.

  • @PremsingRajput-co5qv
    @PremsingRajput-co5qv Рік тому

    ही कविता ऐकून मला माझ्या शाळेची लहानपणी ची आठवण ताजी झाली

  • @vidyaoak6824
    @vidyaoak6824 Рік тому +2

    खूप छान ! डोळ्यातून पाणी आले. खूप वर्षांनी ऐकली ही कविता.

  • @latajoshi3095
    @latajoshi3095 Рік тому

    चौथीच्या वर्गात मराठीच्या पुस्तकात कविता होती ही आम्हाला.

  • @deepapalande6110
    @deepapalande6110 Рік тому

    र हा 84,, ,,हा पाळणा सुंदर चौरयाआयशी साधायला खुप वर्षा ने ऐकायला मिळाला धन्यवाद

  • @vrushalilohagaonkar607
    @vrushalilohagaonkar607 2 роки тому +3

    फारच सुंदर गीत गायले आहे तूम्ही 🙏👌

  • @mandakhare7879
    @mandakhare7879 Рік тому +1

    ही कविता आपल्या करुन स्वरात ऐकताना डोळ्यात पाणी आले आईवडिलांच्या आठवणीने आताच्या पिढीला हे कळण्यासाठी पूर्वी प्रमाणे अभ्यासक्रम शिक्षण द्यायला पाहिजे

  • @namitapant9107
    @namitapant9107 Рік тому

    Pharach sunder....angawar share aananari kavita

  • @shraddhanaik9531
    @shraddhanaik9531 6 місяців тому

    अतिशय सुंदर
    कविता .आजही ऐकताना डोळ्याच्या कडा ओलावतात .आमचे गुरुजी सर्व प्रसंग डोळ्यापुढे ऊभा करत. आज ६९सत्तराव्या वर्षीही त्या गुरुजींना डोळ्यासमोर आणते ही कवीता अविट गोडी.

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 6 місяців тому

    फार छान गोड आवाजात हि कविता अयकविली फार आवडली आम्हाला 4तीच्या वरगाला होती हि कविता मला आधी पुरण पाठ होती आता मात्र थोड्या ओळी आठवतात मी पण म्हणून दाखवते नाती नातवाना आपल्या आवाजात हि कविता अयकुन फार छान वाटले शाळेची आठवण झाली 🙏

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 2 роки тому

    खूप छान म्हंटले ताई. आम्हाला ही कविता होती. आमचे गुरुजी खूप छान शिकवायचे. आमचा सगळा वर्ग रडायचा. माझे वय 70.आता अशा कविता नसतात त्यामुळे भावनिक विकास होत नाही.

  • @ashwinitanawade7211
    @ashwinitanawade7211 Рік тому

    Lahan pani eiklele mazya.aaikadun khooop chan❤

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 Рік тому

    मी चौथीत असताना ही कविता पाठात होती खूप आवडायची तालासुरात म्हणायची आता खूप वर्षांनी ऐकायला मिळाली

  • @SulaWaradkar
    @SulaWaradkar 2 роки тому +5

    क्या बात है! आज Whatsapp वर आली ही कविता. तुमचं नाव शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा व्हिडीओ दिसला. कवितेतली आर्तता थेट आरपार पोहोचली. आजकालच्या चित्रविचित्र हेअर स्टाईल असणा-या रिॲलिटी शोजमधील गायिकांच्या गर्दीत तुमच्यातला ठहराव आवडला. माझ्याकडे शब्दच नाहीत तुमचं कौतुक करायला.
    दशरथ राजा ,रडला धायी धायी..आणि आम्ही सुद्धा!!

  • @jyotikulkarni1223
    @jyotikulkarni1223 3 роки тому +1

    Khup Juni Kavita.balpanichi athwan Ali. Ani khup chan mhanali.

  • @sujatathakur5529
    @sujatathakur5529 Рік тому +2

    खूप आर्तता आहे तुमच्या आवाजात.
    माझ्या सासूबाई माझ्या लेकीसाठी म्हणायच्या.त्यांना जाऊन आज २८ वर्षे झाली.
    त्यांचं ऐकून माझी पाठ झाली.आज हे ऐकून त्यांची तीव्रतेने आठवण आली.😢😢

  • @SudhaKadam-ck1iq
    @SudhaKadam-ck1iq Рік тому

    Khup juni poem khup aanand zala. Khup chhan gaylet tumhi thanks

  • @rameshtingle9818
    @rameshtingle9818 11 місяців тому

    छान सुंदर भाव कविता संवेदनात्मक हृदयतिल व्यथेटिल बोल।।।

  • @pradnyachitnis3707
    @pradnyachitnis3707 Рік тому

    फारच सुंदर म्हटलंय रसिका तुम्ही. डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहात नाही.

  • @purnimagolwalkar4102
    @purnimagolwalkar4102 3 роки тому +2

    खुप छान कविता खरोखर लहानपण आठवले.

  • @mugdhapednekar9553
    @mugdhapednekar9553 3 роки тому +3

    खूपच सुंदर ,रसिका.असे दुर्मिळ गाणे ऐकविल्याबद्दल खरंच Thank you very much.

  • @anaghasa
    @anaghasa 7 місяців тому

    ह्या कविता शिकुन किंवा ऐकुन ज्यांचं बालपण गेलं ते खरंच सुखी... अशा काही आधीच्या पिढीच्या कविता आहेत ज्या खरंच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हव्यात

  • @prajktadange354
    @prajktadange354 3 роки тому +1

    वावा खूपच छान....शब्दच नाही ग .....माझी आई नेहमी म्हणते ही कविता त्यांना त्यांच्या शाळेत होती.....

  • @shekharsunthankar2505
    @shekharsunthankar2505 Рік тому

    Amhi tyaveli karnatakat shikat asu suddha hi kavita ratrandivas ayakata ho ani mhanat basayacho amha bahin bhavanchi bhandan suddha vhayachi hi kavita mhananyavarun❤❤

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 9 місяців тому

    एकदम भारीच. आवाज पण खूप खूप छान.

  • @amrutadeshmukh9953
    @amrutadeshmukh9953 2 роки тому

    निशब्द...अतिशय सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

  • @shripadmahashabde293
    @shripadmahashabde293 3 роки тому +3

    वा वा खुप छान .गाण्यातील करुण भाव रसिकाच्या आवाजात पुर्णपणे जाणवलाय .खुप छान ..ऐकतांना डोळे पाणावलेत ...गाण्यातुन श्रावणबाळ डोळ्यापुढे उभा केला ....

  • @rajarambhure8081
    @rajarambhure8081 Рік тому

    खुपच छान. शालेय जीवनातील अवीट कविता. जोशी बहन अभिनंदन.

  • @dattatraytupsaundray1713
    @dattatraytupsaundray1713 Рік тому

    नमस्कार, आशिष, रसिकाजी.
    हि कवीता, नाही तर प्रत्यक्षात
    एका कर्तव्य दक्ष, आपल्या माता पित्या
    वर जिवापाड प्रेम करणाऱ्या, एका ,,,,,,,
    निष्पाप ,,बाळाची,,कहाणी,
    आपल्या,,आवाजात,,प्रत्यक्षात
    ,,बाळ श्रावण,,हे आपले कर्तव्य करत ,,,,,
    असल्याचे जाणवते,धन्य आहात ,65 वर्ष वय माझे, पण,अश्रुपातावर रोक
    नाही ठेवता आला,आपणांस खुप
    आशिर्वाद, दत्तात्रय तुपसौंदरय'

  • @saylideshmukh1
    @saylideshmukh1 3 роки тому +1

    माझ्या कडे शब्द च नाहीत... ऐकता ऐकता कधी डोळ्यातून पाणी आले कळलच नाही👌👌👌
    मी भाग्यवान मानते स्वतःला तुम्हाला रोज ऐकता येते मला

  • @prabhakarjoshi2318
    @prabhakarjoshi2318 Рік тому

    अत्यंत सुंदर, एकदम जुन्या काळात गेलो, भावपूर्ण चाल व उत्तम सादरीकरण.

  • @satishchati4549
    @satishchati4549 3 роки тому +1

    Khupach chhan Rasika. 👌👌👍👍😍

  • @sandhyaubgade5422
    @sandhyaubgade5422 3 роки тому +2

    अतिशय सुंदर कविता माझी फार आवडती
    मी शाळेत असतांना आम्हाला होती
    अतिशय ह्रदयाला भिडणारी

    • @kankhareatmaram6947
      @kankhareatmaram6947 Рік тому

      खुपच छान पुन्हा शाळेत भ.धो.माळी सर आठवले. सुंदर सादरीकरण

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Рік тому

    अतिशय सुंदर काव्य सादरीकरण केले ताई तू शाळेत ल्या आठवणींना उजाळा मिळाला धन्यवाद ताई

  • @nareshthawai5544
    @nareshthawai5544 21 день тому

    Mast far chan Shalechi athvan zali Uttam

  • @rajashribirje4686
    @rajashribirje4686 Рік тому

    मन हेलावून टाकणारी कविता.खूपच छान गायलात.माझे वडिल ही कविता खूप छान गायचे.

  • @varadvinayak0723
    @varadvinayak0723 Рік тому

    खूपच सुंदर ❤❤❤❤❤

  • @anandakute8713
    @anandakute8713 4 місяці тому

    ही कविता मला 4थ्या वर्गात होती ती मी नेहमी गात होतो, आजही श्रवण करीत आहे. अर्थ पूर्ण कविता .

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 10 місяців тому

    माझे आवडते गाणे आमचे गुरुजी म्हणायचे अगदी डोळ्यातून पाणी येते ❤❤

  • @sadhanagadge7811
    @sadhanagadge7811 3 роки тому +1

    imp superb rasika tai

  • @explorekidsworld8066
    @explorekidsworld8066 11 місяців тому

    आई ची लहानपणी ची कवितं तिला ऐकून खूप खूप आनंद झाला

  • @sulabhachavan3706
    @sulabhachavan3706 2 роки тому

    लहाणपणी शाळेत शिकत असताना हीं कविता मला खूप आवडली होती तोंड पाठ होती आजही ऐकून बालपणाची आठवण झाली खूपच छान गायली आहेत वय 72 आहे धन्यवाद

  • @sanjaysabnawis1872
    @sanjaysabnawis1872 2 роки тому +1

    खूप छान गायलंस। अंगावर काटा येतो।

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Рік тому

    रसिका जोशी यांनी भावपूर्ण गायन करत कारुण्य भाव प्रतित केला आहे.

  • @marotirathod9141
    @marotirathod9141 Рік тому

    श्रावण बाळ कविता आम्हाला चौथ्या वर्गाला होती. सन 1969-70 परंतु हि कविता आवडल्या मुळे इयत्ता दुसरीत च मुखोतगत झाली होती.

  • @dilipkadam2347
    @dilipkadam2347 2 роки тому +1

    वा वा खूपच हृदयस्पर्शी ,करूणामय ,अंतःकरणाला भिडणारी ही कविता आणि सादरीकरण करून संपूर्ण श्रावणबाळचं प्रसंगच डोळ्यांसमोर उभा केलास बेटा😊😊🤗🤗👍👍👌👌👏👏
    आमचे गुरूजी शाळेत शिकवत असताना आम्ही विद्यार्थीवर्ग अगदी स्तब्ध असायचा वर्गात आम्ही सर्व मुलामुलींना (सर्वांनाच) रडायला यायचं विशेष म्हणजे ही कविता वर्गात मीच गावून दाखवायचं अन आताही मी माझ्या मुलींना व नाथवांना ही कविता अंगाई म्हणून गावून दाखवतोय .धन्य आम्ही की आम्हाला चांगले गुरूजी व कवि-कवयत्री आणि लेखक लाभले. पुन्हा एकदा धन्यवाद🙏🙏🙏 आवाजाची देणगी मला निसर्गाने

  • @ajaykolhe1676
    @ajaykolhe1676 4 місяці тому

    Fharach sunder gane gayles Tu rasika👌👌

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 3 роки тому +1

    अतिशय ह्रदयस्पर्शी गायन झाले रसिका. खुप आत भिडले.🙏🙏

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 3 роки тому +47

    शर आला तो कविता माझ्या लहानपणी ची खूप आनंद झाला ऐकून 67 माझं वय

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 3 роки тому +1

      Same to me !!

    • @mahendramahajan2426
      @mahendramahajan2426 2 роки тому +2

      मलाही ४ थी ची कविता ऐकूण खूप खूप छान व समाधान वाटले.

    • @cricketersvsattitude8249
      @cricketersvsattitude8249 2 роки тому

      Mazi pan aawadati kavita aahe.lahan panachi aathwan zali.khubch chan

    • @kamalbonde2435
      @kamalbonde2435 2 роки тому

      Mi 70 varshani hi kavita aekte aahe. 👌💓😌💐

    • @sheeladhemre3408
      @sheeladhemre3408 2 роки тому

      Same to me.

  • @archanawadkar4571
    @archanawadkar4571 3 роки тому +2

    खुप सुदंर कविता माझी आई देखिल गायाची अगदी डोळ्यात पाणी यायच श्रावण बाळाची कथाच कवितेत आहे

  • @seemakubade7754
    @seemakubade7754 2 роки тому +1

    खरच खूप जुन्या कविता ऐकायला मिळाल्यात माझे वय 67व.आनंद वाटतो

  • @yashwasntvishwasrao9541
    @yashwasntvishwasrao9541 2 роки тому

    लहान पणीची छान कविता... दर शनिवार कविता पुस्तक न उघता म्हणत असू. खुप सुंदर

  • @pratibham1912
    @pratibham1912 5 місяців тому

    ❤far God gala atishay sunder

  • @nandadeepchavan5860
    @nandadeepchavan5860 Рік тому +1

    तो काळ झरझर डोळ्यांसमोर उभा राहतो.❤

  • @manishdorlikar1013
    @manishdorlikar1013 Місяць тому

    जुनी कविता आहे सुंदर कविता आहे धन्यवाद मॅडम