श्रीगुरुचरित्र अध्याय ११ | संतती विषयी वाटणारी चिंता दूर होईल | Adhyay 11

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.
    सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे.
    दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे.
    ‘भक्तीमुक्ती परमार्थ । जे जे वांछिले मनात । ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥’
    गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन:शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला, तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले.
    तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा-अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली, ही घटना शके १४९०मध्ये घडली.
    याचाच अर्थ, तब्बल ११० वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले. भीमा-अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले.
    गुरुचरित्राचे एकुण ५२ तसेच काही ग्रंथात ५३ अध्यायात एकुण ७४९१ ओव्या आहेत. त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे.
    विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.
    Gurucharitra in marathi with marathi meaning
    gurucharitra katha
    gurucharitra kathasaar
    kathsarasahit gurucharitra granth
    gurucharitra audio granth
    shree gurucharitra in marathi
    || श्री स्वामी समर्थ ||
    | ग्रंथ | मनाचे श्लोक | नामस्मरण | अध्यात्म |
    Adhyatma Saar provides you the guidance to your inner self by knowing the connection of your soul, mind & body through spirituality. "Spirituality" is a foundation of real happiness & real truth.
    अध्यात्मसार -
    अध्यात्म हाच खऱ्या आनंदाचा आणि वास्तविक सत्याचा पाया आहे.
    मनुष्य देहच मोक्षाचे द्वार आहे. त्यामुळे भौतिक संपत्ती पेक्षा अध्यात्मिक संपत्ती जास्त महत्वाची आहे कारण आध्यात्मिक संपत्ती मुळेच आपल्या आत्म्याचा विकास होऊन आपल्या आत्म्याचे परमात्म्यासोबत मिलन होणार आहे आणि या मिलनामुळे मायेची शक्ती आपलं काहीच बिघडू शकणार नाही आणि या मिलनामुळे योगमाया शक्ती मिळून आपण परमेश्वरासारखे परम शुद्ध होऊ आणि अखेरीस आपली या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊन आपल्याला भगवंताच्या परम धामात म्हणजेच वैकुंठात प्रवेश मिळेल.
    त्यामुळेच हि आध्यात्मिक संपत्ती मिळवणं आपल्या या मनुष्य देहाचं कर्तव्यच आहे. या अध्यात्मसार चॅनेल च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत सर्व अध्यात्मिक माहिती फ्री मध्ये पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याने आपल्या सर्वांनाच या मनुष्य देहाद्वारे आपलं अंतःकरण शुद्ध करून आपल्या आत्म्याचं कल्याण करता येईल.
    Instagram
    adhyatma_saar
    Facebook
    adhyatmasaar
    Subscribe @Adhyatma_Saar for Spiritual guide.
    Follow me on Instagram - adhyatma_saar
    Contact -
    contact.roohsaar@gmail.com
    Other videos -
    1008 Times Shree Swami Samarth Jap - • Shree Swami Samarth Ja...
    1008 Times Shree Gurudev Datta Mantra Jap - • Shree Gurudev Datta Ja...
    1008 Times Jay Jay Ram Krishna Hari Jap - • Jay Jay Ram Krishna Ha...
    Sant Tukaram Gatha Abhang 1 - 100 :
    • Sant Tukaram Gatha Abh...
    Sant Tukaram Gatha Abhang 101 - 200 :
    • Sant Tukaram Gatha Abh...
    Sant Tukaram Gatha Abhang 201 - 300 :
    • Sant Tukaram Gatha Abh...
    Sant Tukaram Gatha Abhang 401 - 500 :
    • Sant Tukaram Gatha Abh...
    श्रीगुरुचरित्र अध्याय 1 - • श्रीगुरुचरित्र अध्याय ...
    श्रीगुरुचरित्र अध्याय 2 - • श्रीगुरुचरित्र अध्याय ...
    श्रीगुरुचरित्र अध्याय 3 - • श्रीगुरुचरित्र अध्याय ...
    श्रीगुरुचरित्र अध्याय 4 - • श्रीगुरुचरित्र अध्याय ...
    श्रीगुरुचरित्र अध्याय 5 - • श्रीगुरुचरित्र अध्याय ...
    श्रीगुरुचरित्र अध्याय 6 - • श्रीगुरुचरित्र अध्याय ...
    श्रीगुरुचरित्र अध्याय 7 - • श्रीगुरुचरित्र अध्याय ...
    श्रीगुरुचरित्र अध्याय 8 - • श्रीगुरुचरित्र अध्याय ...
    श्रीगुरुचरित्र अध्याय 9 - • श्रीगुरुचरित्र अध्याय ...
    श्रीगुरुचरित्र अध्याय 10 - • श्रीगुरुचरित्र अध्याय ...
    Contact -
    contact.roohsaar@gmail.com
    copyright@adhyatmasaar. All Right Reserved.
    #gurucharitra #shrigurucharitra #gangapur #gangapurcity #dattatreya #dattaguru #gurucharitramarathi #gurucharitrasaramrut #shreeswamisamarth #granth #marathi #adhyay11 #maharashtra #marathigranth #granth #spiritualgrowth #lifetransformation #transformlife

КОМЕНТАРІ •