Suke Bombil | Spicy Dried Bombil Curry | १० मिनिटात झटपट तयार करा स्वादिष्ट सुक्या बोंबलाचे कालवण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • Bombil Batata Homemade Curry | Suke Bombil | Spicy Dried Bombil Curry | १० मिनिटात झटपट तयार करा स्वादिष्ट सुक्या बोंबलाचे कालवण | Very Easy & Simple way
    साहित्य - २०० ग्रॅम सुके बोंबील, १ बटाट्याच्या फोडी , २ कांदे बारीक चिरलेले, ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ७/८ कोकम पाकळ्या, २½ tbl spn घरगुती लाल मसाला, ½ tea सपन हळद, १ tbl spn तांदळाचे पीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ५ tbl spn तेल आणि चवीनुसार मीठ.
    कृती - सर्वप्रथम बोंबील कोमट पाण्यात चांगले धुवून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि मिरची घालून लालसर रंगावर परतून घ्या. कांदा मिरची परतून झाल्यानंतर त्यात हळद आणि घरगुती लाल मसाला घाला. मसाला हलका परतून घ्या. मसाला परतून झाल्यानंतर त्यात बोंबील आणि बटाटा घाला. मसाल्यात त्यांना एकजीव करून घ्या. बोंबील एकजीव झाल्यानंतर त्यात एक ग्लासभर साधे पाणी घालून घोळून घ्या. आता वर झाकण ठेवून त्याला ५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. ५ मिनिटानंतर झाकण ओपन करून त्यात कोकम, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा आणि पुन्हा ५ मिनिटे वाफेवर चांगला शिजवून घ्या. ५ मिनिटानंतर गरमागरम सर्व्ह करा. धन्यवाद !
    ............................................................................................................
    Agri Koli Homemade Masala - • Agri Koli Homemade Mas...
    RIce Roti ( Tandalachi Bhakri ) - • Rice Roti Recipe | Tan...

КОМЕНТАРІ • 235