Trimbakgad Brahmgiri Durgbhandar Presha Kadam , Reshvi Kadam , Metghar , Twin sisters..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • ब्रम्हगिरी / त्रंबकगड / दुर्गभंडार ची भटकंती..
    Brahmgiri , Trimbakgad, Metghar , Durgbhandar
    खूप जबरदस्त किल्ला आहे..
    पाषाण कौशल्याचा अप्रतिम नमुना इथे बघायला मिळतो..
    सुरवातीला कातळात कोरलेला पायरीमार्ग बघून मन प्रसन्न झाले..त्या काळी लोक कोणतीही उपकरणे नसताना कश्या प्रकारे एवढे काम करायचे हा प्रश्न परत एकदा मनात आला..
    दोन्ही प्रवेशद्वार अजूनही भक्कम परिस्थितीत आहेत पुढील कित्येक वर्षे त्याला काही होणार नाही एवढे नक्की..
    वरती पोहचण्यापर्यंत पायरी कातळी मार्ग तर जबरदस्त आहेच पण त्या बरोबर ठिकठिकाणी दगडात कोरलेल्या मुर्त्या खूप छान आहेत..
    माथ्यावर पोहचल्यावर पहिले ब्रह्मगिरी मुख्यदर्शन करून पुढे मूळगंगा उगमस्थान बघण्यासारखे..( दोन्ही ठिकाणी पुजारी थोडे विचित्र वाटले कारण सतत लोकांकडे पैसे टाका म्हणून मागणी करत होते, त्यामुळे आम्ही दिले नाही )
    तेथून पुढे हत्ती दरवाजा बघायला जायचे ठरवले , एका लोकल बाईने सांगितले होते कि चक्रधार स्वामी मंदिराच्या मागच्या बाजूने जाण्यास रस्ता आहे त्यानुसार पुढे चालण्यास सुरुवात केली , मळलेल्या पायवाट ने 30-35 मिनिटे चालत होतो तरी काही दिसत नव्हते शेवटी म google ची मदत घेऊन हत्ती दरवाजा कुठे आहे बघितले तर थोडा अंदाज आला आणि तेथील लोकल असणाऱ्या एका मित्राला फोन करून माहिती घेतली आणि पुढे चालत राहिलो..
    शेवटी 1 तास चालत गेल्यावर हत्ती दरवाजा जवळ पोहचलो..
    तेव्हाच आनंद काही वेगळाच होता..
    तिथे एक नाही तर दोन दरवाजे बघायला मिळाले , वरील दरवाजा पूर्णपणे मातीत आणि दगडात बुजला गेला आहे तर दुसरा दरवाजा अर्ध्या पेक्षा जास्त मातीत गाडला गेला आहे..
    गडावरील इतर कातळात केले गेलेले काम बघता इथे सुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या दरवाजा मध्ये कातळी पायरीमार्ग असेल असे वाटते..
    हत्ती दरवाज्याच्या खालून सुद्धा गडावर येणारी थोडी अवघड अशी एक वाट आहे..
    3 मित्र त्या मार्गाने आले होते, त्यांनी सांगितले कि थोडेसे खाली अजून एक गुफा आणि मंदिर आहे..
    म काय आम्ही ते बघण्यास खाली उतरलो..
    त्याच्याच खाली वर येण्यासाठी एक शिडी लावण्यात आलेली आहे..
    परत येताना आम्ही हत्ती दरवाजा ते चक्रधर स्वामी मंदिराजवळ 30 मिनिटात पोहचलो...
    तिथून म आम्ही पोहचलो विरुद्ध दिशेला असणाऱ्या जटा मंदिर जवळ..शिवशंकरच्या जटे मधून गंगा अवतरली ती याच ठिकाणी..
    जटामंदिराच्या मागच्या बाजूने दुर्गभंडार ला जाणारा मार्ग आहे..
    एका बाजूला दरी अश्या निमुळत्या वाटेने खूप काळजी घेत घेत आम्ही दुर्गभंडारच्या पहिल्या कातळात कोरलेल्या पायरीमार्ग जवळ पोहचलो..
    जणू पाताळात जाणारा रस्ता अश्या प्रकारे तो बनवला आहे..एका वेळी कसेतरी दोन जण जातील एवढीच जागा..
    पण खूप जबरदस्त मार्ग..
    तो मार्ग खाली उतरून बाहेर पडलो तोच पुढे दोन डोंगर जोडणारी एक वाट पार करायची होती , आधी जेव्हा काही Videos मध्ये हि वाट बघितली होती तेव्हा Presha, Reshvi ला तिथे घेऊन जायचे नाही असे ठरवले होते कारण दोन्ही बाजूला खोल दरी..
    पण जागेचा , वातावरणाचा अंदाज घेऊन , त्या भागात माकडे नाहीत याची खात्री करून म त्यांना पण घेऊन जाऊयात ठरवले..
    येथून काळजी घेऊन जाणे गरजेचे , उगाच मस्ती मज्जा करण्याच्या नादात किंवा जोखीम असणारे फोटो काढून कायमचे फोटोत जाण्यात काही अर्थ नाही..🤪😄
    या वाटेने पुढे आल्यावर पुन्हा एक कातळात कोरलेला वरती जाणारा पायरीमार्गाने त्याच्या प्रेमातच पाडतो..
    अरे हे सर्व काम करणारी नक्की माणसेच होती कि त्यांच्यात काही दैवी शक्ती होती असे वाटू लागते , कारण आजच्या काळात सुद्धा कोणाला असे काम करायला सांगितल्यास कोणी करू शकणार नाही..
    पायरीमार्गाने वर चढून आल्यावर तेथून पुढे गेल्यास आपण एका बुरुजाजवळ पोहचतो..
    पावसाळा असल्याने गडावरील आणि गडाच्या आजूबाजूला असणारे वातावरण खूप छान होते..
    अश्या प्रकारे एका जबरदस्त गडाची भटकंती केल्याचा आनंद मनात ठेवून आणि उतरण्याची इच्छा नसतानाही आम्ही परतीचा प्रवास सुरु केला..
    ⛰️⛰️🚩🚩
    जय शिवराय , जय शंभूराजे
    मातीत गाडल्या गेलेल्या हत्ती दरवाजाला आपण सर्वांनी प्रयत्न करून लवकरच मोकळा श्वास दिला पाहिजे.. ⛰️⛰️

КОМЕНТАРІ • 13

  • @sandipzende7108
    @sandipzende7108 27 днів тому +1

    ❤❤❤❤

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 26 днів тому +1

    Apratim Video 💯👌👌❤😍 Mahiti tar khupach chan dilit 💯👌👌 Presha ani Reshvi doghina Salute 💯🙌🙌 Exploring khupach chan 💯👌👌❤❤ Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩

  • @amit4747
    @amit4747 27 днів тому +1

    एकदम छान

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 24 дні тому +1

    Apratim. Khoop. Sundar 💞

  • @ramjadhav2519
    @ramjadhav2519 20 днів тому +1

    खूप छान 👌👌👌👌

  • @balasahebjadhav8711
    @balasahebjadhav8711 16 днів тому +1

    chan banvalay video sarv javalun dakhavaly tyamule swata baghatoy sarv asech vatate pudhil asach chan video sathi khup shubhecya

    • @preshareshvivlogs
      @preshareshvivlogs  16 днів тому

      @@balasahebjadhav8711 धन्यवाद , आम्ही नेहमीच आमच्या videos मधून जास्तीत जास्त माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो..

  • @SarikaChibde
    @SarikaChibde 27 днів тому +1

    खूपच छान दादा 👌🏻
    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @balasahebjadhav8711
    @balasahebjadhav8711 16 днів тому +1

    mi colegemadhe asatana 75 te 80 paryant nehami jaicho bramhagirila ata punpratyay ghetala chan vatate 😊

  • @Meandmyfamily647-m6k
    @Meandmyfamily647-m6k 26 днів тому +1

    Paresh kadam aahet na he bhiwandi madye vista प्रिंट company madye admin होते

    • @preshareshvivlogs
      @preshareshvivlogs  22 дні тому

      हो

    • @Meandmyfamily647-m6k
      @Meandmyfamily647-m6k 22 дні тому

      @@preshareshvivlogs mi tya company मद्ये nsf security hoti tyamdye job kela hota fakt 2 month pan ase sir mala aataparyant kutech betle nahi