Mangad fort | An Important Fort in Raigad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. रायगड-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात हा किल्ला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावपासून पुण्याकडे जाताना १० किमी. अंतरावर, तसेच पुणे-माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाट उतरल्यानंतर निझामपूर गाव आहे. निझामपूरपासून एक रस्ता रायगड पायथ्याच्या पाचाड गावाकडे जातो. या रस्त्यावर सु. ३ किमी. अंतरावर बोरवाडी गाव आहे. बोरवाडीपासून सु. २ किमी. अंतरावर मानगड किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मशीदवाडी नावाचे एक छोटे गाव आहे. गावाला लागूनच मानगड किल्ल्याचा डोंगर आहे. किल्ल्याचा डोंगर फार उंच नसून समुद्र सपाटीपासूनची त्याची उंची सु. २३५ मी. आहे. किल्ल्याचा डोंगर हा बाजूच्या डोंगररांगेपासून सुटावलेला असून तो या मुख्य डोंगररांगेशी एका छोट्या खिंडीने जोडला गेला आहे.
    सविस्तर माहिती व्हिडीओ मध्ये उपलब्ध आहे

КОМЕНТАРІ •