आणीक दुसरें मज नाहीं आतां । पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । अप्रतिम चाल | डॉ निरज लांडे अभंग
Вставка
- Опубліковано 23 січ 2025
- नाम वैभव प्रतिष्ठान आयोजित अभंगवाणी संत मुक्ताईनगर कोथळी
अभंग रूप पाहता लोचनी yrics
राग - किरवाणी
सुप्रसिद्ध गायक डॉ नीरज लांडे
सुप्रसिद्ध तबला वादक वेदांत कुलकर्णी
सुप्रसिद्ध पखवाज वादक तुकाराम माळी
टाळ - ओम भोईर
-----------------------------------------------------------------------------------------------------
आणीक दुसरें मज नाहीं आतां ।
नेमिले या चित्ता पासुनिया ॥१॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ।
जागृती स्वप्नी पांडुरंग ॥ध्रु.॥
पडिले वळण इंद्रियां सकळा ।
भाव तो निराळा नाही दुजा ॥२॥
तुका म्हणे नेत्री केली ओळखण ।
तटस्थ हे ध्यान विटेवरी ॥३॥
अर्थ
माझ्या चित्तामध्ये पांडुरंगा वाचून दुसरे काहीही नाही या गोष्टीचा मी आता मनापासून निश्चय केला आहे.माझ्या ध्यानामध्ये ही पांडुरंग आहे आणि मनामध्येही पांडुरंग आहे जागृतीत पांडुरंग आहे स्वप्नामध्ये पांडुरंग आहे.माझ्या सर्व इंद्रियांना पांडुरंगाकडे जाण्याचे वळण लागले आहे एका पांडुरंगा वाचून दुसरीकडे माझे इंद्रिय धावत घेत नाही दुसरा कोणताही विषय माझे इंद्रिय जाणत नाही.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या डोळ्यांनी मला ज्याची ओळख करुन दिली आहे त्याचे ते सगुणरूप विटेवर उभे आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
#अभंग #pandurang #पांडुरंग
नीरज लांडे सर काय गायन लाजवाब❤👌 आवाज तुमचा वेदांत तबला खूपच छान👌👌👌 जय मक्ताई माता🙏🙏🙏🙏
Ram Krishna hari
खूप छान गायन वादन
अप्रतिम
जय हो 🔥
💐👌👌
Nice ❤
पवन सिडाम कुठे आहे