भक्त पुंडलिकाची गोष्ट | Story of Bhakta Pundalika

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • "भक्त पुंडलिक आणि पंढरपूर यात्रेमागील इतिहास पहा." तेंव्हा धुर्त अन लंपट पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी त्यांनाही बरोबर घ्यायचे ठरविले. सर्वजण काशीला निघाले. त्याकाळी प्रवासाच्या अन्य सुविधा गरिबांसाठी नव्हत्या. पायीच प्रवास करावा लागे. वृध्द मातापिता चालू तरी किती शकणार ? त्याची तरुण बायकोही चालून चालून थकली. तेंव्हा पुंडलिकाने काय करावे ? आपल्या तरुण बायकोला घेतले स्वतःच्या खांद्यावर आणि आईवडिलांच्या गळयात बांधल्या दो-या अन् लागला त्यांना ओढत न्यायला ! सकल तीर्थे ज्यांच्या पायासी येवून मिळतात त्या आईवडिलांच्या गळयात दोरीचे फास अडकवून पुंडलिक पुण्यक्षेत्र काशीला निघाला 'पुण्य' मिळविण्यासाठी. पुंडलिकाची वाट चुकली - पण पुढे मात्र बरोबरच्या लोकांनी अन् त्याची चुकामुक झाली. पुंडलिकाची वाट चुकली आणि तो काशीच्या दक्षिणेकडे असलेल्या कुक्कुरस्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला. पोहोचला कुठला ? नियतीनेचत्याला तेथे खेचून आणले ! कुक्कुर स्वामी कधीही कुठल्याही तीर्थक्षेत्री गेले नव्हते. हे ऐकून पुंडलिकाला खूप आश्चर्य वाटते. पुंडलिकाने बायकोला खांद्यावर घेतलेले अन् वृध्द मातापित्यांच्या गळयात दोर बांधलेले स्वामींनी पाहीले होते. ते पुंढलिकाला म्हणाले, '' मी माझ्या आई-वडिलांमध्येच शिव-पार्वती पाहतो. आईवडिलांची सेवा हाच माझा धर्म आणि हेच माझे तीर्थक्षेत्र ! '' पुंडलिकाच्या वर्मी द्याव बसल्या सारखे झाले. तो खजिल झाला. अंतर्मुख झाला. बायकोला खांद्यावरुन खाली उतरवलं. थंड पाणी प्यायला दिलं. रात्री पुंडलिकाने शुध्द अंतःकरणाने आपल्या आईवडीलांची क्षमा मागितली. मुळातच सात्विक स्वभाव असलेल्या त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं. तिघांच्याही डोळयातून अश्रू वाहू लागले ! 'अश्रू' कसले. त्या तर होत्या पवित्रमच गंगा-यमुना ! बदलला, पुंडलिक पूर्णतः बदलला. अंतबार्ह्य बदलला अखेर त्याच्यातील 'देवत्वा'ने राक्षसत्वावर मात केली ! स्त्रीलंपट पुंडलिक, भोगललोलूप पंडलिक निस्सीम निमित्त मातृपितृ भक्त बनला ! वाल्याचा जणू वाल्मिकी बनला !! भगवंत प्रसन्न झाला- पुढे पुंडलिकाने आपल्या वृध्द मातापित्यांना काशी तर घडवलीच पण पंढरपूरासही आणले.'अन्य क्षेत्रं कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति ' या उक्तीनुसार पुंडलिकाच्या पश्चातापामुळे त्याची पूर्वीची सर्व पापे काशी पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये नष्ट झाली. वाल्याचा जसा वाल्मिकी बनला होता तसा भोगी पुंडलिक आता योगी बनला होता ! एकदा काय झालं, रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून पंढरपूरच्या दिंडीरवनात येऊन बसली. रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी देव बाहेर पडले. पुंडलिकाची मातृपितृभक्तीही श्रीकृष्णाला पहायची होती. आजमायची होती. भगवंत पंढरीत आले. पंडुलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले. आत पहातात तो पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात गुंग झालेला होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता.'देव भावाचा भुकेला । सोडूनी आला वैकुंठाला ॥''आणि तरीही त्याच्या स्वागताला उठला नाही नव्हे तर जागचा हाललाही नाही. आईवडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा ? त्याने बसल्या जागेवरुनच सुहास्य वदनाने भगवंताला विनम्र अभिवादन केले. सेवेचं व्रतही मोडता येईना अन् भगवंताच्या स्वागताचा गृहस्थधर्म ही पाळता येईना. पुंडलिकापुढे मोठेच धर्मसंकट उभे राहिले. तेव्हा त्याने जवळचं पडलेली एक विट दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईतोपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं रहायला सांगितले. आणि आश्चर्य असे की तो सावळा विठूराया कर कटावर ठेवून चक्क त्या विटेवरउभा राहिला. ख-या भक्तांसाठी प्रभू सर्व काही करतात ते संत जनाबाईला दळण दळू लागतात ! कबिराचे शेले विणू लागतात ! दामाजीसाठी तर झाला महार पंढरीनाथ ! पुंडलिकाची असीम मातृपितृभक्ती पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला 'वर' माग म्हणाले. तर त्याने काय मागावे ? पैसा ,धनदौलत ? शेती वाडी ? भक्त पुंडलिकाने विचार केला. लौकिकाची प्राप्ती आपल्या पराक्रमाने करायची असते आपण अलौकिक असं काही तरी मागावं तो म्हणाला,' देवा ! मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको ! मला फक्त तू हवा आहेस ! आत्ता जसा उभा आहेस ना तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथचं सतत उभा रहा आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे !'' देव म्हणाले 'तथास्तु' ! आणि तेव्हापासून हे विटेवरलं परब्रह्म कमरेवर हात ठेवून 'अठ्ठावीस युगे' म्हणा की सातशे वर्षे म्हणा- भक्तांचं कोड पुरवित आहे. पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे ! त्याचे पाय 'समचरण' आहेत. सर्वांकडे तो समत्वदृष्टीने पहातो. त्याच्या पायी जो लागतो तोही समत्वदृष्टीप्राप्त करुन घेतो. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती!
    #marathi #vitthal #pandharpur #pandharichivari #bhakti

КОМЕНТАРІ • 167

  • @kalpanadombale5543
    @kalpanadombale5543 Рік тому +102

    आमच्या घरी वारकरी येतात दोन दीवस असतात खरच खुप छान वाटत त्यांची सेवा करायला आम्हाला वाटत खरच पांडुरंगला भेटलो आम्ही ❤❤

    • @vikaswagmare965
      @vikaswagmare965 Рік тому +8

    • @santoshkanse3358
      @santoshkanse3358 Рік тому +3

      गाव कोणत तुमच

    • @naryanvitnor5779
      @naryanvitnor5779 10 місяців тому

      गाव कोणत तुमचं

    • @kalpanadombale5543
      @kalpanadombale5543 10 місяців тому

      @@naryanvitnor5779 अकलूज आहे पण आम्ही पुन्यात असतो पण वारकरी येतात तेव्हा अकलूजला जातो गावाकडे

    • @kalpanadombale5543
      @kalpanadombale5543 10 місяців тому

      @@santoshkanse3358 अकलूज

  • @niteshkhope3086
    @niteshkhope3086 Рік тому +54

    लहानपणी आजीकडून खूप वेळा ही गोष्ट ऐकलीय,आज खूप दिवसांनी पुन्हा ऐकायला मिळाली.... रामकृष्ण हरी 🚩

  • @DaSnipy
    @DaSnipy 3 місяці тому +9

    पुंडलिकावरदा हरि विठ्ठ्ल श्री ज्ञानदेव.....तुकाराम ..... पंढरीनाथ महाराज कि...जय!

  • @DnyaneshawarSuryawanshi-w4s
    @DnyaneshawarSuryawanshi-w4s 2 місяці тому +8

    जय हरी विठू माउली...🌺🙏

  • @AAGT2345
    @AAGT2345 2 місяці тому +4

    आपल्या भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्यासारखे आहे!
    स्वरातील गोडवा मनाला भावतो!

  • @kiranbhoir8955
    @kiranbhoir8955 Рік тому +24

    सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏

  • @Saggyvlogs45
    @Saggyvlogs45 Рік тому +7

    पांडुरंग हरी विठ्ठल ❤️❤️🙇🏽‍♂️🙇🏽‍♂️

  • @explorer1827
    @explorer1827 Рік тому +21

    ही आज घराघरातील कथा आहे. लग्नानंतर मुलगा त्याचा बायकोच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यात मग्न होतो. बायकोच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हवे तितके प्रयत्न करतो. आई वडिलांशी भांडण सुद्धा करतो. त्यांचा त्याग करतो, पण पत्नीला कधीच एकटं सोडत नाही. वर्षानुवर्षे निघून जातात. पण तो सुखी होत नाही, कारण पत्नीच्या महत्वाकांक्षा कधीच संपत नाहीत. मग तो मुलगा खूप दुःखी असतो. कारण आयुष्याला समतोल ठेवताठेवता थकून गेला असतो, आणि शेवटी निराश आणि दुःखच हाती आलेलं असतं.
    आशा वेळी, त्या मुलाची बायको त्याला सुखी सुख मिळावे म्हणून काय प्रयत्न करते? किती प्रयत्न करते? आणि किती त्याग करते? हे प्रश्नच त्या मुलाला स्वतःला विचारता आले तर, खरं सुख कशात आहे हे समजेल!

  • @harshadaher1039
    @harshadaher1039 Рік тому +8

    राम कृष्ण हरी🚩

  • @sarikakulkarni3183
    @sarikakulkarni3183 Рік тому +3

    Jai Rukhumai Vitthal Mauli🙏💐👏🚩🕉️Jai Hari Vitthal Pandurang🙏💐👏🚩🕉️Jai Pandulika🙏💐👏🚩🕉️Khoop Chan Sangatli Katha Taai Tumhi🙏👏👏👏💐🚩🕉️

  • @SunilRathod4141
    @SunilRathod4141 Рік тому +8

    जय हरी विठू माऊली ❣️🙏

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 Рік тому +5

    जय जय राम कृष्ण हरि 🙏🌞🕉🔱

  • @nsk1066
    @nsk1066 Рік тому +6

    जय जय भक्त पुंडलिक 🙏🏻🚩जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🏻🚩

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne 8 місяців тому +4

    पुंडलिक पुंडलिक देव सेवा पाहुनी आला धाउन राम कृष्ण हरी

  • @Saggyvlogs45
    @Saggyvlogs45 Рік тому +5

    राम कृष्ण हरी ❤️❤️🙇🏽‍♂️🙇🏽‍♂️

  • @swapnilharsur3082
    @swapnilharsur3082 Рік тому +18

    Be grateful for everything ❤❤

  • @radhikaganjare
    @radhikaganjare Рік тому +7

    जय हरी विठ्ठल..!!🚩❤️🙏🏻🙏🏻🙏🏻⛳⛳❤️🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajpatil8696
    @rajpatil8696 Рік тому +16

    28 yug nasun… 28 vya yuga madhe … Shree Hari Vitthal 🙏🙏🙏🕉️

  • @kiranbhoi5608
    @kiranbhoi5608 Рік тому +26

    जय हरी विठू माऊली...🌺🙏

  • @shantanuayyar8972
    @shantanuayyar8972 Рік тому +15

    Nice story.. Jai Hari Vitthal 🕉️ 🙏

  • @sambhajikhole9712
    @sambhajikhole9712 2 місяці тому +1

    शंकाच घ्यायची नाही कोणी पांडुरंग वर वारी करायची शक्ती फक्त सर्वांनाच मिळो ही प्रार्थना.
    राम कृष्ण हरी.

  • @Parmeshwar797-g79
    @Parmeshwar797-g79 2 місяці тому +1

    जय जय पांडुरंग हरी🙏🏻🙏🏻🌼🙏🏻🙏🏻
    खूप छान पद्धतीने गोष्ट सादर केली आहे मॅडम तुम्ही 🙏🌹आभारी आहे🌹🙏🏻
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी पांडुरंगा !
    ॐ नमो नारायणा🌼🌼🙏🙏🌼🌼

  • @divyabeldar9382
    @divyabeldar9382 Рік тому +7

    🚩Jay Jay Ram Krushan Hari🙏

  • @Waytosucceed.Motivation
    @Waytosucceed.Motivation Рік тому +7

    Very nice story....it was a very different and good topic👍

  • @babasoaiwale1323
    @babasoaiwale1323 Рік тому +4

    Khup khup sundr❤❤

  • @myselfyuvi
    @myselfyuvi Рік тому +2

    Khoop Sundar varnan kelat! 🙏🙏

  • @udaypatil3630
    @udaypatil3630 Рік тому +4

    Pundalik Varade....Hari Vitthal...🙏🙏🙏

  • @shashankmestry6550
    @shashankmestry6550 Рік тому +2

    विठू माऊली 🙏

  • @Aryanarms
    @Aryanarms Рік тому +5

    जय जय राम कृष्ण हरी ❤

  • @chayahitnli3567
    @chayahitnli3567 Рік тому +3

    राम कृष्ण हरी

  • @prasadshetty4306
    @prasadshetty4306 Рік тому +4

    Jai Jai PandhariNatha Jai Jai Ram Krishna Hari

  • @utkarsh_majre
    @utkarsh_majre Рік тому +3

    khup chaan ❤

  • @mahesht0097
    @mahesht0097 Рік тому +4

    जय हरी विठ्ठल...❤

  • @ramubedarkar2439
    @ramubedarkar2439 Рік тому +3

    माऊली

  • @vinayakyaligar1443
    @vinayakyaligar1443 Рік тому +4

    ಜಯ ಜಯ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ 🙏🙏🙏

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 Рік тому +4

    Jay hari vitthal 🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 Рік тому +3

    जय हो

  • @balasokhapale8473
    @balasokhapale8473 2 місяці тому

    खूप छान राम कृष्ण हरी

  • @Avinashbajad01
    @Avinashbajad01 Рік тому +2

    Vittthuuuuuuuu mauliiiiiii 🕉️🔆🔆🕉️🔆🕉️🔆🕉️🕉️🔆🕉️🔆🕉️🔆🕉️🔆🕉️🔆🕉️🔆🕉️🔆🕉️🔆🕉️🔆🕉️🔆❤️🔥🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥📿🌻📿🌻🌻📿🌻📿🌻📿🌻📿🌻📿🌻📿🌻📿🌻📿🌻📿🌻📿🌻🔥🌻🕉️🔆🕉️🔆🕉️🔆🔆🕉️🔆🕉️🔆🕉️🔆🕉️🔆🕉️🔆

  • @harshadmhatre1604
    @harshadmhatre1604 Рік тому +6

    Khupach Sunder. I wish your channel a great success 🙏

  • @rupalishelar1220
    @rupalishelar1220 Рік тому +2

    राम .कृष्ण हरी🙏🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @saritapachupate2002
    @saritapachupate2002 2 місяці тому

    भावपुर्ण श्रध्दांजली माऊली....

  • @aadeshwaydande2878
    @aadeshwaydande2878 Рік тому +3

    🌸जय हरी विठू माऊली राम कृष्ण हरी 🌸🙏🙏👑😌🌻🌼🏵️🌺🌸🙏❤️

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 2 місяці тому

    🙏🏻सर्वांना विठ्ठल विठ्ठल...🌺🚩

  • @SupriyaShinde-j9e
    @SupriyaShinde-j9e Рік тому +2

    गोंदवले कर महाराज यांचे आभंग

  • @Entertainment..0760
    @Entertainment..0760 2 місяці тому

    भक्त पुंडिकाच्या भक्तीला मंत्रमुध झालो या गोष्टीने
    विठल विठला....🚩

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Рік тому +7

    जय सदगुरू 🙏👌💐🚩

  • @Aakash8739
    @Aakash8739 2 місяці тому +1

    खुप छान 👌👌👍👍

  • @akshayghogale5940
    @akshayghogale5940 Рік тому +2

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @rajeshthakur0808
    @rajeshthakur0808 2 місяці тому

    🚩🕉️🌹🌸🙏🏻#धन्य_ती_भक्त_पुंडलीकाची_भक्ती🙏🏻🌸🌹
    🚩🕉️🌹🌸🙏🏻#धन्य_ते_मायबाप_विठ्ठल_रखुमाई🙏🏻🌸🌹
    🚩🕉️🌹🌸🏵️🙏🏻★#राम_कृष्ण_हरी★🙏🏻🏵️🌸🌹

  • @rajahire2392
    @rajahire2392 Рік тому +3

    जय विठ्ठलं रखुमाई...

  • @sudhabarge7207
    @sudhabarge7207 2 місяці тому +1

    Jay Hari Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @RajkumarKarde
    @RajkumarKarde Рік тому +6

    Khup.sundar.prwchan

  • @vaishalichaudhari1406
    @vaishalichaudhari1406 Рік тому +7

    Pundlikala ashirwad milala hota
    Jeva jeva bhagwantache naw ghetle jail teva pundlikache naw hi ghetle jial
    Mhaun aapn bolto
    Pundalik varda hari vitthal.....

  • @निशामोरे
    @निशामोरे 2 місяці тому

    🙏🏻धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली 🙏🏻विठ्ठल विठ्ठल जय हरी 🌹

  • @rashmitiwari1389
    @rashmitiwari1389 2 місяці тому

    पण गोष्ट खूप छान सांगितल्या 🙏🏻
    विष्णू नव्हते आले ते पांडुरंग विठ्ठल आले होते

  • @shitalambhore8092
    @shitalambhore8092 2 місяці тому

    Khup Chan prastuti,Good♥

  • @abhijeetsakhare7093
    @abhijeetsakhare7093 2 місяці тому

    Shree swami samarth aai apan love you to❤❤

  • @ajaypatil5505
    @ajaypatil5505 Рік тому +2

    जय हरी विठ्ठल

  • @sipabacusbtm6555
    @sipabacusbtm6555 Рік тому +3

    Vittal Vittal Jai Hari Vittal 🙏🙏🙏🙏🙏

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Рік тому +1

    पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल

  • @rekhahodgir9421
    @rekhahodgir9421 Рік тому +3

    पांडुरंग हरि वासुदेव हरि

  • @pintumahalle6678
    @pintumahalle6678 Рік тому +1

    माउली तुकाराम

  • @shraddhamore7117
    @shraddhamore7117 2 місяці тому

    खुप छान

  • @shitalambhore8092
    @shitalambhore8092 2 місяці тому

    Jay Hari Vitthal🙏

  • @shridevikambl
    @shridevikambl Рік тому +1

    Khup chan❤

  • @kesharnaitam4375
    @kesharnaitam4375 Рік тому +2

    Jay Hari vithalllll 🙏🌸🙏🙏🙏

  • @niteshmalore8117
    @niteshmalore8117 Рік тому +1

    ।। जय विठुमाऊली ।।

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 Рік тому +1

    जय हरी विट्ठल रखुमाई 🙏🌹

  • @kamlamandle2414
    @kamlamandle2414 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jay vithuraya Jay mauli❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Neelpawar1
    @Neelpawar1 2 місяці тому

    🚩🌹🙏❤️II गण गण गणात बोते ! II❤️🙏🌹🚩

  • @priyabhagt6249
    @priyabhagt6249 Рік тому +1

    जय जय विठू माउली

  • @vishalj6416
    @vishalj6416 Рік тому +1

    श्री हरी 🙏

  • @jayashreechavan710
    @jayashreechavan710 Рік тому +4

    Jayasree Chavan Pune Om Siree Vital Ki Jay ❤❤❤❤❤❤

  • @OmyaMore-q5j
    @OmyaMore-q5j 6 місяців тому

    खूप छान कथा आहे 🙏🙏

  • @PriyaB-j2w
    @PriyaB-j2w 2 місяці тому +2

    Pundalika vardhe hari vitthal

  • @MayurLokhande-vl1ec
    @MayurLokhande-vl1ec 2 місяці тому

    रामकृष्ण हरी 😌🙏🏻🚩

  • @pradnyaharale.4106
    @pradnyaharale.4106 2 місяці тому

    खूपच छान

  • @rajeshgovindcar2149
    @rajeshgovindcar2149 Рік тому +1

    Aao maushi Telangana pan yeto yejat maulicha shetra aye❤❤

  • @karunamahadik1562
    @karunamahadik1562 2 місяці тому

    Jai Hari Vittal Koti Koti Naman 🌹🙏🙏🙏

  • @anonymousAntony...
    @anonymousAntony... Рік тому +1

    आज कळलं.....
    भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेेवरी🙏
    .
    .
    .
    🌺राम कृष्ण हरी🌺
    ............🙏.............

  • @vinodkulkarni6068
    @vinodkulkarni6068 Рік тому +2

    Jai Hari Vitthal 🙏

  • @nirmalagawas7956
    @nirmalagawas7956 2 місяці тому

    Ram Krishna Hari

  • @pinksky1691
    @pinksky1691 Рік тому +2

    Aaj आषाढी एकादशी आहे ❤

    • @SutradharMarathi
      @SutradharMarathi  Рік тому

      आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।

  • @VithalKakade-p1u
    @VithalKakade-p1u 2 місяці тому +1

    Pundalik.Varada.hari.vithala.mayabapa❤❤❤❤

  • @knowledgesafar
    @knowledgesafar 2 місяці тому +1

    Chan aavaj

  • @darshanazagade9456
    @darshanazagade9456 Рік тому +1

    Jay hari vithhal

  • @kolinakhva1653
    @kolinakhva1653 6 місяців тому +2

    ||पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ्ञानदेव तुकाराम ||पुंडलिका भगवान कि जय ||जय हरी पांडुरंग ||❤️

  • @shobhakurundwadkar3378
    @shobhakurundwadkar3378 Місяць тому

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🥀🥀🌹🌹🌺🌺💐💐🌈🌈🌈🌈🌈

  • @venkateshkankapurkar3852
    @venkateshkankapurkar3852 2 місяці тому

    Hariom vitthala🌺🙏🌸🌺🙏🌸🙏🌺

  • @vandanapednekar5143
    @vandanapednekar5143 2 місяці тому

    Jai hari vithal

  • @maheshshirtode9222
    @maheshshirtode9222 Рік тому +1

    Jay हरी

  • @RahulPawar-zz6zn
    @RahulPawar-zz6zn 2 місяці тому +1

    Jai Hari vitthal

  • @rajeshreepatil4844
    @rajeshreepatil4844 2 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌹🌹🙏🙏

  • @piyushkawatkar2348
    @piyushkawatkar2348 Рік тому +3

    ❤😍👌

  • @Samrudhicreation
    @Samrudhicreation 2 місяці тому

    Thanku for more information from this story❤

  • @shaileshvedpathak7433
    @shaileshvedpathak7433 Рік тому +1

    Jay Hari

  • @rkgawai815
    @rkgawai815 2 місяці тому

    Mauli ❤

  • @sujatabiradar3884
    @sujatabiradar3884 Рік тому +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @nileshnigam9086
    @nileshnigam9086 2 місяці тому

    जय हरी विठ्ठल‌..