Adiyogi, Esha foundation trip

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024
  • काही वर्षांपूर्वी दीपाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला आपण तिला कुठे घेऊन जायचं हा विचार करत होतो, तिला अध्यात्माची आवड असल्यामुळे आपण कुठल्यातरी अशा ठिकाणी जाऊया जिथे तिला तो अध्यात्मिक आनंद मिळेल आणि मी शोधाशोध करायला लागलो भारतामध्ये अशा अनेक जागा आहेत जिथे आपण आध्यात्मिक सुख घेऊ शकतो म्हणजे योगा सेंटर, जिथे तुम्ही आठवडे दहा दिवसाचे काही कोर्सेस करू शकतात हरिद्वार काशी हिमाचल, दक्षिण भारतामध्ये तर इतक्या अप्रतिम जागा आहेत की त्या जागा आपल्याला भारावून टाकतील, आदियोगीच ध्यान मंदिर ध्यानलिंग हे टीव्हीवर पाहिलं होतं आणि तिथे जायची फार इच्छा होती, मी इंटरनेटवरनं माहिती काढली आणि चौकशी केल्यानंतर आपण सहज तिकडे एक चार-पाच दिवस जाऊन राहू शकतो अशी त्यांनी सोय केली आहे आणि कॉटेजेस किंवा ज्या रूम्स आहेत त्या काही फार महाग पण नाही आहेत,
    व्यवस्थित प्लॅनिंग करून कोयंबतूर ला पोहोचलो
    जाताना फ्लाईट तिकीट बुक केलं येताना ट्रेनचं तिकीट बुक केलं. कोयंबतूर एअरपोर्ट वर्णन टॅक्सी केली आणि थेट वेलिंगरी हिल ईशा फाउंडेशन मध्ये पोहोचलो, ऑफिसमध्ये चौकशी केली बुकिंग होतं ते आम्हाला आमच्या कॉटेजेस कडे घेऊन गेले
    बाजूचं वातावरण बघूनच आम्ही भारावून गेलो
    खूपच सुंदर परिसर डोंगराच्या पायथ्याशी ईशा फाउंडेशन चा हा आश्रम सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी तयार केला होता
    तिथे काम करणारे सगळेच सेवक सगळेच क्वालिटीयर्स होते
    छान धोतर आणि कुर्ता सगळ्यांनीच घातला होता ते धोतर अतिशय वेगळ्या पद्धतीचं होतं आणि मला ते फार आकर्षक वाटलं, मला त्या पद्धतीचं धोतर आपल्या स्वतःसाठी घ्यावसं वाटलं त्यांच्या एका स्टोअरमधनं दोन तशी धोत्र मी विकत घेतली आणि आजही मी ते धोतर नेसून योगा प्राणायाम करतो, या वर्षांमध्ये अशा प्रकारची धोत्र मला कुठेही भारतात आढळली नाही फारच comfortable आणि stylish ,
    लिंग भैरवी मंदिर आणि त्या मंदिराचा परिसर फारच सुंदर आहे
    पूजा अर्चा सगळ्या त्या मंदिरात होत असतात
    त्या मंदिरात प्रवेश करत असताना दोन्ही बाजूला विशिष्ट फुलांची झाड आहे आणि आत मध्ये पाऊल टाकतात एक मंत्र मुग्ध करून टाकणारा सुगंध दरवळत असतो, सगळं आपल्याला हवं असतं तसंच मनामध्ये विचार आला की आपण ज्यावेळेला आपला बंगला बांधू त्यावेळेला आपण असंच दोन्ही बाजूला अशा फुलांची झाड लावू म्हणजे आपल्या घरामध्ये जो कोणी येईल त्याला हा सुगंध फार आनंद देईल,
    सद्गुरु नी अतिशय भव्य दिव्य सुंदर ध्यान मंदिर बांधलेला आहे
    आणि त्या ध्यान मंदिरात प्रवेश करण्याआधी तुम्हाला एका कुंडामध्ये अंघोळ करावी लागते
    ओले त्यानेच तुम्ही त्या ध्यान मंदिरात प्रवेश करतात
    एकदा का तुम्ही त्या ध्यान मंदिरात प्रवेश केला तर तुम्हाला आपोआप ध्यान लागतं, efforts घ्यायची काही गरजच भासत नाही दहा-पंधरा मिनिटं स्वस्त ध्यानाला मी कधीही बसू शकत नाही पण ध्यान मंदिरात मी दीड तास शांतपणे ध्यान लावून बसलो होतो, वेळ कसा गेला काही कळलंच नाही, तिथे राहणाऱ्यांना दोन वेळेचं सात्विक जीवन देण्यात येतो
    सकाळी साडेदहा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता भोजनाची तिथे सुंदर सोय केलेली आहे
    सतरंजीवर एका मोठ्या भव्य दिव्य हॉलमध्ये सगळे लाईनीत बसून जेवत असतात
    तिकडे येणारे भक्त सेवक तुम्हाला छान पद्धतीने ते सातवी जेवण वाढत असतात. जेवण सुरू करायच्या आधी तुम्हाला एक काढा दिला जातो पचनक्रिया वाढवण्यासाठी
    सद्गुरूंना माहिती आहे की जे अध्यात्मामध्ये लीन आहे त्यांना हे दोन वेळेचे जेवण पुरेसे आहे
    आपल्याकडे सामान्य माणसाला सकाळी उठल्यावर चहा बिस्किट मनासता मग काहीतरी करायला आणि मग जेवण मग थोड्यावेळाने आणखीन एखादा आंबा मग दुसरं संध्याकाळी चहा मग खारी मग परत संध्याकाळी काहीतरी भेळ भत्ता आणि मग त्याच्यानंतर रात्री जेवण मग त्याच्यानंतर एखादं आईस्क्रीम वगैरे वगैरे हे सगळं चालूच असतं
    त्या लोकांसाठी सद्गुरु यांनी एक कॅन्टीन पण ठेवला आहे
    जिथे बऱ्यापैकी या गोष्टी मिळतात ज्यावेळी लोकांना खायचे असतात
    बरीच गर्दी तिथेही असायची
    पण काहींना सकाळी साडेसहालाच जेवायला लागतं किंवा रात्री दहा नंतर काहीतरी खायला लागतं त्यांच्यासाठी सुद्धा आश्रमाच्या बाहेर एक हॉटेल आहे जिथे या सगळ्या गोष्टी मिळतात
    पण सगळंच शाकाहारी
    मी शाकाहारी असल्यामुळे मला त्याचा काही कधी त्रास झाला नाही पण बाकीच्यांना त्या गोष्टीचा पण त्रास होऊ शकतो.
    आश्रमातून एखाद दोन किलोमीटरवर आधी योगी यांचं भव्य दिव्य वास्तू आहे
    तिथे जाण्यासाठी बैलगाडीची आश्रमणे सोय केलेली आहे
    दोन बैलांना बांधलेली दहावी लोक एकत्र जातील अशी बैलगाडी लोकांना घेऊन जात असते घेऊन येत असते
    मी आणि दीपा मात्र बाकीच्या लोकांप्रमाणे चालत चालतच तिथे पोहोचलो
    अधियोगीच मूर्ती इतकी भव्य आहे की
    भव्यता बघून डोळ्याचे पाळणे पितात
    जसे जसे तुम्ही वेलिंगरी हिल्स च्या जवळ येता
    लांबूनच आधी योगी तुमचं स्वागत करत असतात
    अगदी जवळून ज्यावेळेला आपण आधी योगी ची मूर्ती पाहतो
    भव्यता अति सुंदरता पाहतो
    एक मनामध्ये वेगळाच आनंद प्रसन्नता येते
    तू अनुभव कधी शब्दांमध्ये म्हणता येणारच नाही
    कदाचित मी हे एवढं का लिहितो तर एखादा कुणीतरी हे वाचेल आणि त्याला जर कुठे आयुष्यामध्ये अद्भुत अप्रतिम गोष्टींचा अनुभव घ्यावासा वाटल ,
    आणि एखादा व्यक्ती जरी आधी योगिन पर्यंत पोहोचला तरी माझ्या या लिखाणाचं सार्थक झालं असं मी म्हणेन
    आपल्या देशामध्ये पाश्चात्य देशांचा इतका पगडा आहे इतका influence आहे की आपल्याला असं वाटतं की सगळं भव्य दिव्य सगळं सुंदर हे पाश्चात्य देशात आहे
    पण आपला देश काय कमी नाहीये आपला देश उलट त्यांच्यापेक्षा खूपच समृद्ध आणि सुंदर आहे भव्य आहे
    आणि सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यासारखी माणसं दहा हजार वर्षात ना एकदा जन्माला येतात
    आणि एकदा का तशी माणसे जन्माला आली की पुढची दहा हजार वर्ष ते या मनुष्य जातीला किंवा या पृथ्वीला काही ना काहीतरी चांगलं देऊन जातात
    मी तसा जन्मता काही शाकाहारी नव्हतो सगळ्याच प्रकारचं अन्न पदार्थ खायची सवय होती
    पण सद्गुरूंच्या गोष्टी ऐकून योग्य काय अयोग्य काय ते कळायला लागलं .

КОМЕНТАРІ • 1

  • @dawanesaurabh
    @dawanesaurabh 5 місяців тому

    Khupach sunder lihil ahe baba tumhi... खुपचं indetail आणि छान लिहिल आहे❤❤