कोकणात गोकुळाष्टमीसाठी घराघरात केले जाणारे मालवणी पद्धतीचे नैवेद्याचे जेवण ।Janmaashtami Special

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • कोकणात गोकुळाष्टमीसाठी घराघरात केले जाणारे मालवणी पद्धतीचे नैवेद्याचे जेवण ।Janmaashtami Special
    काही महत्वाच्या टीप्स 👇
    १. काळे वाटाणे भिजत घालताना त्यात थोडा खायचा सोडा व मीठ घाला म्हणजे वाटाणे चांगले शिजतील.
    २. शेगलाच्या भाजीची पाने सहज निघण्यासाठी १ तास पेपरमधे गुंडाळून ठेवा पाने सहज वेगळी होतात.
    ३. पानाचे देठ वेगळे करण्यासाठी पाणी भरलेल्या पातेल्यात भाजी १० मिनिटे तरी भिजत ठेवा सगळे देठ तळाशी जाऊन बसतात.
    ४. अंबोळीचे पीठ चांगले येण्यासाठी थोडे फोहे घाला पीठ लवकर येते.
    ५. अंबोळीला तेला ऐवजी तूप लावा आंबोळी चवीला छान लागते.
    ६. उसळ खमंग लागण्यासाठी वरून उसळीला २ चमचे गरम तेलात १/२ चमचा काश्मिरी मसाला घालून वरून उसळीला फोडणी दया. उसळ खूप छान लागते.
    शेगलाची भाजी साहित्य 👇
    शेगलाची कोवळी भाजी - १ जुडी
    कांदा - १
    हिरवी तिखट मिरच्या - ३
    तेल - ३ चमचे
    मीठ - चवीनुसार
    किसलेले ओले खोबरे - १/४ कप
    काळा वाटणा उसळ -
    काळे वाटाणे - १/२ कप
    रात्री मीठ आणि खायचं सोडा घालून भिजत घाला. दुसऱ्या दिवशी कुकर मधे मीठ, १ टोमॅटो चिरुन घाला व कुकरला ४-५ शिट्या काढा
    मालवणी वाटण 👇
    कांदा उभा चिरलेला - १
    आले - १/२ इंच
    लसूण पाकळ्या - ४-५
    सुखे खोबरे कातळ्या - १/४ कप
    ओले खोबरे - १/२ कप
    कोथिंबीर
    चक्रीफूल - १
    काळीमिरी - १/२ चमचा
    जायपत्री - १/४
    जायफळ - १/४
    खसखस - १ चमचा
    बडीशेफ - १/२ चमचा
    धणे - १ चमचा
    उसळ फोडणी साहित्य -
    तेल - ३ चमचे
    तमालपत्र - २
    बारीक चिरलेला कांदा - १/२
    हळद - १/४ चमचा
    मालवणी मसाला - १ १/२ चमचा
    काश्मिरी मिरची पावडर - १/२ चमचा
    मालवणी वाटाण - २ मोठे चमचे जाड पातळ त्या नुसार घाला.
    उसळ अजून स्पेशल बनवण्यासाठी २ चमचे गरम तेलात १/२ चमचा काश्मिरी मसाला घालून वरून उसळीला फोडणी दया. उसळ खूप छान लागते.
    आंबोली 👇
    तांदूळ - १ १/२ कप
    अख्खे उडीद - १/२ कप
    फोहे - १/४ कप
    मेथ्या - १/२ चमचा
    ८ तास वरील सर्व साहित्य स्वछ धुऊन भिजत घाला. ८ तासानंतर वाटून ८- १० तास आंबवायला ठेवा. पीठ छान येते.
    #janmashatami
    #geetaskitchen
    #shevgyachyabhaji
    #kalewatanyachiusal
    #amboli
    #janmaashtamispecialthali
    #kokanspecialrecipe
    #malvanithali
    #food
    #healthyeating
    #healthy
    #healthylifestyle
    #lunchrecipe
    #dinner
    #viralvideo
    मालवणी कांदा खोबऱ्याचे वाटाण -
    • Malvani Vatan l मालवणी...

КОМЕНТАРІ •