कोकणी घर आणि वाडी साडेआठ गुंठे एनए जागेसहित पाली रत्नागिरी हायवेटच अविश्वसनीय किंमतीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2022
  • नमस्कार मित्रांनो
    Tales of kokan च्या एका नवीन विडिओ मधे आपण सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे
    मित्रांनो आजच्या विडिओमधे आपणास कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथील टू बीएचके दुपाकी कोकणी घर बघणार आहोत
    सदर बंगला हा रत्नागिरी तालुक्यातील पाली कोल्हापूर हायवेवर खानू या ग्रामपंचायत हद्दीत आहे. पाली बाजारपेठेपासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर खानू बसस्टॉपच्या समोरच बंगल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. साडेआठ गुंठे एनए जागेवर बंगला आणि सभोवताली आंबा फणस काजू सागवान नारळ तसेच फुलझाडेही लावण्यात आलेली आपल्याला पहायला मिळतील. बंगल्याचे बांधकाम हे दुपाकी कोकणी पद्धतीचे असून प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला आहे. समोरच्या बाजूला जे नवीन बांधकाम दिसत आहे ते घरमालकांनी दोन वर्षापूर्वीच करून घेतलेले आहे. घरासमोर तुळशी वृंदावन आणि कमळ लावण्यासाठी एक पाॅड केलेला आहे. त्यामागे असलेली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. आतमध्ये प्रवेश करताना बाहेरच्या पडवीत आपल्याला एक मोठा कोकणी पद्धतीचा झोपाळा बघायला मिळेल त्याबाजूला असलेल्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर समोरच दिसतो तो प्रशस्त हाॅल आणि आधुनिक पद्धतीचे ओपन किचन .किचनच्या शेजारी असलेल्या दरवाजातून आपण बाहेरच्या बाजूला जाऊ शकता इतकी मोकळी जागा घरमालकांनी घराचे बांधकाम करताना ठेवली आहे. हाॅलला लागूनच असलेल्या मागील बाजूच्या खालच्या बाजूला असलेला प्रशस्त बेडरूम आपणास पहायला मिळतो त्याला लागनूच आधुनिक पद्धतीचे बाथरूम ज्यात संपूर्ण टाईल्स आणि उत्तम क्वालिटीच्या बाथरुम फिटिंग तसेच गिजर आपणास बघायला मिळेल त्याला लागनूच असलेल्या टाॅयलेट मधे वेस्टर्न पद्धतीच्या कमोडचा वापर केला आहे .पाण्यासाठी पोटमाळ्यावर मोठी सिंटेक्सची टाकी देखील लावण्यात आली आहे.
    हाॅलमधे असलेल्या लोखंडी जिन्यावरुन आपण या बंगल्याच्या दुस-या बेडरूममधे जाऊ शकतो या ठिकाणी प्रशस्त आणि असा बेडरूम त्याला तीनही बाजूला असलेल्या मोठ्या खिडक्यामुळे भरपूर प्रकाश आणि निसर्गाने परिपूर्ण असलेल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद आपण घेऊ शकता मित्रांनोइतकंच नाही तर या बेडरूममधेच घरमालकांनी अगदी हौशेने विंटेज पद्धतीचा गोल जिना बनवून घेतला आहे त्यावर चढून आपण बंगल्याचा टेरेसवर प्रवेश करताच चारही बाजूला असलेले हिरवीगार वनराई पाहून हरखून जातो. याठिकाणी आपल्या कुटुंबासोबत बसून गरमागरम चहाचे घोट घेत आपण आपला वेळ निवांत घालवू शकता. सकाळच्या वेळेस कोवळ्याउन्हात बसून योगा करू शकता किंवा सभोवतालच्या झाडावर बसणा-या विविध प्रकारच्या पक्षांचे आवाज ऐकत वेळ घालवू शकता. तसेच जर वर्क फ्राॅम होम करणारे लोक या शांत ठिकाणी बसून आपलं ऑफिसचे कामही करू शकतात.
    या बंगल्यात मालकांनी जिन्याच्या खालच्या बाजूला इन्वर्टरची सोय केलेली आहे त्यामुळे काही काळ वीज गेली तरी आपली उपकरणे चालू राहतात. तसेच घराच्या मागील बाजूला नैरुत्य दिशेला एक ओपन पडवी सोडलेली आहे त्याठिकाणी जर आपल्याला एखादी छोटीशी चूल बांधून चुलीवरचे चिकन बनवायचा आनंद घेऊ शकता. घरात जर अचानक जास्त पाहूणे आले तर त्यांच्या सोयीसाठी मागील बाजूला एक अतिरिक्त टाॅयलेटची सोय करण्यात आली आहे. सदर बंगल्यात पाण्यासाठी ग्रामपंचायत नळपाणी योजनेतून कनेक्शन घेतलेलं आहे त्यामुळे घरामागे असलेल्या दोन हजार लिटरचा दोन टाक्यामधे पाणी साठवून त्याचा उपयोग घरात तसेच बाहेरचा भागातील कलमांना व बागेला पाणीपुरवठा करण्यासाठी केला जातो. घराच्या मागील ईशान्य दिशेला वाडिवस्ती आणि चारही बाजूनी भातशेती असल्याने याठिकाणी माणसांचा राबता असतो. बंगल्याचे समोरच्याभागात प्रवेश केला की उजव्या हाताला मालकांनी भविष्यातील गरज ओळखून व्यवसायिक वापरासाठी चि-याचा पाया बांधून ठेवला आहे जेणेकरून मुख्य रस्त्यावर लागून असल्याने आपण याजागेत एखादे छोटेसे दुकान बांधून त्याचा वापर करू शकतो किंवा भाड्याने देऊन उत्पन्न घेता येईल.
    घरमालकांनी घरासभोवतालचा परीसर आणि बाग अतिशय हौसेने तयार केलेली आहे हे आपल्याला विडिओ पाहून समजले असेलच पाथवे आणि सभोवतालच्या बागेचे काम हे दोन वर्षापूर्वीच करून घेतलेले आहे. फळझाडे व फूलझाडांचे वर्णन खालील प्रमाणे -- * २५ वर्षों जूनी असलेली हापूस आंब्याची ३ कलमे, सागाची २ झाडे, जांभूळाची २ झाडे, रायवळ आंब्याचे १ झाड, काजूची ३ कलमे, कापा फणसाचे १ कलम असे, * २ वर्षों जूनी सिंगापूर नारळांची १७ कलमे, सुपारीची १२ कलमे,केसर आंब्याची २ कलमे, लिंबू ची २ कलमे, पपई ची २ कलमे, कोकम, पेरू, चिकू,दालचिनी, मोसंबी, संञा, निम, बदाम, कापूर, चंदन, वेलची, अग्नी चंदन, मिरी अशी प्रत्येकी १-१ कलमे *फूलझाडां मध्ये - गुलाबी,लाल,पांढरा,पिवळा,केसरी असे गुलाबांची अनेक रोपे, वेगवेगळ्या जास्वंदी,मोगरा,जूई,चमेली,प्राजक्ता, अनंता, झेंडू,चिनी गुलाब,अशी अनेक रोपे, * शो ची वेगवेगळी झाडे - उदा. तगर,ख्रिसमस ट्री, मयूरपंख,सायप्रस,अळू,वगैरे.
    बागेतली सगळ्या झाडांना व फुलझाडाना ठिबक सिंचन सुविधा उपलब्ध केली आहे जेणेकरून घरबसल्या एक बटन दाबून आपण सगळ्या झाडांना पाणीपुरवठा करू शकतो.
    विडिओत सांगितलेल्या प्रमाणे खालील वस्तू
    फर्निचर मध्ये :- डबल बेड-१ सिंगल बेड-१ दिवान-१ वार्डरोब, शोकेस ट्रॉली, गीझर, सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, फ्रीज, मायक्रोवेव, गॅस शेगडी, सिलेंडर, डायनिंग टेबल सेट, सोफासेट, टीपॉय, गोदरेज कपाट, सागवान टेबल, झूला, इ.मग विचार कसला करताय कोकणातील आपल्या स्वप्नातील घराच्या शोधात असाल तर लवकरातलवकर या बंगल्याला भेट देऊन आपलं स्वप्नातले टुमदार कोकणी घर विकत घ्या.
    संपर्कासाठी स्क्रीन वर दिसणारे घरमालकांचा नंबर वर थेट संपर्क करू शकता खरेदी करू शकता.
    अपेक्षित किंमत 52 लाख तडजोड शक्य
    घरमालक हरीश कदम 9819583502
    सदर विडिओ आपणास आवडल्यास यासारखी कोकणातील घरे पाहण्यासाठी किंवा विकत घ्यायची इच्छा असेल तर माझ्या tales of kokan या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींनी नातेवाईकां पर्यंत शेअर करा
    धन्यवाद 🙏🌻🌿🌴🌴🌳🌳😊

КОМЕНТАРІ • 121

  • @ranjitsampat3760
    @ranjitsampat3760 Рік тому +3

    हे चिकन वगैरे काय बोलताय भाउ खरिद दार आमच्या सारख्या वारकरी शाकाहारी वैष्णव पण असुनसकते 🙏जय जय श्री स्वामी समर्थ 🚩

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 Рік тому +1

    खुप छान आहे

  • @sandeepkarekar6754
    @sandeepkarekar6754 Місяць тому +1

    khup sunder proparty

  • @shilpawairkar1593
    @shilpawairkar1593 Рік тому +1

    खूप खूप छान वाटले, धन्यवाद सर,

  • @psdproduction2570
    @psdproduction2570 Рік тому +1

    Khup chan property video..👌🏻👌🏻👍🏻

  • @pratapjagtap6467
    @pratapjagtap6467 Рік тому +2

    I like

  • @nivan231
    @nivan231 Рік тому +1

    lovely house.. 👌

  • @Nup_786
    @Nup_786 Рік тому +1

    Vihir maru ..😊.. naka ho .... banwa na Navin ....

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 Рік тому +1

    Ghar atishay chaan ahe
    Ani Motha bungalow ahe

  • @milinddalal
    @milinddalal Рік тому +2

    Near by beaches

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      Ratnagiri beaches bhatye beach, devghali beach, aareware beach etc

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому

      भाटे बिच, आरेवारे बिच - रत्नागिरी

  • @vickyindia3474
    @vickyindia3474 Рік тому +1

    27 LACKS CHI KIMMAT HAYE.....WELCOME...RATANAGIRI...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amarchougule4341
    @amarchougule4341 Рік тому +7

    This property was shown by kokan vastu 2 years back @ 28 Lacs

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому +1

      परंतु आता यात बराच बदल झाला आहे. त्यानूसार त्याची किंमत ठरवली आहे.

    • @sanjaygopal9293
      @sanjaygopal9293 Рік тому

      Yes. 28 negotiable

  • @myjourney299
    @myjourney299 Рік тому +2

    हो वास्तू मी अगोदर पण बघितली आहे. थोडे फार बदल आहेत. आणि किंमत जास्त आहे

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      अधिक माहिती साठी कृपया video मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करा 🙏

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому

      धन्यवाद।

    • @ujjwaljagtap388
      @ujjwaljagtap388 Рік тому +1

      I Like

  • @ashokkanojia1372
    @ashokkanojia1372 Рік тому +2

    Cost is very high compare to location and distance from main city

  • @omkarrewale5276
    @omkarrewale5276 Рік тому +4

    52 lac is too much for such property located in village area. It should be around 30 to 35 lac. In 52 to 55 lac you can buy 2 bhk house in Ratnagiri City.

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      कृपया विडिओ मधे दिलेल्या नंबर वर घरमालकांशी थेट संपर्क साधून बोलणी करावी सर...
      धन्यवाद 🙏

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому

      धन्यवाद।

  • @ravikantshrimatishridharka1275
    @ravikantshrimatishridharka1275 Рік тому +13

    हि वाडी कोकण वास्तू ह्या चॅनल ने २८ लाख सांगितले होते कृपया किंमत सांगितले तर बरे होईल

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      कृपया विडिओत दिसणार्‍या घरमालकांचा नंबर वर थेट संपर्क साधून चौकशी करावी

    • @freewilly38761
      @freewilly38761 Рік тому +2

      Barobar ahe... Pun tya video ani he video madhe bagitle tar samju yete ki owner ni thoda far काम केले ahe

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому +1

      52 लाख negotiate

    • @sanjaygopal9293
      @sanjaygopal9293 Рік тому

      True

    • @NiwantGadgil
      @NiwantGadgil Рік тому

      Agdi barobar. Yes it was single floor. New owners renovated it. Installed tiles n all

  • @shaileshshenoy1924
    @shaileshshenoy1924 Рік тому +1

    Hello.
    Namaste.
    Amcha bajet 15 lack aahe.
    Amala kokan made 5 gunte jaga ,vihir,aani ghar sobat fhala che jaad. .
    Assa milel ka .
    Krupya ..kalwavi..

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      आपल्या बजेटनुसार कोकणात फक्त रत्नागिरी जिल्ह्यात एनए व एग्रीकल्चर प्लाॅट उपलब्ध आहेत ते सुद्धा चार गुंठे प्रमाणात यात कंपाउंड, काही फळझाडे व सार्वजनिक पाण्याची सोय या प्रकारात घर बांधकाम खर्च अतिरिक्त आहे सर

  • @ramdaskholavdikar8963
    @ramdaskholavdikar8963 Рік тому +5

    Yes, the location from prime city is quite far away...Hence price matters..Also ceiling is not properly shown whether it is RCC or village type Kaul....
    Suspect recently painted.. surrounding is also I think not in rectangular shape...furniture doesn't matters....However owner has done very hard work to build it....

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      Dear sir...
      For detailed inquiry about this property I request you kindly call on owner number given on the screen
      Thank you so much 🙏

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому

      👍

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому

      धन्यवाद।

  • @sureshkhaire1698
    @sureshkhaire1698 Рік тому +3

    वीस लाखात होत असेल तर लगेच टोकन करतो.

  • @jyotiparab8165
    @jyotiparab8165 Рік тому +1

    Hall va kitchen var cement slab ahe ki plastic cha done kela ahe? Pl reply

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      Hall aani kitchen var कौलारू आहेत..आतील बाजूस plywood che आवरण केले आहे

  • @SN-ih5jr
    @SN-ih5jr Рік тому +2

    2varshat ka vikat aahet any problem? Kokan vastu var 2 varsha purvi 28 lakhs negotiable hoti pan varcha bedroom navata.

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому +1

      कृपया video मध्ये दिलेल्या number वर थेट owner la संपर्क करून अधिक माहिती घ्यावी ही विनंती 🙏

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому +1

      मी ठाण्याला असतो, ठाणे - रत्नागिरी प्रवास हा ञासदायक होत आहे

  • @bestofswaminchabhai
    @bestofswaminchabhai Рік тому +2

    सर,आम्हाला आमच्या छोट्या बजेट मध्ये थोडी जमीन मिळेल का रत्नागिरी,किंवा राजापूर मध्ये? थोडी काजू,नारळ,वगेरे झाडे लावलेली असावीत,

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      नक्कीच मिळेल सर
      कृपया आपणास कोकणातील कोणत्या भागात तालुक्यात जिल्ह्यात किती क्षेत्रफळाची जागा व आपले अंदाजे बजेट किती आहे. हे सर्व मला फोन अथवा मेसेज करून कळवा 🙏

  • @sudhirranadive6803
    @sudhirranadive6803 Рік тому +1

    30L paryant milel ka aani viknyach karan kay sir

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      Owner name & no displaying on the video.. dear sir please call him and get the best deal 🙏

  • @pravinprabhune473
    @pravinprabhune473 Рік тому +1

    Kiti juna bunglow aahe?
    Description madhe owner cha no. Nahi aahe fakt mahiti dili aahe.
    Price kiti aahe?

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      Description मध्ये आणि वीडियो मध्ये सुद्धा owner चा नंबर दिला आहे please call 📞 for more info regarding this property 🙏

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 Рік тому

    32 लाख

  • @jayshreevedanti5119
    @jayshreevedanti5119 Рік тому +1

    Is this available still?

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому +1

      Yes it is available please call owner name no & displaying on the video 🙏

  • @swagataloveschannel2788
    @swagataloveschannel2788 Рік тому +2

    What is another's reason for sale within 2 years?

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      कृपया video मध्ये दिलेल्या नंबर वर घरमालकांशी थेट संपर्क साधून माहिती घ्यावी
      धन्यवाद 🙏

    • @prachiparanjape3107
      @prachiparanjape3107 Рік тому +1

      @@talesofkokan3775 bangala khup chan ahe jagahi chan ahe maza jnma khannutach zala

  • @sayaliayare481
    @sayaliayare481 Рік тому +1

    Still available?

  • @poojakandalgaonkar2362
    @poojakandalgaonkar2362 Рік тому +1

    Still available for sale ?

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      I think so mam...please call property owner for more details...contact number available on the video
      Regards 👍🏻🙏

  • @rohangaikar1312
    @rohangaikar1312 Рік тому +5

    या जागेची किमत 28 lac आहे

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому +1

      दोन वर्षापूर्वी होती. आता नाही.

    • @sangitagode2191
      @sangitagode2191 Рік тому

      @@kadamharish9521 आता किती आहे मग

    • @hemantpatil8128
      @hemantpatil8128 Рік тому

      @@sangitagode2191 m

  • @santoshpalsamkar4425
    @santoshpalsamkar4425 Рік тому +3

    मालमत्ता तशी तर चांगलीच आहे पण विकण्या मागचं कारण काय?

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर थेट घरमालकांशी संपर्क साधून माहिती घ्यावी
      धन्यवाद 🙏

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому

      ठाणे ते रत्नागिरी जाण्या येण्याचा खूप ञास होत आहे म्हणून

  • @freewilly38761
    @freewilly38761 Рік тому +5

    ही प्रॉपर्टी 2 वर्श आदि 28lac होते.. थोडे फार काम kele ahe

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      अधिक माहितीसाठी कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर काॅल करा

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому +3

      आधीच्या व आताच्या vdo' त तुम्हाला बराच बदल झालेला दिसेल. त्यानूसार किंमत सांगितली आहे.

  • @kishorgajare2245
    @kishorgajare2245 3 місяці тому

    ही प्रॉपर्टी अजून available आहे का?

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  3 місяці тому

      होय सर कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर थेट मालकांशी संपर्क करून माहीती घ्या

  • @supriyaparab459
    @supriyaparab459 Рік тому +1

    किंमत किती ते सांगा

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      Video मध्ये कीमत सांगितलi आहे

  • @samadhansuryawanshi9255
    @samadhansuryawanshi9255 Рік тому +3

    किंमत खूप जास्त आहे35lakh ठीक आहे

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      कृपया विडिओमधे दिलेल्या नंबर वर घरमालकांशी थेट संपर्क साधून बोलणी करावी सर..
      धन्यवाद 🙏

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому

      धन्यवाद

  • @devendramhatre772
    @devendramhatre772 Рік тому

    Paali madhe 50 hajar rs guntha aahe he khup khup khup mahag aahe

  • @adityaenterprises4574
    @adityaenterprises4574 Рік тому +2

    हे घर मालक का विकत आहेत?

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर थेट घरमालकांशी संपर्क करून माहीती घ्यावी .
      धन्यवाद 🙏

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 Рік тому +1

    35 lakh

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      कृपया description box मध्ये दिलेल्या number वर घरमालकांशी थेट संपर्क साधावा
      धन्यवाद 🙏

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому

      Thanks

  • @maheshprabhu1557
    @maheshprabhu1557 Місяць тому +1

    Mitra sadar property ahe ka

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Місяць тому

      नमस्कार सर.. सदर प्राॅपर्टी अजूनही विक्रीसाठी उपलब्ध आहे.कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर जागामालकांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळू शकेल. धन्यवाद 🙏

  • @ajitpatil4768
    @ajitpatil4768 Рік тому +1

    कांमत सांगा हो

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      पन्नास लाख रुपए निगोशिएबल किंमत आहे

  • @sandhyamane2010
    @sandhyamane2010 Рік тому +1

    वरच्या बेडरूममला टाॅयलेट, बाथरूमची सोय आहे की नाही?video मध्ये तसे सांगितले नाही आणि दाखवले देखील नाही. जर वरच्या बेडरूमला तशी सोय असेल तर ठिक पण जर नसेल तर प्रत्येक वेळी खाली जावे लागेल.

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      आपल्या सूक्ष्म निरीक्षणासाठी धन्यवाद ताई..
      ज्या गोष्टी आणि सुविधा सदर वास्तू आणि परीसरात उपलब्ध आहेत त्या सर्व विडिओत दाखविण्यात आल्या आहेत...अधिक माहितीसाठी कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर घरमालकांशी थेट संपर्क साधावा 🙏

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому +1

      व्यायाम होतो. धन्यवाद.

    • @mangeshgovalkar6721
      @mangeshgovalkar6721 Рік тому +1

      Kimat kiti aahe te sanga

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      @@mangeshgovalkar6721 50 lakh negotiable

    • @kirtikanavaje2624
      @kirtikanavaje2624 Рік тому

      आताच्या घडीस पाली गावात वीस पःचवीस लाखापर्यत प्राॕपर्टी विकावयाची आसल्यास त्वरीत कळवा

  • @sanjaypataskar9839
    @sanjaypataskar9839 Рік тому +1

    Final price please

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому

      वीडियो मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा
      श्री स्वामी समर्थ 🙏

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому

      52 Lakhs, negotiate.

    • @prakashshinde5838
      @prakashshinde5838 Рік тому

      Verynice. Thanks. Ramneey location.

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому

      @@prakashshinde5838 धन्यवाद।

  • @ranjitsampat3760
    @ranjitsampat3760 Рік тому +1

    भाऊ जागा चा बोला हे चीकन मच्छी सोडा निर्दोष निरागस्त संवेदनाशील जिवाला मारु नका दयाळू व्हा माणूसकी दाखवा 🚩

    • @talesofkokan3775
      @talesofkokan3775  Рік тому +1

      वरील वीडियो मध्ये दाखवलेल्या नंबर वर संपर्क करून आपण जागामालकांशी थेट बोलणी करून व्यवहार करावा 🙏👍🏻

    • @kadamharish9521
      @kadamharish9521 Рік тому

      धन्यवाद।

  • @santoshsurve9516
    @santoshsurve9516 Рік тому

    Gharacha काही उपयोग नाही,कारण घर बरोबर बांधलेले नाही.

  • @supriyasawant1246
    @supriyasawant1246 Рік тому +1

    Still available?