नर्मदा तटी वाटचाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • लेपा पुनर्वसन तालुका कसरावद जिल्हा खरगोण मध्य प्रदेश
    प.पु.परिव्राजिका विशुध्दानंदाजी विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या.ह्यांनी २००५ साली नर्मदा मैय्याची परिक्रमा केली.नर्मदा मैय्याच्या परिसरातील अती दूर्गम भागात वास्तव्यास असणाऱ्या भिल्ल समाजाची दारुण परिस्थिती पाहून त्यांना दु:ख झाले.सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेने त्यांनी लेपा पुनर्वसन तेली भट्टान,छोटी खरगोण येथे २०१२ पासून शाळा चालू केल्या.त्याच बरोबर लेपा पुनर्वसन येथे प्रथम ३ विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतीगृहात आज १०० हून अधिक विद्यार्थी लाभ घेत आहेत व संस्थेला ही विद्यार्थी संख्या वाढवायची आहे.
    ह्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमा बरोबर पारंपारिक व आधुनिक तंत्रज्ञानने वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात संस्था यशस्वी होत आहे.आता तर संस्थेने अती दूर्गम भागात राहणाऱ्या वनवासी आदिवासी समाजासाठी व्यावसायिक प्रशिक्षण फिरती प्रयोगशाळा चालू केली आहे.
    प.पु.विशु़ध्दानंदाजीनी पेटविलेल्या ह्या होमात शतशः प्रणाम व अनेक शुभेच्छा

КОМЕНТАРІ • 3