तीलापिया मासे पालन/Tilapia Fish Farming
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- मत्स्य बीज विक्री -प्रिन्सिल परेरा - 7507100777 वसई
GIFT (जेनेटकली इंप्रूव्हड फार्म्ड) तिलापिया
जुनकीय सुधारित पालनयोग्य तिलापिया जातीला गिफ्ट किंवा सुपर तिलापिया असेही म्हणतात. नाईल तिलापिया (शा. नाव - Oreochromis niloticus) माशाच्या जातीपासून निवड पैदास पद्धतीने गिफ्ट तिलापिया मासा विकसित केला आहे.
या जातीची वैशिष्ट्ये ः
अन्य कोणत्याही मत्यजातींपेक्षा झ
पाट्याने वाढ. सुरवातीला २० ग्रॅम वजनाचे तिलापिया सहा महिन्यांत ६५० ग्रॅमपर्यंत वाढतात.
रोगप्रतिकारशक्ती व जगणुकीचे प्रमाण व जास्त.
सर्व प्रकारचे खाद्य खातो.
माशाची चव अतिशय उत्तम.
हा मासा जिवंत स्थितीत बाजारात नेता येतो, त्यामुळे याला चांगला दर मिळतो.
थोडक्यात, मत्स्यशेतीसाठी आदर्श मासा आहे. मात्र या जातीचे पालन करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून परवाना (लायसन्स) घेणे बंधनकारक आहे.
परवान्यासाठी महत्त्वाच्या अटी
तलावाचे क्षेत्र कमीत कमी १ एकर असावे, खोली ५ फूट असावी.
तलावाला कुंपण (फेन्सिंग) तसेच पक्ष्यांपासून बचावासाठी बर्ड नेट फेन्सिंग असावे.
तलावातील एकही मासा तलावाच्या बाहेर जाऊन शेजारील नदी, नाले, कॅनाल, तलाव अशा अन्य जलस्रोतामध्ये मिसळू नये.
उत्तम गुणवत्तेसाठी मत्स्यबीज राजीव गांधी सेंटर फॉर अॅक्वाकल्चर (RGCA), विजयवाडा (आंध्र प्रदेश) यांच्याकडूनच घेणे बंधनकारक आहे. येथून संपूर्ण नर मत्स्यबीज मिळतात, त्यामुळे तलावात पैदास होत नाही.
माशांना कृत्रिम खाद्य देणे आवश्यक.
पंडितरावांनी मिळविले यश
पंडित चव्हाण यांनी २०१४ पासून गिफ्ट तिलापिया या माशाची शेती सुरू केली. एकरी साडेदहा टन एवढे विक्रमी उत्पादन ८ महिन्यांत घेतले. आता त्यांच्याकडे तीन एकर तळ्यामध्ये गिफ्ट तिलापियाचे पालन केले जाते.
तलावाची खोली ८ फूट असून, त्यात ४.५ ते ५ फूट पाणीपातळी ठेवली जाते.
तलावाभोवती निकषानुसार कुंपण व बर्ड फेन्सिंग केले. पाणी आत येण्याच्या व बाहेर जाण्याच्या पाइपवर जाळ्या लावल्या आहेत. त्यामुळे तलाव बाह्य सजीवांपासून अलिप्त झाला.
बीज सोडण्यापूर्णी तळ्याची नांगरणी करून खते दिली जातात.
बीज आणण्यापूर्वी तलावात एक मोठ्या हाप्याची नर्सरी तयार करतात. त्यात वियजवाडा येथून आणलेले मत्स्यबीज सोडले जाते. एक ग्रॅममध्ये सुमारे १० बीज येतात. एकरी २० हजार प्रमाणात नर्सरी केली जाते. मत्स्यशेतीतील ही सर्वांत अवघड बाबही त्यांनी करून दाखवली.
तलावाच्या माशांची संख्या व त्यांच्या तोंडाच्या आकारमानानुसार योग्य आकार व प्रमाणात खाद्य दिले जाते.
तलावातील पाण्याची रोज सकाळी तपासणी करतात. त्यात पाण्याचा पीएच, विरघळलेला ऑक्सिजन, नायट्रेट व अमोनिया मोजला जातो. आवश्यकतेनुसार सुधारणा करतात.
मासे विशिष्ट वजनाचे झाल्यानंतर तलावात योग्य तेवढा हवेचा पुरवठा करावा लागतो.
उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच वाढीव नफा
सावधानता ः पूर्वीपासून मत्स्यशेतीचा अनुभव असूनही गिफ्ट तिलापिया पालन एक एकरावर प्रथम करून पाहिले. त्यानंतर हळूहळू त्यात ३ एकरापर्यंत वाढ केली.
नोंदी ः प्रत्येक बॅच व त्या संबंधित सर्व घटकांच्या नोंदीसह जमा-खर्च ठेवला जातो. त्यात योग्य त्या सुधारणा करत उत्पादन खर्चात बचत साधली. सुरवातीला त्यांना प्रति किलो माशांसाठी ९०० ग्रॅम खाद्य लागे, त्यात सुधारणा केल्याने आता प्रति किलो ६०० ग्रॅम इतके कमी केले. परिणामी, पूर्वीच्या ५८ रु. प्रति किलो हा उत्पादन खर्च कमी होऊन ४० रुपये झाला. प्रति किलो १८ रुपयांची बचत शक्य झाली.
सध्या मत्स्यखाद्य आंध्र प्रदेशातून मागवले जाते. वाहतुकीसाठी प्रति किलो १० रुपये खर्च होतो. हा खर्च कमी करण्यासाठी नुकतीच ८ लाख खर्चून स्वतःची फीडमिल यंत्रणा खरेदी केली आहे. खाद्यनिर्मितीमुळे आणखीही बचत होणार आहे. शेवटी उत्पादनखर्चात बचत म्हणजेच नफ्यात वाढ.
अपेक्षित दर मिळाल्याशिवाय विक्री करायची नाही हे धोरण. तलावावर किंवा मागणीप्रमाणे अलिबाग, मुंबई येथे जिवंत माशांची विक्री करतात.
सुरवातीला लोकांपर्यंत या माशांची चव समजावी, यासाठी विविध पदार्थ करूनही विकले. त्यातून परिसरामध्ये आता सामिष आहारामध्ये या माशांच्या मेजवानीचे प्रमाण वाढले. संपूर्ण मासे विकले जातात.
मासे शिल्लक राहिले तरी प्रति दिन सरासारी ३ ग्रॅम प्रमाणे वजन वाढत जाते. त्यामुळे दर मिळेपर्यंत थांबले तरी नुकसान होत नाही, असा पंडितराव यांचा अनुभव आहे.
मजूर कमी लागतात. त्यातही कुटुंबीयांची मदत होते.
पंडितराव चव्हाण यांच्या सघन गिफ्ट तिलापिया मत्स्यशेतीचे अर्थशास्त्र
गिफ्ट तिलापिया खर्च व उत्पन्न (१ एकर तलावासाठी, रुपये)
अ) स्थिर खर्च
तलाव बांधणे १ लाख
उपकरणे ओरिएटर, प्रयोगशाळा किट- ६० हजार
पंप संच -२० हजार
बर्ड नेट व क्रॅब नेट -३० हजार
एकूण खर्च (अ) - २.१० लाख
ब) स्थिर खर्चावरील व्याज - २१ हजार
(अ) अधिक (ब) - २.३१ लाख
(क) चालू खर्च
तळ्याची पूर्वतयारी- १० हजार
बीज (२०,००० नग)- ६० हजार
खाद्य १० टन (४० रु. /किलो) ४ लाख
कामगार पगार (१८० - गुणिले -३००) ५४ हजार
इतर खर्च ५० हजार
एकूण (क) ५.७४ लाख
ड) एकूण (अ अधिक ब अधिक क) ८.०५ लाख
इ) माशांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न (१०,००० किलो, १२० रु. प्रति किलो दर) - १२ लाख
संपर्क ः पंडित चव्हाण, ९८६०८१२८००
मत्स्य महाविद्यालय, शिरगाव रत्नागिरी.
सर खूप छान माहिती दिली तीलापिया फिश बद्दल आवडली धन्यवाद .
Khup cchan mahity.. 👍
Bhaji poli kavet
ठाकूर सर खूपच छान माहिती दिली तीलापिया माशांबद्दल. मस्त्यपालन कसे लाभदायक ठरते आहे याचे विवेचन सुंदर रीतीने सादर केले त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद !
Papanis chya zadavar limbu cha kalam hot ka
Mast vedio hai sir 🔥
Tasech limbu chiku peru ani avala chya zadavar khunti kalam hot ka karan amchyakde ya sarv biya pasun banalele rop ahet ti moti zali tari lagat nahi tyala khunti kalam hou shakat ka
good
Very good information
Sir,
Khunti kalam bandhnyasati mena (waxx) yevaji ganapatichi mati lavali tar chalat ka
Goa hapus ani goa mankur he vegvegle jati ahet ki donhi ekach jath ahe
👍👌👍👌❤️❤️❤️
गोड्या पाण्यातील मास्याला अजिबात चव नसते पण खार्या पाण्यातील चवीला चांगली असते.
चव नसते😂😂 काय बोलतो😂😂
मत्स्य बीज विकत घेताना मोजून घ्या..
बॅग मध्ये कमी येतात..
फसवणूक होते..पालन ते विक्री पूर्ण मार्गदर्शन देतात त्यांच्याकडून बीज घ्या..
Please sir comment kivha video dware utter dya
A̲a̲p̲n̲e̲ w̲i̲l̲d̲ m̲a̲e̲d̲i̲c̲i̲n̲s̲ p̲a̲r̲t̲ 1 p̲a̲t̲w̲a̲
Sir mobail namber pathva