Це відео не доступне.
Перепрошуємо.

पावनखिंडीच्या परिसरात दडलेल्या शिवकालीन पाऊलखुणा | Pawankhind | पावनखिंड भाग १ | Full History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2021
  • पावनखिंडीच्या परिसरात दडलेल्या शिवकालीन पाऊलखुणा | Pawankhind | पावनखिंड भाग १ | Full History
    #पावनखिंड
    #Pawankhind
    #Vishalgad
    #Panhala
    #Maratha History
    #फरसबंदी
    #Pavankhind
    #History of Maratha
    आषाढ शुद्ध पौर्णिमा आदल्या रात्री शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती.
    चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला त्याचा पत्ता लागला. पालखी पकडली गेली. 'शिवाजी आपल्या ताब्यात आला आहे' अश्या खुशीत असलेल्या जोहरच्या भ्रमाचा भोपळा लगेच फुटला. त्याला कळून चुकले की हे राजे नसून 'शिवा काशिद' नावाचा दुसराच कोणी तरी आहे. राजे आपल्या हातून निसटले आहेत. त्याने सिद्दी मसूद आणि फाझलखानाला शिवरायांच्या मागावर पाठवले. पाठलाग सुरु झाला ...
    दर काही मिनिटांना पालखीचे भोई बदलत, वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत ते ६०० वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उदिष्ट एकच होत - विशाळगड़. हातात नंग्या तलवारी घेउन बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर बित्तंबातमी राजांकड़े पोचवत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती.
    सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. त्यांनी थोडा वेगळा मार्ग घेतला होता. अर्थात घोड़खिंडीच्या अलिकड़े राजांना गाठायचे असे त्यांनी पक्के केले असेल. त्यांच्या थोड़े मागून आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ येत होते. राजांचे पहिले लक्ष्य होते पांढरपाणी. एकदा तिकडे पोचले की खिंड गाठणे अवघड जाणार नव्हते. आदल्या दिवशी रात्री १० वाजता पन्हाळगड सोडल्यापासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते.
    पन्हाळगड ते पावनखिंड एकुण अंतर आहे ६१ किलोमीटर. तर पन्हाळगड पासून ५५ किलोमीटर अंतरावर आणि पावनखिंडिच्या ६ किलोमीटर अलिकड़े पांढरपाणी आहे. पांढरपाणीच ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण आहे. महाराज पांढरपाणीला येउन पोचलो होते त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते. धोका वाढत जात होता. कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल असे वाटू लागले. शत्रुला गुंतवायला राजांनी २५ मावळे पांढरपाणीला ठेवले आणि ते घोड़खिंडीकड़े निघाले. अवघे २५ जण आता त्या २००० घोडेस्वारांशी लढायला तयार झाले होते. जास्तीत जास्त वेळ शत्रुला रोखून धरायचे काम त्यांना बजावावे लागणार होते. तितका बहुमूल्य वेळ राजांना खिंडीकड़े सरकायला मिळणार होता. आलेल्या घोडदळाला त्या २५ मावळ्यांनी शर्थीने रोखून धरले. त्यात त्या सगळ्या २५ जणांना मृत्यू आला. पण आपले काम त्यांनी चोख बजावले होते. पांढरपाण्याची नदी रक्ताने लाल झाली होती. राजे घोडखिंडीकड़े जाउन पोचले होते.
    राजांनी रायाजी बांदलांना ३०० मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले. पण आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी ह्या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी राजांना सुचवले. बाजींची स्वामीभक्ती येथे दिसून येते. शत्रु टप्यात येण्याची वाट बघत सगळे दडून बसले होते. १२-१३ तासांच्या अथक वाटचाली नंतर सुद्धा निवांतपणा नव्हता. निर्णायक लढाईसाठी आता ते ३०० वीर सज्ज झाले होते. गोफणीच्या टप्यात शत्रू आल्यावर बाजींनी एकच हाकाटी दिली आणि अचानक शत्रूच्या अंगावर दगड बरसू लागले. घोड्यांनी कच खाल्ली. काही उधळले. काही सरकून पडले. एकच गोंधळ उडाला. कित्येकांची डोकी फुटली, बाकी जिवाच्या भीतीने मागे पळाले. मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला. पण शत्रू इतक्यात मागे सरकणार नव्हता. घोडेस्वार पुन्हा उतरु लागले. मावळ्यांनी पुन्हा दगड भिरकवायला सुरवात केली.
    आता मावळ्यांनी त्यांच्यावर शिलाखंड ढकलायला सुरवात केली. त्यामुळे पायदळाची पांगापांग होऊ लागली. अखेर तासाभरानी शत्रूला वर पोहोचण्यात यश मिळाले. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली होती. बाजींचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते. इतक्यात शत्रूने फुलाजीप्रभुंवर डाव साधला. ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग गळाले. बाजींनी एक नजर त्यांच्याकड़े पाहिले. ते म्हणाले, "दादा, तुम्ही थोरले. पहिला मान तुम्ही घेतला." फुलाजीप्रभुंची तलवार त्यांनी उचलली. आधी एक ढाल - एक तलवार घेउन लढणाऱ्या बाजींनी आता दोन्ही हातात तलवारी घेतल्या होत्या. त्यांचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. बाजी आता अधिक त्वेषाने लढत होते. त्यांच्या देहाची आता चाळण उडाली होती. हे काही आपली वाट सोडत नाहीत असे पाहून पिडनायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदूकीतून बाजींवर गोळी झाडायला सांगितली. ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली. बाजींचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले. पण त्यांचे प्राण काही जात नव्हते. त्यांचे कान विशाळगडाकड़े लागले होते. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्युला ठणकावून सांगितले "तोफे आधी न मरे बाजी." बाजींच्या मनाची घालमेल होत होती. त्यांच्या मनात अखेरचे विचार सुरु होते.
    "पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले. "
    "बांदल सेनेचा व बाजींचा इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो."
    पावनखिंडितला हा अविस्मरणीय असा एक अनुभव... आयुष्यावर कायमचा कोरला गेलेला...
    (Location - Kolhapur - Malakapur - Pandharpani - Pavankhind - 65km)
    #Pawankhind trek
    #Pavankhind trek
    #Pawankhind mohim
    #Panhala
    #Pandharpani
    #Gajapur
    बर्कीचा धबधबा कोल्हापूर | Barki Waterfall Kolhapur | Monsoon Trek of Sahyadri
    • बर्कीचा धबधबा कोल्हापू...

КОМЕНТАРІ • 84

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 роки тому +14

    खुप सुंदर माहिती दिली सर तुम्ही तुमच्या सारखे निसर्ग प्रेमी ऐतिहासिकप्रेखी खुप कमी आहेत 👍 मस्त 👍 जय शिवराय 🙏

  • @anitasupal8716
    @anitasupal8716 2 роки тому +1

    खूप सुंदर

  • @bhikajipatil254
    @bhikajipatil254 2 роки тому +2

    उमाकांत खरच खुप छान व महत्वपूर्ण माहीती दिलीत

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 місяців тому +1

    Khoop. Sundar. 🙏🙏🙏

  • @ABVideo_9307
    @ABVideo_9307 Рік тому +1

    खूप छान 👍👍

  • @venkatdevkatte2274
    @venkatdevkatte2274 Рік тому

    Khup Chan

  • @samadhandhage1423
    @samadhandhage1423 2 роки тому +2

    Dhany Maharashtra bhumi

  • @Truth_Be_Bold
    @Truth_Be_Bold 2 роки тому +3

    आपण घेतलेल्या कष्टाची आम्हांस जाणीव होतेय. माहिती ही अप्रतिम व सुरेख. त्याबद्दल शतशः आभार 🙏
    फक्त अधूनमधून जी आपण इंग्रजी भाषेची फोडणी देता (बळे-बळे), ती टाळली तर बरं.
    'पर्यायी' हा शब्द वापरल्यावर परत option हा शब्द वापरायचा आणि तत्सम गोष्टी करू नयेत. मराठी इतिहास कथन करताना काटेकोरपणे मराठी भाषेचाच वापर व्हावा. नाहीतर, इंग्रज गेले मात्र इंग्रजांनी लादलेली गुलामी मात्र अजूनही गेली नाही असे खेदाने म्हणावे लागेल.

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому +2

      अगदी खरे... आभारी आहे, पण इतिहास जगभर पोहचवण्या करिता कधी कधी ग्लोबल भाषेचा वापर करावा लागतो, शिवाय सध्य स्थितीला काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील ती माहिती मिळावी हा एकच उद्देश..! बाकी तुमच्या सूचनांचे नक्कीच स्वागत मी शक्य तितका प्रयत्न करीन किमान ऐतिहासिक गोष्टी स्वभाषेत मांडण्याचा...🙏😊

  • @samarthachaudhari7826
    @samarthachaudhari7826 2 роки тому +2

    पावन खिडीचे सिह जय बाजी प्रभू🚩⚔️🙏🏻👍

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому

      जय भवानी...!🚩 3 रा पार्ट नक्की पहा..! आवडेल...

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 2 роки тому +2

    आपला ग्रामिण भारत अफलातून आहे. खर आहे दादा! सहमत आहे. स्वतः पावनखिंडीत जात आहे असेच पावलापावलावर वाटले ! धन्यवाद !

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому +1

      आभारी आहे.... तिसरा भाग नक्की पहा...!

  • @ridernikhilpatil6497
    @ridernikhilpatil6497 3 роки тому +3

    1no.sir,
    मी तुमचा बँकेत भेटलेला फॅन,
    त्या फारसं बंदी वाटे संबधी ऐकून होतो,
    तुमच्या माध्यमातून ती आज प्रत्यक्ष बघितली,
    Thanks सर,
    Love you....

  • @digambargurav7377
    @digambargurav7377 Рік тому

    जय भवानी जय शिवराय 🙏🙏

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 роки тому +1

    जय जिजाऊ, जय शिवराय,

  • @vidyagokhale5882
    @vidyagokhale5882 2 роки тому +1

    फार छान निवेदन .अंगावर शहारे येतात. छान माहीती

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому

      आभारी आहे, तिसरा भाग नक्की पहा...!🙏

  • @rahulmagdum8449
    @rahulmagdum8449 3 роки тому +1

    खूप छान ऐतिहासिक माहिती व्हिडीओ सह पाहण्यास खूप सुंदर वाटते

  • @venkatdevkatte2274
    @venkatdevkatte2274 Рік тому

    Chan

  • @user-kv1ks6wy1p
    @user-kv1ks6wy1p 2 роки тому +3

    भाग 2 लवकरच बघाय भेटावा
    बोलने ज़बरदस्त आहे

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому

      अपलोड केला आहे, तिसरा भाग सुद्धा करतोय तो वेगळाच आहे आणि नक्की आवडेल तुम्हाला

  • @balirammore8455
    @balirammore8455 2 роки тому +2

    जबरदस्त माहिती 🙏

  • @dineshkadam516
    @dineshkadam516 2 роки тому +1

    तुमच्या स्वराज्याच्या प्रेमाला आमचा मुजरा .....तुमच्या वाक्या - वाक्यातून आणि छोट्या छोट्या कृतीतून तुमची आत्मीयता जाणवते . खरा इतिहास जाणून घेण्याची पद्धत आम्हाला शिकवलीत . धन्य छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचे असंख्य मावळे जे ३५० वर्षानंतर सुद्धा स्वराज्या साठी लढताहेत

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому

      असे काही नाही दादा.. मी तर एक सामान्य नागरिक आहे देशाचा.. मनात देशप्रेम आणि संस्कृती व परंपरेचा वारसा असला की सगळे आपोआप होते, फक्त एक विनंती, आपल्या लहान मुलांना हा परिसर नक्की दाखवा, आणि चित्रपट ही... तो जाज्वल्य इतिहास आणि प्रेरणा यांचं बाळकडू त्यांना आताच मिळू दे...!🙏🚩

  • @bharatikondvilkar4090
    @bharatikondvilkar4090 2 роки тому +1

    👌

  • @nileshvaringe9748
    @nileshvaringe9748 3 роки тому +1

    सर खूप खूप धन्यवाद तुमचे आज पर्यंत फक्त फरसबंदी मार्ग आणि विहिर विषई माहिती ऐकून होतो पण माहित नव्हते मनापासून आभारी आहे सर तूमचा ह्या दोन्ही गोष्टी दाखवल्या बद्दल.

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  3 роки тому +1

      इतिहास तटस्थ पणे आणि संशोधकाच्या किव्हा अभ्यासाच्या दृष्टीने पहिला तर आपण तो जगतो, फक्त फोटो साठी जायचे नाही तर अनुभवायचा तो, आणि जतन करायचा व स्वच्छ ठेवायचा

    • @nileshvaringe9748
      @nileshvaringe9748 3 роки тому +1

      अगदी बरोबर आहे सर तुमच म्हणण म्हणून तर आम्हाला तुमचे विचार आणि तूमची लाईफ स्टाईल पटते

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 2 роки тому +1

    Jay Bhawani Jay Shiwaji....jay Baji 🙏

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 2 роки тому +1

    खूप छान माहिती साहेब तुम्ही दिलीत

  • @vishramnisal3878
    @vishramnisal3878 2 роки тому +1

    खुप सुंदर माहिती सांगितली सर,🙏🙏

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому

      आभारी आहे, तिसरा भाग नक्की पहा आवडेल

  • @vijaychavan3239
    @vijaychavan3239 2 роки тому +1

    Dada 1 no sivkalin prtek dagad aaplya rajancha itihas sangto to prteka dagd aani rajanche pratek gadkot aaplyasathi mhtvache aahet
    Dada tumi khup kholvr jaun rajyancha itihas dakhvlat chan dada
    1 itihas premi

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому +1

      आभारी आहे, आपली संस्कृती म्हणजेच पाया म्हणून फक्त काम करत राहील तर काम होत राहते...🙏🚩

  • @202-atharvamane8
    @202-atharvamane8 3 роки тому +1

    Khup chan !

  • @Naresh_Patil_97
    @Naresh_Patil_97 2 роки тому +1

    धन्यवाद सर🙏... तुम्ही खुप चांगल कार्य केलं.

  • @rohansutar8233
    @rohansutar8233 2 роки тому +1

    👍👍👌🙏🙏🚩

  • @rajpatole5718
    @rajpatole5718 3 роки тому +1

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 2 роки тому +1

    🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 veeranna manacha mujara jai bajiprabhu aani bandhal jai chatrapati Shivaji maharaj 🙏

  • @NiranMediaCraft
    @NiranMediaCraft 3 роки тому +1

    👍👍👌

  • @rajdigitalkarmala4646
    @rajdigitalkarmala4646 2 роки тому +1

    बहुत बढिया.. आम्ही जातोय २३/२४

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому +1

      Nakki jaun ya

    • @rajdigitalkarmala4646
      @rajdigitalkarmala4646 2 роки тому +1

      जाऊन आलोत सर.... पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिम राबविण्यात आली

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому

      Great... Ekdam zakas.... Jay shivray

  • @jamesBond-fy2tl
    @jamesBond-fy2tl 2 роки тому +1

    Ektri asa vedeo hvaa jo clean n clear panhalgad te pawankhind te vishalgad asa original rsta jyavrun maharaj v mawale tyaveli gele hote to smpoorn rsta v marg chalat davnara vedeo konitri bnvay hvaa.. Mhnje te sgle jivant ubhe rahil bgnaryanchya.. 🙏

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому

      Total 55 km cha track ahe, tithe vatet kontyahi junya historical vastu nahit fakt jungle so sagale shoot karayche tari 6 videos hotil 30 te 35 mins che, lokana jungle baghun eka curtain time nantar kantala yeil, ani mag jungle kay pahayche ase hoil, tya peksha ahe tya old ancient memories and places show karne ani pahane sope jate so sagale 3 episode made shoot kele ahe ani te dakhavnyacha try kartoy🙏

  • @satishgondkar1608
    @satishgondkar1608 2 роки тому +2

    😭👌👌🔥🔥🔥😘😘😘

  • @shubhamdahivadikar_photo_films
    @shubhamdahivadikar_photo_films 3 роки тому +2

    आजच केला हा ट्रेक👍

  • @Amolpatil3191
    @Amolpatil3191 2 роки тому +1

    पावनखिंड भाग 2 लवकरच बघायला मिळावा🙏

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому

      Nakki... Khare tar pavankhind hi fakt tya smaraka purti maryadit nahi to itihas ahe panhalya pasun vishalgad paryantcha

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 2 роки тому +1

    आमचा तालुका शाहुवाडी.

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 2 роки тому +1

    सोलापूर जिल्ह्यात म्हणता ते कोल्हापूर हवे ना

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому

      कोल्हापूरच आहे ते, चढाई करत होतो त्यामुळे बहुदा सोलापूर ऐकू येत असेल, कोल्हापूरच बोललो आहे इथे, मी याच तालुक्यातील आहे

  • @pareshwalawalkar6345
    @pareshwalawalkar6345 2 роки тому +1

    Srimant hi padavi Shivaji Maharaj yani peshave yana dili hoti. Hi padavi Shivaji Maharaj yachi nahi.

  • @rajeebandal6553
    @rajeebandal6553 2 роки тому

    तुम्ही video खुप छान बनवलाय पण माहिती तुमच्या चुका ही झाल्यात.
    1) तुम्ही संपूर्ण video मध्ये एकदाही बांदल सेनेचा उल्लेख केलेला नाहीये. तुमच्या मते बांदल सेना नव्हती का त्यावेळी?
    2) तुम्ही बाजीप्रभू देशपांडे यांचा उल्लेख बाजीप्रभू बांदल असा केलात तो कोणत्या आधारे केलात?
    कृपा करून माहिती द्यावी.

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому

      बांदल सेनाचे महत्व खूप जास्त आहे ताई, बांदल मावळे आणि त्यांचा पराक्रम यावर तिळमात्र शंका नाहीये, त्यावर वेगळा व्हिडीओ बनवतोय, आपला नंबर द्यावा नक्की भेटून माहिती घेतो, कोणताही चुकीचा इतिहास इथं सांगायचा नाही

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому +1

      ताई, रायाजी बांदल आणि कोयाजी बांदल या शूरवीरांच्या समाधी अजून पहिल्या नाहीत तिथं जाऊन त्या दाखवायच्या आहेत थोडा वेळ द्यावा... नोकरी करून करतो हे सर्व, कोणताही चुकीचा इतिहास दाखवण्यात काहीही अर्थ नाहीये, पण बांदल सेनेला दुर्लक्षित नाही करत.. 5 भाग आहेत फक्त 2 भाग पोस्ट केले आहेत अजून बरेच आहे, छ. शिवाजी महाराज ज्या वाटेने विशाळगड वर गेले ती वाटही दाखवायची आहे.. एक एक मांडत आहे.. नक्की आवडेल तुम्हाला...!🚩😊

    • @rajeebandal6553
      @rajeebandal6553 2 роки тому +2

      @@lifeinwildlife तुम्हाला कोणत्याही माहितीची गरज पडलीच तर आम्ही निश्चित मदत करू. समाधी स्थळे, शिक्केकरी घर सर्व दाखवू.

    • @lifeinwildlife
      @lifeinwildlife  2 роки тому

      नक्कीच मदत लागेल आपली, संपूर्ण इतिहास पोहचणे गरजेचे आहे.!

    • @rajdigitalkarmala4646
      @rajdigitalkarmala4646 2 роки тому

      बांदल सेना तर मेन होती