काय ती माथेरानची डोंगर, झाडी आणि रसते! ❤️❤️❤️। FHD 4K video ॥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • माथेरान! माथेरान! माथेरान! खूपच ऐकले माथेरान विषयी जाण्याची इच्छा तीव्र झाली होती. खूप काळाने - मला जायची संधी मिळाली पण तेही डोंगर दऱ्या चढून.
    आमची टिम तयार झाली माथेरान ला जायला. आम्ही सहा - सात जण होतो. डोंगर चढण्यासाठी धोदाणी गावातून जाणे हा एक मार्ग होता.
    धोदाणी गावाच्या पायथ्याशी सकाळीच 6:00 वाजता आलो. सर्व साहित्य आणि फळे आणि काहींनी खाद्यपदार्थ घेतली.
    माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटन स्थळ जे ब्रिटीश असल्यापासून आहे. पाहण्याची जिज्ञासा व डोंगर चढण्याची उत्सुकता शिगेला पोहचली.
    ज्यावेळेस डोंगर चढत होतो मला लवकर थकवा आला. पण जिद्द सोडली नाही. मग चढत असताना समजले की आपल्याला तिसऱ्या डोंगरावर पोहचायचे आहे. अर्थात, तिसऱ्या डोंगरावरच माथेरान आहे. तिसरा डोंगर मात्र कठिण होता चढण्या - उतरण्यासाठी.
    कसाबसा तिसऱ्या डोंगरावर पोहचलो व माथेरान च्या सुर्यास्त च्या कडेवर आलो ज्याला Sunset point म्हणतात जो सर्वांना लांबून दिसतो. खूपच सुंदर कडा होता. माथेरान प्रत्येक पॉईंटला कडेला कुंपण केलेले होते.
    माथेरानला एकून मुख्य नऊ पॉईंट आहेत पाहण्यासाठी. तसे तर बरेच आहेत. प्रत्येक पाँईंटचे वैशिष्ट्यपूर्ण बांधणी फार सुंदर होते.
    मी प्रत्येक पॉईंट पाहायचे ठरवले पण डोंगर पुन्हा सुर्यास्तापूर्वी उतरायचे होते कारण अंधार झाल्यावर डोंगर उतरायला कठिण झाले असते म्हणून फक्त सहा ठिकाणीच भेट देऊ शकलो.
    आम्हाला माथेरानला पोहचायला अडीच तास लागले आणि उतरायला दोन तास लागले. पाय खूप दुखायला लागले पण माथेरानला फिरलो याचा आनंद जास्त होता.
    माथेरानला जंगले, बाजार आणि हॉटेल्स व खेळ व घोडे असे बरेच काही पाहू शकलो. तसेच, कुत्रे खूप इमानदार जे आम्हाला एक सुरक्षारक्षक सारखे संगती येत होते. कारण तेथे माकडे भरपूर असतात आणि ते आपल्या हातामधले जे आहे ते खेचून घेतात. त्यामुळे ही कुत्रे आपल्याला माकडांपासून दूर ठेवतात.
    माथेरानला फिरण्यासाठी कुठलेही वाहन तेथे उपलब्ध नाही, जर प्रवास करायचे असेल तर घोड्यांचा उपयोग करू शकतात पण तेही परवडण्यासारखे नव्हते. तर आराम करत करत चालणे महत्त्वाचे आहे.
    पण खूप गम्मत जम्मत व मजा झाली. शॉपिंग ही केली. खेळ खेळलो. मी सर्वांना कळवू इच्छितो तुम्ही ट्रेनने ही माथेरानला जाऊ शकता जे नेरळ मधून मिळते. माथेरान रेल्वे स्टेशन आहे.
    धन्यवाद तुमचे आणि सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांनाही शेअर करा.
    #asocialtraveller
    #travelvideo
    #matheran
    #matheranhills
    #hillstation
    #matheranhillstation
    #picnic
    #mountain
    #mountaintrekking
    #trekking
    #travel
    #toytrains
    #travelvideo

КОМЕНТАРІ • 3