आंबा तोडणी केल्यानंतर करावयाचे बाग व्यवस्थापन - खत , पाणी , छाटणी , बोर्डोपेस्ट व फवारणी व्यवस्थापन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2023
  • 🥭 आंबा लागवड लेख : 8 🥭
    मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    🔹Rahul khairmode Vlogs 🔹
    ♦️खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?♦️
    सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
    हुमिक ॲसिड- २० ग्रॅम
    रिजेंट- ५० gr
    मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )- 100 gr
    लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
    लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
    शेणखत -६ घमेली (६० किलो )
    गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
    पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
    मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    एक वर्ष ते सहा वर्ष पर्यंत च्या
    झाडाना द्यावयाची खते
    वय १ वर्ष
    शेणखत : १ घमेले/१० किलो
    *नत्र (युरिया)*: ८० Gr.
    सिंगल सुपर : ३०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : २०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय २ वर्ष
    शेणखत : २ घमेले/२० किलो
    *नत्र (युरिया)*: १६० Gr.
    सिंगल सुपर : ६०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : ४०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ३ वर्ष
    शेणखत : ३ घमेले/३०किलो
    *नत्र (युरिया)*: २४० Gr.
    सिंगल सुपर : ९०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : ६०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ४ वर्ष
    शेणखत : ४ घमेले/४० किलो
    *नत्र (युरिया)*: ३२० Gr.
    सिंगल सुपर : १२०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : ८०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ५ वर्ष
    शेणखत : ५ घमेले/५० किलो
    *नत्र (युरिया)*: ४०० Gr.
    सिंगल सुपर : १५०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : १२०० Gr.
    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
    वय ६ वर्ष
    शेणखत : ६ घमेले/६० किलो
    *नत्र (युरिया)*: ५०० Gr.
    सिंगल सुपर : १८०० Gr.
    मुरेट ओफ पोटॅश : १४०० Gr.
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    🔸महत्वाचे🔸
    यापैकी
    ५०% नत्र पावसाळ्यापूर्वी व
    ५०% नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
    **************************
    स्फुरद व पालाश पूर्ण - जुलै मध्ये द्यावे
    सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्यावीत.
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    कोणतेही रासायनिक खत झाडाच्या खोडा लगत किंवा मुळापाशी द्यायचे नसते.
    झाड दगावण्याची शक्यता जास्त असते.
    त्यामुळे
    खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर मुजवुन टाकावी .
    (नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पध्दतीनेही देता येते .. रासायनिकचा हट्ट नाही )
    श्री.राहुल खैरमोडे सर
    88 88 78 22 53
    88 55 900 300
    🙏🙏🙏🙏🙏

КОМЕНТАРІ • 137

  • @pravinsawant8969
    @pravinsawant8969 21 день тому +1

    माहिती चांगली असेल असे वाटते परंतु बैकग्राउंड संगीतामुळे अर्धवट माहिती मिळते

  • @ranjeetrathod8973
    @ranjeetrathod8973 Рік тому +2

    आतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @ramchandrakavathekar354
    @ramchandrakavathekar354 Рік тому +3

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @Bothe_krushna_30
    @Bothe_krushna_30 Місяць тому +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल राहुल सर धन्यवाद

  • @pramoddeshmukh4738
    @pramoddeshmukh4738 2 місяці тому +1

    सर धन्यवाद खुप चांगली उपयोगाची माहिती

  • @udaykumarsutar368
    @udaykumarsutar368 Рік тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @vishallembhe3141
    @vishallembhe3141 Рік тому +1

    खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद.......

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Рік тому +2

    छान माहिती दिली आपण...

  • @narendrabhosale9154
    @narendrabhosale9154 Рік тому +1

    Good job saheb, ashish mahiti share karat raha.... धन्यवाद!

  • @mahadevpujari9807
    @mahadevpujari9807 17 днів тому +1

    Chan mahiti dili

  • @sopan880
    @sopan880 Рік тому +1

    अनमोल माहिती

  • @zameershaikh7203
    @zameershaikh7203 Рік тому +2

    Very good information sir

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 Рік тому +1

    फार छान माहीती

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 Рік тому +3

    Very good information

  • @VikasPatel-ur4yd
    @VikasPatel-ur4yd Рік тому +2

    Nice information.

  • @arslanghafoor5510
    @arslanghafoor5510 Рік тому +2

    MASHA ALLAH

  • @bhimraopatil7923
    @bhimraopatil7923 22 дні тому +1

    Khup chan

  • @chimajibhalchim8765
    @chimajibhalchim8765 Рік тому +1

    गुरु फारच उपयुक्त आणि महत्वपूर्ण बारकाव्यासह माहिती दिली धन्यवाद.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      धन्यवाद दादा ..

    • @balwantthube9029
      @balwantthube9029 Рік тому +1

      धन्यवाद खुप छान माहिती दिली.खतव्यवस्थापण कसे करावे छाटणी कशी करावी याची चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.@@rahulkhairmodevlogs2604

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      धन्यवाद दादा

  • @sheojeetewary6625
    @sheojeetewary6625 7 днів тому +1

    Can you please get done pruining of 1000/ keshar plants.

  • @mauligavli5520
    @mauligavli5520 Рік тому +1

    Khup chann mahiti dili sir...
    Mi mazya bagesathi tumhi sangitlelya saglya gosti kartoy👍🙂🌦️⛅️⛈️

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому +1

      धन्यवाद दादा

    • @mauligavli5520
      @mauligavli5520 Рік тому +1

      सर मी मागच्या जून मध्ये नवीन केशर आंब्याची वाडी तयार केली आहे... या जून मध्ये एक वर्ष पूर्ण होईल... तर पावसाळ्यापूर्वी खताचे नियोजन कसे करायचे सांगाल का 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому +1

      माझा whatsapp no. 8888782253
      Send Hi.. will share u all details related to ur mango cultivation .

    • @mauligavli5520
      @mauligavli5520 Рік тому +1

      Ok सर

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 Рік тому +1

    Best farm

  • @OmSalave-op2yw
    @OmSalave-op2yw Рік тому +2

    Rahul sir ji , एक विनंती आहे की आपण घरा पुढे लेवलेली अंबा झाड व त्याचे करवाची घरघुती खत वेवस्तपण या बदल व्हिडिओ बनवावे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому +1

      हो दादा ..
      असा एक vlog नक्की बनवतो .
      आपणास त्याची लिंक uplode केल्यावर नक्की पाठवतो

  • @pravinsawant8969
    @pravinsawant8969 21 день тому +1

    अनावश्यक संगीतामुळे मूल उद्देश सफल होत नाही

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 4 місяці тому +1

    सर, फार छान, अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
    सर , please stop background music .

  • @VikasPatel-ur4yd
    @VikasPatel-ur4yd Рік тому +2

    Cultar kb dalna hai. Ye to August september ke dalte h na

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому +1

      कल्टार का उपयोग १ अगस्त से १५ अगस्त तक करे . उससे पहेले पुरा खाद का व्यवस्थापन करे .

    • @VikasPatel-ur4yd
      @VikasPatel-ur4yd Рік тому +1

      @@rahulkhairmodevlogs2604 ok thank you

  • @nandanshelar
    @nandanshelar Місяць тому +1

    जय शिवराय आणि जय भीम राहुल दादा 🙏🏼

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 Рік тому +1

    Hi

  • @prashantkarne1498
    @prashantkarne1498 28 днів тому +2

    सर सर्व रासायनिक खता ऐवजी गांडूळ खत वापरले तर चालेल का???

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 29 днів тому +2

    सर, कशासाठी back ground music used, so bad ,

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  28 днів тому

      हो दादा ... पुढील सर्व video मध्ये background music वापरणे बंद केले आहे

  • @Shadow-fi6sv
    @Shadow-fi6sv 7 місяців тому +1

    aamchi zhad aata 25-30ft varti geli aahet :) hyatl fakt paani aani khat dene palikade kahi nahi karu shakat ?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  7 місяців тому

      करु शकता ..
      माहीती पाठवतो.
      यावर्षीची फळधारणा नैसर्गिक जशी येइल तशी घ्या .
      पुढील वर्षी चे नियोजन पाठवतो

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  7 місяців тому

      *जुन्या झाडांचे पुनर्जीवन*
      *कसे करावे?*
      *व त्यापासुन मिळणारे*
      *उत्पादन कसे वाढवावे :*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *प्रस्तावना :*
      आंबा रोप लागवडी नंतर पहीली २० ते २५ वर्षे झाडाची फलधारणा चांगली असते व वाढत्या वयाबरोबर ३५ वर्षांपर्यंत ती आणखी वाढत जाते त्यानंतर पुढील काही वर्षे ; पठारावस्था कालावधीत ही फलधारणा स्थिर रहाते मात्र कालांतराने अशा वय वाढत असलेल्या झाडाची फळधारणा कमी होत जाते.फळ कमी येणे वा फळ अजिबात नयेणे; या व अशा अनेक समस्या जुन्या झाडांच्या बाबतीत अनुभवयास येतात.
      *गावठी भाषेत याला झाड वठणे* असे ही म्हंटले जाते .
      काही झाडांच्या बाबतीत झाडांची उंची खूपच वाढल्यामुळे ; फळे आलीच तर ती खूप उंचीवर असल्याने ती काढताही येत नाहीत.आलेली फळे काढता नआल्यामुळे पिकून पडल्यामुळे खराब होवुन जातात किंवा पशूपक्षी यांच्याकडुन खावुन खराब केली जातात .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      म्हणून झाडाची छाटणी करुन अशा वठत चाललेल्या झाडांचे पुनर्जीवन करुन अशा झाडांकडून पुनरुत्पादन देखील घेता येते.
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *आंबा झाडाचे*
      *पुनर्जीवन व पुनरुत्पादनासाठी*
      *काय करावे ?*
      🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
      *उपाय :*
      १)१२ ते १५ फुट उंचीवर झाडाच्या वर जाणाऱ्या मुख्य खोडास करवताच्या किंवा इतर यंत्रांच्या सहाय्याने सपाट कट मारावा ;
      (त्यामुळे झाडाची वर होत जाणारी
      अनियंत्रित वाढ पूर्णपणे बंद होइल.)
      २) उंच गेलेले मुख्य खोड छाटल्यानंतर शिल्लक असणाऱ्या चारही दिशाना जाणाऱ्या सर्व उपफांद्या मुख्य खोडापासून ३ ते ५ फुट अंतराने कट कराव्यात. मात्र या
      फांद्या कापण्यापुर्वी ; कट मारण्याच्या जागेच्या अलिकडे काही उपफांद्या जाणीवपूर्वक शिल्लक ठेवाव्यात.जणे करुन नवीन फुटवा येउन झाड पुन्हा पाना फुलानी बहरुन जाइल.
      ३) झाडावर बांडगूळ व अमरवेली यासारख्या काही परजीवी वनस्पती असल्यास काढून टाकाव्यात .या परजीवी वनस्पती - झाडाच्या खोडातुन जीवनरस(अन्नरस) शोषून झाड कमकुवत बनवत असतात .
      ४) झाडाची छाटणी झाल्यावर ;
      झाडाच्या मुख्य खोडाच्या सर्व बाजूने खोडापासून ६ फुट अंतराने ३ फुट उंचीची गोलाकार दगडाची/जांभ्याची/वीटांची ताल घालून घ्या .
      ५) झाडाच्या खोडास किड , वाळवी , भिरुड आळी व मुंग्या यांचा अपाय झाला असेल तर मुख्य खोड खराब होण्याची शक्यता असते.अशा वेळी खोडातील किड बाहेर काढून टाकावी यासारखी किड समुळ संपवण्यासाठी गोमुत्र किंवा स्प्रे बोर्डोपेस्ट चा वापर करावा . तनंतर जमिनीपासून किमान आठ फुटापर्यंत मुख्य खोड व फांद्या यांच्या पृष्ठभागावर बोर्डो पेस्ट चे तयार केलेले द्रावण रंगवून घ्यावे.
      ६) गोलाकार तालीच्या आतील बाजूस
      तळाशी थायमेट टाकुन अर्धा फुट पालापाचोळा किंवा वाळलेले काष्ट पसरावे . त्यानंतर उरलेला गोलाकार भाग सुपीक माती व नैसर्गिक खते (शेणखत ,लेंडीखत,कंपोस्ट,लिंबोळी पेंड व गांडूळखत) यांचे मिश्रण गोलाकार तालीच्या आतून भरून घ्यावी . तत्पूर्वी आतील बाजूस फंगिसाइड -थायमेट- बीएससी पावडर तालीच्या आत पसरावी किंवा बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावी.
      ७) वरील प्रमाणे खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेचच या तालीत टाकलेले खत व माती चांगली भिजेल अशा पध्दतीने पाणी दयावे.
      किमान एक महिना नियमित पाणी द्यावे.
      ८) झाडाच्या सपाट कापलेल्या जागी बोर्डोपेस्ट लावावी.
      ९) जमीनीत नत्र ,स्फुरद व पालाश त्यांचबरोबर सूक्ष्मअन्नद्रव्ये यांची कमतरता असेल तर अशी खते भरीने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गोलाकार चर काढून द्यावीत.
      ८) प्रतीझाड द्या
      *वय २५ ते ३५ वर्ष*
      *शेणखत : २० /२५ घमेली*
      नत्र (युरिया): १० किलो .
      (दोन टप्प्यात ५+५ किलो)
      जुन व औगस्ट
      * सिंगल सुपर : ५ किलो Gr.
      औगस्ट
      * मुरेट ओफ पोटॅश : ४ किलो Gr.
      औगस्ट
      व २० दिवसानंतर मायक्रो न्युट्रीयंट
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये २ किलो द्यावे .
      (वरील सर्व मात्रा सेंद्रिय (नैसर्गिक) पध्दतीने दिली तरीही चालेल.
      *रासायनिक खतांचा हट्ट नाही.*
      ९) सर्वात महत्वाचे :
      कृषी सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार बुरशीनाशक व कीटकनाशक यांच्या फवाऱण्या कराव्यात .
      १० ) गायीचे शेण व गोमुत्रापासुन जीवामृत तयार करुन झाडास दर १५ दिवसानंतर नियमितपणे दिल्यास रासायनिक खतावरील खर्च कमी होतो व झाडाला अधिक प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो .
      ११) एका वर्षांनंतर झाडावरील फळे काढल्यानंतर लगेचच झाडाची वाढ व विस्तार पाहून छाटणी करावी .
      १२ ) झाड कापण्यासाठी कुऱ्हाड कोयता किंवा पारळी नवापरता करवत किंवा पेट्रोल किंवा लाइट वर चालणारी अवजारे वापरावीत व ती सर्व निर्जंतुक केलेली असावीत.

  • @Vireandrazambre7777
    @Vireandrazambre7777 13 днів тому +1

    सर आपण एकरी उत्पादन किती घेता किंवा सरासरी प्रत्येक झाडास किती किलो आंबे काढता....

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  13 днів тому

      फोन केलात तर सविस्तर सांगता येइल
      8855900300 / 8888782253

  • @nitinshahane5057
    @nitinshahane5057 13 днів тому +1

    There is no need of background music.

  • @sameerbhatkar6833
    @sameerbhatkar6833 9 місяців тому +1

    Sir market aahe ka

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  9 місяців тому

      खुप चांगले आहे .
      आपण फक्त बेस्ट क्वालिटी आंबा तयार करुया

  • @vishalpatkar7604
    @vishalpatkar7604 Рік тому +1

    Expayri date संपल्या नंतर किती दिवस cultar वापरू शकतो.

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan Рік тому +1

    कलम केलेला भाग मातीत गेला तर चालतो का??

  • @user-mb7wb6oj7f
    @user-mb7wb6oj7f Рік тому +1

    Cyclone madhe zhare ukhartat tya sathi prayay

  • @Dr.RamchandraGharge
    @Dr.RamchandraGharge 21 день тому +1

    Bordo.pastes.kasi.tayar.karane

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  20 днів тому

      ua-cam.com/video/2wKnl9BQhpg/v-deo.html
      भाग १

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  20 днів тому

      ua-cam.com/video/so6LDjgvRpo/v-deo.html
      भाग २

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  20 днів тому

      ua-cam.com/video/EXkZKW_vS2M/v-deo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  20 днів тому

      ua-cam.com/video/z5W4O8RLZBA/v-deo.html
      भाग ४

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  20 днів тому

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *UA-cam channel ची लिंक*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी*
      *रामबाण उपाय*
      *How and When to apply Bordopaste on mango plants?*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸
      १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे .
      २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे .
      ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे .
      ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे .
      *वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?*
      🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
      वर्षांतुन दोन वेळा
      🩸 पावसाळा संपला कि लगेच व
      🩸 फेब्रुवारी महिन्यात
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?*
      *बोर्डो पेस्ट*
      👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि
      👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी
      👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
      👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल.
      👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे.
      👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे .
      👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी.
      ******************************
      ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा.
      ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल.
      ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
      ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त.
      ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी .
      ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी....
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

  • @rupali7955
    @rupali7955 Рік тому +1

    Kesar aani kahi vegli zadlavaychi aahet,pn shetat unni,humni ali lagte यासाठी काय करावे

  • @jawalwadikaranchapaksha8787
    @jawalwadikaranchapaksha8787 7 місяців тому +1

    सर तुमचा नंबर दया तुम्हाला फोटो पाठवतो 🙏🙏

  • @rejendragawali7226
    @rejendragawali7226 11 місяців тому +1

    सर तुमचा फोन नंबर स्किरनवर दाखवा मला माहिती विचारयची आहे आंब सिताफळ चकु झाडांविशयी

  • @user-oy2is1kw2s
    @user-oy2is1kw2s 11 місяців тому +1

    सर मी केशर आंबा ची 20 कलम लावले आहे.
    त्याच्या बाजूला कोई लावून दुसरे गावठी रोप तयार केले आहे
    त्याला suport साठी दुसर झाड जोडायचे आहे इनसेतू करायचे आहे दुसर झाड पहील्या कलम च्या वर जोडले तर चालेल का.

  • @omkarudeg7920
    @omkarudeg7920 Рік тому +1

    सेंद्रिय खतांचे प्रमाण सांगा सर

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan Рік тому +4

    या वर्षी तुम्ही इतर आंबा जाती बद्दल माहिती वर विडिओ नाही केले..ज्या उरलेल्या जाती आहे...सोनपरी, माया,चौसा, अंबिका,अरुणीका,सुवर्णरेखा,बदामी,बैगनपल्ली अश्या नवनवीन जाती बद्दल माहिती द्या..किंवा नवीन संकरित आल्या असतील जाती त्या बद्दल...कारण लोक आता लागवड करण्यासाठी जाती शोधत आहेत..किंवा असा एक विडिओ बनवा की फक्त कोकणात होणाऱ्या जाती म्हणजे रत्नागिरी, रायगड,सिंधुदुर्ग, आणि फक्त पश्चिम महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या जाती...असा सविस्तर विडिओ बनवा.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому +1

      हो दादा ..
      आपल्या चॅनेल वर videi बरोबरच
      १ मिनिटांचे short video पण आहेत
      नक्की पहा

  • @lalitbafana5536
    @lalitbafana5536 Рік тому +1

    Contact no plz Rahul sir yancha hawa ahe,plz plz

  • @dattukhade8843
    @dattukhade8843 Рік тому +1

    झाडांची छाटणी साठी साधारण झाडाचं वय किती असावे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      १ वर्षे वयाच्या झाडाचीही करु शकता .
      oct and then in march

  • @sushilakale9707
    @sushilakale9707 Рік тому +2

    Sr mazhy झाडाची उंची वाढते पण खोड पातळ आहे काय करावे ते सांगा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      छाटणी करा ..
      खोड भरणी चांगली होइल सोबत फांद्या ही वाढतील

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *UA-cam channel ची लिंक*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
      *How & When to prune a mango plant ?*
      *आंबा झाडांची छाटणी*
      *कधी व कशी करावी ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
      ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
      १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
      ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
      *छाटणी कधी व कशी करावी*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      *पहीली छाटणी*
      *पावसाळा संपल्यानंतर*
      ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
      दरम्यान
      *दुसरी छाटणी*
      ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
      *चैत्र पालवी यायच्या अगोदर*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
      *व*
      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *कट कसे मारावेत ?*
      👉 *सपाट व थोडे तिरके*
      🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
      *छाटणी तंत्र व काळजी*
      लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
      १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
      २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
      ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
      ४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
      ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
      ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
      ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
      अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      ua-cam.com/video/zSIv8S5nWaM/v-deo.html

  • @shirishchandrapatil4523
    @shirishchandrapatil4523 Рік тому +2

    कीटक नाशक व बुरशीनाशक कोणते वापरावे व त्याचे प्रती लिटर प्रमाण किती

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      ua-cam.com/video/prTVePQmHoU/v-deo.html
      नक्की पहा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      ua-cam.com/video/prTVePQmHoU/v-deo.html
      फवारणी भाग २

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      🥭 आंबा लागवड लेख : १९ 🥭
      मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *Rahul khairmode Vlogs*
      *बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी शेड्युल्ड*
      *कार्य व महत्व :*
      आंबा झाडावर येणारे बहुतांश आजार हे बुरशीमुळे येत असतात. बुरशीमुळे रोप मर , फांदी मर, पानाच्या मागील बाजूला पांढरी बुरशी (मावा) , मुळ कुजणे यासारखे आजार झाडाला त्रासदायक ठरतात .तसेच झाड्यावर विविध किडी येवुन खोडावर खोडकिड , खोड पोखरणे , पान गुंडाळणे , पान खाणे ,भुरी ,मुंग्या व आळी , सुरवंट
      तुडतुडे ,मिजमाशी ,खवला व फळमाशी यासारखे विविध आजार
      किडीमुळे येतात .
      यासाठी झाडावर नियमितपणे बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करावी लागते .
      ही फवारणी रासायनिक किंवा सेंद्रिय पध्दतीनेही करता येते .
      *फवारणी कधी करावी ?*
      बुरशीनाशक फवारणी प्रत्येक महिन्याच्या पहील्या आठवड्यात करावी .
      कीटकनाशक फवारणी तिसऱ्या आठवड्यात करावी .
      *बाजारातील उपलब्ध औषधे-*
      *बुरशीनाशक* - एम ४५ , गोल्डस्टीन
      *कीटकनाशक* - क्लोरोपायरीफॉस २०% , हमला , नुआन
      *सेंद्रिय फवारणी*- गोमुत्र ,जीवामृत ,निमास्त्र ,दशपर्णी अर्क
      *बोर्डोस्प्रे -* स्टार बोर्डो गोल्ड (खोडकिडीसाठी - काव पेस्ट ही लावता येते.)
      *प्रमाण -*
      १ लिटर पाणी - २ मिली
      पंपासाठी - २५ ते ३० मिली
      *सोबत 10 मिली स्टीकर किंवा शॅंपो पाकीट मिसळावे.*
      *श्री.राहुल खैरमोडे सर*
      88 88 78 22 53
      88 55 900 300
      (whatsapp)
      🙏🙏🙏🙏🙏

    • @shirishchandrapatil4523
      @shirishchandrapatil4523 11 місяців тому

      @@rahulkhairmodevlogs2604 dhanyawad🙏

  • @anitachavan5393
    @anitachavan5393 Рік тому +1

    सर माझा प्रश्न आसा आहे की आंबा लागवड करताना जे आपण आनंतर ठेवतो 12 फूट किंवा 15 फुट ते का ठेवतो एव्हडी मोकळी जगा का सोडावी त्याचा फायदा काय असतो

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому +2

      आंबा वृक्ष प्रकारात मोडणारे झाड आहे .
      सघन / अती सघन लागवडीत कमी जागेत जास्त रोपे लावाण्याचा मानस असतो . त्यामुळे छाटणी करुन उंची कमी करुन झाडाचा घेर (कॅनोपी)वाढवला जातो .
      त्यामुळे झाड चारही बाजुला पसरते त्यामुळे ही अती ची सोडलेली जागा फार उपयुक्त ठरते .
      शिवाय त्याला जमीनीतुन पुरेसी अन्नद्रव्ये मिळावीत यासाठी मुळांची होणारी वाढ, त्याला मिळणारा सुर्यप्रकाश व खेळती हवा व कालांतराने झाडाची वाढत जाणारी उंची व घेर लक्षात घेता दोन ओळीतील सोडलेले अंतर खुप गरजेचे आहे .
      ८× १५ / १०× १२ या व इतर वर्गीय पध्दतीने लागवड केल्यास फलधारणा अधिक होते .
      अधिक माहीतीसाठी फोन करा .
      88 88 78 22 53 / 88 55 900 300

    • @anitachavan5393
      @anitachavan5393 Рік тому +2

      Answers please sir

    • @anitachavan5393
      @anitachavan5393 Рік тому +1

      माहिती खूप सुंदर आहे thanks sir

  • @jawalwadikaranchapaksha8787
    @jawalwadikaranchapaksha8787 7 місяців тому +1

    आंब्यांची छाटणी केली आहे आणि नवीन निघालेल्या अतिशय लहान फुटाव्यावर चिकट चिकट चिकागत काहीतरी आहे तर काय केल पाहिजे

  • @bhairavnathdiwane9769
    @bhairavnathdiwane9769 Рік тому +1

    Sir अती घन आंबा बागेची छाटणी कशी 12×5

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      Sending u links

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *UA-cam channel ची लिंक*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
      *How & When to prune a mango plant ?*
      *आंबा झाडांची छाटणी*
      *कधी व कशी करावी ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
      ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
      १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
      ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
      *छाटणी कधी व कशी करावी*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      *पहीली छाटणी*
      *पावसाळा संपल्यानंतर*
      ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
      दरम्यान
      *दुसरी छाटणी*
      ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
      *चैत्र पालवी यायच्या अगोदर*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
      *व*
      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *कट कसे मारावेत ?*
      👉 *सपाट व थोडे तिरके*
      🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
      *छाटणी तंत्र व काळजी*
      लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
      १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
      २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
      ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
      ४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
      ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
      ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
      ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
      अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      ua-cam.com/video/OGKQXg5rGQo/v-deo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      ua-cam.com/video/zSIv8S5nWaM/v-deo.html

  • @taraohol3
    @taraohol3 9 місяців тому +1

    🙏Background music चा आवाज कमी ठेवत जा सर, तुम्ही इतकी छान माहीती देता आणि ते Background music मुळे तुमचे कही - काही शब्द समजून येत नाही. मला वाटतंय तुम्ही सांगितलेली आणि तुमचा आवाज छान आहे, याला Background music ची गरज नाही. 🇮🇳🌷🍀🌼🌴🍋🍏🍅🥕🍆🌰👌 धन्यवाद🙏

  • @sohangaikwad3044
    @sohangaikwad3044 Рік тому +1

    सर बोर्डोपेस्ट काव पेस्ट कुठं भेटते

  • @mahadevpujari9807
    @mahadevpujari9807 17 днів тому +1

    Sir mo no sent kara

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 Рік тому +1

    सर माळरानावर आंबा फळ लागवड केली तर चालेल का जमिनीत थोड्या प्रमाणात दगड आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      पाण्याचा निचरा होणाऱ्या जमीनीत आंबा उत्तम येतो .
      मुरमाड , दगड माती मिक्स , अगदी जांभा किंवा कातळाची जमीन असली तरी आंबा लागवड करता येते .
      शक्य असल्यास मला फोन करा .
      अशा जमीनीत लागवड कशी करावी याबाबत सविस्तर माहीती सांगेन .
      88 88 78 22 53 / 88 55 900 300

    • @santoshdhatrak9475
      @santoshdhatrak9475 Рік тому +1

      सर शेत जमीन उंच ठिकाणी आहे आणि वारे जोराने वहातात आशा ठिकाणी ची जमीन चालेल का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Рік тому

      हो चालते .
      H आकाराची बांधणी
      हा video पहा

  • @anjalikulkarni1649
    @anjalikulkarni1649 Місяць тому +1

    अवजपेक्षा संगीत जास्त .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  Місяць тому

      हो दादा .. पुढील सर्व video मध्ये background music बंद केल आहे