गांडूळ खत विक्रीतून लाखो कमावणारा शेतकरी व /Vermicompost & culture making ,earning lakhs of rupees

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 5

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  8 місяців тому +2

    कृषि तंत्र निकेतन देवगड, सिंधुदुर्ग आपल्याला आमच्या विषयी सर्व माहिती मिळेल. प्रशिक्षण,साधने,साहित्य,व शेती विषयी माहिती व लिंक,जरूर पहा
    vcard.allservicepoint.com/asp_digital_visiting_card/personal?vCardId=6028
    *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
    facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
    *यू ट्युब लिंक* 👇
    ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
    *instagram* लिंक
    instagram.com/vinayak4426?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
    *श्री.विनायक ठाकूर*
    facebook.com/profile.php?id=100007896465948&mibextid=ZbWKwL
    जर गांडूळ खत निर्मिती प्रकल्प करायचा असेल किंवा शासन सबसिडी घेऊन प्रकल्प राबवायचा असेल तर या नं वर संपर्क करा.
    श्री.सुधाकर सावंत-7039169662
    श्री.विकास-(ऑफिस) 7588523978
    श्री.निलेश वळंजू-9604410063
    गांडूळ खत म्हणजे काय
    संपादन
    गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.
    गांडूळाचे प्रकार
    अ‍ॅनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आईसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. ते स्वतच्या वजनाइतके अन्न रोज खातात.
    गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती
    संपादन
    गांडूळांच्या 300हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.
    गांडूळ खाद्य
    चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, ऊसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीय खत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पद्धतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते.त्याच प्रमाणे घरातील कचरा, सांडपाणी, तसेच स्वयंपाकघरातील कचरा सुद्धा वापरता येतो.

  • @hemantsawant5385
    @hemantsawant5385 8 місяців тому +1

    खर्च किती केला युनिट उभारण्यासाठी हे सांगीतले असते तर अधिक उपयुक्त झाला असता व्हिडिओ... छान माहिती दिलीत 😊

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 8 місяців тому

    उपयुक्त माहिती.

  • @AmrutKulkarni-fq7gz
    @AmrutKulkarni-fq7gz 8 місяців тому +1

    थमनेल कसा तयार कसा करावा ?