संघाला मशीदीखाली मंदिरे शोधण्यात रस नाही असं कुठेच ते म्हणाले नाहीत पण अशी मंदिरे शोधतात त्यांच्यावर भागवतांनी टीका केली आहे. संघाला करायचं नसेल तर गप्प बसावे आपापसात चर्चा करावी पण भागवतांनी लोकांसमोर जाहीरपणे बरळू नये.
संघ ही एक सार्वजनिक संघटना आहे आणि त्याचे लक्षावधी अनुयायी देशभर असल्याने संघ ही एक capable of being known (cognizable) संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. त्यामुळे साहजिकच सघ प्रमुखांकडून देशात घडत असलेल्या प्रमुख घटनांवर 'तुमचं मत काय?' असं विचारण्याचा हक्क विविध पत्रकारांना लोकशाहीनी दिला असल्याने मोहन भागवतांनी 'मंदिर-मसजिद' या सारख्या विषयावर 'आपलं' मत मांडलं तर त्याला आपण 'बरळणं' असं कसं म्हणू शकतां? जर त्यांनी आपलं मत मांडलंच नाही तर 'आपण गप्प कां?' असंही पत्रकार म्हणतील, हल्ली पत्रकारांना कुठल्याही विषयांवर प्रश्ण विचारता येत असल्याने त्यांना कसं रोखणार? म्हणजे 'राजाची टोपी आणि माकड' या गोष्टीसारखी गत झालीये.
हेतु कितीही चांगला असला तरी .असे वक्तव्य करून नक्की काय मिळवले हा खरा मुद्दा आहे. तुमची वक्तव्य फेरफार करून नँरेटीव्ह पसरवायला मदत करतो याचा विचार नेतृत्वाने करणे आवश्यक आहे. काही वक्तव्य केली नाही तर काय नुकसान झाले असते या वर विश्लेषण अपेक्षित होत. तूमच्या सभा मेळावे यात खाजगी संभाषणात सांगणे योग्य ठरले असते. विरोधक आपल्या विरोधात काहूर उठवतात हे भान तरी वरिष्ठ नेतृत्वाला असले पाहिजे. काय बोलू नये हे पण तितकेच महत्त्वाचे आस्ते. नेमके भाजप आणि संघाचे लोक तीच चूक परत परत करून आपल्याच प्रगतीत अडथळे आणतात . जे नाराजी व्यक्त करतात ते सर्व च संघाचे शत्रू नसतात .आत्मियता पोटी आणि पोटतिडीकेने ते आपली नाराजी संयम राखून व्यक्त करतात . सुधारणा व्हावी हीच माफक अपेक्षा असते . संघ आणि मोदी यांच्यातली दरी रुंदावत आहे हे उघडपणे देत असताना. जैन काही उपदेशाचे कडू डोळ्यांचे तै बंद दाराआड देऊनही कार्यभाग साधता आला असता लेकी बोले सुने लागे या उक्तीनुसार आता लेकीचा वापर करून सुनेला टोमणे मारणे सुरू झाले आहै. यामुळेच लोकसभेत पराभव झाला . तेव्हा संघ निष्क्रीय राहिल्याने च बहुमत हुकले हे नंतरच्या विधानसभेतील प्रचंड यामुळेच सिध्द झाले .आज बहुमत नसल्यानेच शरद पवार यांच्याशी ,strategic alliance ,करण्याची वेळ आली आहे . शाफुआ ला नामोहरम करणे अवघड होऊन बसले .भाजपच्या काही धोरणांबाबत नाराजी दर्शवण्यासाठी नादात लोकसभेत भाजप. कमकुवत झाल्यावर आता इतरांची मनधरणी करावी लागत आहे . म्हणूनच भुजबळ आपल्या मागण्या रेटत आहेत . जी व्यक्ती जामिनावर बाहेर आहे त्याचा योग्य तो मानसन्मान (?) ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या पक्षाची असताना ते ओझे भाजप आपल्या डोक्यावर का घेत आहे हे अनाकलनीय आहे. तुम्ही त्याना मंत्रीमंडळात घ्यावयास तयार होतात असे जाहीर वक्तव्य भूजबळ करतात तरी तुम्ही त्याना सोडवायला पूढे येता है कशाचे द्योतक आहै
भागवतांच्या विधानाने बहुतांश संघ कार्यकर्ते दुखावले आहेत.. संघांमध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे आणि त्या लोकशाही मार्गाने त्यांना आता त्यांच्या दायितवातून मुक्त करायला हवे..
सत्यं ब्रुयात् प्रियं ब्रुयात् , न ब्रुयात् सत्यं च अप्रियं । प्रियं च नानृतं ब्रुयात् एष धर्म सनातनः ।। असे मनुनी सांगून ठेवले आहे, ते तरी पाळा...... सरसंघचालक म्हणवता स्वतःला.
विष्णू शंकर जैन व त्यांचे पिता जिवापाड त्रास घेत आहेत. त्यांचे कौतूक करण्याचे सोडून ते नेता बनत आहेत त्या पितापुत्रांवर रोख असल्याचे हिंदी युट्युबर्सचे मत आहे.
एक तर वक्तव्य स्वतःचे आहे असे म्हणायला हवे आधी कारण ती संघाची अधिकृत लाईन नाही असे वाटते कारण देवेंद्र फडणवीस यांनी धतनायुधाचे आवाहन केले होते. त्यावर इतक्यातच थंड पाणी का ओतले जात शे? आणि सरसंघचालकांनी पुन्हा पुन्हा ते वक्तव्य देऊन री ओढणे हे असे म्हणाल्यासारखे वाटते: 1) मे सांगतोय ते ऐका 2) ऑर तुम्ही हिंदू बहिरे किंवा बुद्ध आहेत का असे करत सुटायला
बरोबर! मी अनेक वर्षे गेलोय शाखेत. गाणी (पद्य ) कोणी लिहिलीत हे नाव लिहायचं नाही, कोणाचं कौतुक करायचं नाही, भाषण ((बौद्धिक) नंतर टाळ्या वाजवयाच्या नाहीत असे ' निःस्वार्थ' लोक ना हे? मग लोकसभा निवडणुकीआधी नुसतं नड्डा म्हणाले आम्हाला फारशी गरज म्हटल्यावर इतके काय झोम्बले ? निस्वार्थी पणे आपले काम केले का नाही?
बाकी चे लोक काय करत होते,वोट धायला हिंदू तैयार नाहीं पिकनिक वर जातो किंवा घरातून निघत नाही,हे प्रत्येक हिंदू चे कार्य आहे, एकट्या आर एस एस चे नाही @@Gaganvihang
@@associateddistdhule5608बरोबर पण मी ते न केल्याबद्दल संघाला दोष दिला नाही तर केवळ नड्डा च्या वक्तव्यामुळे न केल्यामुळे दिला. नाहीतर विधानसभेसाठी संघाने ते काम केले ( केले असेल) तर त्याचा आदरच आहे.
नमस्कार, अनयजी आपण संघाच्या मूल संकल्पणेकडे आमचे लक्ष वेधून घेतले. जे द्विधा मनस्थितीत असणाऱ्या स्वयं सेवकांच्या लक्षात आणून दिले त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद. स्वयंसेवाकानी हे समजून घेणे आवश्यक आहे.
दुर्दैवाने संघाच्या वरिष्ठ व्यक्तींना असे वाटते की जगातले सगळे काही आपल्याला कळते. त्यांच्या वयाचा आदर करूनही नाइलाजाने म्हणावे लागते आहे की मोहन भागवतांचे वक्तव्य हे आचरटपणाचेच आहे.
अनय जी, एक विचार आपण जरुर विचारात घ्या. रामजन्म भूमीच्या चळवळीतून समाज इतका जागृत झाला आहे की भागवतांच्या वक्तव्याचा सुद्धा समाचार सामान्य हिंदु घेऊ लागला आहे. कधी कधी उलट (नकारात्मक) बोलल्यानेसुद्धा जे काम होतं ते सरळ बोलून होत नाही. तो विचार या मागे नसेल कशावरून? आज आपल्या गावातल्या आपले पारंपारिक मंदिर आपले असावे ही भावना वाढलेली आहे. ही अतिशय मोठी झेप आपण घेतली आहे. जेव्हा विचार जमिनीपर्यंत पोहोचतो, तेव्हा ती जबाबदारी सामान्य माणूस घेतो. माझ्यामते ही बाब खूप स्पष्ट होत आहे. हीच तर आवश्यकता आहे. शिवाजीने पहिले काही किल्ले घेतले पण मग जेव्हा सामान्य मावळे घरदाराचा विचार न करता ही "माझे" कर्तव्य आहे, असे जाणून लढू लागला, तेव्हा परकीयांची पीछेहाट झाली. शिवाजीच्या मृत्यूने त्यात यत्किंचितही फरक पडला नाही. हेच शिवाजीचे सर्वात मोठे श्रेय आहे. निशाण पडले की पळून न जाता दुपटीने वार करून निशाण पुन्हा उभे करायचे ही नवी वृत्ती सैन्यात आली. आपण या परिपेक्षातून अवश्य विचार मांडावेत. 🙏🏽🙏🏽🙏🏽
संघातील लोक त्यांच्या परिघा बाहेरील लोकांशी कधी बोलणार ? हा खरा प्रश्न आहे. कायम संघाची भूमिका आम्हाला सगळे कळते , आम्ही हे करणार, हे करणार नाही अशी असते. आणि ते चिंताजनक आहे . विविध क्षेत्रातील ज्या महनीय व्यक्ती आहेत त्यांना दुय्यम स्थान त्यांच्या कडून दिले जाते व म्हणून लोक दुखावतात . मोहन भागवत अनेकदा वादग्रस्त विधाने करत असतात त्यामुळेही त्यांना टीकेला सामोरे जावे लागते . शिवाय भाजप व संघ यांच्यात एक संघर्ष आहेच .
भागवतांचे वक्तव्य योग्य, सूज्ञ आणि व्यावहारिक आहे. परंतु पांडवांनी फक्त ५ गावे मागितली होती. तीही नाकारण्याचा उद्दामपणा केला आणि मग महाभारत घडले. हा इतिहास आहे. बाकी सांगायची गरज नसावी.
शाखेत जायला पाहिजे असे नाही मनात राष्ट्रा बद्दल नितांत प्रेम हिंदु धर्माबद्दल प्रेम म्हणजेच संघ आता मोहन भागवतांनी निवृत्त व्हावे सर्व हिंदुना आपले विचार सांगू नये त्यातून त्यांच्याबद्दल मत कलुषित होईल ते होउ न देता निघतात व्हावे हे योग्य
मुळात हा शब्द 'हिंदु' हा भारतीय उपखंडातील लोकांचं वर्णन जगातील इतर लोकांनी करताना संबोधलेला आहे. धर्म संपुर्ण जगात एकच आहे तो सनातन नावाने प्रचलित होता कालांतराने या धर्मालाच हिंदु नाव वापरले जाऊ लागले व त्याला अस्तित्वात नसलेली लवचिकता द्यायचा प्रयत्न सातत्याने स्वकीयांकडुनच केला गेला जातोय. शास्त्रशुद्ध गोष्टींना अंधश्रद्धा ठरवत पाश्चात्यांच्या विध्वंसकारी विज्ञानाचा आरसा दाखवला गेला तो मागच्या पिढ्यांमधील काही मॅकोलेच्या हळकुंडाने पिवळे झालेल्या नवशिक्षितांना साक्षात भगवंताने दिलेला वर मिळाल्यासारखा जाणवला.काळ पुढे सरकला पुढच्या पिढीने या गोष्टींचा उलगडा सुरु करून आज संपुर्ण सत्य जगासमोर आणण्यासाठी प्रशंसनीय काम केलेलं आहे 🙏🚩
You have done a great job. I saw many stalwarts like Omkar Choudhary and Jaipur Dialog Dixit have made many acceptable remarks on Mohan Bhagwats statements which are not proper at all. You have perfectly interpreted Dr Bhagwat's approach. I congratulate you for that. 👍👍🙏
निर्भया प्रकरण घडलं तेंव्हा भागवतांनी लक्ष्मण रेषा ओलांडली तर रावण येणार अशी प्रतिक्रिया दिली होती व गदारोळ झाला होता. त्यांच्या दोन्ही प्रतिक्रिया बरोबर असल्या तरी वेळ मात्र चुकीची होती.
संघचालक ना एखादी गोष्ट करायची नसेल तरी आपणच हिंदूंचे कैवारी असल्यासारखी विधाने मुळीच करू नयेत. तुमचे विचार हे संघाच्या बैठकीतच बोलावेत. बरेचदा सरसंघचालकांच्या विधानातून देशाच्या नेत्यांबद्दल असूया, नकारात्मकता दिसते. त्यांना देश चालवू तुम्ही फक्त संघ चालवावा. मणिपूरमध्ये काय करावे असले सल्ले देवू नयेत ही विनंती. जनतेचा मोदी योगी शहांवर पूर्ण विश्वास आहे
अन्यजी , धन्यवाद! तुमही केलेले विश्लेषण पटण्यासारखे आहे. भागवत जींचा व्हीडिओ बघून बरेच जण अस्वस्थ झाले होते, तुमच्या ह्या व्हीडिओ मुळे गैरसमज दूर होतील
तुम्ही भागवतांच्या बोलण्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करीत आहात. भागवताना आपला माणूस गडकरी पंतप्रधान झाला नाहीं याचे दुःख आहे, त्यामुळे ते अशी गरळ ओकतात. त्यांनी योगीनाही अपशकुन केला होता.
Very very very good statement.nice presentation God bless you.rss chief what is told is 100 percent correct.rss concentrated on kanshi viswanath and Shri Krishna bhumi and no other else.those who wants other surveys let them do.but RSS should consertrated on kashi viswanath and Shri Krishna jsnmabhmi only.jai Hind jai bhole nath.
भागवत कारण नसताना अवेळी तोंड उचकवतात . 2015 ला बिहार विधानसभा निवडणुकीत दोन दिवस आधी अकारण आरक्षणाबाबत तोंड उघडल आणि मोदींच्या मेहनतीवर पाणी ओतल होत जेव्हा भाजप बिहार मध्ये सत्तेत यायची शक्यता होती ते दोन दिवस भाजप नेत्याना ते महत्त्वाचे दोन दिवस त्याचे खंडन करण्यात गेली नी भाजप सत्तेपासून जी दूर गेली ती आजतागायत . नितीशकुमार वर अवलंबून रहाव लागतय .
सरसंघचालकांनी असे वक्तव्य करण्याची गरज नाही. हिंदूंच्या भावनाशी दुखवू नये. याचा समस्त हिंदू नागरिक जाहिर निषेध करतो. हिंदूस्थान हिंदूचा आहे आणि हिंदूचाच राहिल यात कोणतेही दुमत नाही.
2013 ला मोहनजी आमच्या घरा शेजारील संघ प्रचरकाच्या घरी आले होते, जवळून बघायचा अनुभव आला, त्यांच्या सोबत आलेले महानुभाव आमच्या घरी रात्री भोज साठी होते. शाखेचा संबंध तुमचा आणि माझा सेम. बाकी माझा संघाचा अनुभव फारसा चांगला नाही. मी शक्यतो निंदा टाळतो मग ती कोणाची असो. पण माझ्या संपर्कात आलेल्या संघातील लोकांनी माझे मन जास्तच कलुशित केले. कदाचित चांगल्या व्यक्ती माझ्या भाग्यात नसतील. पण एकंदरीत मी संघा पासुन सुरक्षित अंतरावर राहतो. बाकी मी कट्टर संघी आहे अशी चर्चा फक्त अडनावाने होते, आणि हे मी कधी टाळू नाही शकलो. पण अजून हि संघ माझा साठी विश्वासार्ह होऊ नाही शकला याचा खेद वाटतो मलाच.
@prashantwasalwar1165 जे तथाकथित शेजारील प्रचारक आहेत त्यांना मी एकदिवस स्पश्ट सर्व शंका सांगितल्या पण ते कोणते हि स्पश्टीकरण आज हि करू शकले नाहीत. असो हे ते ठिकाण नाही जिथं मी या गोष्टी व्यक्त करू. कोणताही एक पक्ष, धर्म, देश थोडक्यात मानवी संगठन हे पूर्ण चांगल्या किंवा पूर्ण वाईट लोकांचे नसुन संमिश्र असणार. पण माझ्या दुर्दैवाने संघाच्या चांगल्या, निस्वार्थी देशप्रेमी लोकांशी माझा कधी संबंध नाही येऊ शकला जे मी शोधत होतो. आणि मला थोडी फार अपेक्षा संघाकडून च होति त्या काळी. माणूस म्हटलें की चालायचेच. पण एक गोष्ट आयुष्यात चांगली झाली की त्यामुळे मी आयुष्यात कधीही कोणत्याही मानवी संघटनेचा भाग नाही झालो कधीच .
मी ही ते वक्तव्य ऐकून चाटच पडलो. रा स्व संघाच्या शिस्ती बाहेरचं हे वक्तव्य आहे ते खेदजनक आहे. अती बोलण्याच्या नादात मनुष्य नको ते ही बोलून जातो हे सर्वविदित आहे. असं व्हायला नको होतं.
हिंदूना offensive strategy शिवाय पर्याय नाही आहे..त्यांच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे.. ह्या आक्रमक हिंदू द्वेष्ट्या धर्मांध लोकांना दुसरी भाषा कळत नाही.. भय बिन होय ना प्रीती.. संघा ने आता तरी नेतृत्व बदलावे..
मोहन भागवतांच आता वय झालय,यांना आता वानप्रस्थाश्रम गरजेचा आहे,हे गेल्या काही वर्षापासून आशी लिब्रांडु वक्तव्य करायला लागले आहेत.ह्यांचा असा गैरसमज आहे की आपण हिंदूमूळे नाही तर हिंदू आपल्यामूळे आहेत.संघाने यांना लवकरात लवकर नारळ द्यावा,अन्यथा आपला पर्याय निर्माण करावाच लागेल.
संघाला मशीदीखाली मंदिरे शोधण्यात रस नाही असं कुठेच ते म्हणाले नाहीत पण अशी मंदिरे शोधतात त्यांच्यावर भागवतांनी टीका केली आहे. संघाला करायचं नसेल तर गप्प बसावे आपापसात चर्चा करावी पण भागवतांनी लोकांसमोर जाहीरपणे बरळू नये.
संघ ही एक सार्वजनिक संघटना आहे आणि त्याचे लक्षावधी अनुयायी देशभर असल्याने संघ ही एक capable of being known (cognizable) संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. त्यामुळे साहजिकच सघ प्रमुखांकडून देशात घडत असलेल्या प्रमुख घटनांवर 'तुमचं मत काय?' असं विचारण्याचा हक्क विविध पत्रकारांना लोकशाहीनी दिला असल्याने मोहन भागवतांनी 'मंदिर-मसजिद' या सारख्या विषयावर 'आपलं' मत मांडलं तर त्याला आपण 'बरळणं' असं कसं म्हणू शकतां? जर त्यांनी आपलं मत मांडलंच नाही तर 'आपण गप्प कां?' असंही पत्रकार म्हणतील, हल्ली पत्रकारांना कुठल्याही विषयांवर प्रश्ण विचारता येत असल्याने त्यांना कसं रोखणार? म्हणजे 'राजाची टोपी आणि माकड' या गोष्टीसारखी गत झालीये.
अगदी बरोबर, मलाही हेच म्हणायचं आहे.कधी कधी नको ते बरळतात भागवत !
संघ आणि भाजपला एकमेकांची मते पटत नसल्यास त्यावर आपसात चर्चा करून प्रश्न सोडवावा,.जाहीरपणे बोलून माकडांच्या हातात कोलीत देऊ नये,ही नम्र विनंती!🙏
अगदी बरोबर.. मुस्लिमांनी आपली भूमिका बदलली आहे. पाकिस्तान यांना देण्यात आल्यानंतर हे भाडेकरू.. आमची मूळ जी मंदिर ती तर देण्याची दानत आहे..
Exactly, well said.
अगदी बरोबर.
बिलकुल गरज नव्हती...... सरसंघचालक म्हणजे संघ नव्हे..... एकीकडे मोदी जी आणि योगी जी निराळा नारा लावताहेत अशा वेळी असे वक्तव्य निषेधार्ह आहे.
Yes absolutely right 🙏
तोकडे समर्थन. त्यांना विधान करण्याची गरज काय होती?ह्याला अवसानघातकीपणा म्हणतात. ही त्यांची दुसरी वेळ आहे. सरसंघचालक देखील मर्यादित कालावधीसाठी असावा.
कालावधी मर्यादित असावा 101%
गडकरी, चंद्रकांत पाटील व सरसंघचालक बर्याचदा सरकारला अडचणीत आणणारे वक्तव्य करतात.
पूर्ण vdo पाहिला का तुम्ही दोघांनी ?
पूर्वी काळी हिंदू राजांची हीच गत झाली.. कोणत्याही चैनल भागवत असल्या मुलाखती देऊ नये..
हेतु कितीही चांगला असला तरी .असे वक्तव्य करून नक्की काय मिळवले हा खरा मुद्दा आहे.
तुमची वक्तव्य फेरफार करून नँरेटीव्ह पसरवायला मदत करतो याचा विचार नेतृत्वाने करणे आवश्यक आहे.
काही वक्तव्य केली नाही तर काय नुकसान झाले असते या वर विश्लेषण अपेक्षित होत.
तूमच्या सभा मेळावे यात खाजगी संभाषणात सांगणे योग्य ठरले असते.
विरोधक आपल्या विरोधात काहूर उठवतात हे भान तरी वरिष्ठ नेतृत्वाला असले पाहिजे.
काय बोलू नये हे पण तितकेच महत्त्वाचे आस्ते.
नेमके भाजप आणि संघाचे लोक तीच चूक परत परत करून आपल्याच प्रगतीत अडथळे आणतात .
जे नाराजी व्यक्त करतात ते सर्व च संघाचे शत्रू नसतात .आत्मियता पोटी आणि पोटतिडीकेने ते आपली नाराजी संयम राखून व्यक्त करतात .
सुधारणा व्हावी हीच माफक अपेक्षा असते .
संघ आणि मोदी यांच्यातली दरी रुंदावत आहे हे उघडपणे देत असताना. जैन काही उपदेशाचे कडू डोळ्यांचे तै बंद दाराआड देऊनही कार्यभाग साधता आला असता
लेकी बोले सुने लागे या उक्तीनुसार आता लेकीचा वापर करून सुनेला टोमणे मारणे सुरू झाले आहै.
यामुळेच लोकसभेत पराभव झाला .
तेव्हा संघ निष्क्रीय राहिल्याने च बहुमत हुकले हे नंतरच्या विधानसभेतील प्रचंड यामुळेच सिध्द झाले .आज बहुमत नसल्यानेच शरद पवार यांच्याशी ,strategic alliance ,करण्याची वेळ आली आहे .
शाफुआ ला नामोहरम करणे अवघड होऊन बसले .भाजपच्या काही धोरणांबाबत नाराजी दर्शवण्यासाठी नादात लोकसभेत भाजप. कमकुवत झाल्यावर आता इतरांची मनधरणी करावी लागत आहे . म्हणूनच भुजबळ आपल्या मागण्या रेटत आहेत .
जी व्यक्ती जामिनावर बाहेर आहे त्याचा योग्य तो मानसन्मान (?) ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या पक्षाची असताना ते ओझे भाजप आपल्या डोक्यावर का घेत आहे हे अनाकलनीय आहे.
तुम्ही त्याना मंत्रीमंडळात घ्यावयास तयार होतात असे जाहीर वक्तव्य भूजबळ करतात तरी तुम्ही त्याना सोडवायला पूढे येता है कशाचे द्योतक आहै
भागवतांच्या विधानाने बहुतांश संघ कार्यकर्ते दुखावले आहेत.. संघांमध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे आणि त्या लोकशाही मार्गाने त्यांना आता त्यांच्या दायितवातून मुक्त करायला हवे..
अनय जी भागवत यांची अलीकडची वक्तव्य हिंदू विरोधी बेजबाबदार व हिंदूंचा अवसान घात करणारी असू नयेत. धन्यवाद.
ते दिल्लीत मशिदीत पण जातात
@@swapnapandit478 faltu ahe to
they are right. Anay's videos are good but he is infatuated with Bhagwat
@@chandrashekharmhatre3900 @swapnapandit478 हळूहळू मोहोब्बत की दुकान मध्ये दिसायला लागतील भागवत.
सत्यं ब्रुयात् प्रियं ब्रुयात् , न ब्रुयात् सत्यं च अप्रियं । प्रियं च नानृतं ब्रुयात् एष धर्म सनातनः ।। असे मनुनी सांगून ठेवले आहे, ते तरी पाळा...... सरसंघचालक म्हणवता स्वतःला.
विष्णू शंकर जैन व त्यांचे पिता जिवापाड त्रास घेत आहेत. त्यांचे कौतूक करण्याचे सोडून ते नेता बनत आहेत त्या पितापुत्रांवर रोख असल्याचे हिंदी युट्युबर्सचे मत आहे.
संघाचे आम्ही दोन पिढ्या स्वयंसेवक आहोत पण जेव्हा भागवत बोलतात तेंव्हा भीती वाटते.
मग सरसंघचालक बदला जो विचार पूर्वक बोलेल
त्यांना सर्व स्वयंसेवक यांनी लेखी कळवावे पत्र लिहून
खरंय सर्व स्वयंसेवकांनी भागवताना आपली नाराजी कळवावी
सर संघ चालक अकारण वादग्रस्त वक्तव्य टाळायला हवं होतं.
एक तर वक्तव्य स्वतःचे आहे असे म्हणायला हवे आधी कारण ती संघाची अधिकृत लाईन नाही असे वाटते कारण देवेंद्र फडणवीस यांनी धतनायुधाचे आवाहन केले होते. त्यावर इतक्यातच थंड पाणी का ओतले जात शे?
आणि सरसंघचालकांनी पुन्हा पुन्हा ते वक्तव्य देऊन री ओढणे हे असे म्हणाल्यासारखे वाटते:
1) मे सांगतोय ते ऐका
2) ऑर तुम्ही हिंदू बहिरे किंवा बुद्ध आहेत का असे करत सुटायला
भागवतांनी आता निवृत्त व्हावे आणि पुढील पिढीला कार्य सोपवावे..
त्यांचा इगो लोकसभेला भोवला..
बरोबर! मी अनेक वर्षे गेलोय शाखेत. गाणी (पद्य ) कोणी लिहिलीत हे नाव लिहायचं नाही, कोणाचं कौतुक करायचं नाही, भाषण ((बौद्धिक) नंतर टाळ्या वाजवयाच्या नाहीत असे ' निःस्वार्थ' लोक ना हे? मग लोकसभा निवडणुकीआधी नुसतं नड्डा म्हणाले आम्हाला फारशी गरज म्हटल्यावर इतके काय झोम्बले ? निस्वार्थी पणे आपले काम केले का नाही?
बाकी चे लोक काय करत होते,वोट धायला हिंदू तैयार नाहीं पिकनिक वर जातो किंवा घरातून निघत नाही,हे प्रत्येक हिंदू चे कार्य आहे, एकट्या आर एस एस चे नाही @@Gaganvihang
@@associateddistdhule5608बरोबर पण मी ते न केल्याबद्दल संघाला दोष दिला नाही तर केवळ नड्डा च्या वक्तव्यामुळे न केल्यामुळे दिला. नाहीतर विधानसभेसाठी संघाने ते काम केले ( केले असेल) तर त्याचा आदरच आहे.
पण तेच होत नाही कारण हिंदु नेहमी विभागलाय हो 🙏@@associateddistdhule5608
@@associateddistdhule5608aaplya lokana evdhe sudha kalat nahiye
Kiti shikvayache
नमस्कार, अनयजी आपण संघाच्या मूल संकल्पणेकडे आमचे लक्ष वेधून घेतले. जे द्विधा मनस्थितीत असणाऱ्या स्वयं सेवकांच्या लक्षात आणून दिले त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद. स्वयंसेवाकानी हे समजून घेणे आवश्यक आहे.
दुर्दैवाने संघाच्या वरिष्ठ व्यक्तींना असे वाटते की जगातले सगळे काही आपल्याला कळते. त्यांच्या वयाचा आदर करूनही नाइलाजाने म्हणावे लागते आहे की मोहन भागवतांचे वक्तव्य हे आचरटपणाचेच आहे.
१०० % सहमत
अगदी खरं आहे
सरसंघचालक मोहन भागवत चुकीचे बोलले आम्ही हिंदू विरोधी प्रेम त्यांच्या लक्षात आला आहेत पण सर्व हिंदूंनी योगी आदित्यनाथ जी च्या पाठीमागे उभे राहावे
अनय जी, एक विचार आपण जरुर विचारात घ्या.
रामजन्म भूमीच्या चळवळीतून समाज इतका जागृत झाला आहे की भागवतांच्या वक्तव्याचा सुद्धा समाचार सामान्य हिंदु घेऊ लागला आहे.
कधी कधी उलट (नकारात्मक) बोलल्यानेसुद्धा जे काम होतं ते सरळ बोलून होत नाही. तो विचार या मागे नसेल कशावरून?
आज आपल्या गावातल्या आपले पारंपारिक मंदिर आपले असावे ही भावना वाढलेली आहे. ही अतिशय मोठी झेप आपण घेतली आहे.
जेव्हा विचार जमिनीपर्यंत पोहोचतो, तेव्हा ती जबाबदारी सामान्य माणूस घेतो. माझ्यामते ही बाब खूप स्पष्ट होत आहे. हीच तर आवश्यकता आहे. शिवाजीने पहिले काही किल्ले घेतले पण मग जेव्हा सामान्य मावळे घरदाराचा विचार न करता ही "माझे" कर्तव्य आहे, असे जाणून लढू लागला, तेव्हा परकीयांची पीछेहाट झाली. शिवाजीच्या मृत्यूने त्यात यत्किंचितही फरक पडला नाही. हेच शिवाजीचे सर्वात मोठे श्रेय आहे. निशाण पडले की पळून न जाता दुपटीने वार करून निशाण पुन्हा उभे करायचे ही नवी वृत्ती सैन्यात आली.
आपण या परिपेक्षातून अवश्य विचार मांडावेत.
🙏🏽🙏🏽🙏🏽
मोहन भगवंतांनाच संघ संस्काराची आवश्यकता आहे.
अशा परिस्थितीत चुप राहणे योग्य. नरो वा कुंजरोवा.
सरसंघ चालकांनी जबाबदारीने बोलायला पाहिजे. वादग्रस्त विधाने टाळवीत.
विश्लेषण फार उत्तम केलं आहे मी स्वतः सहमत आहे.
सध्याचा जनमानस पाहता भागवतांनी उघडपणे हे विधान करायचं टाळायला हवं होतं. तसंही संघ आपलं काम करतच रहातो.
संघातील लोक त्यांच्या परिघा बाहेरील लोकांशी कधी बोलणार ? हा खरा प्रश्न आहे. कायम संघाची भूमिका आम्हाला सगळे कळते , आम्ही हे करणार, हे करणार नाही अशी असते. आणि ते चिंताजनक आहे . विविध क्षेत्रातील ज्या महनीय व्यक्ती आहेत त्यांना दुय्यम स्थान त्यांच्या कडून दिले जाते व म्हणून लोक दुखावतात . मोहन भागवत अनेकदा वादग्रस्त विधाने करत असतात त्यामुळेही त्यांना टीकेला सामोरे जावे लागते . शिवाय भाजप व संघ यांच्यात एक संघर्ष आहेच .
असं मत सर संघ चालकांनी वेक्त करायला नको होते
नाही पटलं तर गप्प बसायचे
बरोबर
अगदी बरोबर
एकदम बरोबर
खुरच सुंदर विवेचन ,पध्दतरीत्या विचारांची मांडणी केली आहें
अत्यंत योग्य विश्लेषणया निमित्ताने संघ स्वयंसेवकांचे सुद्धा प्रबोधन झाले विषयांमध्ये स्पष्टता आली.
अतिशय चुकीचे विधान होते.
आजचे विश्लेषण खूप छान होते लोकांनी समजून घेण्याची गरज आहे
भाजप आणि संघ सर्वांनीच विचारपूर्वक बोलावे
अनयजी आपण उपयुक्त माहिती दिली आहे. विषयाची मांडणी उत्कृष्ट केली आहे.
धन्यवाद.
भाजपा आणि संघ यांच्यात समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे
अनयजी,
सर्वोत्तम विश्लेषण!
तुम्ही अभ्यासपूर्ण, सुयोग्य आणि अत्यंत समतोल विचार मांडता. तुम्ही हे काम करत राहिलेच पाहिजे!👍
Your analysis is logical and correct.
अतिशय समर्पक व समतोल विवेचन!
आ.मोहनजींच्या वक्तव्याचे अत्यंत योग्य विवरण आपण केल्याबद्दल आपले आभार.
सरसंघचालक मोहन भागवत हे नेहमी आपलं वेगळेपण दाखवून लक्ष वेधून घेण्यासाठी अशी काही वक्तव्य करत असतात.
प्रतिपक्षाच्या कोलित देऊ नये एवढेच
भागवतांचे वक्तव्य योग्य, सूज्ञ आणि व्यावहारिक आहे.
परंतु पांडवांनी फक्त ५ गावे मागितली होती. तीही नाकारण्याचा उद्दामपणा केला आणि मग महाभारत घडले. हा इतिहास आहे. बाकी सांगायची गरज नसावी.
मोहन भागवत यांनी आता रिटायर व्हावे..... मी पण संघ कार्य करतो पण भागवत यांचा कार्य काल समाधान कारक वाटत नाही....
सर संघ चालकाची गेल्या काही महिन्यांतील प्रतिक्रिया पाहिली असता त्यांना सक्रिय राजकारणात यायचा मोह झालेला वाटतो
सक्रिय राजकारण 😂😂😂😂 . जरा भानावर या सैरभैर होउ नका .
कालचा संजय दिक्षित यांचा व्हिडीओ नक्की पहा.
त्यांना मोदी शाह वरती सोनिया गांधी सारखा कंट्रोल ठेवण्याची इच्छा आहे, पण शक्य होत नाहीं. त्यामुळे असा राग काढतात .
मोहन भागवत सर आता राजकीय नेते सारखे बोलत आहे... त्यांच्या या वक्तव्यसाठी आलोचना होणे स्वाभाविक आहे
शाखेत जायला पाहिजे असे नाही मनात राष्ट्रा बद्दल नितांत प्रेम हिंदु धर्माबद्दल प्रेम म्हणजेच संघ आता मोहन भागवतांनी निवृत्त व्हावे सर्व हिंदुना आपले विचार सांगू नये त्यातून त्यांच्याबद्दल मत कलुषित होईल ते होउ न देता निघतात व्हावे हे योग्य
संघाला पुन्हा गर्तेत लोटण्याचा प्रयास
मुळात हा शब्द 'हिंदु' हा भारतीय उपखंडातील लोकांचं वर्णन जगातील इतर लोकांनी करताना संबोधलेला आहे. धर्म संपुर्ण जगात एकच आहे तो सनातन नावाने प्रचलित होता कालांतराने या धर्मालाच हिंदु नाव वापरले जाऊ लागले व त्याला अस्तित्वात नसलेली लवचिकता द्यायचा प्रयत्न सातत्याने स्वकीयांकडुनच केला गेला जातोय. शास्त्रशुद्ध गोष्टींना अंधश्रद्धा ठरवत पाश्चात्यांच्या विध्वंसकारी विज्ञानाचा आरसा दाखवला गेला तो मागच्या पिढ्यांमधील काही मॅकोलेच्या हळकुंडाने पिवळे झालेल्या नवशिक्षितांना साक्षात भगवंताने दिलेला वर मिळाल्यासारखा जाणवला.काळ पुढे सरकला पुढच्या पिढीने या गोष्टींचा उलगडा सुरु करून आज संपुर्ण सत्य जगासमोर आणण्यासाठी प्रशंसनीय काम केलेलं आहे 🙏🚩
You have done a great job. I saw many stalwarts like Omkar Choudhary and Jaipur Dialog Dixit have made many acceptable remarks on Mohan Bhagwats statements which are not proper at all. You have perfectly interpreted Dr Bhagwat's approach. I congratulate you for that. 👍👍🙏
माकडाच्या हातात कोलीत देऊ नये
निर्भया प्रकरण घडलं तेंव्हा भागवतांनी लक्ष्मण रेषा ओलांडली तर रावण येणार अशी प्रतिक्रिया दिली होती व गदारोळ झाला होता.
त्यांच्या दोन्ही प्रतिक्रिया बरोबर असल्या तरी वेळ मात्र चुकीची होती.
माननीय संघचालक मोहन भागवत संघाचे प्रमुख आहेत याचा अर्थ समस्त हिंदू जनमानसाचे सम्राट आहेत असाही होत नाही...
I liked this Video very much. We must think very Deeply on this
खूप छान बोलता. तुमच्या मताशी सहमत आहे .फार छान विश्लेषण केलेत .आवडले❤❤
Very thoughtful and long foreseeing analysis. I like yr thoughful analysis on diverse topics. Congratulations. Congratulations
अतिशय योग्य व परखड विचार ..
प्रत्येक चांगल्या गोष्टीला ... दोन बाजू आहेत
संघचालक ना एखादी गोष्ट करायची नसेल तरी आपणच हिंदूंचे कैवारी असल्यासारखी विधाने मुळीच करू नयेत. तुमचे विचार हे संघाच्या बैठकीतच बोलावेत. बरेचदा सरसंघचालकांच्या विधानातून देशाच्या नेत्यांबद्दल असूया, नकारात्मकता दिसते. त्यांना देश चालवू तुम्ही फक्त संघ चालवावा. मणिपूरमध्ये काय करावे असले सल्ले देवू नयेत ही विनंती. जनतेचा मोदी योगी शहांवर पूर्ण विश्वास आहे
गरज नव्हती हे खरं आहे.
उत्तम विचार व विश्लेषण केलंय, सहमत
सरसंघचालकांची भूमिका वास्तववादी होय. अनयजी, तुम्ही योग्य विश्लेषण केलेत..
अनयजी,खूप समतोल आणि विचार पूर्वक बोललात...संघ समजणे ही निरंतर प्रक्रिया असते..त्यात हा आपला प्रयत्न खूप उल्लेखनीय वाटला...
अगदी बरोबर 👍
अतीशय उत्तम विवेचन! 🙏
खूप चांगले विश्लेषण. अभिनंदन.
सभी सनातनी, हिन्दू राष्ट्र की मांग करें।
अन्यजी , धन्यवाद! तुमही केलेले विश्लेषण पटण्यासारखे आहे. भागवत जींचा व्हीडिओ बघून बरेच जण अस्वस्थ झाले होते, तुमच्या ह्या व्हीडिओ मुळे गैरसमज दूर होतील
संघाला कोणत्या दिशेने जायच आहे त्यांनी त्या दिशेने जरुर जावं तसेच ज्यांना मंदिर ज्यांना शोधायच त्यांनी त्या दिशेने जाव.प्रतिक्रीया द्यायची काय गरज?
अतिशय उत्तम मुद्दे.
ते प्रत्येक वेळी असं बोलतात त्यांना मोदींची असूया वाटते असं बऱ्याच जाहीर बोलण्यातून दिसून येतं
वैचारिक खुलेपणा म्हणजे सत्व गमवणे असे असूच शकत नाही, अनयजी 🙏
खूप आवडले विश्लेषण.आभार.
तुम्ही भागवतांच्या बोलण्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करीत आहात.
भागवताना आपला माणूस गडकरी पंतप्रधान झाला नाहीं याचे दुःख आहे, त्यामुळे ते अशी गरळ ओकतात. त्यांनी योगीनाही अपशकुन केला होता.
Very very very good statement.nice presentation God bless you.rss chief what is told is 100 percent correct.rss concentrated on kanshi viswanath and Shri Krishna bhumi and no other else.those who wants other surveys let them do.but RSS should consertrated on kashi viswanath and Shri Krishna jsnmabhmi only.jai Hind jai bhole nath.
अनयजी तुमचे मत आमच्या करता महत्त्वाची आहे कारण तुम्ही आमचे बिना election चे प्रतिनिधि आहात.
अप्रतिम विषय मांडलाय आपण . चांगले अंजन पडलय डोळ्यात .
सर्वोत्तम विश्लेषण...... अनयजी खूप खूप खूप धन्यवाद 🙏
भागवत कारण नसताना अवेळी तोंड उचकवतात . 2015 ला बिहार विधानसभा निवडणुकीत दोन दिवस आधी अकारण आरक्षणाबाबत तोंड उघडल आणि मोदींच्या मेहनतीवर पाणी ओतल होत जेव्हा भाजप बिहार मध्ये सत्तेत यायची शक्यता होती ते दोन दिवस भाजप नेत्याना ते महत्त्वाचे दोन दिवस त्याचे खंडन करण्यात गेली नी भाजप सत्तेपासून जी दूर गेली ती आजतागायत . नितीशकुमार वर अवलंबून रहाव लागतय .
उत्तम विवेचन 👍
Anay ji very balanced approach of analysis thanks for video.
There should not radical Hindus
सरसंघचालकांनी असे वक्तव्य करण्याची गरज नाही. हिंदूंच्या भावनाशी दुखवू नये. याचा समस्त हिंदू नागरिक जाहिर निषेध करतो.
हिंदूस्थान हिंदूचा आहे आणि हिंदूचाच राहिल यात कोणतेही दुमत नाही.
योग्य विस्लेशण आणि अगदीच योग्य.
नुसते वय वाढले आहे अक्कल काडीची नाही. या मोहन भागवत यांचा ताबडतोबीने राजीनामा घ्यावा
मोहनराव भागवत सारख्या सरसंघचालकावर हींदुनी विश्वास कसा व का ठेवायचा? ते धार्मिक नेते नाहीत व त्याचे वक्तव्य हिंदू/सनातन द्रोहीच आहे
फारच सुंदर स्पष्टीकरण
आमची माती आमची माणसं करतात ते बरोबर आहे 😊
2013 ला मोहनजी आमच्या घरा शेजारील संघ प्रचरकाच्या घरी आले होते, जवळून बघायचा अनुभव आला, त्यांच्या सोबत आलेले महानुभाव आमच्या घरी रात्री भोज साठी होते. शाखेचा संबंध तुमचा आणि माझा सेम. बाकी माझा संघाचा अनुभव फारसा चांगला नाही. मी शक्यतो निंदा टाळतो मग ती कोणाची असो. पण माझ्या संपर्कात आलेल्या संघातील लोकांनी माझे मन जास्तच कलुशित केले. कदाचित चांगल्या व्यक्ती माझ्या भाग्यात नसतील. पण एकंदरीत मी संघा पासुन सुरक्षित अंतरावर राहतो. बाकी मी कट्टर संघी आहे अशी चर्चा फक्त अडनावाने होते, आणि हे मी कधी टाळू नाही शकलो. पण अजून हि संघ माझा साठी विश्वासार्ह होऊ नाही शकला याचा खेद वाटतो मलाच.
@@brahmanaad124 कारणे कळली तर बरं होईल
@prashantwasalwar1165 जे तथाकथित शेजारील प्रचारक आहेत त्यांना मी एकदिवस स्पश्ट सर्व शंका सांगितल्या पण ते कोणते हि स्पश्टीकरण आज हि करू शकले नाहीत. असो हे ते ठिकाण नाही जिथं मी या गोष्टी व्यक्त करू. कोणताही एक पक्ष, धर्म, देश थोडक्यात मानवी संगठन हे पूर्ण चांगल्या किंवा पूर्ण वाईट लोकांचे नसुन संमिश्र असणार. पण माझ्या दुर्दैवाने संघाच्या चांगल्या, निस्वार्थी देशप्रेमी लोकांशी माझा कधी संबंध नाही येऊ शकला जे मी शोधत होतो. आणि मला थोडी फार अपेक्षा संघाकडून च होति त्या काळी. माणूस म्हटलें की चालायचेच. पण एक गोष्ट आयुष्यात चांगली झाली की त्यामुळे मी आयुष्यात कधीही कोणत्याही मानवी संघटनेचा भाग नाही झालो कधीच .
विधानाच समर्थन पटण्यासारख नाही.
सरसंघचालक ....सेक्युलर झालेत....त्यांनी आता सन्मानाने पाय उतार व्हावे हे उत्तम.
त्यांनी आता सन्मानाने निवृत्त व्हावे....वय झालं आता त्यांचं!
वादग्रस्त विधान टाळावे...
मी ही ते वक्तव्य ऐकून चाटच पडलो. रा स्व संघाच्या शिस्ती बाहेरचं हे वक्तव्य आहे ते खेदजनक आहे. अती बोलण्याच्या नादात मनुष्य नको ते ही बोलून जातो हे सर्वविदित आहे. असं व्हायला नको होतं.
मोहन भागवत ना सरसंघचालक म्हणून १५ वर्षे झाली आहेत. त्यांना रिटायर केलं पाहिजे.
हिंदूना offensive strategy शिवाय पर्याय नाही आहे..त्यांच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे.. ह्या आक्रमक हिंदू द्वेष्ट्या धर्मांध लोकांना दुसरी भाषा कळत नाही.. भय बिन होय ना प्रीती.. संघा ने आता तरी नेतृत्व बदलावे..
संघ जर कॉग्रेस ची विचार सरणी अवलंबून कार्य करणार असेल तर नागपूर चे मुख्यालय १० जनपथ दिल्लीला न्यायला काय हरकत नाही.
सुंदर विवेचन❤
भागवतात आणि भागवतांनी जे सांगितले आहे ते आम्हास प्रमाण आहे
अनय जी, माझी अवस्था तुमच्यासारखीच आहे!
RSS must distance itself from active support to mandir-masjid controversies.
Let it be handled by धर्म गुरू and other सनातन संघटना.
अप्रतिम विश्लेषण अनयजी
लंगड समर्थन!
भागवत secular होत चालले आहेत. नेहमी वादग्रस्त विधाने करतात.
मोहन भागवतांच आता वय झालय,यांना आता वानप्रस्थाश्रम गरजेचा आहे,हे गेल्या काही वर्षापासून आशी लिब्रांडु वक्तव्य करायला लागले आहेत.ह्यांचा असा गैरसमज आहे की आपण हिंदूमूळे नाही तर हिंदू आपल्यामूळे आहेत.संघाने यांना लवकरात लवकर नारळ द्यावा,अन्यथा आपला पर्याय निर्माण करावाच लागेल.
खूप चांगले विश्लेषण. धन्यवाद.
🙏 नमस्कार अनयजी. सरसंघचालकांचे हे विधान अवसानघातकी आहे. ऐनवेळी हे लोक असे का बोलतात हेच कळत नाही. पण माझ्या सारख्या अनेकांना हे आवडले नाही.
भागवतांची अवसानघातकी वक्तव्य दिवसेंदिवस वाढत आहे सरसंघचालक बदलावे
खुप छान धन्यवाद
योग्य सार्थ विवेचन केलेत धन्यवाद, अनय जी. सुधाकर पोटे, शिरूर
विनायक पोटे कोण?🤔
योग्य विवेचन