Sawala Ga Ramchandra (Lyrical) | Ram Janmabhoomi | Geet Ramayan | Sudhir Phadke | Jai Shree Ram

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • #ShriRamBhajan रामजन्मभूमीच्या शुभ मुहूर्तावर गीत रामायण मधील एक खास गाणे तुमच्यासाठी सादर करत आहे - सांवळा ग रामचंद्र 💜
    Song - Sawala Ga Ramchandra
    Artist - Sudhir Phadke
    Music Director - Sudhir Phadke
    Lyricist - G. D. Madgulkar
    Lyrics:
    सांवळा ग रामचंद्र
    माझ्या मांडीवर न्हातो
    अष्टगंधांचा सुवास
    निळ्या कमळांना येतो
    सांवळा ग रामचंद्र
    माझ्या हातांनीं जेवतो
    उरलेल्या घासांसाठीं
    थवा राघूंचा थांबतो
    सांवळा ग रामचंद्र
    रत्‍नमंचकीं झोंपतो
    त्याला पाहतां लाजून
    चंद्र आभाळीं लोपतो
    सांवळा ग रामचंद्र
    चार भावात खेळतो
    हीरकांच्या मेळाव्यांत
    नीलमणी उजळतो
    सांवळा ग रामचंद्र
    करी भावंडांसी प्रीत
    थोरथोरांनी शिकावी
    बाळाची या बाळरीत
    सांवळा ग रामचंद्र
    त्याचे अनुज हे तीन
    माझ्या भाग्याच्या श्लोकाचे
    चार अखंड चरण
    सांवळा ग रामचंद्र
    करी बोबडे भाषण
    त्याशी करितां संवाद
    झालों बोबडे आपण
    सांवळा ग रामचंद्र
    करी बोबडे हें घर
    वेद म्हणतां विप्रांचे
    येती बोबडे उच्‍चार
    सांवळा ग रामचंद्र
    चंद्र नभींचा मागतो
    रात जागवितो बाई
    सारा प्रासाद जागतो
    सांवळा ग रामचंद्र
    उद्यां होईल तरुण
    मग पुरता वर्षेल
    देवकृपेचा वरुण
    #jaishreeram
    #मराठीगाणी
    #Saregamamarathi
    #MarathiSong
    #Oldmarathisong
    #Marathigani
    Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    Follow us on -
    Instagram: / saregamamarathi
    Facebook: / saregamamarathi2022
    Twitter: / saregamaglobal

КОМЕНТАРІ • 35