अनघा, तुझ्याबद्दल काय बोलू, शब्दच सुचत नाहीत... किती talented, किती positive, किती गोड! किती सुंदर बोलतेस...ऐकताना खूप भरून येत होतं...खरंच खूप जणांसाठी प्रेरणा आहेस बाळा!..God bless you ! इतक्या सुंदर व्यक्तिमत्वाची भेट घडवल्याबद्दल,Thank you, सुलेखाजी!
सुलेखाताई, आज अगदी रडवलंस! पण त्यातूनच अनघाची जिद्द, चिकाटी व जनतेने कसे वागावे हेही दाखवून दिलंस जगाला! तुलाही ऐकताना सारखं भरून येत होतं हे जाणवत होतं. तरीपण अशा वेगवेगळ्या व्यक्तीमत्वांची ओळख करून देतेस याबद्दल खूपखूप धन्यवाद व आभार!
सुलेखा ताई एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची आम्हाला जवळून ओळख करून दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अनघा तुला तुझ्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आयुष्यात जर कोणाला कधी थोडेसे जरी निराश हताश वाटले तरी त्यांनी ही मुलाखत ऐकावी ही मुलाखत आयुष्य जगण्याचा एक वस्तू पाठ शिकवून जाईल
अतिशय ह्रद्य अशी अनघाची मुलाखत झाली. तिच्यातील सकारात्मकता खूपच भावली. वेगळ्या वळणावर अनघाला आम्हाला भेटवल्याबद्दल सुलेखा तुमचे मनःपूर्वक धन्यवाद! सगळ्या गिफ्ट्सही सुंदरच! अनघासाठी माझ्या या चार ओळी, डोळे सगळ्यांनाच असतात मात्र दृष्टी काहींनाच असते सुपातलेच जास्त रडतात भरडता हसणे काहींनाच जमते तुझे बोलणे, तुझे हसणे कोजागिरीचे टिपूर चांदणे कृपा निरंतर अशीच राहो प्रवास व्हावा सुरेल गाणे
अनघा ,खूप खूप खूप खूप सुंदर मुलाखत तुझी .प्रत्येक शब्दनशब्द कानात साठवून ठेवत रहावासा वाटतो.किती हुशार ,किती उत्साह ,जगण्याचा तंत्र आणि मंत्र तुझ्या कडून घ्यावा. केवढे दुःखद अनुभव ,खूप काही शिकवून जातात . तुला मिळालेल्या मित्र मैत्रिणींचे पण खूप कौतुक आहे .आणि आई बद्दल तर काय आणि किती बोलले तरी कमीच आहे. खूप प्रेरणादायी तुझी मुलाखत .सगळ्यांच्या दिल के करीब गेलीस .मी तुझ्या कार्यक्रमाला आले होते. तिथेही तुझे अँकरिंग ऐकले होते . Hat's of to you
अनघा, आम्हाला तुझा अभिमानच वाटतो. तुझ्या "संवाद शाळेमुळे" (Training sessions)झालेले मार्गदर्शनही सर्वांना मोलाचेच ठरले आहे. तुझ्यासाठी वाचन करताना मलासुद्धा खूप शिकायला मिळते. शुभम भवतू!
दिल के करीब मध्ये येणाऱ्या प्रत्येकाबद्दल खूप आस्था ,आपुलकी वाटते...त्यांचा प्रवास त्यांच्याच शब्दात ऐकताना पण आजचा भाग हा निःशब्द करणारा होता...आयुष्य जगायचे कसे हे अनघाच्या प्रत्येक शब्दातून उमजत होते ...तिचे रसाळ आणि गोड अभ्यासपूर्ण बोलणे ऐकतच रहावेसे वाटते नेहमीच..❤ घन भरल्या शब्दात तुझ्या या आयुष्याचे सार असे ........ कसे जगावे प्रत्येकाने पाहुनी तुला.उत्तर गवसे🌹🌹अनघा खूप खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुला....खरतर तुझे बोलणे ऐकले की तुझ्यापुढे नतमस्तक च व्हावेसे वाटते.......😊खूप संतगुणी आहेस तू पुण्यचं असावे आहे आम्हा श्रोत्यांचे की तुझी वणी आम्हाला ऐकायला मिळते❤❤😊अशीच बोलत रहा.....👍🏻😍😍😍
खूपच सुंदर मुलाखत किती सकारात्मक. किती मोठया गोष्टीवर मात केली आहे अनघान.धडधाकट माणसही एवढया तेवढ्या कारणावरुन चिडतात. पण अनघाची गोष्टच वेगळी. सुलेखानी सुंदर मुलाखत घेतली.
अनघा तुझा प्रवास अनेकदा ऐकलंय प्रत्येक वेळी अंगावर काटा येतो.तू पारल्या सारख्या ठिकाणी आणि अगदी सुसंसुकृत सुशिक्षित घराण्यातील असल्यामुळे तुला स्वतःला सावरायला संधी मिळाल्या.परंतु मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी तेवढीच बुध्दीमत्ता आणि कुवत असावी लागते.ती तुझ्यात आहे.उत्तरोत्तर अशीच तुझी प्रगति होवो ह्या आमच्या शुभेच्छा नमिता तेंडुलकर एक सेवाव्रती स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान.दहिसर.
अप्रतिम मुलाखत..अनघा तू टॅलेंट तर आहे सच अगदी सरस्वती प्रसन्न आहे.चांगले वाईट अनुभव सर्वच पाॅजिटिव्हली घेतेस.सर्वांसाठी प्रेरणादायी प्रवास आलगद उलगडला.सुलेखाताईंनी खूप छान गप्पांना प्रेरित केले.
अनघा पोरी अग काय आहेस तू आमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलस ग.एवढ्या तेवढ्या गोष्टींचा आम्ही इशू करतो.खरंच लाज वाटली माझी मलाच.खूप शिकवलंस तू आम्हाला.thanku very much.dhanywaad बेटा.❤❤❤❤❤❤
एक सर्वांगसुंदर मुलाखत,कारण आज अनघा इतकं सुंदर बोलली आहे,खाडकन डोळे उघडलेत,किती मनापासून बोलली आहे, रोज ऐकावी आणि रोमारोमात झिरपवून घ्यावं बोलणं.खूप शिकले आज. आजपर्यंत ची सगळ्यात भावलेली मुलाखत.❤❤
Sulekha... aga kiti आभार manave tuze ?? Kitti kitti vegveglya great great lokanchi amchi bhet ghadvun Antes g !!!! Anagha kamaal ahe !!!Goad ahe !!kiti prasanna ahe ticha hasya , kiti chhan vichar Sunder kavita दिल ke kareeb var ...kya baat
खूप खूप धन्यवाद सुरेखा ताई❤ या मुलीचे विचार लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनीच ऐकण्या जोगे आणि अमलात लक्षात ठेवण्यासारखे आहेत.. चांगल्या विचारांचा मंजुळ झरा आहे.. डोळ्यामध्ये अश्रू येत होते पण ते कणव येऊन किंवा दुःखाचे नव्हते तर आनंदाश्रू होते की कदाचित पूर्वीच्या काळी ज्ञानेश्वर माऊलींचे विचार ऐकताना सुद्धा लोकांचे देहभान असेच हरपत असावे😊 अनघा तुझी किव करणाऱ्या लोकांचीच किव यायला हवी.. तुला अनेक उत्तम आशीर्वाद😊 सुलेखा ताईंना मनापासून धन्यवाद 🙏🌹
सुलेखा ताई खरंच खूप सुंदर मुलाखत होती ही . अनघा अनोळखी होती माझ्यासाठी पण या मुलाखती नंतर खूप dil ke karib झाली. मी तुमच्या सगळ्या मुलाखती वेळ मिळेल तेव्हा बघते पण ही एकमेव अशी मुलाखत जी मला पुन्हा बघावस वाटले आणि मे दोनदा पहिली . किती positive energy आहे या episode मध्ये खरंच खूप रसाळ वाणी आहे अनघाची ❤❤❤❤ खूप खूप धन्यवाद या वेगळ्या वळणासाठी . खूप खूप प्रेम❤❤❤❤❤❤
अनघाच्या धैर्याला सलाम. आवाज खूपच गोड आहे .आलेल्या कठीण परिस्थितीत खंबीरपणे पाय रोवून मार्गक्रमण करणारी धीरांगना यशाचं शिखर नक्कीच गाठणार. आयुष्याला योग्य वळण देण्यात आईचाही वाटा महत्वाचा आहे
अनघा!! तु दिल के करीब नाही तर थेट हृदयात शिरलीस. काय गं ऐकतच रहावं असे तुझे बोल. सगळेच interviews ऐकले एकापेक्षा एक सुंदर पण तु मला लिहायला उद्युक्त केलस. तुझी वाक्ये मनात झिरपत होती. शब्दांच्या पलीकडील भाषा, अर्थ अप्रतिम.मला जागंही केलस. चुकतोय याची जाणीव करुन दिलीस अंतर्मुख केलंस. जिच्या जीभेवर सरस्वती चा वास आहे तिला मी अल्पज्ञ काय सांगणार? तुझी सगळीच्या सगळी स्वप्ने पुर्णत्वाला जावोत. तुला हवे तसेच होवो.Thanks to Sulekhatai ह्या कोहीनूर हिरा भेटवला आणि त्याचे पैलुही. Anagha! . Stay blessed, happy & healthy always. Have a Fantabulous life. Tons& tons of blessings& wishes dear. Go forth & prosper
अप्रतिम ,प्रेरणादायी,तरलविचार,भाषे वरअसलेले प्रभुत्व,कमालीचे पेशन्स जीवनाचे विविध रंग ,शब्द गुंफण सर्वगुण संपन्न अनघा खरच तुझ्यापुढे नतमस्तक झालो आम्ही जीवनाचे सार्थक कशात आहे हे समजले शब्द अपुरे पडतात ग तुझे कौतुक करण्यासाठी तुझ्या जीवना विषयीच्या सखोल ज्ञानास, तुझे जगणे आम्हा सर्वसाधारण व्यक्तीसही प्रेरदायी ठरणे या सगळ्यासाठी तुला सलाम 🌹🌹🌹❤❤❤
निशब्द करुन टाकलंस अनघा...किती गोड बोलतेयस गं ❤ तुला तुझ्या डोळ्यांनीच जीवनाकडे कसं पहावं हे तुला शिकवलं आणि हे दुसऱ्यांनाही तु शिकवतेयस.... तुझे अनुभव ऐकून तर अंगावर काटाच आला... प्रेरणादायी मुलाखत... धन्यवाद सुलेखा.. एक अनमोल रत्न तु घेऊन आलीस आलीस 🙏
मी फिनलंड देशामध्ये राहतो आणि तुम्ही घेत असलेल्या मुलाखती बघत असतो. पण आजची मुलाखत बघून कॉमेंट केल्याशिवाय राहवलेच नाही. अतिशय हृदयस्पर्शी मुलाखत होती ही. १००० मोटिवेशनल प्रोग्राम जरी attend केले तरी ह्या मुलाखती तून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. अनघाच्या जिद्दीला सलाम. ही मुलाखत बघताना डोळ्यांतून सतत अश्रुधारा वाहत होत्या. आयुष्यामध्ये किती अडचणी असू शकतात आणि तरी सुध्दा खचून न जाता प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता कशी आणता येवू शकते ह्याची जाणीव झाली. धन्यवाद सुलेखा ताई. मुलाखत घेताना तुझ्या हळव्या मनाचे दर्शन घडून तुझ्या बद्दल आदर व्दिगुणित झाला. ह्या मुलाखती मुळे माझा समाजा कडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला! अनघा ताईला माझ्याकडुन भावी वाटचालीस शुभेच्छा!🎉 गणेश धुरे.
Khup ch sundar ani Ustfurt! Inspiring, innocent and candid! She is amazing! Best wishes for her future and speedy recovery! Dev karo tila tichi drushti parat milo.... Ujedacha chalu aslela prawas ajun samruddha hovo! Sulekha tai.... Tu pan ek changali manus ahes.... Keep the spirit up!
सुलेखा ताई तुमचा दिल के करीब हा कार्यक्रम नेहमीच न चुकता बघते. तुमचा मुलाखतीचा कार्यक्रम छानच असतो.. आजचा हा अनघाचा कार्यक्रम ऐकल्यावर मात्र प्रतिक्रिया द्यावीशी वाटली. अतिशय प्रेरणादायी व्यक्तीमत्व. तिचा जीवनप्रवास आणि आलेल्या संकटावर एका स्थिर आणि positive विचारांनी केलेली मात नक्कीच वंदनीय आहे.. खूप काही तिच्याकडून शिकण्यासारखे आहे. तिला परमेश्वराने यश द्यावे... वेगळ्या वळणावरील अप्रतिम कार्यक्रम...❤
केवळ अप्रतीम झाली मुलाखत ..... खूप मोठी प्रेरणादायी मुलाखत .... किती गोष्टी शिकायला मिळाल्या.... एक वेगळा दृष्टिकोन मिळाला .... कार्यक्रम संपताना ऐकवलेली कविता , तर इतकी समर्पक आणि मार्मिक .... खूप हृदयस्पर्शी झाली मुलाखत . हॅट्स ऑफ टू यू , अनघा ताई ,आणि मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई ..... 🙏🙏🙏
अतिशय लाघवी मुलाखत. प्रेरणादायी... खरोकर एक आयुष्य दोन प्रवास.. अनघा, बाळा तुला खूप आशीर्वाद... शरारिक डोळे असणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा संवाद.. सुलेखा, तुझे कौतुक व परत परत आभार... नेहमीप्रमाणे...
अतिशय उत्कृष्ट मुलाखत. किती उत्तुंग व परिपक्व व्यक्तिमत्व आहे अनघाचे! सरस्वती तिच्या जिभेवर नांदत आहे. अनघाची ओळख करून दिल्याबद्दल सुलेखा ताई तुमचे खूप खूप आभार. 🙏🏼अनघाला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 💐
सुलेखा ताई ही मुलाखत सगळ्यात छान possitive Enrgy देणारी. अनघा ताई तुम्ही खरच खुप great आहात. तुम्ही खुप सुंदर आहात असा उल्लेख ह्या मुलाखतीत झाला त्याला अनुसरून बोलते की खरच तुमच सौंदर्य हे तुमच्या विचारानी, शिक्षणा ने ,तुमच्या knowladge ने, तुमच्या गोड स्वभावाने आणि वाणीने समृद्ध आहे.❤❤❤ खुप छान ❤❤
स्वयम् मध्ये ऐकलं होतं अनघाला. तेव्हा खूप आदर वाटला होता. पण आज इथे तिला ऐकताना कित्येक आवंढे आले.... निःशब्द व्हायला झालं.... संपूच नयेत अशा गप्पा! One of the best episodes! Thank you ❤
Khoop Chaan jhala thanks hyaa interview ne velglich nazar bhavanaa shikvli . Dilke karib chi Kavita kharch Yogya aahe sulekha tujhya sathi . God bless you ❤
सुलेखा मावशी तुझे सगळे Episodes मी बघत आलोय....सगळ्याच भागात ज्यांची मुलाखत घेतेस त्यातून एक माणूस म्हणून कसं असावं, हे शिकायला मिळतं आणि या भागात अनघा ताईनी तर कमालंच केली. डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे कसं पहावं हे शिकलो. मावशी तुझे खूप खूप धन्यवाद 🙏 तूला मावशी म्हटलं तर चालेल ना ?
Your brilliance is beyond admiration.. You are where you are despite the limitation because you have excellent understanding of situations and are very articulate to express yourself. Sincere wishes for many more achievements.
वा! काय बोलावे? अनघा मोडक यांचा हा जीवनप्रवास खरोखर विलक्षण आहे. म्हणजे संकटामुळे खचून जायला होते, चिडचिड होते... पण त्यातूनही काहीतरी सकारात्मकता घेऊन पुढे वाटचाल करायची... याला खरेच खूप धैर्य लागते. आपल्याला ' डोळ्यांनीही शॉपिंग करता येते...' हे वाक्य आणि त्यामागील प्रसंग खूपच भावूक करणारा... अनघा यांची शब्दसंपदा आणि तिचा योग्य वापर... सुरेख ! दिलं के करिब वर केलेली कविता पण खूप छान... अनघा यांना खूप खूप शुभेच्छा...! सुलेखा ताई आणि दिल के करीब टीमचे आभार... आजची मुलाखत खूपच inspiring होती. 😊
फारच सुरेख झाली मुलाखत. घेणारा नी देणारा ऐकत रहावे असेच किती ऐकावे संपूच नये असे ओघवते. अनघा च्या बर्याच मुलाखती ऐकल्या आहेत. दरवेळेस समृद्ध होतो. खूप हुशार मुलगी. धन्यवाद सुलेखा!
O goddddd!… both of you made me bawl!😢😢… amazing and heart melting!…. Too too good! I used to read and write … wishhh I could do things for you!.. you are just a beautiful being!.. all the veryyyy best.
अनघा ,अनघा अनघा अग समोर असतीस ना बेटा तुझ्या ह्या सगळ्या मुलाखतीनंतर तुझे दोन्ही हात हातात घेऊन तुला गरगर फिरवून ,तुला घट्ट मिठी मारून,तुला डोक्यावर घेऊन नाचले असते अग.काय विचार आहेत राजा तुझे.तुम्ही दोघीही ग्रेट ग्रेट आहात.अग बेटा तुला खूप मोठ्ठी दृष्टी लाभलीय असं नाही वाटत? अग काय बोलू नी काय नको असं झालय.आभार कुणाचे मानायचे अनघाचे की सुलेखाचे.सुलेखा क्या बात हैं.केवढी मोठ्ठी भेंट दिलीय तु . आभार आभार तुम्हा दोघींचेही.🙏🙏🙏🌹
खरंच आजपर्यंत ची सर्वात उत्कृष्ट आणि सकारात्मकतेने ओथंबलेली मुलाखत अनघा केवढी ती स्मरणशक्ती आणि शब्दभांडार, मुद्देसूद बोलणं खरंच सरस्वती ची कृपाच आहे खुपच छान 👌🙏
अनघा, तुझ्याबद्दल काय बोलू, शब्दच सुचत नाहीत... किती talented, किती positive, किती गोड! किती सुंदर बोलतेस...ऐकताना खूप भरून येत होतं...खरंच खूप जणांसाठी प्रेरणा आहेस बाळा!..God bless you ! इतक्या सुंदर व्यक्तिमत्वाची भेट घडवल्याबद्दल,Thank you, सुलेखाजी!
आभार
सुलेखाताई, आज अगदी रडवलंस! पण त्यातूनच अनघाची जिद्द, चिकाटी व जनतेने कसे वागावे हेही दाखवून दिलंस जगाला! तुलाही ऐकताना सारखं भरून येत होतं हे जाणवत होतं. तरीपण अशा वेगवेगळ्या व्यक्तीमत्वांची ओळख करून देतेस याबद्दल खूपखूप धन्यवाद व आभार!
अनघा किती पॉझीटीव्ह आहेस तू. खूप काही शिकण्यासारखं तुझ्यापासून. मन खूप भरून येतयं.
सुलेखा ताई एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाची आम्हाला जवळून ओळख करून दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अनघा तुला तुझ्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आयुष्यात जर कोणाला कधी थोडेसे जरी निराश हताश वाटले तरी त्यांनी ही मुलाखत ऐकावी ही मुलाखत आयुष्य जगण्याचा एक वस्तू पाठ शिकवून जाईल
Atishay sunder mulakhat. Anagha you are great n Sulekhatai thanks for such a wonderful programme.
अतिशय ह्रद्य अशी अनघाची मुलाखत झाली. तिच्यातील सकारात्मकता खूपच भावली. वेगळ्या वळणावर अनघाला आम्हाला भेटवल्याबद्दल सुलेखा तुमचे मनःपूर्वक धन्यवाद! सगळ्या गिफ्ट्सही सुंदरच! अनघासाठी माझ्या या चार ओळी,
डोळे सगळ्यांनाच असतात
मात्र दृष्टी काहींनाच असते
सुपातलेच जास्त रडतात
भरडता हसणे काहींनाच जमते
तुझे बोलणे, तुझे हसणे
कोजागिरीचे टिपूर चांदणे
कृपा निरंतर अशीच राहो
प्रवास व्हावा सुरेल गाणे
धन्यवाद....अनघालाही खूप आवडलीही कविता
निःशब्द !!!
अनघाला सलाम!!!
सुलेखा ताई आज खूप काही comment मध्ये लिहावे वाटते आहे पण शब्द नाही आज तुझे खूप खूप धन्यवाद!!!
सुलेखा ताई आजपर्यंतची सगळ्यात सूंदर आणि पाॅझीटीव मुलाखत❤
अनघा ,खूप खूप खूप खूप सुंदर मुलाखत तुझी .प्रत्येक शब्दनशब्द कानात साठवून ठेवत रहावासा वाटतो.किती हुशार ,किती उत्साह ,जगण्याचा तंत्र आणि मंत्र तुझ्या कडून घ्यावा. केवढे दुःखद अनुभव ,खूप काही शिकवून जातात . तुला मिळालेल्या मित्र मैत्रिणींचे पण खूप कौतुक आहे .आणि आई बद्दल तर काय आणि किती बोलले तरी कमीच आहे. खूप प्रेरणादायी तुझी मुलाखत .सगळ्यांच्या दिल के करीब गेलीस .मी तुझ्या कार्यक्रमाला आले होते. तिथेही तुझे अँकरिंग ऐकले होते . Hat's of to you
अनघाने डोळस माणसांच्या डोळ्या अंजन घातले आहे. खुप छान मुलाखत.
अनघा, आम्हाला तुझा अभिमानच वाटतो.
तुझ्या "संवाद शाळेमुळे" (Training sessions)झालेले मार्गदर्शनही सर्वांना मोलाचेच ठरले आहे.
तुझ्यासाठी वाचन करताना मलासुद्धा खूप शिकायला मिळते.
शुभम भवतू!
निशब्द अनुभव..अनेकदा आवंढे,अश्रू आले आणि आश्चर्य तसेच काही गोष्टींचे आकलन होत होते. अनघाला सादर सलाम. ❤
अगदी खरे
सकारात्मक विचारसरणी साठीचे जिवंत उदाहरण आहे अनघा , hats off 👍
खूप सुंदर मुलाखत. डोळ्यात पाणी आले आणि अंगावर काटा पण आला. ही मुलाखत बघितल्यावर आपलं दुःख किती कुरवाळत बसतो. खूप प्रेरणा मिळाली. थॅंक्स सुलेखा मॅम.
दिल के करीब मध्ये येणाऱ्या प्रत्येकाबद्दल खूप आस्था ,आपुलकी वाटते...त्यांचा प्रवास त्यांच्याच शब्दात ऐकताना पण आजचा भाग हा निःशब्द करणारा होता...आयुष्य जगायचे कसे हे अनघाच्या प्रत्येक शब्दातून उमजत होते ...तिचे रसाळ आणि गोड अभ्यासपूर्ण बोलणे ऐकतच रहावेसे वाटते नेहमीच..❤
घन भरल्या शब्दात तुझ्या या
आयुष्याचे सार असे ........
कसे जगावे प्रत्येकाने
पाहुनी तुला.उत्तर गवसे🌹🌹अनघा खूप खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुला....खरतर तुझे बोलणे ऐकले की तुझ्यापुढे नतमस्तक च व्हावेसे वाटते.......😊खूप संतगुणी आहेस तू पुण्यचं असावे आहे आम्हा श्रोत्यांचे की तुझी वणी आम्हाला ऐकायला मिळते❤❤😊अशीच बोलत रहा.....👍🏻😍😍😍
वा...सुंदर
खूपच सुंदर मुलाखत किती सकारात्मक. किती मोठया गोष्टीवर मात केली आहे अनघान.धडधाकट माणसही एवढया तेवढ्या कारणावरुन चिडतात. पण अनघाची गोष्टच वेगळी. सुलेखानी सुंदर मुलाखत घेतली.
खूप प्रेरणादायी मुलाखत... अनघा ताई तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा... एवढ्या सुंदर मुलाखतीसाठी thank you सुलेखाताई
अनघा तुझा प्रवास अनेकदा ऐकलंय प्रत्येक वेळी अंगावर काटा येतो.तू पारल्या सारख्या ठिकाणी आणि अगदी सुसंसुकृत सुशिक्षित घराण्यातील असल्यामुळे तुला स्वतःला सावरायला संधी मिळाल्या.परंतु मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी तेवढीच बुध्दीमत्ता आणि कुवत असावी लागते.ती तुझ्यात आहे.उत्तरोत्तर अशीच तुझी प्रगति होवो ह्या आमच्या शुभेच्छा
नमिता तेंडुलकर
एक सेवाव्रती
स्नेहज्योत दिव्यांग सेवा
प्रतिष्ठान.दहिसर.
अप्रतिम मुलाखत..अनघा तू टॅलेंट तर आहे सच अगदी सरस्वती प्रसन्न आहे.चांगले वाईट अनुभव सर्वच पाॅजिटिव्हली घेतेस.सर्वांसाठी प्रेरणादायी प्रवास आलगद उलगडला.सुलेखाताईंनी खूप छान गप्पांना प्रेरित केले.
अनघा पोरी अग काय आहेस तू आमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलस ग.एवढ्या तेवढ्या गोष्टींचा आम्ही इशू करतो.खरंच लाज वाटली माझी मलाच.खूप शिकवलंस तू आम्हाला.thanku very much.dhanywaad बेटा.❤❤❤❤❤❤
एक सर्वांगसुंदर मुलाखत,कारण आज अनघा इतकं सुंदर बोलली आहे,खाडकन डोळे उघडलेत,किती मनापासून बोलली आहे, रोज ऐकावी आणि रोमारोमात झिरपवून घ्यावं बोलणं.खूप शिकले आज. आजपर्यंत ची सगळ्यात भावलेली मुलाखत.❤❤
Anagha Modak is so courageous, optimistic, intelligent and well spoken !There is so much we can learn from her. 🙏🏻
काय लिहव सुचत नाही अनघाताई you are great👍😊 तुझ बोलणं ऐकत राहावंसं वाटत. सुलेखाताई 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻❤
ही मुलाखत पूर्ण होईपर्यंत किमान चार वेळा माझ्या डोळ्यात पाणी आले.
Anagha kharach kiti sundar bolate ga !! mantra Mugdha hovun mee Tula aikale !! so sweet you r 👌god bless you 🙏
मी दिल के करीत हे नेहेमी पाहते पण आज ऐकत ते खुप निशब्द ऐकते आणि अनघा तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे .जे ऐकले त्यासाठी माझ्याकडे शब्दातच नाही.❤
Sulekha... aga kiti आभार manave tuze ??
Kitti kitti vegveglya great great lokanchi amchi bhet ghadvun Antes g !!!!
Anagha kamaal ahe !!!Goad ahe !!kiti prasanna ahe ticha hasya , kiti chhan vichar
Sunder kavita दिल ke kareeb var ...kya baat
खूप खूप धन्यवाद सुरेखा ताई❤ या मुलीचे विचार लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनीच ऐकण्या जोगे आणि अमलात लक्षात ठेवण्यासारखे आहेत.. चांगल्या विचारांचा मंजुळ झरा आहे.. डोळ्यामध्ये अश्रू येत होते पण ते कणव येऊन किंवा दुःखाचे नव्हते तर आनंदाश्रू होते की कदाचित पूर्वीच्या काळी ज्ञानेश्वर माऊलींचे विचार ऐकताना सुद्धा लोकांचे देहभान असेच हरपत असावे😊 अनघा तुझी किव करणाऱ्या लोकांचीच किव यायला हवी.. तुला अनेक उत्तम आशीर्वाद😊 सुलेखा ताईंना मनापासून धन्यवाद 🙏🌹
अतिशय उत्कृष्ट मुलाखत ....ऐकत राहावी अशी ...खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई आणि अनघा. ताईंना खूप खूप शुभेच्छा ...प्रेरणादायी मुलाखत होती ..
प्रेरणादायी विचार ,अप्रतिम मुलाखत
ऐकावं आसं बोलत होती एवढं होऊनही देवावर विश्वास आहे खरचं खूप घेण्यासारखे आहे अनघा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे हीच प्रार्थना
Great....Anagha Madam .. सलाम तुमच्या जिद्दीला..
सुलेखा ताई खरंच खूप सुंदर मुलाखत होती ही . अनघा अनोळखी होती माझ्यासाठी पण या मुलाखती नंतर खूप dil ke karib झाली. मी तुमच्या सगळ्या मुलाखती वेळ मिळेल तेव्हा बघते पण ही एकमेव अशी मुलाखत जी मला पुन्हा बघावस वाटले आणि मे दोनदा पहिली . किती positive energy आहे या episode मध्ये खरंच खूप रसाळ वाणी आहे अनघाची ❤❤❤❤ खूप खूप धन्यवाद या वेगळ्या वळणासाठी . खूप खूप प्रेम❤❤❤❤❤❤
खूप सुंदर कविता आणि मुलाखत नेहमी प्रमाणे सुंदर!! काय म्हणू अनघा ? आज तुझ्याकडून खूप शिकायला मिळालं.God bless you!!
धन्यवाद सुलेखा!! अनघा बदद्ल काय बोलू!!खूपच प्रेरणादायक!!!जेंव्हा आपण लो फील करूं तेंव्हा ही मूलाखत जरूर ऐकावी.
अनघाच्या धैर्याला सलाम. आवाज खूपच गोड आहे .आलेल्या कठीण परिस्थितीत खंबीरपणे पाय रोवून मार्गक्रमण करणारी धीरांगना यशाचं शिखर नक्कीच गाठणार. आयुष्याला योग्य वळण देण्यात आईचाही वाटा महत्वाचा आहे
अनघा!! तु दिल के करीब नाही तर थेट हृदयात शिरलीस. काय गं ऐकतच रहावं असे तुझे बोल. सगळेच interviews ऐकले एकापेक्षा एक सुंदर पण तु मला लिहायला उद्युक्त केलस. तुझी वाक्ये मनात झिरपत होती. शब्दांच्या पलीकडील भाषा, अर्थ अप्रतिम.मला जागंही केलस. चुकतोय याची जाणीव करुन दिलीस अंतर्मुख केलंस. जिच्या जीभेवर सरस्वती चा वास आहे तिला मी अल्पज्ञ काय सांगणार? तुझी सगळीच्या सगळी स्वप्ने पुर्णत्वाला जावोत. तुला हवे तसेच होवो.Thanks to Sulekhatai ह्या कोहीनूर हिरा भेटवला आणि त्याचे पैलुही.
Anagha! . Stay blessed, happy & healthy always. Have a Fantabulous life. Tons& tons of blessings& wishes dear. Go forth & prosper
Anaghatainche vichar kiti changle aani dusryana Ubhari denare aahet
.Great....
अप्रतिम .. ❤मनातील विचारांचा वेग आणि बोलण्यातील लय यांचा इतका सुंदर ताळमेळ अनघा पहिल्यांदाच अनुभवला ..खूप सुंदर मुलाखत
सुलेखा ताई फारच छान मुलाखत आहे. इतकी चांगली मुलगी आहे अनघा. Very touching
अप्रतिम ,प्रेरणादायी,तरलविचार,भाषे
वरअसलेले प्रभुत्व,कमालीचे पेशन्स
जीवनाचे विविध रंग ,शब्द गुंफण
सर्वगुण संपन्न अनघा खरच तुझ्यापुढे नतमस्तक झालो आम्ही
जीवनाचे सार्थक कशात आहे हे समजले
शब्द अपुरे पडतात ग तुझे कौतुक करण्यासाठी
तुझ्या जीवना विषयीच्या सखोल ज्ञानास,
तुझे जगणे आम्हा सर्वसाधारण व्यक्तीसही प्रेरदायी ठरणे या सगळ्यासाठी तुला सलाम 🌹🌹🌹❤❤❤
खुपच सुंदर फार छान सुलेखा तजे हे सदर मला फार आवडले खुपच शिकायला मिळाले!
कविता फारच साजेशी आहे...अणि तु अशीच सुलेखा मारत जा लव यू ❤❤❤❤
अनघा साठी ❤❤❤❤❤❤
निःशब्द! स्वा. सावरकर यांच्या वर तिने सादर केलेला कार्यक्रम नुकताच बघितला. अप्रतिम! तिच्या हुषारीला, वक्तृत्वाला,व जिद्दीला सलाम👌💐
अप्रतिम मुलाखत . एक चैतन्यदायी व्यक्ती आणि तिला ऐकण खूप छान . अनघा तुला खूप खूप शुभेच्छा.
निःशब्द......hats off अनघा 🙏🙏
अतिशय सुंदर झाला हा भाग! Very inspiring 👌
किती positive आहेत अनघा मॅडम आणि भाषेवरचे प्रभुत्व पण अफाट, शेवटची कविता भन्नाट लिहीली आहे!
निशब्द करुन टाकलंस अनघा...किती गोड बोलतेयस गं ❤ तुला तुझ्या डोळ्यांनीच जीवनाकडे कसं पहावं हे तुला शिकवलं आणि हे दुसऱ्यांनाही तु शिकवतेयस.... तुझे अनुभव ऐकून तर अंगावर काटाच आला... प्रेरणादायी मुलाखत... धन्यवाद सुलेखा.. एक अनमोल रत्न तु घेऊन आलीस आलीस 🙏
ताई हा भाग कळस ठरला ❤🎉
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी मुलाखत. प्रगल्भ विचार. अनघा आणि सुलेखा ताई दोघींनाही सलाम आणि खूप खूप धन्यवाद
अप्रतिम मुलाखत! खरचं अनघा तुला ऐकत असतांना भान हरपले.तुला ऐकतच रहावे.जीवनाबद्दल इतकी सकारात्मक.धन्य आहेस तू.
सुंदर अप्रतिम सुंदर ऐकल आजी ऐकता ऐकता नजरें समोर सगळ बघत अनुभवत ही गेलो
अतिशय अप्रतिम कार्यक्रम झाला, सुलेखा ताईंचे आभार
अनघा, किती सुंदर बोलतेस ग. दिसतेस पण खूप छान. सुस्पष्ट विचार. खूपच मजा आली ऐकताना. खूप खूप शुभेच्छा.
भरपूर घेण्यासारखे आहे या मुलाखतीतून तुमचे खूप खूप धन्यवाद...
मी फिनलंड देशामध्ये राहतो आणि तुम्ही घेत असलेल्या मुलाखती बघत असतो. पण आजची मुलाखत बघून कॉमेंट केल्याशिवाय राहवलेच नाही. अतिशय हृदयस्पर्शी मुलाखत होती ही.
१००० मोटिवेशनल प्रोग्राम जरी attend केले तरी ह्या मुलाखती तून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची बरोबरी कोणीच करू शकणार नाही.
अनघाच्या जिद्दीला सलाम. ही मुलाखत बघताना डोळ्यांतून सतत अश्रुधारा वाहत होत्या. आयुष्यामध्ये किती अडचणी असू शकतात आणि तरी सुध्दा खचून न जाता प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता कशी आणता येवू शकते ह्याची जाणीव झाली. धन्यवाद सुलेखा ताई. मुलाखत घेताना तुझ्या हळव्या मनाचे दर्शन घडून तुझ्या बद्दल आदर व्दिगुणित झाला.
ह्या मुलाखती मुळे माझा समाजा कडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला! अनघा ताईला माझ्याकडुन भावी वाटचालीस शुभेच्छा!🎉
गणेश धुरे.
धन्यवाद
Khup ch sundar ani Ustfurt! Inspiring, innocent and candid! She is amazing! Best wishes for her future and speedy recovery! Dev karo tila tichi drushti parat milo.... Ujedacha chalu aslela prawas ajun samruddha hovo!
Sulekha tai.... Tu pan ek changali manus ahes.... Keep the spirit up!
खूपच छान.. खूप काही घेण्यासारखे आहे अनघा कडून. खूपच प्रेरणादायी मुलाखत होती..आणि दिलं के करून साठी केलेली कविताही फारच सुंदर योग्य होती.
अनघा ताईंचे निवेदन ऐकल्यापासून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची फार इच्छा होती . सुलेखाजी या मुलाखती मुळे पूर्ण झाली . खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा .
अप्रतिम एपिसोड झाला अनघा आणि सुलेखा ताईंचे खूप खूप आभार
धन्यवाद
सुलेखा ताई तुमचा दिल के करीब हा कार्यक्रम नेहमीच न चुकता बघते.
तुमचा मुलाखतीचा कार्यक्रम छानच असतो..
आजचा हा अनघाचा कार्यक्रम ऐकल्यावर मात्र प्रतिक्रिया द्यावीशी वाटली.
अतिशय प्रेरणादायी व्यक्तीमत्व.
तिचा जीवनप्रवास आणि आलेल्या संकटावर एका स्थिर आणि positive
विचारांनी केलेली मात नक्कीच वंदनीय आहे.. खूप काही तिच्याकडून शिकण्यासारखे आहे.
तिला परमेश्वराने यश द्यावे...
वेगळ्या वळणावरील अप्रतिम कार्यक्रम...❤
I am speechless
This interview has forced me to rethink about my flaws which I was feeling bad for myself
I felt the abundance that I have
केवळ अप्रतीम झाली मुलाखत ..... खूप मोठी प्रेरणादायी मुलाखत .... किती गोष्टी शिकायला मिळाल्या.... एक वेगळा दृष्टिकोन मिळाला .... कार्यक्रम संपताना ऐकवलेली कविता , तर इतकी समर्पक आणि मार्मिक .... खूप हृदयस्पर्शी झाली मुलाखत . हॅट्स ऑफ टू यू , अनघा ताई ,आणि मन : पूर्वक धन्यवाद सुलेखा ताई ..... 🙏🙏🙏
खूपच सुंदर मुलाखत... एकदम positive
अतिशय लाघवी मुलाखत.
प्रेरणादायी... खरोकर
एक आयुष्य दोन प्रवास..
अनघा, बाळा तुला खूप आशीर्वाद...
शरारिक डोळे असणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा संवाद..
सुलेखा, तुझे कौतुक व परत परत आभार... नेहमीप्रमाणे...
I am speechless 🙏🙏
अतिशय उत्कृष्ट मुलाखत. किती उत्तुंग व परिपक्व व्यक्तिमत्व आहे अनघाचे! सरस्वती तिच्या जिभेवर नांदत आहे. अनघाची ओळख करून दिल्याबद्दल सुलेखा ताई तुमचे खूप खूप आभार. 🙏🏼अनघाला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 💐
अप्रतिम झाला हा एपिसोड. अनघा खूप भरभरून बोलत होती. ...... अनघा, तुझ्या जिद्दीला, तुझ्यातल्या positivity ला सलाम.❤
सुलेखा ताई ही मुलाखत सगळ्यात छान possitive Enrgy देणारी.
अनघा ताई तुम्ही खरच खुप great आहात.
तुम्ही खुप सुंदर आहात असा उल्लेख ह्या मुलाखतीत झाला त्याला अनुसरून बोलते की खरच तुमच सौंदर्य हे तुमच्या विचारानी, शिक्षणा ने ,तुमच्या knowladge ने, तुमच्या गोड स्वभावाने आणि वाणीने समृद्ध आहे.❤❤❤ खुप छान ❤❤
Thank you so much Angha ani Sulekha Tai 👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
स्वयम् मध्ये ऐकलं होतं अनघाला. तेव्हा खूप आदर वाटला होता. पण आज इथे तिला ऐकताना कित्येक आवंढे आले.... निःशब्द व्हायला झालं.... संपूच नयेत अशा गप्पा!
One of the best episodes!
Thank you ❤
सुलेखा ताई किती गोड बोलून तिच्याशी संवाद साधला तुम्ही ...खूप खूप धन्यवाद
अनघा काय बोलू! खूप वेळा ऐकताना अश्रू अनावर होत होते.
पॉझिटिव्ह विचारांनी सर्वांना प्रेरणा देणारा आहे. तुला खूप खूप शुभेच्छा.
Khoop Chaan jhala thanks hyaa interview ne velglich nazar bhavanaa shikvli . Dilke karib chi Kavita kharch Yogya aahe sulekha tujhya sathi . God bless you ❤
नेहमी अशीच रहा--स्वयंप्रकाशी.दीपस्तंभ.
सृजनाचं समाधान,आनंद भरभरून मिळत राहो.शुभेच्छा.God Bless!
खूप काही शिकवून गेले हा शब्द सूरांचा प्रवास खूप आवडला धन्यवाद सुलेखा ताई.
सुलेखा मावशी तुझे सगळे Episodes मी बघत आलोय....सगळ्याच भागात ज्यांची मुलाखत घेतेस त्यातून एक माणूस म्हणून कसं असावं, हे शिकायला मिळतं आणि या भागात अनघा ताईनी तर कमालंच केली. डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे कसं पहावं हे शिकलो. मावशी तुझे खूप खूप धन्यवाद 🙏
तूला मावशी म्हटलं तर चालेल ना ?
खूपच सुंदर......नी:शब्द. धन्यवाद सुलेखा ताई 🙏
Khup chaan aawaz kiti god aahe❤❤❤❤❤
Your brilliance is beyond admiration..
You are where you are despite the limitation because you have excellent understanding of situations and are very articulate to express yourself. Sincere wishes for many more achievements.
God Bless you Angha, You are simply amazing, hats off to your courage, positivity, knowledge, simplicity. The BEST AND INSPIRING interview ever.
खूपच छान मुलाखत.... अनघा तुझे शब्द ऐकताना खुप positive वाटतं...all the best for your bright future...😊😊
अनघा ताई किती सुंदर!! नि:शब्द!! सुलेखा ताई खूप सुंदर!
Anagha is an inspiration
👍🏼❤
Thank you, Sulekha ❤
तुला तुच जिंकले ग अनघा...ऐकताना नतमस्तक झाले मी 🙏.I,me,अहं बघणार्यांचे खरच गळून पडले....खुप खुप शुभेच्छा...सुलेखा तळवलकर आणि टीम धन्यवाद
वा! काय बोलावे? अनघा मोडक यांचा हा जीवनप्रवास खरोखर विलक्षण आहे. म्हणजे संकटामुळे खचून जायला होते, चिडचिड होते... पण त्यातूनही काहीतरी सकारात्मकता घेऊन पुढे वाटचाल करायची... याला खरेच खूप धैर्य लागते. आपल्याला ' डोळ्यांनीही शॉपिंग करता येते...' हे वाक्य आणि त्यामागील प्रसंग खूपच भावूक करणारा... अनघा यांची शब्दसंपदा आणि तिचा योग्य वापर... सुरेख ! दिलं के करिब वर केलेली कविता पण खूप छान... अनघा यांना खूप खूप शुभेच्छा...!
सुलेखा ताई आणि दिल के करीब टीमचे आभार...
आजची मुलाखत खूपच inspiring होती. 😊
Topmost liked Interview......Her every single word touches the heart. Most inspirational interview.
अनघाच्या धीरोदात्त पणाचे खूप कौतुक वाटले आणि तिच्या पालकांचे ही
तीने दिल के करीब बद्दल व्यक्त केलेले काव्य अप्रतिम शब्दरचना मार्मिक आणि अर्थपूर्ण
Hats off. So much maturity in handling her life beautifully. Salaam Parlekar.
खूप खूप उत्सक आहे अनघा ताईची मुलाखत पाहायला...तिचे विचार ऐकायला....सुलेखा ताई.... खरंच खूप खूप धन्यवाद!❤❤
आत्तापर्यंतची सर्वोत्तम मुलाखत. जगावे कसे ते सांगणारी.
खूप छान मुलाखत प्रेरणादायी ...
Anagha is so positive ,calm and kind girl.She is one of the top motivational speaker in Marathi.
फारच सुरेख झाली मुलाखत. घेणारा नी देणारा ऐकत रहावे असेच किती ऐकावे संपूच नये असे ओघवते. अनघा च्या बर्याच मुलाखती ऐकल्या आहेत. दरवेळेस समृद्ध होतो. खूप हुशार मुलगी.
धन्यवाद सुलेखा!
किती positive असावं खूपच प्रेरणा मिळते अनघाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे अनघा तुला खूप शुभेच्छा
खरंच , तुझ्याबद्दल बोलायला शब्दच नाहीत. किती सुंदर बोलतेस... खरंच तुझा आदर्श घ्यायला पाहिजे. खूप मोठी हो बाळा....❤
Khupach inspiring aahe Anagha.. itaka positivenes aahe tichyat hats of to her..thanks Sulekhaji
अरे व्वा क्या बात है..सुलेखा दीं...अनघा..the best...my very favourite
सुंदर अप्रतिम मुलाखत आज पर्यंत ची नंबर वन मुलाखत
अतिशय सुरेख मुलाखत!!
अप्रतिम!
O goddddd!… both of you made me bawl!😢😢… amazing and heart melting!…. Too too good! I used to read and write … wishhh I could do things for you!.. you are just a beautiful being!.. all the veryyyy best.
नमस्कार सुलेखाताई आगदी अप्रतिम मुलाखत शब्दच नाही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद व मनापासून खूप आशिर्वाद
अनघा ,अनघा अनघा अग समोर असतीस ना बेटा तुझ्या ह्या सगळ्या मुलाखतीनंतर तुझे दोन्ही हात हातात घेऊन तुला गरगर फिरवून ,तुला घट्ट मिठी मारून,तुला डोक्यावर घेऊन नाचले असते अग.काय विचार आहेत राजा तुझे.तुम्ही दोघीही ग्रेट ग्रेट आहात.अग बेटा तुला खूप मोठ्ठी दृष्टी लाभलीय असं नाही वाटत? अग काय बोलू नी काय नको असं झालय.आभार कुणाचे मानायचे अनघाचे की सुलेखाचे.सुलेखा क्या बात हैं.केवढी मोठ्ठी भेंट दिलीय तु . आभार आभार तुम्हा दोघींचेही.🙏🙏🙏🌹
हे खरं आहे की अनघाताई,आपल्या सगळ्यांच्या दिल के करीब झालीस.तुला खूप खूप शुभेच्छा!!
आणि सुलेखा ताई तुझे खूप खूप आभार वेगळा प्रवास जाणून घेता आला.
खरंच आजपर्यंत ची सर्वात उत्कृष्ट आणि सकारात्मकतेने ओथंबलेली मुलाखत अनघा केवढी ती स्मरणशक्ती आणि शब्दभांडार, मुद्देसूद बोलणं खरंच सरस्वती ची कृपाच आहे खुपच छान 👌🙏