🔴 LIVE : शिवसेना नाव आणि धनुष्य बाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यावर, उद्धव ठाकरे लाईव्ह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • देशातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाची आगामी रणनीती काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
    दोन्ही गटांची बाजू ऐकून निवडणूक आयोगाचा निर्णय
    खरी शिवसेना कोणाची तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाने दोन्ही म्हणजेच ठाकरे तसेच शिंदे गटाला आपापली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी दोन्ही गटांना पदाधीकारी तसेच पक्षातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले दिले होते. त्यानंतर दोन्ही गटाने पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असलेली कागदपत्रं निवडणूक आयोगासमोर सादर केली होती.
    दरम्यान, या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. आज आपण पाहिले राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. हा बहुमताचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. मी पुन्हा एकदा सांगतो बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा हा विजय आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
    ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या -
    ऍप डाउनलोड करा
    Download App : instoriesplus....
    Prime Marathi : primemarathi.in
    Facebook : / primenewsmarathi
    Twitter : / primenews_mh
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 8

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 Рік тому +1

    आपल्याला आपले आमदार सांभाळता आले नाहीत

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 Рік тому

    विपरीत बुद्धी विनाश काले

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 Рік тому

    उद्या सुप्रीम कोर्टात पण निकाल विरोधात लागला तर
    ये म्हणतील की
    सुप्रीम कोर्ट वर पण दबाव आणला

  • @0123__
    @0123__ Рік тому

    😃

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 Рік тому

    शिवसेना भावनाच काय

    • @ashokpatekar21
      @ashokpatekar21 Рік тому

      आता शिवसेना भवन कुणाचं

  • @bepositive2400
    @bepositive2400 Рік тому +1

    खरंच दादागिरी चालू आहे
    लोकशाही चा तर कुठे पत्ताच नाही
    एकाधिकार शाही सुरू आहे
    पैशाने आता न्यायदेवताही खरेदी होते हे सिद्ध झालंय
    अतिशय चुकीचा निर्णय