टोमॅटो पिकातील तिरंगा, भुरी आणि फळ सड नियंत्रण | Tomato Pest Management

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2022
  • ✅घरबसल्या कृषि निगडीत सर्व उत्पादने भारी डिसकाऊंटसह खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा 👉krushidukan.bharatagri.com/
    ============================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱टोमॅटो पिकातील तिरंगा, भुरी आणि फळ सड नियंत्रण | Tomato Pest Management👍
    ✅ टोमॅटोवरील तिरंगा व्हायरस
    रोग फुलकिड्यांमार्फत पसरतो. फुलकिडे टोमॅटोची पाने कुरतडतात आणि पाझरणारा रस शोषून घेतात. हंगामाच्या अगदी सुरुवातीला या रोगाची लागण झाली तर फळधारणा होत नाही व फळधारणा झाल्यानंतर लागण झाली तर फळांवर हिरव्या बांगडी च्या आकाराचे ठिपके दिसतात. एवढेच नाही तर नवीन पानांवर तपकिरी रंगाच्या रिंगा देखील पडतात. जर उशिरा लागण झाली असेल तर रोपांना डागाळलेली फळे लागतात.
    ✅ उपाय:
    👉टोमॅटो रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ ते ८ दिवसानंतर २५ पिवळे व निळे चिकट सापळे प्रति एकरी लावावेत. तसेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फुलकिड्यांचा प्रधुरभाव झाल्यास -
    1️⃣ डॉ. बैक्टो वर्टिगो (वर्टिसिलियम लेकानी) - ४५ मिली
    2️⃣ झपॅक (थियामेथोक्सम 12.6% + लैम्ब्डा साइहलोथ्रिन 9.5% जेडसी) - ८ मिली
    3️⃣ अरेवा (थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी) - ८ ग्राम
    👉या पैकी कोणत्याही एका कीडनाशकांची प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    तसेच व्हायरसची लक्षणे दिसू लागताच पुढील फवारणी घ्यावी.
    👉कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल) ८ मिली + नो व्हायरस (बोटॅनिकल एक्सट्रॅक्ट) ४५ मिली + आनंद वेट गोल्ड (स्टिकर) २ मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    ✅ भुरी रोग
    थंड आणि कोरड्याहवामानात हा रोग प्रामुख्याने येतो. पानाच्या खालच्या बाजूवर पांढरे चट्टे पडतात आणि पानाचा वरचा भाग फिकट पिवळसर होतो. भुरीचे प्रमाण फार वाढल्यास पानांची गळ होते. भुरीचे ठिपके फांद्या फुले आणि फळे यांवरही येतात.
    ✅ उपाय:
    1️⃣ रैलिस ईशान (क्लोरोथालोनिल 75% डब्लू. पी.) - ३० ग्राम
    2️⃣ कोंटाफ प्लस (हेक्साकोनाजोल 5% एससी) - २५ मिली
    3️⃣ अवतार (हेक्साकोनाज़ोल 4% + ज़िनेब 68% डब्लू. पी.) - ३० ग्राम
    4️⃣ गोडिवा सुपर (एज़ोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डिफेनोकोनाज़ोल 11.4% एससी) - १५ मिली
    5️⃣या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
    ✅ फळ सडणे (ब्लॉसम एन्ड रॉट)
    कॅल्शिअम या अन्नद्रव्याच्या कमतरते मूळे हि विकृती दिसून येते. या विकृतीमध्ये सुरवातीच्या काळात फळाच्या खालच्या बाजूला तपकिरी रंगाचा ठिपका दिसून येतो. ठिपक्याचा आकार वाढत जाऊन नंतर तो भाग कुजतो.
    ✅उपाय :
    👉 खतांचा संतुलित वापर करावा.
    👉 आवश्यकतेनुसार चिलेटेड कॅल्शिअम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी.
    👉 रोको बुरशीनाशक (थायफेनेट मिथाईल 70% डब्ल्यू) ८ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 54

  • @shivalalmohabbe25
    @shivalalmohabbe25 11 місяців тому

    खुप छान माहिती मिळाली

  • @rajukharat2677
    @rajukharat2677 Рік тому +2

    Khup chan mahiti aahe sir thanks

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      धन्यवाद. मी देखील आपला आभारी आहे

  • @devidasdeore2461
    @devidasdeore2461 Рік тому +1

    माहिती चांगली दिली धन्यवाद.

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 Рік тому +1

    👌Ok💯. Tke

  • @ajayavhale11
    @ajayavhale11 8 місяців тому +1

    Ch calshium Ani roko ektr चालेल का

  • @rushikesh8890
    @rushikesh8890 Рік тому +2

    चांगली आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Рік тому

    Very good video by BharatAgri!

  • @oldsongs4339
    @oldsongs4339 11 місяців тому

    Urjnet amche tomato bag 1 ekar ahe kharab hoy lagle sagel

  • @santoshtayde36
    @santoshtayde36 Рік тому

    टँमोटो दुरी फोडणी साठी काय करावे

  • @rahulakolkar2408
    @rahulakolkar2408 Рік тому

    AdarAk var video banava

  • @sagarkatole8263
    @sagarkatole8263 Рік тому +1

    सल्फ्युरिक ऍसिड बद्दल माहिती सांगावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      ओके . आपण ही माहिती पुढील विडियो मध्ये कवर करू

  • @pawanpalaskar
    @pawanpalaskar 11 місяців тому

    पहिले तीन औषध एकत्र करून फवारणी करायचीय आहे का

  • @sushantpatil4514
    @sushantpatil4514 Рік тому +1

    Mirchi sate kay karav

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      मिरची साठी तुमची समस्या आणि पिकाची अवस्था सांगा , आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू

  • @gorakhpnagare6482
    @gorakhpnagare6482 9 днів тому

    Navin video banva sir lavkar

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 дні тому

      आपण संगितलेल्या प्रमाणे नवीन व्हिडिओ बनवाला जाईल लवकर, धन्यवाद सर!

  • @baburavshirtode6200
    @baburavshirtode6200 Рік тому

    Tomato La kaluki yenyasathi kay karayche

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , आपण बायोविटा , मायक्रोनुट्रीएंट्स चा वापर करा धन्यवाद सर !

  • @vishnusormare8562
    @vishnusormare8562 Рік тому

    Tuta absuluta fawarani kay

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      बेनेविया - 2 मिली / लिटर फवारणी आणि सापळे लावावे !

  • @sanjaysonkar9620
    @sanjaysonkar9620 Рік тому +1

    Mangoverty mohar University adhik jankari Diya

  • @vsmore8549
    @vsmore8549 Місяць тому

    Sir tamato chau zala pan bhuri 50 % pramnt vadhli ahe kantrol hot nahi 😢

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      आपण भुरी साठी नेटिवो - 10 ग्रॅम / 15 लिटर पाण्यासाठी फवारणी करावी.

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 11 місяців тому

    हो जैविक मध्ये साग सर आमचे पण होत आहेत तर काय करावे

  • @vijaymane981
    @vijaymane981 7 місяців тому

    सर आपले नंबर मिळेल का मिळाली तर ठिक होईल... तुम्हाला संपर्क कसे करनार...

  • @anilharale502
    @anilharale502 3 місяці тому

    सल्फर नाही का चालणार

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, सल्फर चालेल ना भुरी रोगासाठी. धन्यवाद सर !

  • @bapujadhav8657
    @bapujadhav8657 4 місяці тому +1

    आमच्या टोमॅटो पिकावरील फळावर जास्त तिरंगा आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी व्हिडिओ कॉल वरती सविस्तर चर्चा करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @oldsongs4339
    @oldsongs4339 11 місяців тому

    Number patva

  • @onlygaming4156
    @onlygaming4156 3 місяці тому

    डाऊन लोड तो नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому

      नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?

  • @saurabhgore1275
    @saurabhgore1275 10 місяців тому

    टोमॅटो फळ सड थांबत नाही काय करावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 місяців тому

      कृपया तुमच्या टोमॅटो पिकाचे फोटो आमच्या BharatAgri App मध्ये पाठवा. आमचे कृषि डॉक्टर ते पाहून संपूर्ण मार्गदर्शन करतील

  • @user-zd1xd9ld5z
    @user-zd1xd9ld5z 11 місяців тому

    फळ खालून आधि ओलंपिक होत मग काळा डाग येतो आतुन काळ होत

  • @user-xp9zp9is6k
    @user-xp9zp9is6k Рік тому

    Tomato chi sarvant best variety konti ahe sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      आर्यमान (सेमिनीस)- ५५-६० दिवसांनी पहिली तोडणी, एकसारख्या आकाराची फळे, गडद लाल रंगाची फळे, लांबच्या वाहतुकीसाठी चांगले, फळांचे सरासरी वजन ९०-१०० ग्राम आहे.
      अलंकार (क्लॉज सीड्स) - उशिरा खरीप आणि रब्बी लागवडी साठी शिफारस, ८०-८५ दिवसांनी पहिली तोडणी, लांबट फळे, फळांचे सरासरी वजन १०० ग्राम, कमी प्रमाणात विषाणू आणि जास्त उष्णतेला प्रतिकारक्षम आहे.
      टिओ ६२४२ (सिंजेंटा इंडिया)- लाल फळे, ६५-७० दिवसांनी पहिली तोडणी, माध्यम उंचीची झाडे, जास्त उष्णतेमध्ये सुद्धा चांगला परिणाम, फळांचे सरासरी वजन- ८०-१०० ग्राम, जास्त उत्पादन क्षमता.
      अनिशा (सैवी सीड्स) - ७० दिवसांनी पहिली तोडणी, गोल आकाराची लाल फळे, माध्यम उंचीची झाडे, फळांचे सरासरी वजन - ९०-१०० ग्राम, येल्लो लीफ कर्ल व्हायरस प्रतिकारक्षम, जिवाणूजन्य आणि बुरशीजन्य मर रोगासाठी प्रतिकारक्षम, चांगली टिकावण क्षमता.
      आयरिश केशर (आयरिश सीड्स) - गडद लाल रंगाची फळे, ५८-६२ दिवसांनी पहिली तोडणी, माध्यम उंचीची फळे, फळांचे सरासरी वजन - १००-११० ग्राम, येल्लो लीफ कर्ल व्हायरस प्रतिकारक्षम, जिवाणूजन्य मर रोगासाठी प्रतिकारक्षम
      जयम २ (अडव्हांटा सीड्स)- उन्हाळी हंगामासाठी चांगले वाण, ६०-६५ दिवसांत पहिली तोडणी, उच्च उत्पादन क्षमता, येल्लो लीफ कर्ल व्हायरस प्रतिकारक्षम, गडद लाल रंगाची फळे, लांबच्या वाहतुकीसाठी चांगले वाण.

    • @user-hf2gn5nl2n
      @user-hf2gn5nl2n 11 місяців тому

      ​@@bharatagrimarathi😮

  • @navanthkhatale2494
    @navanthkhatale2494 10 місяців тому

    टोमॅटो पिकामध्ये तिरंगा येऊ नये म्हणून पुढील प्रमाणे स्प्रे करावे कॉम्प्युटर सुपर 200 लिटर पाण्याला 100ml रिफ्रेश 200 लिटर पाण्यासाठी 350 ग्रॅम पूर्वा केमिकल कंपनीचे फिल्म एक्स कॉम बी 300 ग्रॅम ड्रीपद्वारे एकरी मिलान 2kg ओएमजी कंपनीचे टॉप रूट 2 लिटर ऍडव्हान्स कंपनीचे सी बॉण 1 लिटर याप्रमाणे ड्रीप द्वारे द्यावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 місяців тому

      ओके. कमेन्ट केल्या बद्दल धन्यवाद .

  • @sandipchaudhari7377
    @sandipchaudhari7377 Рік тому +1

    watsp nabar daya

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      कृपया तुम्ही आम्हाला BharatAGri App मध्ये संपर्क करू शकता

  • @satishburle5494
    @satishburle5494 11 місяців тому

    टोमेटो खालुन काळे चटे पडले आहेत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 місяців тому

      कृपया याचे फोटो BharatAgri App मध्ये टाका. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला योग्य मार्ग दर्शन करतील