सह्याद्री मधील फ्रिज - किल्ले कमळगड भाग-२

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला गडकिल्ले आणि सह्याद्रीचे अविरत प्रेम लाभले आहे. याच सह्याद्रीच्या कुशीत रुबाबात वसलेला कमळपुष्पाच्या आकाराचा कमळगड. सह्याद्रीचा फ्रीज म्हणून या किल्ल्याचा नावलौकिक जगभर आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात या किल्याचे वास्तव्य पाहायला मिळतं. चहुबाजूंनी घनदाट जंगलांनी या किल्याला वेढलेल आहे. किल्ल्यावर पोहचल्यावर सह्याद्रीच डोळ्यात न मावणार रूप अनुभवता येत. कृष्णामाईच शांत आणि मनाला विसावा देणार पात्र जणू आईचीच माया देत आहे का असा भास होतो. कमळगड किल्ल्याच्या समोर पाचगणी पठार आणि त्याच्या उजवीकडे महाबळेश्वरचा केट्स पॉइंट दृष्टीस पडतो. कमळगड किल्ल्यापासूनच काही अंतरावर रायरेश्वर किल्ला आहे. तसेच नवरा नवरीचा डोंगर सुद्धा तुम्हाला या गडावरुन पहायला मिळतो. समुद्रसपाटीपासून अंदाजे ४२०० फूट उंचीवर वसलेले, ते उंच खडकांनी वेढलेले आहे. जावळी मोहिमेच्या आधी हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात घेतला, नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता अन् किल्लेदार हे पिलाजी गोळे असल्याचे पुरावे सापडतात. धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे. गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरीचे डोंगर म्हणतात. किल्ल्यावर पाहण्यासारखं ठिकाण म्हणजे कावेची विहीर. तलवारीच्या आकाराची ही विहीर ४० ते ५० फुट खोल आहे. विहिरीत उतरण्यासाठी उत्तम पायऱ्या आणि सुरक्षीतेच्या दृष्टीने एक दोरखंड सुद्धा आहे. दोरखंडाला धरून विहिरीमध्ये उतरता येते. तुम्ही आतमध्ये प्रवेश कराल तसे सह्याद्रीची अधभूत किमया तुम्हाला अनुभवायला मिळेल. या कावेच्या विहिरीमुळेच याला सह्याद्रीचा फ्रीज म्हंटल जात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमळगड किल्ल्याची माहिती शेअर करा.
    #chatrapatishivajimaharaj #sahyadri #swarajya #history #shivajiraje #marathi #kamalgad #forts #maharashtra #travel #trekking #heritage #indianhistory #chhatrapati #travelvlog

КОМЕНТАРІ •

  • @abhijeetpatil5160
    @abhijeetpatil5160 2 дні тому

    Very Nice Prathamesh..❤✨

  • @VrushaliShinde-o2v
    @VrushaliShinde-o2v 13 днів тому +1

    Proud of you sir

  • @rohitdait8344
    @rohitdait8344 12 днів тому +1

    mast bhava🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pranavkatkar9496
    @pranavkatkar9496 15 днів тому +1

    Great sir❤🚩

  • @ameyalad476
    @ameyalad476 2 дні тому

    Namaskar Dada ! Jai Maharashtra Jai Bhavani Jai Shivrai .. Mala tumcha sobat eka trek sathi collaborate karaycha aahe. Icchuk asal tar mala reply kara