आपला मित्र परिवार सेवा संस्था वार्षिक स्नेहसंमेलन २०२3 | Reunión Anual 2023 | PART 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 сер 2023
  • महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आध्यात्मिक लोकजीवनाचा विचार करता या लोकजीवनाला वळण देणारे तीन महत्त्वाचे प्रवाह सांगता येतील. पहिला म्हणजे संतपरंपरा आणि महाराष्ट्र. दुसरा प्रवाह म्हणजे लोकपरंपरा आणि महाराष्ट्र तर तिसरा प्रवाह म्हणजे सुधारकांची परंपरा आणि महाराष्ट्र संतपरंपरेने भक्तिसाक्षर केले, लोकपरंपरेने भावसाक्षर केले तर सुधारकांनी बुद्धिसाक्षर केले. संतांनी विवेकप्रामाण्यवाद दिला. त्यावर सुधारकांचा बुद्धिप्रामाण्यवाद उभा राहिला. तर विवेक आणि बुद्धी या दोन सीमारेषांचे मोठेपण ओळखून कलावंतांनी विशेषतः लोककलावंतांनी कलाविष्कारातून मराठी मनाचे उत्कट भावदर्शन घडविले. संतांनी महाराष्ट्राला नेमके काय दिले, याचे उत्तर काय दिले नाही, असे द्यावे लागेल. मराठी भाषेच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करून संतांनी भागवत धर्मातील भक्तीला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाची बैठक दिली आणि आपल्या वाङ्मयातून आणि कृतीतून तो मानवतावाद जगाला दिला. महाराष्ट्राचे आणि संतपरंपरेचे एक अद्वय नाते आहे. ते जपण्याचे काम आपला मित्र परिवार करत आहे
  • Розваги

КОМЕНТАРІ •