Sumit Desale vlog
Sumit Desale vlog
  • 115
  • 91 512
|| मोरोशीचा भैरवगड 🚩 | अत्यंत चर्चेत असणारा | Thrilling trek | #aagrikolivlogs #trekking
सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झालेली आहे. लाव्हरसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लाव्हारसाचे थर एका वर एक थर जमत गेले. त्यानंतर उन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजे "प्रस्तर भिंती"; ही रचना आपल्याला भैरवगडा वरती पहायला मिळते. लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगररांगे पासून अलग झालेल्या बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच, सरळसोट भिंतीवर वसवलेला आहे. त्याची रचना व त्यामागची आपल्या पूर्वजांची कल्पकता पहातांना आपण थक्क होऊन जातो.
माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगे पासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे. किल्ल्याची रचना पहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.
या गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.
गडाच्या माचीवर कुठलेही अवशेष नाहीत. माचीवरून बालेकिल्ल्याकडे जातांना आपण डाईकच्या(बालेकिल्ल्याच्या) पायथ्यापाशी पोहोचतो. तिथेच पाऊल वाटेच्या वरच्या बाजूला पाण्याच टाक आहे. पाण्याच्या टाक्याच्या उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक आयताकृती गुहा आहे, परंतू या गुहेत जाण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. पुढे त्याच पाऊल वाटेने आपण बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकापाशी पोहोचतो. येथे साधारण ५० फूट उंचीवर कातळात खोदलेली आयताकृती गुहा आहे. या गुहेत जाण्यासाठी सुध्दा गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो.
बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाला वळसा घातल्यावर आपण भैरवगड व बाजूचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचतो. येथून बालेकिल्ल्याच्या कातळ कड्यावर खोदलेल्या पायर्‍या दिसतात. अंदाजे ५० पायर्‍या चढल्यावर आपण एका कातळात खोदलेल्या गुहेपाशी पोहोचतो. या गुहेत शिरण्यासाठी गुहेच्या पायथ्याला एक भोक पाडलेले आहे. त्यातून सरपटतच गुहेत प्रवेश करावा लागतो. ४ फुट लांब, २ फूट रुंद व ८ फूट उंच असलेली ही गुहा चारही बाजूने बंद आहे. फक्त गुहेच्या दर्शनी बाजूच्या ५ फूट उंचीवरील कातळ आयताकृती कापलेला आहे. गुहेच्या मागच्या भिंतीवर लाकडी वासे अडकवण्यासाठी खोबण्या खोदलेल्या आहेत. या वाशांवर गवताचे छप्पर तयार केल्यावर गुहेत बसलेल्या पहारेकर्‍याचे ऊन - पाऊस यापासून संरक्षण होत असे.
गुहेच्या पुढील पायर्‍या उध्वस्त केलेल्या आहेत. या ठिकाणी दोर लाऊनच वर चढावे लागते.हा साधारणत: १५० फूटाचा भाग (पॅच) पार केल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. या पायर्‍यांच्या एका बाजूला कातळकडा व दुसर्‍या बाजूला खोल दरी आहे तसेच पायर्‍यांवर मुरूमाची माती साठलेली असल्यामुळे जपूनच जावे लागते.पायर्‍या संपल्यावर आपण एका छोट्या उंचवट्यावर पोहोचतो. येथे उजव्या बाजूला कड्याला लागून एक सुकलेल टाक आहे. ते पाहून डाव्या बाजूच्या वाटेने वर चढायला लागावे ,वाटेत अजून एक कोरडे पडलेले पाण्याचं टाकं लागत. या टाक्याच्या पुढे वाट निवडूंगाच्या जाळीतून गडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचते. गडमाथा अरूंद असून पूर्व - पश्चिम पसरलेला आहे. गडमाथ्यावर कोणतेही अवशेष नाहीत. गडमाथ्यावरून पश्चिमेला नाणेघाटाचे टोक ते पूर्वेला हरीश्चंद्रगड असा विस्तृत प्रदेश दिसतो.
Переглядів: 86

Відео

|| किल्ले तिकोना (वितंडगड) | पवन मावळातील घाटवाटांचा पहारेकरी 🚩| #trekking #aagrikolivlogs #vlog
Переглядів 110Місяць тому
follow me on Instagram:- _mr._khiladi पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. या किल्ल्यावरून ३-४ कि.मी. अंतरावरील तुंग किल्ला दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले. तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर...
|| पदरगड | ९०° कड्यावरून चिमणी climb😰| थरारक अनुभव 😳| #trekking #sahyadri #aagrikolivlogs
Переглядів 635Місяць тому
follow me on Instagram:- _mr._khiladi कर्जत - खांडस मार्गे भिमाशंकरला जाणाऱ्या पुरातन गणेश (गणपती) घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड व तुंगी या किल्ल्यांची निर्मित करण्यात आली होती. हे दोनही किल्ले टेहळणीसाठी बांधण्यात आले होते, त्यामुळे या किल्ल्यांवर फारसे अवशेष नाहीत. पदरगडावर जाण्याचा मार्ग ठिकठिकाणी तुटल्यामुळे प्रस्तरारोहणाचे सामान वापरूनच गड सर करता येतो.पदरगडावरील २ कातळ सुळक्यांना "कलावंतीण...
|| किल्ले चंदेरी 🚩| chanderi fort | थरारक अनुभव 😰 #chanderi #trekking
Переглядів 4773 місяці тому
follow me on Instagram:- _mr._khiladi ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेत चंदेरी किल्ला आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून ट्रेकर्सच्या दृष्टीने अवघड समजला जातो. मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना एक डोंगररांग आहे. त्या डोंगरावर चंदेरीचा हा मोठा सुळका दिसतो. बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव असून येथूनच या चंदेरी किल्ल्याची वाट आहे. चंदेरीच्या पायथ्याशी घनदाट वृक...
|| एकच दिवसात जेजुरी,💛 भुलेश्वर🚩 आणि एकवीरा आई दर्शन🚩| #motovlog #aagrikolivlogs #dominar400
Переглядів 2225 місяців тому
|| एकच दिवसात जेजुरी,💛 भुलेश्वर🚩 आणि एकवीरा आई दर्शन🚩| #motovlog #aagrikolivlogs #dominar400
|| अजिंक्य अभेद्य जंजिरा🇮🇳 | किल्ले पद्मदुर्ग (कासा)🚩 | #murudjanjira , padmdurg #trekker #सह्याद्री
Переглядів 2505 місяців тому
|| अजिंक्य अभेद्य जंजिरा🇮🇳 | किल्ले पद्मदुर्ग (कासा)🚩 | #murudjanjira , padmdurg #trekker #सह्याद्री
|| घोसाळगड उर्फ वीरगड 🚩|| Ghosalgad | #trekking #motovlog #sahyadritrekking #trekker
Переглядів 5246 місяців тому
|| घोसाळगड उर्फ वीरगड 🚩|| Ghosalgad | #trekking #motovlog #sahyadritrekking #trekker
|| पुन्हा एकदा कोकणात 😍| Morning Ride💝| सूर्योदय 🌄| #motovlog #kokan #aagrikolivlog #dominar400
Переглядів 2296 місяців тому
|| पुन्हा एकदा कोकणात 😍| Morning Ride💝| सूर्योदय 🌄| #motovlog #kokan #aagrikolivlog #dominar400
|| श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान 🚩😍 | मुळगाव | बदलापूर | #aagrikolivlog #motovlog #खंडोबा
Переглядів 4106 місяців тому
|| श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान 🚩😍 | मुळगाव | बदलापूर | #aagrikolivlog #motovlog #खंडोबा
|| श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा🚩| दीपोत्सव 🪔 | भव्य पाळखी सोहळा🚩😍|| #aagrikolivlog #jayshreeram 💝
Переглядів 4737 місяців тому
|| श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा🚩| दीपोत्सव 🪔 | भव्य पाळखी सोहळा🚩😍|| #aagrikolivlog #jayshreeram 💝
|| पूर्णगड किल्ला | गणपतीपुळे दर्शन🙏🏻| आरे वारे बीच 🏖️| #aagrikolivlog #kokan_diary #bikelover #bike
Переглядів 2597 місяців тому
|| पूर्णगड किल्ला | गणपतीपुळे दर्शन🙏🏻| आरे वारे बीच 🏖️| #aagrikolivlog #kokan_diary #bikelover #bike
|| कोकण पृथ्वीवरचा स्वर्ग 🌴😍| सूर्य मंदीर | देवघळी beach🏖️ | #dominar400 #bikelover #kokan #kokan
Переглядів 5537 місяців тому
|| कोकण पृथ्वीवरचा स्वर्ग 🌴😍| सूर्य मंदीर | देवघळी beach🏖️ | #dominar400 #bikelover #kokan #kokan
|| ⛵ सफर विजयदुर्ग किल्ल्याची🚩 | Dolphin's 🐬 | भुयारी मार्ग | #kokan #kokan_diary #trekking
Переглядів 2,9 тис.8 місяців тому
|| ⛵ सफर विजयदुर्ग किल्ल्याची🚩 | Dolphin's 🐬 | भुयारी मार्ग | #kokan #kokan_diary #trekking
|| Mumbai To Kokan🌴 Bike Ride || विजयदुर्ग🚩 || #dominar400 #bikelover #motovlog #aagrikolivlog
Переглядів 1058 місяців тому
|| Mumbai To Kokan🌴 Bike Ride || विजयदुर्ग🚩 || #dominar400 #bikelover #motovlog #aagrikolivlog
|| Mumbai To Kokan 🌴 Bike Ride😍 || कुणकेश्वर|| पोखरबाव गणेश मंदिर|| #dominar400 #aagrikolivlog
Переглядів 1858 місяців тому
|| Mumbai To Kokan 🌴 Bike Ride😍 || कुणकेश्वर|| पोखरबाव गणेश मंदिर|| #dominar400 #aagrikolivlog
|| Mumbai To Kokan🌴 Bike Ride || कुणकेश्वर🙏🏻 || देवगड || #dominar400 #bikelover #motovlog #aagrikoli
Переглядів 3198 місяців тому
|| Mumbai To Kokan🌴 Bike Ride || कुणकेश्वर🙏🏻 || देवगड || #dominar400 #bikelover #motovlog #aagrikoli
|| Mumbai To Kokan 🌴 bike Ride || 🥵 #dominar400 #bikelover #rider #bikelife #bikerider
Переглядів 3208 місяців тому
|| Mumbai To Kokan 🌴 bike Ride || 🥵 #dominar400 #bikelover #rider #bikelife #bikerider
|| Donating Blood 🩸 For Thalassemia Major Patient || 🩸🤗💞 #blooddonation #savelife #savemotherearth
Переглядів 1728 місяців тому
|| Donating Blood 🩸 For Thalassemia Major Patient || 🩸🤗💞 #blooddonation #savelife #savemotherearth
| किल्ले गोरखगड आणि मच्चींद्रागड | भाग -१ |#thriller #sahyadri #trekking #sahyadritrekking #motovlog
Переглядів 2199 місяців тому
| किल्ले गोरखगड आणि मच्चींद्रागड | भाग -१ |#thriller #sahyadri #trekking #sahyadritrekking #motovlog
|| गोवर्धन Ecovillage | वज्रेश्वरी | Forest explore | #motovlog #dominar400 #aagrikolivlog
Переглядів 1479 місяців тому
|| गोवर्धन Ecovillage | वज्रेश्वरी | Forest explore | #motovlog #dominar400 #aagrikolivlog
|| किल्ले राजमाची आणि श्रीवर्धन | Mighty sahyadri | #sahyadri #trekking #sahyadritrekking#dominar400
Переглядів 14210 місяців тому
|| किल्ले राजमाची आणि श्रीवर्धन | Mighty sahyadri | #sahyadri #trekking #sahyadritrekking#dominar400
|| किल्ले राजमाची आणि श्रीवर्धन | सह्याद्री सोनकी महोत्सव 😍 | #dominar400
Переглядів 15610 місяців тому
|| किल्ले राजमाची आणि श्रीवर्धन | सह्याद्री सोनकी महोत्सव 😍 | #dominar400
|| किल्ले राजमाची आणि श्रीवर्धन || 11km off Road Ride || सह्याद्री सोनकी महोत्सव.😍| #dominar400
Переглядів 16410 місяців тому
|| किल्ले राजमाची आणि श्रीवर्धन || 11km off Road Ride || सह्याद्री सोनकी महोत्सव.😍| #dominar400
| कर्नाळा किल्ला भाग २ | Karnala bird sanctuary | #सह्याद्री #sahyadri #trekking
Переглядів 233Рік тому
| कर्नाळा किल्ला भाग २ | Karnala bird sanctuary | #सह्याद्री #sahyadri #trekking
| कर्नाळा किल्ला भाग १ | Karnala bird sanctuary | #सह्याद्री #sahyadri #trekking
Переглядів 411Рік тому
| कर्नाळा किल्ला भाग १ | Karnala bird sanctuary | #सह्याद्री #sahyadri #trekking
|| श्री मलंग गड🚩 | trekking point | निसर्गरम्य दृश्य🌍| with@gavwalayoutuber9869 #aagrikolivlog
Переглядів 197Рік тому
|| श्री मलंग गड🚩 | trekking point | निसर्गरम्य दृश्य🌍| with@gavwalayoutuber9869 #aagrikolivlog
|| K.B. wifi group || खूप जोरदार पार्टी || Insta 360x3 shots || #comedyvlog #aagrikolivlog
Переглядів 392Рік тому
|| K.B. wifi group || खूप जोरदार पार्टी || Insta 360x3 shots || #comedyvlog #aagrikolivlog
|| explore Water Kingdom || weekend vibes || #aagrikolivlog #comedyvlog #motovlog
Переглядів 607Рік тому
|| explore Water Kingdom || weekend vibes || #aagrikolivlog #comedyvlog #motovlog
|| Mishka चा वाढदिवस || #आगरीकोळी #aagrikolivlog #comedyvlog
Переглядів 564Рік тому
|| Mishka चा वाढदिवस || #आगरीकोळी #aagrikolivlog #comedyvlog
|| Weekend At Ram Baug || with @gavwalayoutuber9869 #travelvlog #motovlog
Переглядів 280Рік тому
|| Weekend At Ram Baug || with @gavwalayoutuber9869 #travelvlog #motovlog

КОМЕНТАРІ