![Shreyasee Mantrawadi](/img/default-banner.jpg)
- 60
- 190 017
Shreyasee Mantrawadi
Приєднався 17 січ 2021
Proprietor - Fortune Entertainment, anchor, RJ, lyricist
धनश्री ताई, कविता आणि मी.. #marathikavita #marathi #धनश्री #shreyasee #philosophy #गप्पा #kavita
कधी कधी काही गोष्टी स्वप्नवत वाटाव्या अशा आपल्या आयुष्यात घडतात. देव एक सुंदर दान आपल्या पदरात टाकतो आणि मग सगळ्याच गोष्टी जुळून येतात. मी लिहिलेली एक कविता सहज म्हणून मी धनश्री ताईला पाठवली, तिने ती कविता आवडल्याचं सांगून कौतुक केलं, पॉडकास्टरुपी गप्पांसाठी वेळ दिला, त्यात माझीच कविता एकत्र वाचू म्हणाली, मुलुंडला स्वरगंधार म्युझिक अकॅडमीची सुंदर जागा माझा मित्र केदार गोखले याने लगेच उपलब्ध करून दिली आणि केवळ माझा पॉडकास्ट उत्तम व्हावा म्हणून स्वतः लोकप्रिय गायक असलेले मंदार आपटे आणि अर्चना गोरे यांनी शूटिंगची जबाबदारी घेतली. सागर पटवर्धनने उत्तम संकलन केलं आणि विश्वनाथराव बिरेवार फाऊंडेशन ट्रस्टने यासाठी आर्थिक साहाय्य करून हा पॉडकास्ट सुंदर स्वरूपात रसिकांसमोर आणायला मदत केली. एका गोष्टीसाठी किती गोष्टी जुळून याव्या लागतात, तशा त्या आल्या आणि आमच्या या कवितामय गप्पा मी पोस्ट करू शकले. तुम्हा रसिकांचं प्रेम आणि आशीर्वाद यात जमा व्हायचे बाकी आहेत आता केवळ. ते लाभले की वर्तुळ पूर्ण होईल..
व्हिडिओला like, share आणि subscribe या त्रिसूत्रीनेही पुढे जाण्यास मदत करा ही नम्र विनंती.
यामध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांप्रती मी मनापासून ऋण व्यक्त करते आणि रसिकांच्या प्रतिक्रियांची वाट बघते..
श्रेयसी वझे - mantrawadii
व्हिडिओला like, share आणि subscribe या त्रिसूत्रीनेही पुढे जाण्यास मदत करा ही नम्र विनंती.
यामध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांप्रती मी मनापासून ऋण व्यक्त करते आणि रसिकांच्या प्रतिक्रियांची वाट बघते..
श्रेयसी वझे - mantrawadii
Переглядів: 6 991
Відео
गाणं,मी आणि तुम्ही.. सौ. इला भाटे. #marathikavita #kavita #bookrelease #shreyasee #feeling
Переглядів 38514 днів тому
'सहज सुचलं तेव्हा' या माझ्या काव्यसंग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी ज्येष्ठ अभिनेत्री सौ. इला भाटे यांनी माझ्या दोन कविता अतिशय मनापासून आणि प्रभावीपणे वाचल्या. त्यांच्या भावपूर्ण वाचनामुळे मी लिहिलेले शब्द रसिकांना अधिक भिडले याचा प्रत्यय निश्चितच आला तो रसिकश्रोत्यांच्या प्रतिक्रियांवरून. याच दोन कवितांमधली ही दुसरी कविता. कलाकार हा त्या कलामय वातावरणाचा आणि रसिकांच्या प्रेमाच...
विठुराया तुझे नाम - Mitawa #devotional #marathikavita #विठ्ठल #vitthal #भजन #आषाढी #bhakti
Переглядів 522Місяць тому
आषाढी एकादशी निमित्त 'मितवा' या गाजलेल्या हिंदी गाण्याच्या चालीवर विठ्ठला हे शब्द बरोबर बसले आणि माझ्या चुलत मामाच्या फर्माइशीवरून याच चालीवर पुढे पूर्ण भक्तिरचना मी लिहू शकले ही त्या बापरखुमादेवीवराचीच कृपा. त्या चालीची मजा अनुभवता येण्यासाठी मी त्या चालीतच हे माझे शब्द गाण्याचा प्रयत्न केला आहे तेवढा तुम्ही गोड मानून घ्या! नंतर याच शब्दांना सुप्रसिद्ध गायक - संगीतकार मंदार आपटे यांनी एक सुंदर...
करिअरवाली बायको हवी - कवयित्री - श्रेयसी मंत्रवादी - सादरकर्त्या - ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे
Переглядів 4 тис.2 місяці тому
पाडगावकर काकांनी जसे त्यांच्या बोलगाण्यांमधून त्या वेळचे समाजातले विषय मांडले, मनोवस्था मांडली..त्यावरूनच प्रेरणा घेऊन काही कविता लिहिल्या गेल्या. या कवितांना मी हल्लीची गाणी म्हणते. गप्पागप्पांमधून अनेकदा अनेक विषय कानावर येतात त्यापैकीच एक महत्त्वाचा विषय म्हणजे आजची तरुणाई, करियर, लग्न, मुलगा - मुलगी हा विचारांमधला भेद, संसार, अपेक्षा वगैरे वगैरे. त्यावरूनच हे मनात, मनातून काव्यात उलगडत गेलं...
महाराष्ट्राची मायबोली | #kavita #marathi #marathikavita #festival #मायबोली #maharashtra #shreyasee
Переглядів 1022 місяці тому
महाराष्ट्र म्हणजे जणू मायमराठीचं माहेरघर. आपल्या या मराठी बोलीचं सौंदर्य अवर्णनीय आणि तिच्या मुशीतून घडलेले अनेक कवी, साहित्यिक, वैज्ञानिक, क्रीडापटू, योद्धे हे तिचं खरं वैभव. सकल संतांनी तिचा गौरव केला. जगभर ती गुण्यागोविंदाने तिच्या माणसांच्या रुपात नांदते आहे, बहरते आहे. तिच्याबद्दल माझ्या मनात जो जिव्हाळा आहे, तो मी माझ्या या काव्यगीतातून प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या माझ्या शब्दां...
सहज सुचलं तेव्हा (कवितासंग्रह)- तिसरी आवृत्ती प्रकाशन #kavita #marathi #bookrelease #marathikavita
Переглядів 8602 місяці тому
आपलं पुस्तक, आपली कविता हे आपल्या मनाच्या अगदी जवळचं असं काही असतं. ते रसिकांसमोर आणण्यासाठी जेव्हा तितक्याच मनापासून एखादी संस्था रंगमंच उपलब्ध करून देते तेव्हा हा आनंद शतगुणीत होतो. मुलुंडच्या कल्पना विहार महिला मंडळाचे मी यासाठी मनःपूर्वक आभार मानेन, कारण त्यांनी त्यांच्या गेल्या वर्षीच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात कार्यक्रम सादर करण्याबरोबरच मला ही संधी दिली. ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे आणि अ...
Chandanyachya Veshivar #marathisong #kavita #moonlight #newsong #music #trending #love #shreyasee
Переглядів 4183 місяці тому
'चांदण्याच्या वेशीवर' हे एक काव्य-गीत. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांसाठी हे चांदणगीत प्रकाशित करताना अतिशय आनंद होत आहे. माझ्या शब्दांना सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे हिने अतिशय तरल स्वरांमध्ये गुंफलं आहे. आम्हा दोघींवर चित्रित झालेलं हे गीत आपल्याला आवडेल अशी आशा आहे. आमचे प्रायोजक गिरीशभाई गणदेवीकर ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांची मी ऋणी आहे. त्यांनी अतिशय मनापासून या ...
Chandanyacha Veshivar..#newsong #originalcomposition#marathi #marathikavita#kavita#shabda #moonlight
Переглядів 1383 місяці тому
'चांदण्याच्या वेशीवर' हे एक काव्य-गीत येत्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी ऑनलाइन प्रकाशित होणार आहे. तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांसाठी हे चांदणगीत प्रकाशित करताना अतिशय आनंद होत आहे. माझ्या शब्दांना सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे हिने अतिशय तरल स्वरांमध्ये गुंफलं आहे. आम्हा दोघींवर चित्रित झालेलं हे गीत आपल्याला आवडेल अशी आशा आहे. आमचे प्रायोजक गिरीशभाई गणदेवीकर ज्वेलर्स प्राय...
Chandanyachya Veshivar.. चांदण्याच्या वेशीवर..
Переглядів 414 місяці тому
आपली कविता आपल्या कवितांच्या वहीतून एका प्रवासाला निघते तेव्हा वाटेत तिला सूर भेटतात आणि मग ते दोघे हातात हात घालून पुढची वाटचाल सुरू करतात.. पुढचा सगळा प्रवास अतिशय आनंद देणारा असतो आणि याच प्रवासातले हे काही आनंदक्षण. शब्द - श्रेयसी वझे - मंत्रवादी संगीत आणि स्वर - सावनी शेंडे प्रायोजक श्री. गिरीशभाई गणदेवीकर ज्वेलर्स यांचे मनःपूर्वक आभार ! Fortune Entertainment च्या माध्यमातून या चांदण-गाण्य...
'गुरुपरमेश' - GuruParamesh । #fortuneentertainment #guru #devotional #guruvandana #shreyasee
Переглядів 4415 місяців тому
तुम ध्येय हो, उद्दिष्ट हो व्यासंग हो, आनंद हो तुम वृत्ती हो, तुम तत्त्व हो तुम चित्त हो, सर्वत्र हो ।। आराधना आराध्य हो तुम साधना तुम साध्य हो तुम भाग्य हो हर शिष्य का तुम मित्र हो, सर्वत्र हो ।। तुम भक्ती हो, तुम शक्ती हो विरक्ती हो, तुम मुक्ती हो तुम से ही आशा है बनी तुम सूत्र हो, सर्वत्र हो ।। तुम सूर ताल कवित्त्व हो तुम जाप जप्य पवित्र हो रियाज का तुम हो फलित तुम स्थीर हो, सर्वत्र हो ।। तुम...
Aik na g aai, Dr. Sadhana Bhatkhande, Part 2 #fortuneentertainment #positiveparenting #communication
Переглядів 1,4 тис.5 місяців тому
Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातल्या सहाव्या तज्ञ आहेत डॉ. साधना भातखंडे. मानसिक विकृती, व्यसनाधीनता, मानसिक रुग्णांच्या मुलांच्या समस्या अशा अनेक गोष्टींवर मार्मिक भाष्य करत आ...
Aik na g aai, Dr. Sadhana Bhatkhande। part 1 #fortuneentertainment #positiveparenting #communication
Переглядів 2,2 тис.5 місяців тому
Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातल्या सहाव्या तज्ञ आहेत डॉ. साधना भातखंडे. मानसिक विकृती, व्यसनाधीनता, मानसिक रुग्णांच्या मुलांच्या समस्या अशा अनेक गोष्टींवर मार्मिक भाष्य करत आ...
Cinematale Dev - सिनेमातले देव #shreyasee #fortuneentertainment #rameshdeo #seemadeo #marathisong
Переглядів 7596 місяців тому
दि. २३ जून २०१९ हा दिवस Fortune Entertainment साठी अविस्मरणीय होता कारण सिनेमातले 'देव' साक्षात अवतरले होते खास मुलुंडकरांसाठी. अर्थात 'देव' येणार म्हटल्यावर मुलुंड बाहेरूनही अगदी लांबवरून रसिक प्रेक्षक आले होते. अतिशय खेळकर आणि उत्साही अशा या रुपेरी पडदा गाजवलेल्या दाम्पत्याने मुलाखत आणि कार्यक्रमासाठी होकार दिल्यावर प्रचंड आनंद झाला. सुप्रसिद्ध गायक-संगीतकार मंदार आपटे याच्यामुळे श्री. रमेश द...
SUMANSUGANDH सुमनसुगंध, चरित्र प्रकाशन सोहळा, #FortuneEntertainment #sumankalyanpur #biography
Переглядів 8 тис.6 місяців тому
ज्येष्ठ पार्श्वगायिका 'सुमन कल्याणपूर' यांच्या अवीट गोडीच्या गाण्यांचा, आठवणींचा, विचारांचा आणि त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण अशा घटनांचा मागोवा घेणारं त्यांचं 'सुमनसुगंध' हे सुसंवादिनी सौ. मंगला खाडिलकर लिखित चरित्र प्रकाशित करण्याचा मान Fortune Entertainment या माझ्या संस्थेला मिळाला याचा मला मनापासून आनंद आहे. स्वतः सुमन ताई तब्बल २५ वर्षांनंतर रसिकांसमोर प्रत्यक्ष आल्या, बोलल्या, गायल...
Ek Pravas | Ravindra Sathe | Part 02 #interview #marathisong #shreyasee #fortuneentertainment
Переглядів 2 тис.7 місяців тому
नमस्कार रसिकहो, 'एक प्रवास' ही Fortune Entertainment' आयोजित बडोदे इथे संपन्न झालेली एक मुलाखत मालिका. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि आयोजनात काही प्रमु संस्थांचा सहयोग यामुळे अतिशय नेटकी, माहितीपूर्ण, रंजन करणारी आणि रसिकांना बरंच काही देऊन जाणारी अशी ही मुलाखत मालिका होती. याची सांगता झाली सुगम संगीत आणि ध्वनिमुद्रण क्षेत्रातल्या एका नामवंत कलाकाराशी रंगलेल्या गप्पांनी. ते नाव म्हणजे ज्येष्ठ प...
Ek Pravas | Ravindra Sathe | Part 01 #interview #marathisong #shreyasee #fortuneentertainment
Переглядів 12 тис.7 місяців тому
Ek Pravas | Ravindra Sathe | Part 01 #interview #marathisong #shreyasee #fortuneentertainment
Aik na ga aai- Dr. Geeta Khare- Part 02- #positiveparenting #shreyasee #upbringing #communication
Переглядів 3858 місяців тому
Aik na ga aai- Dr. Geeta Khare- Part 02- #positiveparenting #shreyasee #upbringing #communication
Aik na ga aai -Dr. Padmaja Dange -Part 01 #positiveparenting #shreyasee #upbringing #communication
Переглядів 1,5 тис.8 місяців тому
Aik na ga aai -Dr. Padmaja Dange -Part 01 #positiveparenting #shreyasee #upbringing #communication
Aik na ga aai | Pravin Davane | Part 02 #shreyasee #upbringing #communication #positiveparenting
Переглядів 1,2 тис.10 місяців тому
Aik na ga aai | Pravin Davane | Part 02 #shreyasee #upbringing #communication #positiveparenting
Aik na ga aai, Pravin Davane 01 #communication #upbringing #psychology #marathiliterature #shreyasee
Переглядів 88411 місяців тому
Aik na ga aai, Pravin Davane 01 #communication #upbringing #psychology #marathiliterature #shreyasee
बाबूजी महोत्सव - पार्ले । Sudhir Phadke | Asha Bhosle
Переглядів 53Рік тому
बाबूजी महोत्सव - पार्ले । Sudhir Phadke | Asha Bhosle
गुरुपरमेश |GuruParamesh| Rakesh Chaurasia |Raghunandan Panshikar|Shaunak Abhisheki|Sanjeev Abhyankar
Переглядів 3,2 тис.Рік тому
गुरुपरमेश |GuruParamesh| Rakesh Chaurasia |Raghunandan Panshikar|Shaunak Abhisheki|Sanjeev Abhyankar
गुरु परमेश - Guru Paramesh #shreyasee #guru #guruvandana
Переглядів 87Рік тому
गुरु परमेश - Guru Paramesh #shreyasee #guru #guruvandana
गुरु परमेश - Guru Paramesh..लवकरच #shreyasee #guru #guruvandana
Переглядів 86Рік тому
गुरु परमेश - Guru Paramesh..लवकरच #shreyasee #guru #guruvandana
'गुरु - परमेश' - Guru Paramesh .. Coming Soon
Переглядів 82Рік тому
'गुरु - परमेश' - Guru Paramesh .. Coming Soon
Mulansathi Mul Vhava - मुलांसाठी मूल व्हावं - #positiveparenting #shreyasee #upbringing #parenting
Переглядів 125Рік тому
Mulansathi Mul Vhava - मुलांसाठी मूल व्हावं - #positiveparenting #shreyasee #upbringing #parenting
Aik na ga Aai - Interview series - Mr. Sadashiv Patil ( Episod 2 - Part 2)
Переглядів 506Рік тому
Aik na ga Aai - Interview series - Mr. Sadashiv Patil ( Episod 2 - Part 2)
सहज सुचलं तेव्हा - कार्यक्रम झलक (solo)
Переглядів 104Рік тому
सहज सुचलं तेव्हा - कार्यक्रम झलक (solo)
Aik na ga Aai - Interview series - Mr. Sadashiv Patil ( Episod 2 - Part 1)
Переглядів 2,2 тис.Рік тому
Aik na ga Aai - Interview series - Mr. Sadashiv Patil ( Episod 2 - Part 1)
दोघींची भाषा श्रवणीय खूप सुंदर❤
खूप छान चर्चा.....
अश्रू कविता अप्रतिम चर्चा पण फार उंचीची
खुपच सुंदर 👌👌👌👏👏👏
कविता हृदयस्पर्शी! कविता वाचन आणि चर्चा खूप छान. दोघींचंही मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉
फारच सुंदर खुप आवडलं धन्यवाद 🙏
श्रेयसी कविता खूप छान आणि सोबत धनश्री ताई मग काय विचारता 🎉
सुरेख चर्चा..खरं आहे कवितेला एक छंद असतो. तसच कवितेला जेंव्हा सूरांचे पंख लाभतात, त्याचं गीत होतं तेव्हा ते मनाला जाऊन भिडतं. मी देखील कविता लिहीते त्यामुळे हा विषय जरा जास्तच जवळचा.
छंद,वृत्त - हे शिकायचे राहिले आहे हे पुन्हा जाणवलं संस्कृत आणी संस्कृति साठी अजून जगायचे आहे हे जाणवलं एका जन्मात हे शिकणे शक्य नाही पुन: पुन: जन्म घ्यावे लागेल हे जाणवलं म्हणून देहांत म्हणतात ,जीव तर शाश्वत आहे हे जाणवलं.
अश्रू कविता अप्रतिम , धनश्रीताई असल्यावर चर्चा किती उंची गाठणार याची कल्पना आलीच होती. 👏🏼
मॅडम आपण राशीवडे बृदुक येथील राहणाऱ्या आहात का
धनश्री ताई व श्रेयसी दोघींच्या कवितेविषयी रसग्रहण खूप आवडले
खूप छान आवडली चर्चा कविता आवडल्या. दोघींचे बोलणे समृद्ध करून गेले.
सुंदर कविता! प्रत्येकीच्या अश्रुंचं दु:ख का आणि कसं झेललं याबद्दलचे विश्लेषण धनश्रीताई आणि श्रेयसीताई या दोघींनी खूप छान केलंय. एक चांगला विषय ऐकायला मिळाला. धन्यवाद! 👌👌👍
Khare aahe Sir,tumhe mhanane manoman patale.me tumche khup lakhan wachle aahe,.
काव्यवाचन आणि चर्चा उत्तमच
खूप छान, ज्ञानात भर पडली धनश्री ताई
खूप सुरेख श्रवणीय👌
खूप सुंदर संवाद आणि अश्रू कविता सर्व विश्र्वाला व्यापणारी🙏💖
खूप सुंदर कवितेचा आस्वाद कसा घ्यावा हे शिकायला मिळाले खूप गोड मस्त
फारच सुंदर, श्रवणीय मंदाक्रांता म्हणती तीजला वृत्त ते मंद चाले " किंवा जाणा वसंततिलका व्हय तेच वृत्त येती जिथे त भ ज य गण, शब्द सगळी माहिती, धनश्रीताई म्हणाल्या तसे वृत्त पाठांतरपण पटकन अश्रु कविता फारच आवडली.
खूप छान
नुसतं धनश्री ताई नाही, डॉ.धनश्री ताई. हा त्यांचा मान आहे
दोघींच्या मनमोकळ्या गप्पा ऐकून आनंद वाटला, ज्ञानात भर पडली.छान झाला कार्यक्रम.
अतिशय सुंदर कविता व सादरीकरण
ऐकून सम्रुध्द झालो.
खूपच सुंदर तुझ्या आवाजात जातच गोड वाटते
ZAKKAASS
फार छान, चर्चा आणि काव्य वाचन अधिक काळ चाललं असतं ❤
KHUP CHHAN
केवळ अप्रतिम👌🏻👏🏻
खूपच छान....❤❤
केवळ अप्रतिम...❤
खुप छान कविता आणि विवेचन
अश्रू.. फार उद्बोधक आणि सुंदर. सुंदर अध्यात्मिक काव्य रूपी सादरीकरण. आपणास आणि धनश्री ताईंना धन्यवाद आणि नमस्कार.
दोन्ही कविता अप्रतिम. दुसर्या कवितेशी तर सहज रिलेट झाले.
फारच सुंदर 😂🎉 राधा विरह 😅
खूपच सुंदर
आणखी हा मराठी शब्द योग्य असताना लोक कवी नट मैफिल टीव्ही रंगमंच सर्वच ठिकाणी "अजून" या चुकीचा शब्दाचा वापर का करतात,आपणही अजून हाच चुकीचा शब्द या ठिकाणी वापरला आहे, आघा बदल करता आला तर.
खूप छान आपल्या कविता एकत्र कुठे मिळतील
माझं पुस्तक आहे सहज सुचलं तेव्हा या नावाने. माझ्याकडून ते विकत घेऊ शकता तुम्ही
श्रेयसी, धनश्रीताईं बरोबरील काव्य वाचन ,त्यावरील संपन्न संस्कारातील चर्चेच्या ह्या मेजवानीने श्रवणतृप्ती व आगळा आनंद मिळाला! तुमचे अभिनंदन!
अप्रतिम चर्चा
शब्दा ची ताकद आणि त्यातून आलेले काव्य सारच अद्वितीय
अश्रू कविता फारच हृद्य! आपल्या बोलण्यात आलेल्या सर्वच कविता उत्तमच आणि त्यावरचं विवेचनही! ऐकत राहावं, संपूच नये असं वाटत राहिलं. गहिवरून आलं ❤
सुरेख !
कविता, मुलाखत वजा गप्पा आणि एकूणच सादरीकरण खूप छान आहे. मनःपूर्वक अभिनंदन!! 💐💐
काव्य आणि विवेचन दोन्ही छान.
अप्रतीम कव्या झालंय
Ek sundar kalpana tumha donhi kaviyatrinchi mehfil mhanaje ekmekanche vicharanchi denghen farach bhavali. Farach chan.tumha doghana manapasun Shubhecha and Abhinandan
अप्रतिम
Khup छान!