Raja dalvi official
Raja dalvi official
  • 19
  • 100 974
भजन | Bhajan|राजा दळवी|भजन ऐसे गाव | भगवान लोकरे|भजनसम्राट मानवंदना |#RajadalviOfficial #viralsong
भजन | Bhajan|राजा दळवी|भजन ऐसे गाव | भगवान लोकरे|भजनसम्राट मानवंदना |#RajadalviOfficial #viralsong
__________________________________________________________
आज आपण महाराष्ट्रातील स्वर्गीय सुप्रसिद्ध भजन सम्राट, कीर्तनकार, दशावतार महानुभवाना भजन क्षेत्रातील मेरुमणी प्रसिद्ध गायक भगवान बुवा लोकरे यांच्या सुमधुर आवाजात आदरांजली देण्याचा प्रयत्न केला आहे... आपण रसिक मायबापांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल.. तो आपल्या अभिप्रायातून नक्की आम्हाला कळवा...
आणि राजा दळवी ऑफिसिअल या आमच्या यु ट्यूब चॅनेल ला भरभरून प्रेम द्या!
________________________________________________
Lyrics
स्वर्गीय बुवानी स्वर्गात वसविलं एक गाव ।
त्याचं भजन ऐसे नाव ॥धृ॥
जयराम कृष्ण हरी . . . . .
१)विठ्ठल रखुमाई ग्रामदैवत गावाचं ।
भक्त पुंडलिक पुजारी विठ्ठलाचं ।
जातपात नाही ना आरक्षण सारे जपती बंधूभाव(भक्तिभाव) ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
२) जनाई मुक्ताई नाव बारमाही नद्यांच ।
आषाढी कार्तिकीला स्थान भीमा चंद्रभागेचं ।
संतादिकांचे नित्य दर्शन हि हरिनामाची ठेव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
३)स्नेहल भाटकराना गावप्रमुख पद मानाच ।
बुवा शिवराम वरळीकर ट्रस्टी विठ्ठल मंदिराच ।
फुलाजी बागडे गोपाळ दांडेकर अध्यक्ष खोपकर नाव ॥ धृ ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
४) दीक्षित बुवा प्रमुख संगीत अकॅडमीच ।
परशुराम मौर्ये बुवा
सर इंग्रजी विषयाच ।
अनंत पांचाळ शिवाजी बुधकर तालवाद्यांचा घेती सराव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
५)विश्वकर्मा कला केंद्र चिंतामणी पांचाळांच ।
बुवा प्रमोद सुतार संचालक त्याचl
परशुराम पांचाळ चालक बुवा त्यांचा संगीत प्रधान भाव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
६)तंटामुक्ती गाव अर्जुन तावडे पोलीस पाटलांच ।
चंद्रकांत कदम डॅडी गावाचे सरपंच ।
कृष्णा पवार तलाठी बुवा ग्रामसेवक दयाळराव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
७)केशकर्तनालय महादेव न्हावी बुवांचं ।
अनंत पानवालेंच दुकान किराणा भुसारीच ।
हातिसकर बुवा कपडेवाले लेंगा सदरा टोपी पेहराव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
८) नांदी भजन पोळे बुवांच ।
बाबू निपाणींच फडाच
उदय गोखले काशिरामांच । . .
जयराम नानू मर्गजांच
बाळासाहेब प्रवेशव्दार ।
मच्छिंद्र कांबळी तलाव ॥ धृ ॥
९ ) .एकादशीला कीर्तन बाबा महाराज सातारकरांच ।
वार्षिकाला नाटक बाबी नालंग कलिंगणांचा ।
क्रिकेट मॅचच आयोजन विलास पाटिल बुवानी कराव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
१०) पुण्यआत्मा पूर्वजांच गाव भजनीकलावंतांच ।
चित्रगुप्ताच्या चोपडीत नाव भगवान खानावळीचं ।
भावना लोकरे सुगरणीच्या हाताला न्यारी चव ॥धृ॥
जयजय रामकृष्ण हरी . . . . .
_______________________________________________
संकल्पना - जयवंत राऊळ
गीत / संगीत - राजा दळवी
गायक - भजनसम्राट बुवा श्री भगवान लोकरे
किबोर्ड - रुपेश जाधव
ढोलकी / पखवाज - विजय सावंत
तबला - सर्वेश पांचाळ
साईट रिदम - विक्रम कोयंडे
एडिटींग - शशांक कोंडविलकर
कोरस - चंद्रकांत जाधव गोपी हारचेकर विक्रम कोयंडे आणि वृंदा लोकरे
वि सहाय्य - वर्संत बाणे सुयश काराणे आणि सुनिल लब्दे
विशेष आभार - जेष्ठ पखवाज वादक श्री .माऊली सावंत आणि व्यंकटेश उर्फ भाई राणे
रेकॉडिंग - अरविंद रेकॉर्डिंग स्टुडियो भांडूप
मिक्सिग -अविनाश बाईत
________________________________________________________________________
Famous Tags :
#भजन, #Bhajan|, #राजादळवी, #भगवानलोकरे, #सुप्रसिद्धभजनसम्राटमानवंदना, #RajadalviOfficial, #ViralSong2024, #स्नेहलभाटकर, #बुवाशिवरामवरळीकर, #मारुतीबागडे, #गोपाळदांडेकर, #वामनखोपकर, #प्रमोददीक्षित, #तुळशीरामदीक्षित, #परशुराममोर्ये, #अनंतपांचाळ, #परशुरामपांचाळ, #शिवाजीबुधकर, #चिंतामणीपांचाळ, #विलासपाटील, #चंद्रकांतकदम, #काशीरामपरब, #मच्छिंद्रकांबळी, #बाबामहाराजसातारकर, #बाळासाहेबठाकरे, #सुधीरकलिंगण, #बाबीनालंग, #शांतीकलिंगण, #उदयगोखले, #नानूमर्गज, #भजनऐसे गाव
______________________________________________________________________
Do watch this Also:
ua-cam.com/video/diqzKFCaLXc/v-deo.html
पाच रंगाच्या गौळणी|Official Music Video| Sant Eknath|Marathi Gavlan|Raja D|पारंपारिक गवळण
ua-cam.com/video/4FI_D8tk-d8/v-deo.html
गुळ सांडोनी गोडी घ्यावी ( अभंग ) | संत तुकाराम महाराज| भजन सम्राट श्रीधर मुणगेकर । संगीत राजा दळवी
ua-cam.com/video/iF3r1J80jpc/v-deo.html
धुंडीराज मोरया- अभंग | राजा दळवी | श्रीधर मुणगेकर #trending #viral #ganeshchaturthi #kokan #ganpati
ua-cam.com/video/-fU5fQRBINQ/v-deo.html
Happy Birthday Bappa|माघी गणेश जयंती विशेष गीत|#rajadalviofficial|Sameer K|#trending song
ua-cam.com/video/WcMkoehQm_A/v-deo.html
ट्वेटी ट्वेटी फटाके || बुवा श्री समीर कदम
__________________________________________________________
अशाच नवनवीन संकल्पना आणि वैशिष्ठपुर्ण गाण्यांसाठी Like आणि Subscribe करा "Rajadalviofficial" UA-cam channel धन्यवाद 🙏
_________________________________________________
Переглядів: 6 980

Відео

पाच रंगाच्या गौळणी|Official Music Video| Sant Eknath|Marathi Gavlan|Raja D|पारंपारिक गवळण
Переглядів 7612 місяці тому
पाच रंगाच्या गौळणी|Official Music Video| Sant Eknath|Marathi Gavlan|Raja D|पारंपारिक गवळण पाच रंगाच्या गौळणी गायक : श्रीधर मुणगेकर रचना - संत एकनाथ संगीत : राजा दळवी Femous tags: मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मानात, पारंपारिक गवळण, कान्हा पिचली माझी बांगडी, Marathi Gavlan, Gau Nako Kisna, Ghagar Gheun बुवा श्री समीर कदम बुवा श्री. श्रीधर मुणगेकर आल्या पांच गौळणी | पांच रंगाचे शृंगार करूनि ||धृ|...
गुळ सांडोनी गोडी घ्यावी ( अभंग ) | संत तुकाराम महाराज| भजन सम्राट श्रीधर मुणगेकर । संगीत राजा दळवी
Переглядів 3,2 тис.3 місяці тому
राजा दळवी सादर करीत आहेत गुरु पौर्णिमा 2024 विशेष अभंग गुळ सांडोनी गोडी घ्यावी ( अभंग ) | संत तुकाराम महाराज| भजन सम्राट श्रीधर मुणगेकर । संगीत राजा दळवी अभंग -गुळ सांडोनी गोडी घ्यावी रचना - संत तुकाराम महाराज गायक - सम्राट बुवा श्रीधर मुनगेकर संगीत - राजा दळवी राजा दळवी यांची इतर गाणी ट्वेंटी-ट्वेंटी फटाके ua-cam.com/video/WcMkoehQm_A/v-deo.htmlsi=uqEbVwEWyhFEa1TS हॅपी बर्थडे बाप्पा ua-cam.com...
बिघाडलो भजनाचो रंग
Переглядів 8497 місяців тому
बिघाडलो भजनाचो रंग
बिघडलेल्या भजन संस्कृतीवर हास्य आणि भाष्य करणारे धमाल विनोदी नाटक - बिघाडलो भजनाचो रंग ...
Переглядів 7757 місяців тому
बिघडलेल्या भजन संस्कृतीवर हास्य आणि भाष्य करणारे धमाल विनोदी नाटक - बिघाडलो भजनाचो रंग ...
नाटक - बिघाडलो भजनाचो रंग ( बिघडलेल्या भजन संस्कृतीवर हास्य आणि भाष्य करणारे धम्माल विनोदी नाटक )
Переглядів 5578 місяців тому
Marathi Natak, मराठी नाटक , मालवणी नाटक प्रयोगासाठी संपर्क - राजा दळवी 8879900331
Happy Birthday Bappa|माघी गणेश जयंती विशेष गीत|#rajadalviofficial|Sameer K|#trending song
Переглядів 6 тис.8 місяців тому
Happy Birthday Bappa|माघी गणेश जयंती विशेष गीत|#rajadalviofficialSameer K|#trending song राजा दळवी प्रस्तूत माघी गणेश जयंती स्पेशल बाप्पा Happy Birthday To You ... गायक - समीर कदम गीत /संगीत/ संकल्पना - राजा दळवी स्पेशल voice - कु.रुची संजय सावंत Live रिदम - आकाश सावंत किबोर्ड - नागेश गुजर कोरस -कु.प्रज्ञेश सावंत , कु नील सावंत संकलन - शशांक कोंडविलकर विशेष सहाय्य - वसंत बाणे आणि विलास सावंत स्...
राजा दळवी यांची संगीत रचना .बुवा चंद्रकांत जाधव यांच्या हदयस्पर्शी आवाजात .गीत - प्रभाकर भोगले
Переглядів 1 тис.8 місяців тому
कोकणच्या सध्य परीस्थितीवर आधारीत गीत गायक - बुवा चंद्रकांत जाधव गीत - प्रभाकर भोगले संगीत -राजा दळवी रिदम व साईड रिदम- विशाल खोत सन्क्लन- जयंत रेवडेकर विशेष आभार - रघुनाथ कदम ध्वनीमुद्रण - श्रीकृष्ण सावंत #viral. #kokan#natak# गजालीन खालो घो : #trending #bhajan # gav आता हयसर पयल्या सारखा काय नाय रवला ... सगळा हरावला
बारा बारा बारा 12-12-12 (कै. बुवा काशिराम परब याना विनम्र अभिवादन)
Переглядів 7 тис.10 місяців тому
बारा बारा बारा 12 12 12 गायक - बुवा समीर कदम गीत/संगीत - राजा दळवी ढोलक - आकाश सावंत तबला - अभिषेक सरफरे साईड रिदम - विनोद मांडवकर कोरस - प्रशांत देवलकर / विनोद / अभिषेक / आकाश स्टुडियो - अरविंद रेकॉडिंग स्टुडियो , भांडूप रेकॉडिस्ट - अविनाश बाईत विशेष आभार - रामभाऊ दळवी स्वर्गीय बुवा काशिराम परब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ...
धुंडीराज मोरया- अभंग | राजा दळवी | श्रीधर मुणगेकर #trending #viral #ganeshchaturthi #kokan #ganpati
Переглядів 1,6 тис.Рік тому
राजा दळवी सादर करत आहे भजनरत्न श्रीधर बुवा मुणगेकर यांच्या सुमधुर आवाजात गणेश चतुर्थी निमित्त अभंग "धुंडीराज मोरया" गीत/संगीत : राजा दळवी गायन : भजनरत्न श्रीधर बुवा मुणगेकर
नका आणू रीफायनरी | गीत/संगीत : राजा दळवी | गायन : श्रीधर मुणगेकर बुवा #kokan #viral #trending
Переглядів 1,1 тис.Рік тому
राजा दळवी यांच्या लेखणीतुन साकार झालेले भजनरत्न बुवा श्रीधर मुणगेकर यांच्या आर्त स्वरांत कोकणातल्या ज्वलंत विषयावर कोकणी माणसांला भावनिक साद.... नका आणू रिफायनरी गायक -श्रीधर मुणगेकर गीत / संगीत -राजा दळवी पखवाज - प्रणव धुरी तबला - फिरण पेडणेकर कोरस -सुनिल लब्दे, प्रणाली, वसंत बाणे विशेष आभार: जयवंत राऊळ आणि दत्तात्रय कारेकर विधी व्हाईस स्टुडियो, लोअर परेल
आवळेगावावर देवा राहो कृपेची छाया...गायिका .सौ.निशा शिंदे - टेमकर / गीत / संगीत - राजा दळवी
Переглядів 916Рік тому
"आवळेगावावर देवा राहो कृपेची छाया... गायिका व संगीत संयोजन - सौ.निशा शिंदे -टेमकर ( संगीत सम्राट / सूर नवा ध्यास नवा फेम ) किबोर्ड - रुपेश टेमकर गीत / संगीत - राजा दळवी ऱ्हीदम/ साईड ऱ्हीदम- विजय सावंत तबला-सर्वेश पांचाळ ऑक्टोपॅड - तेजस सावंत कोरस - प्रिया विजय सावंत, शैलेश शिंदे, विशाल राणे रेकॉंडींग आणि मिक्सिंग - प्रतिक वाघ फिनिक्स रेकॉंडींग स्टुडियो गोवंडी, मुंबई All rights Rajadalvi Officia...
योगेश आग्रावकरची "माऊली " गीत व संगीत -राजा दळवी
Переглядів 2572 роки тому
बाळगोपाळ नवरात्रौत्सव मंडळ, सातरस्ता निर्माता - विशाल धुरी गायक - योगेश आग्रावकर गीत/संगीत -राजा दळवी संगीत संयोजन - प्रशांत कदम - हीदम /पर्कशन - विशाल खोत कोरस - १)प्रशांत मेस्त्री २)विशाल खोत ३)प्रियांका कदम ४) नम्रता कदम साऊंड रेकाँडिस्ट-प्रतिक वाघ - फिनिक्स स्टुडियो
सातरस्त्याची माऊली || गायक - विवेक नाईक / गीत -संगीत राजा दळवी
Переглядів 2952 роки тому
सातरस्त्याची माऊली गायक - विवेक नाईक गीत -संगीत राजा दळवी
स्वराघिश गणाधीश || निर्माता - सुनिल लब्दे, संकल्पना - राजा दळवी
Переглядів 1,6 тис.2 роки тому
स्वराघिश गणाधीश निर्माता - सुनिल लब्दे संकल्पना - राजा दळवी Disclaimer:-This video contains of @Raja dalvi official. This video covered under copyright © act. Any piracy, unauthorized imitation and circulation to any social media or other digital platforms (WhatsApp, Facebook, Instagram, UA-cam etc.) is strictly prohibited and punishable offence against copyright act. Strict action will be take...
देवांची तिरंगी बारी💥Devanchi tirangi bari🔥नक्की पहा💥
Переглядів 5 тис.2 роки тому
देवांची तिरंगी बारी💥Devanchi tirangi bari🔥नक्की पहा💥
लोकराजा सुधीर कलिंगण पुन्हा होणे नाही || भजनसम्राट श्रीधरबुवा मुणगेकर यांच्या भावस्पर्शी आवाजात..
Переглядів 11 тис.2 роки тому
लोकराजा सुधीर कलिंगण पुन्हा होणे नाही || भजनसम्राट श्रीधरबुवा मुणगेकर यांच्या भावस्पर्शी आवाजात..
आसा आमचा कोकण || बुवा श्री चंद्रकांत जाधव
Переглядів 2,9 тис.2 роки тому
आसा आमचा कोकण || बुवा श्री चंद्रकांत जाधव
ट्वेटी ट्वेटी फटाके || बुवा श्री समीर कदम
Переглядів 49 тис.2 роки тому
ट्वेटी ट्वेटी फटाके || बुवा श्री समीर कदम

КОМЕНТАРІ

  • @SamirWaghdhare-k9e
    @SamirWaghdhare-k9e 2 дні тому

    बुवा अप्रतिम गजर😮👌👍

  • @sanjaysawant2544
    @sanjaysawant2544 18 днів тому

    भजनाचे पंडीत.,भजन महर्षी,भजन सम्राट, कोकण रत्न, लोकरे बुवा ❤❤खूप खूप सुंदर ,नवीन असे भजन गावं सकल्पना खूप आवडली राजा दळवी खूप छान

  • @narayansutar6050
    @narayansutar6050 23 дні тому

    मस्त गायनबुवा अप्रतिम

  • @omkarpujari5851
    @omkarpujari5851 25 днів тому

    Khup chan Mauli ❤

  • @charuhasmanjrekar1491
    @charuhasmanjrekar1491 Місяць тому

    अप्रतिम एकदम ❤

  • @VRCreation1979
    @VRCreation1979 Місяць тому

    सुंदर👌😊

  • @sadanandpatil1534
    @sadanandpatil1534 Місяць тому

    ज्येष्ठ भजन बुवांच्या आठवणी अप्रतिम जागृत केल्या गुरुवर्य लोकरे बुवांच्या आवाजाची जादू आणि कोरास पण खूप छान आहे

  • @pramodkoyande9438
    @pramodkoyande9438 Місяць тому

    छान संकल्पना! उत्तम सादरीकरण!

  • @sejaldhanba9317
    @sejaldhanba9317 Місяць тому

    फार छान अप्रतिम ❤❤

  • @1986laxman
    @1986laxman Місяць тому

    अप्रतिम !

  • @rypp3981
    @rypp3981 Місяць тому

    श्री. लोकरे बुवा, ।।भजन ।। धन्य ते, स्वर्गीय बुवांनीवसवलेल " भजन गांव " जिथे ग्रामदैवत विठ्ठल रखुमाईच्या पूजेसाठी स्वतः पुंडलीक आहे जिथे सगळे बंधुभावाने आणि भक्ती -भावान रहातात. त्या गावातील प्रत्येक कलाकाराचं, व्यावसायिकाच गीतकारान, गद्य स्वरुपात केललं वर्णन गायकानं पद्य स्वरूपात अगदी समजेल अशा शब्दांत म्हटलं अगदीच 👌👌 चित्रगुप्ताच्या नोंदीतील 'लोकरे खानावळ' आणि त्यात सद्भभावनेन, प्रेमाने चविष्ट अन्न बनवणारी भावन/सुगरण, नव्हे तर साक्षात "अन्नपूर्णा" तिला तर माझा दंडवत!! 👏👏 भजन सम्राट भगवान लोकरे यांचे स्पष्ट उच्चार,आणि त्यांच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ छानच कळतो. तसेचत्यांच्या गोड गळ्याची स्तुती करावी तेवढी कमीच होईल तसेच गीतकार, संगीतकार आणि त्यांच्या साथीदारांनी दिलेली साथ तर छानच वाटली. या सर्वांनी त्यांच्या भजन क्षेत्रातील महानुभवानाआणि मेरुमणींना दिलेली "आदरांजली " तर अवर्णिय वाटली !! भजन ऐकून कान👂👂 तृप्त झाले . जय जय रामकृष्ण हरी। धन्यवाद। 🙏 आपला चहिता / श्री. पावसकर

  • @umeshvanjare8791
    @umeshvanjare8791 Місяць тому

    कोकण रत्न बुवा श्रींमान भगवानजी लोकरे यांच्या गोड वाणीतून महान दिग्गज कलाकारांना आदरांजली..🙏🏻💐 वा...राजा बुवा... अश्या वेगळ्या संकल्पना तुम्हीच साकार करू शकता सुंदर रचना, वादन आणि खास करून संकलन खुप भारी...👌🏻🌹❤️

  • @व्यंकटेशराणे

    🙏🚩 *राम कृष्ण हरि* 🚩🙏 राजा दळवी ! राजा दळवी !! राजा दळवी !!!* .... स्वत: भजनकार, पखवाजवादक, तबलावादक म्हणून मिरवत नसतानाही भजन क्षेत्राविषयी भरीव अन् ओतप्रोत ओढ व प्रेम असलेलं निखळ, तरल व्यक्तिमत्व !! .... आणि विशेष म्हणजे एक सर्वोत्कृष्ट कवनकार आणि नाविन्यपूर्ण रचनांचा निर्माता !! तसेच आमचे परमस्नेही श्रीमान लोकरे बुवा आणि सहकारी यांनीही राजा दळवींच्या या कवनाला सुंदर रीत्या सादर करुन पूर्णत: न्याय दिल्याचंही आवर्जून जाणवतंय !! अर्थात सुंदर सादरीकरण म्हटल्यावर त्यात तालवाद्यांची उत्तम साथसंगत हे ओघाने आलंच !! असो ..... श्रवण करताना एकूण आपणां सगळ्यांनाच वंदनीय, पूजनीय अशा स्वर्गस्थ गुरुतुल्य भजनकारांचं *भजन* हे गावच साक्षात डोळ्यांपुढं उभं राहिल्याचं मात्र प्रकर्षानं नक्कीच जाणवते !! 😊👍 भूतलांवरुन अंतर्धान पावल्यानंतर सध्या स्वर्गस्थ असलेल्या आपल्या ज्येष्ठ-श्रेष्ठ दिग्गज भजनकारांनी स्वर्गीच एक मांदियाळी तयार करुन त्या ईहलोकी पुन्हा तोच भजन / नामस्मरणाचा परमानंद लुटण्याकरिता *"भजन"* या नावानंच एक गाव वसवावं, ही संकल्पनाच मुळात किती आनंददायी अन् आपल्या जीवाला सुखावणारी आहे .... नाही का ? अर्थात हे सुचण्याकरिता देखील *"भजन"* या विषयाबद्दल तेवढीच आसक्ती असणे हेही क्रमप्राप्त आहेच आणि तीच *भजन-आसक्ती,* आपल्या समस्त भजनरसिकांच्या ह्रदयांत स्थानापन्न झालेल्या *श्री. गोविंद दळवी उर्फ राजा दळवी* यांच्या ठायी ठासून भरलेली आहे. त्यास्तवच अशी सर्वोत्तम कलाकृती आज त्यांच्याकडून घडून आली आहे, हेही नाकारता येणार नाही. तरीही कोणतीही उत्तम कलाकृती एखाद्या कलावंताकडून घडवून आणताना भगवंत देखील त्या कलाकाराच्या डोक्यात हवा जाऊ नये म्हणजेच त्याचे पाय जमिनीवरच राहावेत याकरिता काही न काही उणीव शिल्लक ठेवतोच आणि तद्वतच काही दिवंगत भजनी कलावंतांचा नामोल्लेख राहून गेला असावा, असं माझं प्रामाणिक मत आहे. एक सच्चा कलाकार हेतुपुरस्सरपणे असं करेल, असं मात्र कधीच वाटणार नाही. मानवाच्या प्रत्येक कृतीमागे त्याच्या संचित आणि प्रारब्ध यांच्या मूल्यमापनाबरोबरच भगवंत देखील आपल्या परीनं मूल्यमापन करीत असतोच !! म्हणूनच या उणीवेस आपण मोठ्या मनानं समजून घेऊया !! भविष्यात अशा या उणीवा राहू नयेत, याची ते नक्कीच काळजी घेतील !! *राजा* 🩷😊 आपल्या या उत्तम कलाकृतीस खरंच अगदी मनापासून अभिवादन !! 🌹💐🪷👍😊 आपला स्नेहांकित, व्यंकटेश राणे (भाई बुवा) दि. ६ सप्टेंबर, २०२४ 😊👍🚩🙏्

  • @bhagwanlokare3842
    @bhagwanlokare3842 Місяць тому

    भजन हे मान सन्माच्या पलीकडे असत,, ते शुद्ध भक्ती भावाचं प्रतीक असत

  • @maheshsawant9193
    @maheshsawant9193 Місяць тому

    अप्रतिम श्री राजाजी दळवी साहेब खूप छान वर्णन करून भजन कलेला एक सर्व दिग्गजंची आठवण देऊन संगीत संयोजन खूपच श्रवणीय सर 🙏🙏🙏महर्षी आदरणीय श्री लोकरे बुवांनी त्याला मस्तच साज चढवलीय आणि संगीत संयोजन सुद्धा अप्रतिम झालेय सर्व टीम चे अभिनंदन 🙏🙏🙏🥰🥰🥰🌹🌹🌹👌👌👌👍👍👍

  • @chandrakantvaradkar7691
    @chandrakantvaradkar7691 Місяць тому

    अति सुंदर राजा सर्व बुवांची आठवण करून दिली

  • @kaustubhredkar8313
    @kaustubhredkar8313 Місяць тому

    छान

  • @Dattaram-j6i
    @Dattaram-j6i Місяць тому

    माऊली अप्रतिम सादरीकरण उत्तम कोरस जुन्या बुवांची बऱ्याच वर्षाने तुमच्या मुखवाणीतून नाव ऐकायला मिळाली ❤ मन भरून आलं

  • @Dattaram-j6i
    @Dattaram-j6i Місяць тому

    सुंदर सादरीकरण उत्तम कोरस मन भरून आलं

  • @SandipPanchal-c9m
    @SandipPanchal-c9m Місяць тому

    लयभारी ❤

  • @kishorwadkar2768
    @kishorwadkar2768 Місяць тому

    सुंदर रचना, सुंदर गायन तितकाच कोरस उत्कृष्ट सर्वाना नमस्कार

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 Місяць тому

    Apratim shabda rachana tyala sajeshi chal nivad Guruvarya BHAGAVANJI Lokare buvancha matured Avaj Buvanache spastha shabdochar kharach ek ucchadarjachi kalakruti niraman zali Sahayyak kalakar hi uttam vadan hi pramanat sajese vajandar sarvana manapasun DHANYAWAD❤🙏🤝 दिल जीत लिया❤

  • @vinayaknatekar97
    @vinayaknatekar97 Місяць тому

    👍खुप छान माऊली गायन,वादन,आणि कोरस अप्रतिम संगीत ❤❤❤🙏🙏

  • @vijaypokale7328
    @vijaypokale7328 Місяць тому

    खूप श्रवणीय 👍👌

  • @sachinsawant7083
    @sachinsawant7083 Місяць тому

    अतिशय सुंदर

  • @PrakashShinde-j6m
    @PrakashShinde-j6m Місяць тому

    सुंदर रचना, सुंदर सादरिकरण, श्रवणीय 👌👌👍👍

  • @namu21-hc3ym
    @namu21-hc3ym Місяць тому

    उत्तम उत्तम रचना, सर्वाना शुभेच्छा 💐🙏🌹❤️

  • @namu21-hc3ym
    @namu21-hc3ym Місяць тому

    छान शुटींग केले दळवी साहेब 🙏🌹💐❤️

  • @namu21-hc3ym
    @namu21-hc3ym Місяць тому

    वा, मस्त, आपल्या नावात भजन 🌹❤️🙏💐

  • @pandurangtikam3844
    @pandurangtikam3844 Місяць тому

    राजा दादा एक अप्रतिम संकलपना , स्वर्गीय सुख अनुभवताना मान्यवर बुवांचे स्मरण व त्यांचे कार्य यांची मोजक्या अशा शब्दात सांगड घातली आहे. संगीत व माऊलींचे गायन अप्रतिम. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤

  • @dnyaneshwarsawant4839
    @dnyaneshwarsawant4839 Місяць тому

    श्रीमान राजा दळवी साहेब, या अप्रतिम रचनेतून आपला भजन संप्रदायाचा अभ्यास किती गाढा आहे याची प्रचिती येते. वैकुंठवासी समस्त पूर्वसुरिन एकप्रकारची हि श्रद्धांजलीच आहे. लोकरे बुवांचा गोड आवाज आणि साजेशी साथसंगत यामुळे खूपच श्रवणीय झाले आहे हे गीत.❤❤❤

  • @MadhviSawant
    @MadhviSawant Місяць тому

    वा दादा छान आहे गाणं आणि चाल सुद्धा फार सुंदर आहे

  • @yogeshchafekar9985
    @yogeshchafekar9985 Місяць тому

    खूप छान 🎉🎉

  • @navnathkankekar6518
    @navnathkankekar6518 Місяць тому

    सन्माननीय श्री. लोकरे बुवा आपल्या सुमधुर वाणीने गीत सादर केलात. खूप आनंद झाला. गीताची रचना देखील अप्रतिम आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे आपल्या गावचे सरपंच आमचे कोकणकलाभूषण स्वर्गीय चंद्रकांत कदम बुवा 👏👏👏👏

  • @chandrakantkankekar6032
    @chandrakantkankekar6032 Місяць тому

    बुवा, खूपच सुंदर सादरीकरण. 🙏

  • @bot-fm5by
    @bot-fm5by Місяць тому

    अतिशय सुंदर संगित, अप्रतिम गायन- साथसंगित आणि विशेष सरव बुवांची आठवण झाली.

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 Місяць тому

    जप तप नाही आरक्षण सारे जपती बंधुभाव। त्याचे भजन भजन भजन ऐसे नांव। ❤

  • @sanjaysawant2841
    @sanjaysawant2841 Місяць тому

    पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे श्रवणीय गीत.

  • @vitthalvarkute5346
    @vitthalvarkute5346 Місяць тому

    खरंच हे गीत ऐकल्यावर मन भारावुन जात की गावाच्या नावाची प्रशंसा करणार गीत आहे एवढे कलावंत या गावांमध्ये होऊन गेले

  • @atharvalokare
    @atharvalokare Місяць тому

    khup chan gana aahe baba aani saglya team la pan well done👍🏻❤

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga Місяць тому

    👌👌💥💥

  • @chandrakantdesai5
    @chandrakantdesai5 Місяць тому

    सन्माननीय श्री राजा दळवी साहेब (कवी) यांची सुंदर रचना एकदम अप्रतिम गायन आणि कोरस सहित वादनही चांगलं शिवाय ज्येष्ठ बुवांचे आणि पखवाज वादकाचं सुंदर वर्णन करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम काम केले आहे.

  • @kishornanda6
    @kishornanda6 Місяць тому

    राजा दादा एक सुंदर संकल्पना घेऊन छान रचना केलीत... संगीत तर उत्तमच, त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे सन्माननीय लोकरे माऊलींचा भारदस्त आवाज ... अत्यंत सुंदर श्रवणीय गीत ऐकल्याचं समाधान मिळालं. विजय सावंत यांचं वादन आणि कोरस उत्तम. तुमच्या या गावात ज्यांना आम्ही प्रत्यक्ष पाहिलेही नाही अशा दिग्ग्ज कलाकारांचं दर्शन सुद्धा झालं. मनापासून धन्यवाद दादा

  • @swift2610
    @swift2610 Місяць тому

    ख़ुप छान

  • @krishnakadave2889
    @krishnakadave2889 Місяць тому

    खूप छान 👌 ♥️

  • @योगेशलक्ष्मणपरब

    सुंदर गीत

  • @santoshlad9945
    @santoshlad9945 Місяць тому

    वा खूप छान

  • @vinodlavande1755
    @vinodlavande1755 Місяць тому

    खूप सुंदर माऊली शब्द रचना संगीत आणि गायन अप्रतिम सर्व बुवांचा उल्लेख ही एक पोच पावती.... खूप दिवसांनी ऐकायला मिळाले ❤❤

  • @ashwiniparab3750
    @ashwiniparab3750 Місяць тому

    खूप सुंदर 👌👌

  • @SandipPanchal-c9m
    @SandipPanchal-c9m Місяць тому

    अप्रतिम रचना माऊली ❤