हा चित्रपट क्रांतिकारकांची मानवी बाजू दाखवीतो. आपण नेहेमी क्रांतिकारकांचा महिमा गातो पण आपण हे विसरतो की त्यांना देखील आपल्यासारख्याच इतर भावना असतील. ते सर्व मोह त्यागून देशासाठी बलिदान देत होते. त्यांचा देशप्रेमापलीकडील संघर्ष हा चित्रपट एकदम हुबेहूब दाखवतो. साष्टांग नमन त्या महान वीरांना आणि वीरांगनांना 🙏
असे चित्रपट मराठी मध्ये तयार होतात खरचं आमचं सौभाग्य आहे. मन हेलावून टाकणार कथानक आणि दर्जेदार अभिनय खरोखरच हा एक चित्रपट नसून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटलेल्या क्रांतिकारांच्या बलिदानाचे, त्यागाचे प्रतीक आहे.
कोण होती ही माणसं??? ..भावनांचा ,नात्याचा,प्रेमाचा आणि वेळ आल्यास जीवाचा सुद्धा त्याग करून फक्त आणि फक्त देशाच्या स्वातंत्र्य साठी झटली...किती आणि किती सहन केलं... अरे कुठे जगतोय आपण खरं जगणं तर ह्या माझ्या भारत मातेच्या वीर पुत्रांकडून शिका ज्यांच्यामुळे आज हा मोकळा श्वास घेतोय आपण!!!....जय हिंद!!
मी इंडियन आर्मी मध्ये काम करतो . आज हा चित्रपट बघितला आणि मला स्वतःचीच लाज वाटतेय की यांनी सगळ्यांनी जे कार्य केले आहे.त्या मधील मी एक कन भर पण कार्य करत नाहीये.खरच इतका सगळा त्याग बघून आज त्यांचे किती आभार मानावे समजत नाहीये . खरचं खुप ग्रेट शब्द नाहीये.
खरी स्वातंत्र्याची किंमत माझ्या पिढीला कळनासी झाली आहे; खूप छान चित्रपट आहे. फालतू चित्रपटास खूप प्रसिद्धी मिळते पण असले अप्रतिम चित्रपट मागेच राहतात ही खूप मोठी शोकांतिका आहे....
खरोखरच मनाला छेदुन जाणारं चित्रपट आहे आणप किती स्वार्थी आहोत क्रांतीकारक यांना विसरत आहोत यांच्यामुळेच आज आपन स्वातंत्र्य आहोत खरच खुप तरुन क्रांतीकारक बलीदान देलेत हा चित्रपट प्रत्येक भारतीयांनी बघावा माझ्या तर डोळ्यात पाणी आलं इंदु आणि व्यंकटेशच्या पत्नी च विरह बघुन खरी निस्वार्थ प्रेमकहाणी
काय बोलाव समजतच नाहीये अति उत्तम फिल्म आहे, त्रिवार वंदन आहे माझे त्या आद्य क्रांतीकारकांना, आणि ह्या फिल्म द्वारे त्यांच्या व्यथा मांडणाऱ्या निर्देशकास जितके वेळेस बघावे तितके मन भरतच नाही 1च no, फिल्म आहे
स्वातंत्र मिळवण्यासाठी त्या थोर पुरुषांनी कित्येक बलीदान दिले पन आजच्या काळात लोकांना थोडी सुद्धा जानीव नाही ... का कुणास ठाउक पन आजच्या काळात लोक आसे चित्रपट नाहीत पाहत ...Great Movie ... Proud to an Indian.. Jai Hind..
स्वातंत्र्याची खरे मूल्य समजण्यास हा चित्रपट कारणीभूत ठरेल... प्रेयसी मागे अवघे तारूण्यपण विहित करणाऱ्या तरुणांसाठी हा चित्रपट एक उत्कृष्ट उदाहरण ठरू शकेल... आपण स्वातंत्र्य भारतात भेटल्या जाणाऱ्या प्रत्येक स्वासाची किंमत या क्रांतिकारकांनी अखंड हालअपेष्टाने मोजली हे चित्रपटातून प्रतित होते... धन्यवाद.. वंदे मातरम...
अधीर मन झाले,हे माझ्या आवडीचे गाणे मोजता येणार नाही एवढ्या वेळेस पाहिले ऐकिले,पण आज पहिल्यांदाच हा चित्रपट पाहिला अप्रतिम,शब्दांनी गुणगान करता येणार नाही असा चित्रपट,खूपच उत्कृष्टपणे केलेले सादरीकरण,मराठमोळा अभिनय,संगीत, कथा,सारे काही मनाला भारावून टाकणारे,,,,,,,,
I am indian from andhra pradesh but this movie just showed at that time freedom was more tha important for country survival, many sacrificed there lives for country for us and this movie just gave us one more reminder of that. This is lifetime movie for me and ma wife. A brilliant movie with tremendous direction. Thanks to the entire team of this movie who just shown us few moment of those time when people live without electricity and they didnt even have proper food, but still some fought for country without food and water for many days only for the country. A big salute to those Hero's.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप लोकांना आपला संसार, प्राण गमवावा लागला.... आताचे लांडगे देश विकायला निघाले आहेत.... कर्तव्य काय असते हे या चित्रपटातून समर्पकरित्या सांगितले 🤙🤙
》माझे आई वडील दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते...आई 16 व्या वर्षी आणि वडील 22व्या वर्षी तुरुंगात गेलेले आहेत ! त्यावेळचे वातावरण निर्माण केले गेले आहे अचूकपणे...《
खूप च छान चित्रपट आहे.. अतिशय प्रेरणदायी आणि रक्त सळसवणारी कथानक आहे. बिकट प्रसंगात देखील माणुसकी आणि देशभक्ती च चित्र उभे केले आहे. चित्रपट पाहताना अगदी भरभरून येतंय. आणि खूप वाईट ही वाटते की अशा लढ्या मध्ये आपण सहभागी नाही झालो. आपल्याला स्वतंत्र मिळण्यासाठी आपल्या वडीलधाऱ्या नी खूप अटोकाट प्रयत्न करून, वेळीच प्राण गमावून आपल्या पदरात स्वातंत्र्याचे अमूल्य असे वरदान च जणू आपल्या ला दिले आहे. हे आपण कधीच विसरू नये.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपट तर छान च असणार. खूप दिवसांनी खूप जबरदस्त काहीतरी पाहिले. सलाम त्या देश वेड्या लोकांना त्यांच्या त्यागावर आपण मोकळे पणाने जगतो. नीलकंठ मास्तर 👍👍👍
जीव या लोकांनी दिला आणि त्यामुळेच आपण जीवन सुखाने जगत आहोत.. यावरून एकच समजते कि खूप असाध्य गोष्ट हि साध्य होते, फक्त त्यात सातत्य हवे... खूप चरित्रामय, क्रांतीमय चित्रपट आहे... दोन्ही लेडीज रोल उत्तम👌👌👌.. छाप पाडली 😊!!! ज्यांना लेडीज रोल आवडले त्यांनी मनापासून लाइक करा!!👌👌👌😎
सध्याच्या भरकटत जाणाऱ्या तरुण-तरुणींसाठी स्वातंत्र्य कस मिळालं याच हा अप्रतिम उदाहरण...🙏 काही यक्तीनी कशाप्रकारे आपल्या भावनांची काळजी न करता आपल आयुष्य वाहून घेतलं..🙂
चित्रपटातील प्रत्येक क्षणाने डोळ्याचे पारणें फिटले खूप अप्रतिम होता खूप छान दिग्दर्शन केले आहे चित्रपट पाहून स्वातंत्र्य पूर्व काळाचा साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक होण्यास खूप आवडले असते. भयाण शांतता, खुललेला निसर्ग आणि चित्रपटातील कलाकार शब्दच नाहीत असे चित्रपट बनायला हवे 🙏🙏
बलिदान,त्याग,प्रेमतपस्या ह्यांच सुंदर मिश्रण..आणि आजच्या कार्यकर्त्यांवर देशाच्य। जबाबदारी चे क्रांतिकाराचे असणारे जणू कर्ज आहे याची जाणीव म्हणजे "निळकंठ मास्तर"
मनाला भावलेला मराठी मातीतील चित्रपट, सर्व कलाकारांचा दर्जेदार अभिनय, चांगले संगीत, त्यावेळची सादर केलेली परस्थिती.. आज खूप दिवसांनी खूप छान चित्रपट पहिला.
खरंच खूप छान चित्रपट प्रदर्शित केला आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते या लोकांच्या बलिदानामुळे नाहीतर आज सुद्धा आपण गुलामगिरी करत असतो. पण त्या स्वातंत्र्याची जणीव किती लोक ठेवतात.
असच होत, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो पण ती व्यक्ती कुना दुसऱ्या बरोबर प्रेम करते आणि दुसरी व्यक्ती कुणी तिसऱ्या वर!!😢 पटलं तर like करा नाही पटलं तर कंमेंट करा,
+Rajshri Marathi there are many more movie still not shown on television channels, we want to watch Investment , dhag, Atsu, postcard,highway, Bioscope, vakratund mahakay, Nagrik , shutter, shugar salt aani prem, prime time, slambook,
खरच खुप अप्रतिम प्रकारे चित्रपट चित्रिकरण केलेला आहे. असे चित्रपट आले पाहिजे आणि त्याला आपल्या कडुन तेवढी प्रसिद्धीही मिळण गरजेच आहे स्वतंत्र देशाचा लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिलेल आहे.अशा वीर क्रांतिकारकांना सलाम🙏🙏 वंदे मातरम् 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खरी जिवंत माणसं. यांसारख्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांमुळे, त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्यात आहोत. दुर्दैवाने त्याची किंमत कोणाला नाही. स्वातंत्र्य म्हणजे काहीही करा, कसेही वागा, स्वैराचार असे सर्वांना वाटतय.
खरी स्वातंत्र्याची किंमत माझ्या पिढीला कळनासी झाली आहे; खूप छान चित्रपट आहे. फालतू चित्रपटास खूप प्रसिद्धी मिळते पण असले अप्रतिम चित्रपट मागेच राहतात ही खूप मोठी शोकांतिका आहे
खरंच काळजाला चिरा करणारी फिल्म आहे.कित्येक जनांनी आपल्या प्रेमाचा आपल्या नात्यांचं आपल्या जीवाची बाजी लावली आहे. सर्वांच्या त्यागासाठी आणि आपण काय करत आहे. खरंच मनापासून ज्ञात असंख्य अज्ञात क्रांतीकारकानां विनम्र 🙏 अभिवादन 🚩💐💐😭
My mind was totally change when I saw this movie...This movie is just a part of one revolutionary but their are many more...I salute to this kind of people who participate and fight for his nation.big salute to whole movie maker staff and character.
हा चित्रपट अप्रतिम आहे . मनाला भिडणार आहे . माणूस म्हणुन कसं असाव हे तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा . असं मला वाटत . जिवाला जिव देणारी माणसं होती आधी ' पण आता जिव घेतात .
खूप छान अप्रतिम चित्रपट व गाणी आहेत व कलाकर आहेत . लोक फक्त शिवरायांचं भक्त स्वतःला म्हणतात पण गल्ली बॉय सारखे खराब चित्रपट बघतात आणि स्वातंत्रयोत्तर काळ तील स्वातंत्रवीरांचे चित्रपट कोणी च बघत नाही , आजकाळ लोक मराठी भाषा विसरून परकियांनी भाषा जांनी आपल्यावर अन्याय केला त्यांची भाषा तांचा वेष धारण केली आहेतपण मराठी भाषा हीचा अपमान आहे आपल्या देशात थोडी मराठी काळाची गोडी उरले ती फक्त खर्या शिव भक्तांमुल अरे आपण शिवाजी महाराज च इतिहासात अभिमान वाटला पाहिजे मला खूप इतिहास विषय आवडतो मला खूप आवडला पिक्चर खरे शिवभक्त हा चित्रपट बघतील आणि ओमकार गोवर्धन व पूजा सावंत व आदित्य कोठारे व नेहा महाजन व विक्रम गोखले खरंच खुप सुंदर काम केलत इतिहास खरा डोळ्या समोर आला चैतन्य माझा मित्र त्यालाही इतिहास आवडतो
No words to explain about this movie..Words are not enough to say.really we feel sooo proud to be an indian. freedom has not got only few freedom fighter which we celebrate their anniversary..but countless krantikaries hv devoted everything for the nation..i cried several Times to watch this movie..i feel my homege to all people who fought for our mother India.💐💐💐
खरोखरंच समोर घडतंय असं वाटतं. किती तरुण तरुणींनी आपल्या जीवनाची आहुती देवून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. कित्येकांची नावे अशीच स्वातंत्र्याच्या यज्ञात भस्म झाली आहेत त्याला गणती नाही. असे चित्रपट खूप आवडतात. एक हिंदी चित्रपट होता खेल नावाचा तोही अशाच संघटनेवर होता. सत्यघटनेवरच होता. चित्रपट गृहात जावून पाहिला.दिपीका पदुकोणचा. त्यावेळीही गर्दी फार नव्हती. पण जी कमी लोक होती ती रसिकतेने पाहत शिट्या मारत होती.
स्वातंत्र्याची खरी किंमत आजच्या पिढीला समजायला हवी. क्रांतिवीरांनी त्यांच्या कुटुंबाचा विचार न करता देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले म्हणून आज आपण खरे स्वातंत्र्य उपभोगत आहोत.याची जाण प्रत्येकाला असावी.फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी देशप्रेम दाखवून काय फायदा? अप्रतिम फिल्म 👌👌👍💖💖🇮🇳❣️😘
Very very good move...this is give insprination to young youth..all lost..all life lost fridom fighter for this conuntry but pe ople politician nt care about all this people...every citizen in India want thankfull this freedom fighter ...jay hind
Salute to those freedom fighters who fought for our nation/our people without knowing the result but having strong belief...Let us all do some things for nation in our ways....great piece of work
चित्रपटाची कथा, कथेची पार्श्वभूमी,पात्रांची निवड, त्यांचा प्रत्येकाचा अभिनय, चित्रीकरण कौशल्य आणि दिग्दर्शन कौशल्य अजून आणखी कितीतरी बाबी आहेत ह्या चित्रपटाबाबत बोलण्यासारख्या आणि वाखाणण्याजोग्या, त्याच अधीर मन झाले हे गीत, गीताचे बोल, पिच्यरायझेशन आणि सभोवतालचे नैसर्गिक सौंदर्य. गीताचे संगीत तर असे काही आहे की नेहमी प्रमाणेच अजय अतुल चे कौतुक करावे वाटते. एकंदरीत अष्टपैलू चित्रपट आहे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात जे जे काही वीर हुतात्मे झाले कितींचा संसार उध्वस्त झाला किती आजन्म कारावासात मेले अशा सर्व वीर शहीद हुतात्म्यांना कोटी कोटी नमन.
Extremely nice movie Nilkantha Master. Salute to those freedom fighters, dedicated their life for freedom of Hindustan. All the artists have done a great job.
माझ्या आजी चे आई वडील स्वातंत्र्य सैनिक होते ते ही तुरुंगात गेले होते आणि स्वातंत्र्य सैनिकांची मुलगी म्हणून माझ्या आजी ला शिक्षिकाची नौकरी लागली होती... असे त्यांचे खूप अनुभव मला ऐकण्यात मिळाले... Salute all freedam fighters 🇮🇳
हा चित्रपट क्रांतिकारकांची मानवी बाजू दाखवीतो. आपण नेहेमी क्रांतिकारकांचा महिमा गातो पण आपण हे विसरतो की त्यांना देखील आपल्यासारख्याच इतर भावना असतील. ते सर्व मोह त्यागून देशासाठी बलिदान देत होते. त्यांचा देशप्रेमापलीकडील संघर्ष हा चित्रपट एकदम हुबेहूब दाखवतो. साष्टांग नमन त्या महान वीरांना आणि वीरांगनांना 🙏
असे चित्रपट मराठी मध्ये तयार होतात खरचं आमचं सौभाग्य आहे. मन हेलावून टाकणार कथानक आणि दर्जेदार अभिनय खरोखरच हा एक चित्रपट नसून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटलेल्या क्रांतिकारांच्या बलिदानाचे, त्यागाचे प्रतीक आहे.
चित्रपट असावा तर असा , अभिनय असावा तर असा 😢
मन तृप्त झाले 🙏
खूपच छान आहे.. खरेतर मी अधिर मन झाले या गाण्यामुळे हा चित्रपट बघितला.. खूपच सुंदर चित्रपट आहे.❤️❤️
कोण होती ही माणसं??? ..भावनांचा ,नात्याचा,प्रेमाचा आणि वेळ आल्यास जीवाचा सुद्धा त्याग करून फक्त आणि फक्त देशाच्या स्वातंत्र्य साठी झटली...किती आणि किती सहन केलं... अरे कुठे जगतोय आपण खरं जगणं तर ह्या माझ्या भारत मातेच्या वीर पुत्रांकडून शिका ज्यांच्यामुळे आज हा मोकळा श्वास घेतोय आपण!!!....जय हिंद!!
@@amit.k4012 तुला कोणता विषय त्रास देतोय मित्रा??? तुला अभिमान नाही का अशा क्रांती वीरांचा..???
Ho bhau kharach yanchyamule aapn aaj mokle aaho
ho khar ahe mitra...tuza comment cachun dolyat paani ala bhava...
@@sachink74 to
खूप छान
मी इंडियन आर्मी मध्ये काम करतो . आज हा चित्रपट बघितला आणि मला स्वतःचीच लाज वाटतेय की यांनी सगळ्यांनी जे कार्य केले आहे.त्या मधील मी एक कन भर पण कार्य करत नाहीये.खरच इतका सगळा त्याग बघून आज त्यांचे किती आभार मानावे समजत नाहीये . खरचं खुप ग्रेट शब्द नाहीये.
❤❤❤❤❤
ज्या क्रांतिकारकांनी देश स्वातंत्र्यासाठी प्राणाची, संसाराची आहुती दिली, त्या सर्व क्रांतिकारकांना क्रांतिकारी वंदे मातम् 🙏🙏🙏
एवढी वर्षे झाली फक्त ऐकून होतो स्वातंत्र्य दिन म्हणजे आज कळाल ,खरच स्वातंत्र्यवीराची किंमत हा movie बघितल्यावर अंगावर काटा येतो I love you my India👍💕
फक्त एक गाण्यासाठी मी पूर्ण picture बघितला.. अपेक्षेपेक्षा एकदम वेगळा निघाला...पूजा चा रोल खूप थोडा पण तितकाच प्रभावी होता...👌👌
खरं आहे। मी देखील अनभिज्ञ होतो movie खूपच सुंदर। कदाचित त्यावेळी जनतेसमोर नीटपणे आली नाही
Khar mi pn ek song sati he movie bagtli khupp bhari ahe 👌👌
@@anilvadak2470 Khup chaan aahe
Me pn same
Adhira man
खरी स्वातंत्र्याची किंमत माझ्या पिढीला कळनासी झाली आहे; खूप छान चित्रपट आहे.
फालतू चित्रपटास खूप प्रसिद्धी मिळते पण असले अप्रतिम चित्रपट मागेच राहतात ही खूप मोठी शोकांतिका आहे....
Nice
सैराट बद्दल काय मत आहे?
कमेंट वाचा
अतिशय बरोबर आहे
Brobar ahe
अशा चित्रपटामुळे कळतं किती पराकोटीची किमत आपल्या देशातील त्यावेळच्या क्रांती कारकांना मोजावी लागली पण आज आपण हे विसरत आहोत खरच मन हेलावुन टाकते👏👏🙏🙏
खरोखरच मनाला छेदुन जाणारं चित्रपट आहे आणप किती स्वार्थी आहोत क्रांतीकारक यांना विसरत आहोत यांच्यामुळेच आज आपन स्वातंत्र्य आहोत खरच खुप तरुन क्रांतीकारक बलीदान देलेत हा चित्रपट प्रत्येक भारतीयांनी बघावा माझ्या तर डोळ्यात पाणी आलं इंदु आणि व्यंकटेशच्या पत्नी च विरह बघुन खरी निस्वार्थ प्रेमकहाणी
डोळ्याला पाणी आले हो...खऱ्या अर्थाने समाधान वाटलं...सलाम त्या प्रत्येक विर जवानाला ...पण आत्ताच्या तरुणांना हे कधी कळणार देव जाणे...
खरच सुपर -डुपर चित्रपट आहे हा मी किमान 10 वेळेस बघितला खरच त्या क्रांतिकारकानीं देश स्वतत्र्यासाठी किती गोष्टीचा त्याग केलेला आहे
स्वातंत्र्यासाठी लोकांनी प्राणाची आहुती तर दिलीच पण आपल्या प्रेमाची पण आहुती दिली हे खूप सुंदर रेखाटलं आहे...खूप छान चित्रपट आहे.
बरोबर बोललीस बघ
काय बोलाव समजतच नाहीये अति उत्तम फिल्म आहे, त्रिवार वंदन आहे माझे त्या आद्य क्रांतीकारकांना, आणि ह्या फिल्म द्वारे त्यांच्या व्यथा मांडणाऱ्या निर्देशकास जितके वेळेस बघावे तितके मन भरतच नाही 1च no, फिल्म आहे
डोळे भरून आले..... आज जे स्वातंत्र्य मिळालंय हे सर्व त्यागाचं प्रतीक आहे..... शब्दचं नाहीयेत.... इतका मोठा त्याग.....
Khar aahe bhava
khar ahe...majhe pan chitrapat baghun dole bgarun ale...
खरं आहे....आणि ज्याच्या डोळ्यात पाणी आले नसेल त्याने मन लावून चित्रपट पाहिलाच नाही किंवा त्याच्यात भावनाच नाहीत....
माझी कमेंट वाचा
@@ajaykarle9780 bhau nai te
आजच्या पिढीला प्रेरणा देणारा चित्रपट आहे हा. का म्हणून असे चित्रपट मागे राहतात?या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला पाहिजे.
खुप छान.... हिंदी चित्रपटांसारखे आदरणीय कलाकृतींशी खिलवाड न करता असेच अप्रतीम चित्रपट देण्याची परंपरा कायम टिकून रहावी...🙏
स्वातंत्र मिळवण्यासाठी त्या थोर पुरुषांनी कित्येक बलीदान दिले पन आजच्या काळात लोकांना थोडी सुद्धा जानीव नाही ... का कुणास ठाउक पन आजच्या काळात लोक आसे चित्रपट नाहीत पाहत ...Great Movie ... Proud to an Indian.. Jai Hind..
Aaj che nete fakt TV var debatekarayla aahet
स्वातंत्र्याची खरे मूल्य समजण्यास हा चित्रपट कारणीभूत ठरेल...
प्रेयसी मागे अवघे तारूण्यपण विहित करणाऱ्या तरुणांसाठी हा चित्रपट एक उत्कृष्ट उदाहरण ठरू शकेल...
आपण स्वातंत्र्य भारतात भेटल्या जाणाऱ्या प्रत्येक स्वासाची किंमत या क्रांतिकारकांनी अखंड हालअपेष्टाने मोजली हे चित्रपटातून प्रतित होते...
धन्यवाद.. वंदे मातरम...
माझी कमेंट वाचा
माझी कमेंट वाचा
अधीर मन झाले,हे माझ्या आवडीचे गाणे मोजता येणार नाही एवढ्या वेळेस पाहिले ऐकिले,पण आज पहिल्यांदाच हा चित्रपट पाहिला अप्रतिम,शब्दांनी गुणगान करता येणार नाही असा चित्रपट,खूपच
उत्कृष्टपणे केलेले सादरीकरण,मराठमोळा अभिनय,संगीत, कथा,सारे काही मनाला भारावून टाकणारे,,,,,,,,
I am indian from andhra pradesh but this movie just showed at that time freedom was more tha important for country survival, many sacrificed there lives for country for us and this movie just gave us one more reminder of that.
This is lifetime movie for me and ma wife.
A brilliant movie with tremendous direction.
Thanks to the entire team of this movie who just shown us few moment of those time when people live without electricity and they didnt even have proper food, but still some fought for country without food and water for many days only for the country.
A big salute to those Hero's.
........ MN.
,
Liie
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप लोकांना आपला संसार, प्राण गमवावा लागला.... आताचे लांडगे देश विकायला निघाले आहेत.... कर्तव्य काय असते हे या चित्रपटातून समर्पकरित्या सांगितले 🤙🤙
देशासाठी त्याग काय असतो..
हे आताच्या तरूण पिढीने पाहा असा सिनेमा आहे. ब-याच वेळा पाहिला तरी पाहावासा वाटतो.गाणी खूप छान. .....जयहिंद...वंदेमातरम्....
Mi 3 वेळा बघितला
खरचं किती त्याग केला आहे देशासाठी यांनी
परंतु आज च्य पिढीला हे समजलं न्हाई
》माझे आई वडील दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते...आई 16 व्या वर्षी आणि वडील 22व्या वर्षी तुरुंगात गेलेले आहेत ! त्यावेळचे वातावरण निर्माण केले गेले आहे अचूकपणे...《
O my god
😲😳
😥🙂😡🇮🇳🇮🇳
@@kittyqueen5137 🙏🙏
🙏🙏
Most underrated movie ❤
Songs dialogue....just amazing 🤩❤
मराठी चित्रपट सृष्टी काही कमी रंगतदार नाही.... त्याच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा चित्रपट ❤
खूप च छान चित्रपट आहे.. अतिशय प्रेरणदायी आणि रक्त सळसवणारी कथानक आहे. बिकट प्रसंगात देखील माणुसकी आणि देशभक्ती च चित्र उभे केले आहे. चित्रपट पाहताना अगदी भरभरून येतंय. आणि खूप वाईट ही वाटते की अशा लढ्या मध्ये आपण सहभागी नाही झालो. आपल्याला स्वतंत्र मिळण्यासाठी आपल्या वडीलधाऱ्या नी खूप अटोकाट प्रयत्न करून, वेळीच प्राण गमावून आपल्या पदरात स्वातंत्र्याचे अमूल्य असे वरदान च जणू आपल्या ला दिले आहे. हे आपण कधीच विसरू नये.
किती त्यांचे देशप्रेम आणि देशाविषयी समर्पण किती उच्च कोटीचे.शतशः नमन त्यांच्या त्यागाला.
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपट तर छान च असणार.
खूप दिवसांनी खूप जबरदस्त काहीतरी पाहिले. सलाम त्या देश वेड्या लोकांना त्यांच्या त्यागावर आपण मोकळे पणाने जगतो.
नीलकंठ मास्तर 👍👍👍
जीव या लोकांनी दिला आणि त्यामुळेच आपण जीवन सुखाने जगत आहोत.. यावरून एकच समजते कि खूप असाध्य गोष्ट हि साध्य होते, फक्त त्यात सातत्य हवे... खूप चरित्रामय, क्रांतीमय चित्रपट आहे... दोन्ही लेडीज रोल उत्तम👌👌👌.. छाप पाडली 😊!!! ज्यांना लेडीज रोल आवडले त्यांनी मनापासून लाइक करा!!👌👌👌😎
अप्रतिम व्यक्तिमत्व साकार झाले
भारत देशात हिंदू, शिख, मुस्लिम धर्मियांनी आणि आदिवासी लोकांनी स्वातंत्र्यासाठी खूप मोठा त्याग केला आहे.
Bhoddh lok kute gele
अप्रतिम अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे खरंच देशासाठी ज्यानी स्वःताहा चे जिवन अर्पण करणारे क्रांतीकारक होवुन गेले त्याना नमन करतो
अप्रतिम चित्रपट आहे. मला सांगु वाटतं, फक्त ज्या क्रांतीवीरांनी बलिदान दिलं आहे. ते कशासाठी हे आपल्या देशातील भ्रष्ट नेत्यांना कळावं
खुप छान..!! का म्हणुन असे चित्रपट बघत नाहीत लोक..!! रोमाॅंटीक किंवा आगाऊच चित्रपट का चालतात ईथ..!!!
Excellent
Kharach khup chan aahe movie..I cried really.👌👌
रोमान्स च्या नावाने लोक पागल झालीत
Hii
Kharach nna
सध्याच्या भरकटत जाणाऱ्या तरुण-तरुणींसाठी स्वातंत्र्य कस मिळालं याच हा अप्रतिम उदाहरण...🙏
काही यक्तीनी कशाप्रकारे आपल्या भावनांची काळजी न करता आपल आयुष्य वाहून घेतलं..🙂
आपल्या स्वातंत्र्यासाठी किती त्रास सोसला आहे क्रांतिकारकांनी....... निःशब्द होतात साऱ्या भावना..हे ऋण कधीच फेडता येणार नाहीत.
एकदा गोद्या आला रे चा ट्रेलर पण बघा.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी कामी आलेल्या पण अज्ञात असलेल्या माझ्या असंख्य बांधव आणि भगिनींना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🇮🇳!
जय हिंद!
भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना कोटी कोटी प्रणाम
खूप छान बनवला आहे चित्रपट. कलाकार अभीनय अप्रतिम. किती त्रास घेतला या सर्व थोर देशभक्तांनी.शतःशतःनमन🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
चित्रपट बघताना बऱ्याच वेळा अंगावर काटा उभा रहातो......किती भयानक परिस्तिथि मधून गेले होते आपले स्वातंत्र्य सैनिक...
Kharch 🙏🏻🙏🏻
Great
Hoy kharach
खरंय. 🌹🌹🌹🌹
चित्रपटातील प्रत्येक क्षणाने डोळ्याचे पारणें फिटले खूप अप्रतिम होता खूप छान दिग्दर्शन केले आहे चित्रपट पाहून स्वातंत्र्य पूर्व काळाचा साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारक होण्यास खूप आवडले असते. भयाण शांतता, खुललेला निसर्ग आणि चित्रपटातील कलाकार शब्दच नाहीत असे चित्रपट बनायला हवे 🙏🙏
बलिदान,त्याग,प्रेमतपस्या ह्यांच सुंदर मिश्रण..आणि आजच्या कार्यकर्त्यांवर देशाच्य। जबाबदारी चे क्रांतिकाराचे असणारे जणू कर्ज आहे याची जाणीव म्हणजे "निळकंठ मास्तर"
This is my first marati movie to watch, good direction . ❤️ From Karnataka
Mee too
👌👌👌
This can lead to OurNational Integration! I do watch South Indians
Movies 🎥 with subtitles. Some are outstanding! Jai 🇮🇳 Bharat!
जय हिंद जय महाराष्ट्र ह्य चित्रपट पाहून खूप मनात आदर वाटतो आणि ह्या लोकांच्या बलिदान मुळे आज आपण मोकळा श्वास घेतो
मी आज पाहिला हा चित्रपट, खरच खुप छान आहे एक आठवण झाली स्वातंत्र पूर्व काळाची त्या घराण्यांची really nice very nice movie 👍
मनाला भावलेला मराठी मातीतील चित्रपट, सर्व कलाकारांचा दर्जेदार अभिनय, चांगले संगीत, त्यावेळची सादर केलेली परस्थिती..
आज खूप दिवसांनी खूप छान चित्रपट पहिला.
खरंच खूप छान चित्रपट प्रदर्शित केला आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते या लोकांच्या बलिदानामुळे नाहीतर आज सुद्धा आपण गुलामगिरी करत असतो. पण त्या स्वातंत्र्याची जणीव किती लोक ठेवतात.
असच होत,
आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो पण ती व्यक्ती कुना दुसऱ्या बरोबर प्रेम करते आणि दुसरी व्यक्ती कुणी तिसऱ्या वर!!😢
पटलं तर like करा नाही पटलं तर कंमेंट करा,
ज्या स्वातंत्र्यासाठी एवढं सगळ ते आपण जगतोय.. त्यात पण आपण म्हणतो किती प्रॉब्लेम्स आहेत आपल्या आयुष्यात...वे should be positive towards life now...✨
Thank You all for your feedback. We will soon be uploading more latest Marathi movies on Rajshri Marathi! Stay Tuned!
+Jeevan Dohifode okay! :)
+Rajshri Marathi there are many more movie still not shown on television channels, we want to watch Investment , dhag, Atsu, postcard,highway, Bioscope, vakratund mahakay, Nagrik , shutter, shugar salt aani prem, prime time, slambook,
+Rajshri Marathi plz show jajaikar, rajwade sons, gulabi, champions, aajoba
can u get postcard,highway for us
please upload ranga patanga and give me link too.... thanks
स्वतंत्र्यानंतर जो सन्मान या वीर क्रांतिकार्यांना मिळाला पाहिजे होता तसा सन्मान मला वाटते मिळाला नाही😢❤
खुपच छान आहे हा चित्रपट माझा सलाम ह्या कलाकारांना जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम् 🇳🇪🇳🇪
खरच खुप अप्रतिम प्रकारे चित्रपट चित्रिकरण केलेला आहे. असे चित्रपट आले पाहिजे आणि त्याला आपल्या कडुन तेवढी प्रसिद्धीही मिळण गरजेच आहे स्वतंत्र देशाचा लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिलेल आहे.अशा वीर क्रांतिकारकांना सलाम🙏🙏
वंदे मातरम् 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
😭😭😭😭😭😭जेव्हा हा चित्रपट बघतो तेव्हा तेव्हा मन भरुन् येत. . .!!
खरी जिवंत माणसं. यांसारख्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांमुळे, त्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्यात आहोत. दुर्दैवाने त्याची किंमत कोणाला नाही.
स्वातंत्र्य म्हणजे काहीही करा, कसेही वागा, स्वैराचार असे सर्वांना वाटतय.
अधीर मन झाले...या गाण्यामुळे ओढलो गेलो या चित्रपटाकडे. पण खरं रूप काही औरच !!!
खरी स्वातंत्र्याची किंमत माझ्या पिढीला कळनासी झाली आहे; खूप छान चित्रपट आहे.
फालतू चित्रपटास खूप प्रसिद्धी मिळते पण असले अप्रतिम चित्रपट मागेच राहतात ही खूप मोठी शोकांतिका आहे
हल्ली आताचे डीरेक्टर लोकांनी सिनेमा पहावा म्हणून ईतिहासात ढवळाढवळ करुन मिर्चमसाले लाऊन बनवतात....परंतू हा सिनेमा अपवाद आहे त्याला....💯
खूप छान अभिनय,,,,,किती भयानक परस्थिती मधून गेलेत आपले पूर्वज,,,,आणि त्यांनी दिलेल्या बलीदानामुळे आपण आज स्वत्रंत आहोत......
RIP to all the martyrs who sacrificed their lives for India's independence Jai Hind
Jai.Hind.
खरंच काळजाला चिरा करणारी फिल्म आहे.कित्येक जनांनी आपल्या प्रेमाचा आपल्या नात्यांचं आपल्या जीवाची बाजी लावली आहे. सर्वांच्या त्यागासाठी आणि आपण काय करत आहे. खरंच मनापासून ज्ञात असंख्य अज्ञात क्रांतीकारकानां विनम्र 🙏 अभिवादन 🚩💐💐😭
My mind was totally change when I saw this movie...This movie is just a part of one revolutionary but their are many more...I salute to this kind of people who participate and fight for his nation.big salute to whole movie maker staff and character.
शक्य तेवढी भाषेची गुलामी देखील आपण सोडू🙏
हा चित्रपट अप्रतिम आहे . मनाला भिडणार आहे . माणूस म्हणुन कसं असाव हे तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा . असं मला वाटत . जिवाला जिव देणारी माणसं होती आधी ' पण आता जिव घेतात .
आपल्या पिढीला स्वातंत्र्याची किंमत कधीच नाही समजू शकत . पण तरी या चित्रपटामुळे थोडंफार तरी उमजल . फक्त मराठी मध्येच असे चित्रपट होऊ शकतात.
आजादी ऐसे ही नही मीली और जो लोग आजादी के लीए मर मीटे ऊनके चरनो मे मेरे हजारो सलाम और मूझे खूद पे नाज है की मै एक भारतीय हू
👍...
आज ची पीडी नाही समजणार हा त्याग आज tik tok नाही सुटत तर देश प्रेम काय समजणार
Great story,
Really a great story .
@@rupalipawar4427 qpqpqpqpqp
@@rupalipawar4427 qpqpqpqpqpqpqp
@@rupalipawar4427 qpqpqpqpqpqpqpq
चित्रपटातील विश्वास ने याआधी सावित्री -ज्योती मालिकेमध्ये महात्मा फुलेंच पात्र साकारलं होतं.
खुपच अप्रतिम ❤❤❤👏👏👏
I am from bihar and I love this movie
This type of movie should be given credit at national level
खुपछान हा चित्रपट देशच्या स्वातंत्र्य साठी किती त्याग केलाय ह्या क्रांतीकारकांनी हे समजते
खुपच छान चित्रपट त्या स्वातंत्र्य विरांना विनम्र अभिवादन , वंदे मातरम जय हिंद
खूप छान अप्रतिम चित्रपट व गाणी आहेत व कलाकर आहेत . लोक फक्त शिवरायांचं भक्त स्वतःला म्हणतात पण गल्ली बॉय सारखे खराब चित्रपट बघतात आणि स्वातंत्रयोत्तर काळ तील स्वातंत्रवीरांचे चित्रपट कोणी च बघत नाही , आजकाळ लोक मराठी भाषा विसरून परकियांनी भाषा जांनी आपल्यावर अन्याय केला त्यांची भाषा तांचा वेष धारण केली आहेतपण मराठी भाषा हीचा अपमान आहे आपल्या देशात थोडी मराठी काळाची गोडी उरले ती फक्त खर्या शिव भक्तांमुल अरे आपण शिवाजी महाराज च इतिहासात अभिमान वाटला पाहिजे मला खूप इतिहास विषय आवडतो मला खूप आवडला पिक्चर खरे शिवभक्त हा चित्रपट बघतील आणि ओमकार गोवर्धन व पूजा सावंत व आदित्य कोठारे व नेहा महाजन व विक्रम गोखले खरंच खुप सुंदर काम केलत इतिहास खरा डोळ्या समोर आला चैतन्य माझा मित्र त्यालाही इतिहास आवडतो
No words to explain about this movie..Words are not enough to say.really we feel sooo proud to be an indian. freedom has not got only few freedom fighter which we celebrate their anniversary..but countless krantikaries hv devoted everything for the nation..i cried several Times to watch this movie..i feel my homege to all people who fought for our mother India.💐💐💐
खरोखरंच समोर घडतंय असं वाटतं. किती तरुण तरुणींनी आपल्या जीवनाची आहुती देवून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. कित्येकांची नावे अशीच स्वातंत्र्याच्या यज्ञात भस्म झाली आहेत त्याला गणती नाही. असे चित्रपट खूप आवडतात. एक हिंदी चित्रपट होता खेल नावाचा तोही अशाच संघटनेवर होता. सत्यघटनेवरच होता. चित्रपट गृहात जावून पाहिला.दिपीका पदुकोणचा. त्यावेळीही गर्दी फार नव्हती. पण जी कमी लोक होती ती रसिकतेने पाहत शिट्या मारत होती.
अहो कितीदा बघीतला पण कंटाळा येतच नाही खूप छान पिचर आहे हो मला खूप आवडतला
स्वातंत्र्याची खरी किंमत आजच्या पिढीला समजायला हवी. क्रांतिवीरांनी त्यांच्या कुटुंबाचा विचार न करता देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले म्हणून आज आपण खरे स्वातंत्र्य उपभोगत आहोत.याची जाण प्रत्येकाला असावी.फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी देशप्रेम दाखवून काय फायदा? अप्रतिम फिल्म 👌👌👍💖💖🇮🇳❣️😘
खरचं स्वातंत्र्य सैनिकांच्या फार उपकार आहे आपल्या वर... Salute All of them....Jay Hind.
खरंच त्यांनी कित्येक कष्ट सोसलीत आम्हाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी. जे आम्हाला विचार सुद्धा करता येणार नाही. 🙏🔥🔥
Very very good move...this is give insprination to young youth..all lost..all life lost fridom fighter for this conuntry but pe ople politician nt care about all this people...every citizen in India want thankfull this freedom fighter ...jay hind
एवढी वर्ष झाली झाली फक्त ऐकून होतो . स्वातंत्र्य दिन म्हणजे आज कळलं. चित्रपट बघितल्यावर अंगावर काटा येतो.
त्याग समर्पण आणि बरच काही शिकायला मिळालं मूवी बघून
असे चित्रपट बनवायला पाहिजे म्हणजे व आजच्या पिढी ने बघायला पाहिजे
हैट ऑफ जय हिंद
जय हिंद जय भारत
आजची पिढी बघेल हो हा चित्रपट ..
पण आजच्या नालायक राजकारणी लोकांनी पण बघायला हवा ना!
आजच्या पिढीला मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व लक्षात आणून देणारा अप्रतिम चित्रपट💐💐👌👍
Really beautiful ,heart touching movie
हमारे हर एक क्रांतिकारी को कोटिशः प्रणाम।
गजेंद्र अहिरे आपणास प्रथम खूप खूप शुभेच्छा, मनाला चटका लावून गेली फिल्म.इंदू पात्र् आयुष्यभर स्मरणात राहील.
On of the best movie, very inspiring. True example of unconditional service towards nation. Good direction and music and cast. Thanks for the upload.
या कलाकारांनी प्रस्थापित आणि घराणेशाही तील कलाकारांच्या तोंडावर जोडे मारले. अप्रतिम, natural acting❤
Salute to those freedom fighters who fought for our nation/our people without knowing the result but having strong belief...Let us all do some things for nation in our ways....great piece of work
आजच आपल स्वातंत्र्य किती बलिदान आणि त्यागाचं प्रतीक आहे याची थोडीफार कल्पना येती ही फिल्म बघून. अतिशयित सुंदर फिल्म आहे.
देश आणि देश प्रेम हे आजचा माणूस विसरलाय
खरचं खुप खुप कठिण होत त्या काळी जगणं शत शत नमन त्या विराना
आणि चित्रपट पण खुप छान प्रदर्शित केला
आवडला मला
खुप छान फिल्म होती जस वाटल पुरव जाना बघतोय असी फिलिंग मनात आली होती बघतानी
चित्रपटाची कथा, कथेची पार्श्वभूमी,पात्रांची निवड, त्यांचा प्रत्येकाचा अभिनय, चित्रीकरण कौशल्य आणि दिग्दर्शन कौशल्य अजून आणखी कितीतरी बाबी आहेत ह्या चित्रपटाबाबत बोलण्यासारख्या आणि वाखाणण्याजोग्या, त्याच अधीर मन झाले हे गीत, गीताचे बोल, पिच्यरायझेशन आणि सभोवतालचे नैसर्गिक सौंदर्य. गीताचे संगीत तर असे काही आहे की नेहमी प्रमाणेच अजय अतुल चे कौतुक करावे वाटते. एकंदरीत अष्टपैलू चित्रपट आहे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात जे जे काही वीर हुतात्मे झाले कितींचा संसार उध्वस्त झाला किती आजन्म कारावासात मेले अशा सर्व वीर शहीद हुतात्म्यांना कोटी कोटी नमन.
तेव्हा काय आणि आता काय खरं प्रेम करणारे कधीच एकत्र येत नाही 🙏🏽
खूप सुंदर चित्रपट निर्मिती..... असे चित्रपट बघायला हवे... तेव्हाच स्वातंत्र्याच खर महत्व कळेल
Thanks Rajshri for uploading such excellent movies. I cannot walk to see these movies. Watching them now is a great boon for us
अधीर मन झाले या गाण्यामुळे पाहिला पण खरच खूप छान आहे प्रत्येकाने पाहावा असा
एक लाईक त्या क्रांतिकारकांसाठी ज्यांच्यामुळे आज आपणाला स्वातंत्र्य मिळाले,
खरंच सुंदर चित्रपट आहे
काय बोलाव आंता.... निशब्द झालो.... ऐवढा मोठा त्याग अन् तपस्या.... हा देश आहे या क्रांतिकारकांचा....
Extremely nice movie Nilkantha Master. Salute to those freedom fighters, dedicated their life for freedom of Hindustan.
All the artists have done a great job.