कोकणातील श्री पद्धतीने भात (तांदूळ) लागवड ( 50% पर्यंत नफा)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • कोकणातील श्री पद्धतीने भात (तांदूळ) लागवड ( 50% पर्यंत नफा)
    For Latest Update Follow me on INSTAGRAM: / pragat.loke
    Shree pandthine bhat Tandul Lagvad 50 takke Paryant Jast Nafa
    आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नासिक, विभागाच्या सह्याद्रीलगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात भात हे पीक “साळ” आणि “धान” या नावाने देखील ओळखले जाते.
    हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या विशेषतः सुधारित भात जातींच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ, शिफारशीनुसार सेंद्रिय व रासायनिक खतांच्या मात्रांचा संतुलित वापर, मशागतीचे व लावणीचे योग्य तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपायांचा अवलंब इत्यादी बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे. तसेच संकरीत भात निर्मितीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. आपल्या राज्यातील खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते.
    राज्यातील शेतकरी भातशेती अनेक वर्षापासून करीत आहेत. तरीसुद्धा देशाच्या सरासरी उत्पादकतेशी तुलना करता राज्याची उत्पादकता अत्यंत कमी असून त्यास बरीच करणे आहेत. राज्यातील भात उत्पादनातील महत्वाच्या समस्या कोणत्या आहेत, याविषयीची माहिती खाली देण्यात आलेली आहे.
    सुधारित व अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींच्या लागवडीखाली असलेले कमी क्षेत्र.
    सेंद्रिय व रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा कमी आणि असंतीलुत वापर.
    कीड, रोग व तण नियंत्रण उपायांचा अल्प प्रमाणात वापर.
    वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतमजुरांच्या उपलब्धतेतील अडचणींमुळे रोप लावणी करताना लागणारा अधिक कालावधी.
    राज्यातील भातशेती करणारे सुमारे 80 ते ८५ टक्के अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी आणि त्यांची विखुरलेली भातशेती त्यामुळे यांत्रिकीकरणाचा कमी प्रमाणात वापर.
    समुद्र किनाऱ्यालगतच्या खार जमिनीत अनियमित व अपुऱ्या अथवा जादा पावसामुळे होणारे नुकसान.
    मराठवाडा विभागात जमिनीतील लोहाच्या कमतरतेमुळे भात पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर होणारे अनिष्ट परिणाम.
    वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पोहोचण्यासाठी खत पुरवठ्यातील अडचणी व लागणारा विलंब.
    सुधारित भात लागवडीच्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यापर्यंत होणारा अल्प प्रमाणातील प्रसार.
    अति बारीक, लांब दाण्याचा व सुवासिक भात जाती भरडण्यासाठी लागणाऱ्या सुधारित भात गिरण्यांची लागवड क्षेत्रातील अपुरी उपलब्धता.
    आपल्या देशात भात उत्पादनातील हरीक्रांतीची सुरुवात ही सन १९६४ मध्ये तायचुंग स्थानिक १ व १९६६ मध्ये आय. आर. - ८ ही भात जातींची लागवडीद्वारे झाली. त्यांनतर सन १९६७ पासून आपल्या देशातील शास्त्रज्ञांना जया, रत्ना यासारख्या अनेक बुटक्या. न लोळणाऱ्या तसेच रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या, लवकर तयार होणार्या, किडींना व रोगांना कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या भात जातींची निर्मिती करण्यामध्ये यश मिळाले. शेतकरीदेखील या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्या देशातील व राज्यातील भात उत्पादनात लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. महाराष्ट्रात सन १९९१ पासून भात पिकावरील संशोधनास सुरुवात झाली.
    रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी जमीन, नांगरून, ढेकळे फोडून भुसभुशीत करावी. नंतर १२० से.मी. रुंद (४ फुट) व ८ ते १० से. मी. (८ ते १० बोटे) ऊंच आणि शेताचा आकार व उतारानुसार लांबी ठेवून गादी वाफे तयार करावेत. चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली तसेच ज्या ठिकाणी हंगामामध्ये सुरुवातीस पाऊस कमी असतो अशा ठिकाणी गादी वाफ्याची उंची ३ ते ५ से. मी. ठेवली तरी चालते. गादी वाफे करणे शक्य नसेल तर रोप तयार करण्यासाठी शेतातील उंचवट्याची जागा निवडावी व चारही बाजूंनी खोल चारी काढावी. यामुळे पाऊस जास्त झाला तरी पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल व कोवळी रोपे मरण्याचे प्रमाण कमी राहील.
    गादी वाफे तयार करण्यापूर्वी दर आर क्षेत्रात (१ गुंठ्यास) एक गाडी याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे, गादी वाफा तयार झाल्यावर दर चौ. मी. क्षेत्रावर तीन किलो याप्रमाणे चांगल्या कंपोस्ट खताचा थर दयावा. नंतर त्यावर दर आर क्षेत्रास २ किलो अमोनिअम सल्फेट किंवा १ किलो युरिया खत द्यावे. पावसाला सुरु होताच ७ ते ८ से.मी. अंतरावर ओळीत व १ ते २ से. मी. खोल बियाणे पेरून मातीने झाकावे. पावसाचा अंदाज पाहून साधारणतः ३ ते ४ दिवस आधी धूळवाफेवरही बियाणे पेरण्यास हरकत नाही. पेरणीनंतर १५ दिवसांनी परत दर आर क्षेत्रास २ किलो अमोनिअम सल्फेट किंवा १ किलो युरिया खत द्यावे. एक हेक्टर लागवडीसाठी १० आर (१० गुंठे) क्षेत्रावर बियाणे वापरून रोपे तयार करावीत. प्रती हेक्टरी लागणारे बियाणे हे दाण्याची प्रत आणि लावणीच्या वेळी एक चौ. मी. मधील चुडांच्या संख्येवर अवलंबून आहे. प्रती हेक्टर क्षेत्राला लागणारे बियाणे पुढीलप्रमाणे

КОМЕНТАРІ • 24

  • @swatilele8055
    @swatilele8055 2 роки тому

    खूप छान उपयुक्त माहिती.
    मला गेल्या वर्षी चांगला रिझल्ट मिळाला 👍

  • @sachinbane8839
    @sachinbane8839 5 років тому +1

    चांगली माहिती

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 роки тому

    पारंपरिक पद्धती मधे कोळपणी होत नाही
    फुटवे येण्यासाठी जमीन पणलुज राहावी
    लागते मुळे मजबूत झाल्याने उत्पादन चांगले
    येते.

  • @Event24vinod
    @Event24vinod 5 років тому +1

    दादा तुमच्या मिठबाव ला , गाव गाता गजाली, च शूटिंग झालं आहे का? हे खरं आहे का?

  • @rajaramshinde2321
    @rajaramshinde2321 4 роки тому

    लागणीचा व्हिडीओ असेल तर पाठवा

  • @sunilapte8386
    @sunilapte8386 5 років тому +1

    अरे माझा काका हा.... कुठे भेटला...

  • @shashikantkambli7271
    @shashikantkambli7271 5 років тому

    आ पटे साहेब आपला नं द्या

  • @sanjayjadhav6829
    @sanjayjadhav6829 4 роки тому

    रब्बी हंगामात sri पद्धतीने भात लावणी करता येईल का

  • @swatilele8055
    @swatilele8055 3 роки тому

    आपटे साहेबांचा नंबर मिळेल का

  • @rajendrak.rawool7009
    @rajendrak.rawool7009 5 років тому +2

    चंगली माहीती दिली

  • @shrutiapte4742
    @shrutiapte4742 5 років тому +2

    वा छान काका👌👌👍👍

  • @ranjitrane9
    @ranjitrane9 5 років тому +1

    एक विनंती, पुढच्या वेळी कोकणात मसाला पिकं कोण करत असतील तर त्यांचा एक व्हिडिओ बनवा .

  • @AbasoChavanFarmerHypnotist
    @AbasoChavanFarmerHypnotist 4 роки тому

    SRT सगुणा राईस पद्धतपण फायद्याची आहे

  • @prasadsathe5847
    @prasadsathe5847 5 років тому +1

    चांगली माहिती दिली

  • @krunalyerme9502
    @krunalyerme9502 4 роки тому

    Khat oushadhi konti waprle te TR sanga

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 5 років тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मानतो .

  • @satishjoshi7226
    @satishjoshi7226 4 роки тому

    उत्तम माहिती , उत्तम मराठी भाषेत

  • @usmankalsekar
    @usmankalsekar 5 років тому

    12 guntha madhye kitti kharch yet asel

  • @usmankalsekar
    @usmankalsekar 5 років тому

    kitti guntha ahye ha plot

  • @kundanpalande3249
    @kundanpalande3249 5 років тому

    Beblya kuthe ahe pragat bhava